26. संतवाणी | 6वी ,मराठी

26. संतवाणी

6वी ,मराठी

अभंग-1) संत बहिणाबाई


भावार्थ-

लिंबाच्या झाडाला कडवटपणा कोण देतो?

ऊसाला गोड कोण करतो?
बीज कडू असेल, तर फळ कडू येते. बीज गोड असेल, तर फळ गोड येते , हा चवींचा न्याय आहे.
इंद्रवन वनस्पतीच्या मुळांत विष कोण घालते ?

आंब्याला अमृताची मधुरता कोण देते ?
बचनाग वनस्पतीच्या अंगात विष कोणी भिनवले?

फुलाला सुगंध बाहेरून आणावा लागत नाही. त्याच्या गाभ्यातच सुगंध असतो.
मोहरीला तिखटपणा कोण देतो?

खारकेत गोडवा कोण निर्माण करतो?
संत बहिणाबाई म्हणतात-

जसे ,बीज असते, तसे फळ मिळते. उत्तम काय आणि वाईट काय, याची परीक्षा
करावी.

अभंग-2) संत निर्मळा

भावार्थ-

संत निर्मळा म्हणतात – रात्रंदिवस माझे मन तळमळत आहे. माझ्या जिवाला खूप हळहळ वाटते.
माझी पावले आता मला दिसत नाहीत. संसाराच्या जंजाळात मी गळ्यापर्यंत बुडाली आहे.
प्रपंचाचा मला खूप वीट आला आहे. हे देवा, मला बसलेला हा संसाराचा पाश तोडून टाक.

संत निर्मळा म्हणतात –

देवा, आता मला संसारापासून परकेपणा येऊ दे, चोखामेळ्याची शपथ मी तुम्हांला
घालते आहे.

अभंग-3) फादर थॉमस स्टीफन्स

भावार्थ-

फादर स्टीफन्स मराठी भाषेचा गौरव करताना म्हणतात- तेजामध्ये रत्नाचे तेज उत्तम असते, रत्नांमध्ये निळा हिरा जसा उत्कृष्ट असतो. त्याप्रमाणे सर्व भाषांमध्ये उत्तम भाषा मराठी आहे.
जसे फुलांमध्ये मोगऱ्याचे  सुंदर असते किंवा सुगंधामध्ये कस्तुरीचा सुगंध सगळ्यांत छान असतो; तशी सर्व भाषात मराठी भाषा सुंदर आहे.
जसा पक्ष्यांमध्ये मोर देखणा आहे; झाडांमध्ये कल्पतरू सर्वांत फलदायी आहे; तसा सर्व भाषामध्ये मराठी भाषेचा मान थोर आहे.

सर्व तारकांमध्ये जशा बारा राशीच्या तारका महत्त्वाच्या आहेत; सात वारांमध्ये सूर्याचा वार – रविवार व चंद्राचा वार सोमवार हे दोन वार महत्त्वाचे आहेत; त्याप्रमाणे आशिया खंडात सर्व भाषांमध्ये मराठी बोली सर्वोत्तम आहे.

 

Author: Active Guruji

Blogger

2 thoughts

आपल्या अनमोल प्रतिक्रियेबद्दल आभार.

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.