Sarvatmaka shivsundara lyrics
सर्वात्मका, शिवसुंदरा-प्रार्थना
कुसुमाग्रज यांची सुंदर प्रार्थना ,सर्वात्मका, शिवसुंदरा,प्रार्थना , (marathi prarthna), Sarvatmaka Shivsundara, सर्वात्मका, शिवसुंदरा,प्रार्थना lyrics

सर्वात्मका शिवसुंदरा
सर्वात्मका, शिवसुंदरा स्वीकार या अभिवादना
तिमिरातूनी तेजाकडे प्रभू आमुच्या ने जीवना ॥ धृ. ॥
सुमनांत तू, गगनांत तू
ताऱ्यांमध्ये फुलतोस तू
सद्धर्म जे जगतामध्ये
सर्वांत त्या वसतोस तू
चोहीकडे रूपे तुझी जाणीव ही माझ्या मना ॥ १ ॥
श्रमतोस तू शेतामध्ये
तू राबसी श्रमिकांसवे
जे रंजले अन गांजले
पुसतोस त्यांची आसवे
स्वार्थावीना सेवा जिथे तेथे तुझे पद पावना ॥ २ ॥
न्यायार्थ जे लढती रणी
तलवार तू त्यांच्या करी
ध्येयार्थ जे तमी चालती
तू दीप त्यांच्या अंतरी
ज्ञानार्थ जे तपती मुनी, होतोस त्या तू साधना ॥ ३ ॥
करुणाकरा, करुणा तुझी
असता मला भय कोठले ?
मार्गावरी पुढती सदा
पाहीन मी तव पाउले
सृजनत्व या हृदयामध्ये नित जागवी भीतीविना ॥ ४ ॥
अधिक माहिती मिळवण्यासाठी …..
राष्ट्रगीत विषयी अधिक माहितीसाठी – येथे क्लिक करा
मराठी,हिंदी,संस्कृत व इंग्रजी प्रतिज्ञा अधिक माहितीसाठी – येथे क्लिक करा
5वी शिष्यवृत्ती – येथे क्लिक करा
8वी शिष्यवृत्ती – येथे क्लिक करा
DECLAIMER-
वरील सर्व माहिती ही संग्रहित असून आपण पडताळून पहावी. काही चुका असू शकतात. फक्त शैक्षणिक माहिती असल्याने आम्ही कोणतेही कायदेशीर हक्क (copy right) सांगत नाही.
8 thoughts