Pravas kachryacha
12वा पाठ – इयत्ता तिसरी– Pravas kachryacha,प्रवास कचऱ्याचा
प्रवास कचऱ्याचा -Pravas kachryacha पाठावर स्वाध्याय – टेस्ट
प्रवास कचऱ्याचा पाठाचा सार –
इयत्ता तिसरी धडा शिकवणारे बाईंनी मुलांच्या सहभागाने एक उपक्रम राबवला.त्यांनी मुलांना ओला व सुका कचरा यातील फरक सांगितला.कचऱ्याचा प्रवास समजावून सांगितला व कचऱ्याचे अनेक उपयोग सांगितले.
थोडक्यात उत्तरे लिहा.
प्रश्न-१) परिसर स्वच्छ करतो तसे आपणही स्वच्छ राहायला हवे ,स्वतःला स्वच्छ ठेवण्यासाठी तुम्हाला काय काय करता येईल ते सांगा व लिहा.
उत्तर- दररोज सकाळी दात स्वच्छ करणे.
स्वच्छ आंघोळ करणे.
स्वच्छ धुतलेले कपडे घालने.
आठवड्यातून एकदा नखे कापणे.
महिन्यातून एकदा केस कापणे.
जेवल्यानंतर दात स्वच्छ घासणे.
खेळून आल्यानंतर हातपाय तोंड स्वच्छ धुणे.
काही खाऊन झाल्यानंतर हात व तोंड स्वच्छ धुणे.
प्रश्न-२) पुढील वस्तूंमधून सुका व ओला कचरा यांचा गट बनवा.
केळ्यांच्या साली,साधे कागद, खरकटे, तुटका कप, तुटके पेन, कॅरीबॅग ,शिळे अन्न, पालेभाज्यांची देठे, फळांच्या साली,सडलेली फळे,तुटकी खेळणी,
ओला कचरा- केळ्यांच्या साली,खरकटे,शिळे अन्न,सडलेली फळे,पालेभाज्यांची देठे,फळांच्या साली
सुका कचरा-कागद, तुटके पेन, तुटकी खेळणी, कॅरीबॅग, तुटका कप,खराब वहीचा पुठ्ठा.
दीर्घोत्तरी प्रश्न
प्रश्न- पुढील प्रसंग वाचा यांमध्ये मुलांकडे स्वच्छतेसाठी लागणाऱ्या काही आवश्यक गोष्टी नाहीत पण स्वच्छता तर व्हायलाच हवे ते काय करू शकतील ते सुचवा.
प्रश्न-१) सुनिता मावशीकडे राहायला आली होती. सकाळी दात घासायला जाताना तिला आठवले की तिच्या ब्रश घरीच विसरून आली ती आता दात कसे साफ करू शकते?
उत्तर- सुनिता लिंबाच्या काडीने दात घासू शकते किंवा बोटावर पेस्ट घेऊन दात घासू शकते.
प्रश्न-२) जमील अंघोळ करत होता दोन तांबे पाणी ओतले आणि त्याच्या लक्षात आले कि मोरीतला साबण संपलेला आहे आता जमीलला अंग स्वच्छ करण्यासाठी काय करता येईल ?
उत्तर- जमीला कडुलिंबाच्या पाण्याने अंग घासून शकतो किंवा लिंबाच्या सालींची अंग घासू शकतो.
प्रश्न-३) रोहित सकाळी उठला. शौचालयात जाऊन आला. हात धुवायला साबण नव्हता ,आता तो हात कसे स्वच्छ करेल?
उत्तर- हात जमिनीवर घासून रोहित हात स्वच्छ करू शकतो.
प्रश्न-४) नखांमध्ये घाण साचू साचून राहते. तसे होऊ नये म्हणून सरांनी नखे कापून यायला सांगितले होते. पण आमच्या घरात नेलकटर नव्हते. मग अंबुला काय करता येईल?
उत्तर- अंबुला धारदार छोट्या कात्रीने हळुवारपणे नखे काढता येतील.
👍
Govinda shamrao padghan