25.नवा पैलू | 6वी, मराठी

25.नवा पैलू

6वी,मराठी

प्रश्न- तीन-चार वाक्यांत उत्तरे लिहा

१) आजी नातवाला लवकर चल, म्हणून घाई का करीत होती?
उत्तर : आजी नातवाला दवाखान्यात घेऊन चालली होती. त्याच वेळी आभाळ गच्च ढगानी दाटून कुठल्याही
क्षणी पाऊस कोसळेल असे वातावरण होते. स्टैंडपासून दवाखाना जवळ होता, पण दिगू हळूहळू चालला हाता. पाऊस सुरू
कायच्या आत दवाखान्यात पोहोचले पाहिजे होते, म्हणून आजी नातवाला लवकर चल म्हणून घाई करात होती.

 

२) रिक्षावाल्याच्या बोलण्याने आजीच्या डोळ्यांत पाणी का आले?

उत्तर : दिगूला ऐकू येत नव्हते. दवाखान्यात जाताना एकाएकी दिगू रिक्षाच्या समोर आला. रिक्षाचा आवाज
आजीला ऐकू आला, पण दिगूला ऐकू आला नाही. रिक्षावाल्याला हे माहीत नसल्यामुळे तो दिगूवर ‘ बहिरा आहेस की
काय?’ असे म्हणत ओरडला. आजीने रिक्षावाल्याचे बोलणे ऐकले. आपल्या नातवाच्या बहिरेपणाबद्दल वाईट वाटून
आजीच्या डोळ्यांत पाणी आले.

 

३) वत्सलाबाईनी आजीला घरी येण्याचा आग्रह का केला?
उत्तर : शहराच्या डॉक्टराबद्दल आजी जे पुटपुटत होती ते वत्सलाबाईंनी ऐकले होते. रिक्षावाल्याने दिगुला
हटकलेलेही पाहिले होते. आजीची अवस्था व दिगुचे बहिरेपण वत्सलाबाईच्या लक्षात आले होते. वत्सलाबाई
मूक-बधिर मुलांच्या शाळेत शिक्षिका होती. दिगूवर इलाज करता यावा, या उद्देशाने वत्सलाबाईनी आजीला घरी
येण्याचा आग्रह केला.

 

४) शाळेत गेल्यावर आजीला आनंद का झाला ?

उत्तर : वत्सलाबाई आजीला घेऊन मूक-बधिरांच्या शाळेत आली. शाळेत हेडफोन्स लावून बसलेली मुले,
माईकमधून शिकवणार्या बाई हे सगळे आजीने पाहिले. एक बाई एका छोट्या मुलाला यंत्राच्या मदतीने गोष्ट शिकवत
होत्या. बहिच्या मुलाच्या तोंडून बाहेर पडलेले उच्चार ऐकण्यास आजी आतुर झाल्या आणि ते मूल बाईसारखे हसत
हसत बोलले. हे ऐकून आपला दिगूही असाच बोलेल अशी आजीने मनोमन कल्पना केल्यामुळे आजीला आनंद झाला.

 

५) मूक-बधिरांची शाळा पाहून आजीच्या मनात कोणते विचार आले?
उत्तर : वत्सलाबाईंच्या मूक-बधिर शाळेत दिगूला ठेवायचे असे आजीने ठरवले. आजीच्या मनात विचार आला
की आपल्याही खेड्यात अशी मूक-बधिर शाळा काढली तर…! शेत विकून येणाऱ्या पैशांत मूक -बधिर शाळा काढायचे
आजीने ठरवले. आजीने विचार केला की आपल्या गावची मुले शाळेत जातील, शिकतील, त्यांना वळण लागेल. ती स्वत:च्या पायावर उभी राहतील.

का ते लिहा-

1.आजी शहरात गेली.

उत्तर : दिगू बहिरा आहे हे कळल्यापासून आजी चिंतेत होती. गावातल्या लोकांच्या सांगण्यावरून दिगूचा
चांगला इलाज व्हावा, म्हणून आजी शहरात डॉक्टरांकडे गेली.

 

२) आजी वत्सलाबाईच्या घरी गेली.
उत्तर : दवाखाना बंद होता. पाऊस कोसळत होता. अशा परिस्थितीत वत्सलाबाईंनी आजीला घरी येण्याचा
आग्रह केला. ‘उद्या मी तुम्हांला जे दाखवीन, ते पाहून तुम्ही हसत घरी जाल’ या वत्सलाबाईंच्या सांगण्याच्या मोहात पडल्यामुळे आजी त्यांच्या घरी गेली.

