2.देवा तुझे किती | 2री, मराठी ,प्रश्नोत्तरे

देवा तुझे किती

१ ) आपल्याला प्रकाश कोणापासून मिळतो ?

उत्तर -आपल्याला सूर्यापासून प्रकाश मिळतो .

२ ) आकाशाला समानार्थी शब्द सांग .

उत्तर – आकाश – नभ ,आभाळ

३ ) ‘प्रकाश’ या शब्दाला विरुद्धार्थी शब्द लिही .

उत्तर – प्रकाश * अंधार

४ ) चांदणे कशामुळे पडते ?

उत्तर – चांदणे हे चंद्र व चांदण्यामुळे पडते.

५ ) गोड गाणी कोण गातात ?

उत्तर -गोड गाणी सुंदर पाखरे गातात .

६ ) वेलींना सुंदर काय येतात ?

उत्तर -वेलींना सुंदर फुले येतात .

७ ) विरुद्धार्थी शब्द लिही .

उत्तर – सुंदर  * कुरूप

८ ) लहान मुले कोणाची देणगी आहेत ?

उत्तर -लहान मुले देवाची देणगी आहेत .

९ ) वचन बदलून  लिही .

उत्तर -१) मुल- मुले  2)तारा – तारे

१० ) अयोग्य जोडी ओळख .

१) देव – दानव  ,2) सुंदर – कुरूप ,३) उंच – बुटका, ४) मुल -मुले

उत्तर – ४) मुल -मुले

Author: Active Guruji

Blogger

आपल्या प्रतिक्रिया लिहा.

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.