 

३) आजीने गावात शाळा काढायची ठरवले.
उत्तर :आजीला स्वत:च्या दुःखावरून सर्वच मुक्या मुलांच्या दुःखाची जाणीव झाली. आपल्या खेड्यातील गावात शाळा काढायचे ठरवले.

प्रश्न- थोडक्यात उत्तरे लिहा.

१) वत्सलाबद्दल पाच ते सहा ओळी लिहा.
इत्तर : वत्सला या बाई मूक-बधिरांच्या शाळेत शिक्षिका होत्या. त्यांचा स्वभाव अत्यंत हसरा व आनंदी होता.
नी विचार केला की बोलकी मुले शिकतात, हसतात, खेळतात, आनंदी जीवन जगतात. अशा मुलांना कोणीही
शिकवौल, परंतु ज्यांच्या वाट्याला बहिरेपणाचे व मुकेपणाचे दुःख आले आहे, त्यांना कोण शिकवणार? या मुक्या
कळयांना कोण उमलवणार?-अशा मुलांच्या चेह्यांवर अभिमानाचे, विश्वासाचे हसू फुलवायचे आणि त्यांच्यातले
स्वत्व जागवायचे, असा पक्का निश्चय करून वत्सलाबाईंनी व्रतस्थपणे मूक-बधिरांच्या शाळेत शिक्षिकेचे काम
पत्करले. त्यांनी दिगूलाही आपल्या शाळेत इलाजासाठी आणले.

 

२) या पाठाला ‘नवा पैलू’ हे शीर्षक आहे, ते योग्य कसे ते थोडक्यात लिहा.
उत्तर : आजीने दिगूला वत्सलाबाईंच्या मूक-बधिरांच्या शाळेत घातले. त्यांना खूप आनंद झाला. पण आपल्या
नातवाचेच भले व्हावे, असा त्यांनी स्वार्थी विचार केला नाही. त्यांनी आपल्या गावी अशी शाळा काढण्याचा मनोदय
व्यक्त केला. त्यासाठी गावची जमीन विकून पैसा उभा करण्याचे ठरवले. आजीच्या मनातील ही उदात्त भावना
त्यांच्या व्यक्तिमत्त्वाचा ‘नवा पैलू’ दर्शवते. म्हातारपणातही समाजसेवेचा धडा आजीने इतरांना दिला. म्हणून ‘नवा
पैलू’ हे शीर्षक योग्य आहे.

 

३) आजीच्या थोर विचारांबाबत पाच ते सात ओळी लिहा.
उत्तर : दिगूच्या आजाराबाबत आजी विवंचनेत होती. वत्सलाबाईंची शाळा पाहिल्यावर त्यांना आशेचा किरण दिसला. नातवाच्या दुःखावरून त्यांना सर्वच मूक-बधिर मुलांच्या दुःखाची जाणीव झाली. त्यांचा मनात विचार आला.
आपल्याही खेड्यात अशी मूक-बधिरांसाठी शाळा काढायला हवी. त्या लगेच कृतिशील झाल्या. त्यांनी विचार केला. एक शेत विकले तर लाखाला जाईल. शाळा काढूया. माझ्या गावची मुले शाळेत जातील, शिकतील, त्यांना वळण लागून ती स्वत:च्या पायावर उभी राहतील. असे उदात्त व क्रियाशील विचार आजीच्या मनात आले.

 

प्रश्न- पुढील शब्दसमूहांचा वाक्यांत उपयोग करा.
१) खंत करणे : डोळ्याने अधू असणाच्या बेबीचे पुढे कसे होईल, याची आईला नेहमी खंत वाटते.

२) दिङ्मूढ होणे : वयाच्या तिसर्या वर्षी संगणक सफाईने हाताळणाऱ्या राजूला पाहून काका दिङ्मुढ झाळे

३) स्वाभिमान : प्राचीन भारतीय संस्कृतीचा व मी भारतीय आहे याचा मला स्वाभिमान आहे.

४) विश्वासाचे हास्य फुलणे : सरांनी सुदेशला शाबासकी देताच त्याच्या चेहऱ्यावर विश्वासाचे हास्य फलते

५) पक्का निर्धार करणे : पहाटे उठून अभ्यास करण्याचा सुनंदाने पक्का निर्धार केला.

६) धक्का बसणे : प्रकाशने चोरी केली, हे कळल्यावर मित्रांना धक्का बसला.

७) जाणीव होणे : परीक्षा जवळ आली, आता तरी अभ्यासाला गंभीरपणे सुरुवात करायला हवी, याची मोहनला जाणीव झाली.

(८) थक्क होणे : उन्हात पाऊस पडताना पाहून मुले थक्क झाली.

Author: Active Guruji

Blogger

3 thoughts

आपल्या प्रतिक्रिया लिहा.

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.