8 august | 8 ऑगस्ट दिनविशेष, शालेय परिपाठ, Daily Routine

8 august

8 ऑगस्ट दिनविशेष

शालेय परिपाठ, Daily Routine

वार- मंगळवार

दिनांक- 08/08/2023, 8ऑगस्ट

मिती- अधिक श्रावण कृ. 8

शके– 1945

सुविचार- संकटकाळी जो मदत करतो तोच खरा मित्र असतो. A friend in need is a friend indeed.

म्हणी व अर्थ : अंथरूण पाहून पाय पसरावे : आपली आवक जेवढी असेल तेवढेच पैसे खर्च करावे.

वाक्प्रचार- सामोरे जाणे – निधड्या छातीने संकटास तोंड देणे.

ठळक घटना आणि घडामोडी

ऑगस्ट ८ हा ग्रेगरी दिनदर्शिकेनुसार वर्षातील २१९ वा किंवा लीप वर्षात २२० वा दिवस असतो.

सोळावे शतक

  • १५०९ – सम्राट कृष्णदेवरायचा राज्याभिषेक व विजयनगर साम्राज्याची स्थापना.

अठरावे शतक

  • १७८६ – जॉक बाल्मात व मिशेल-गॅब्रियेल पकार्डनी युरोपमधील सर्वोच्च शिखर मॉॅंत ब्लांकवर सर्वप्रथम सफल चढाई केली.

एकोणिसावे शतक

  • १८६३ – गेटिसबर्गच्या लढाईत हार पत्करल्यावर दक्षिणेच्या सेनापती रॉबर्ट ई. लीने राजीनामा दिला(जो अस्वीकृत झाला).

विसावे शतक

  • १९१८ – पहिले महायुद्ध-अमियेन्सची लढाई – दोस्त राष्ट्रांची जर्मनीविरुद्ध आगेकूच.
  • १९४२ – दुसरे महायुद्ध – अमेरिकेत ६ जर्मन व्यक्तींना हेर असल्याच्या आरोपाखाली मृत्युदंड.
  • १९४२ – चले जाव आंदोलन – मुंबईतील अधिवेशनात भारतीय राष्ट्रीय कॉॅंग्रेसने चले जावचा ठराव मंजूर केला.
  • १९४५ – सोवियेत संघाने जपानविरुद्ध युद्ध पुकारले व मांचुरियावर आक्रमण केले.
  • १९४९ – भूतानची स्थापना.
  • १९६३ – इंग्लंडच्या बकिंगहॅमशायर काउंटीत दरोडेखोरांनी रेल्वेतून २६,००,००० ब्रिटीश पाउंड लुटले.
  • १९७४ – वॉटरगेट कुभांड – अमेरिकन राष्ट्राध्यक्ष रिचर्ड निक्सनने राजीनामा दिला.
  • १९८८ – म्यानमारचा राज्यकर्ता ने विनने राजीनामा दिला.

जन्म

  • १०७९ – गो-होरिकावा, जपानी सम्राट.
  • १८७५ – आर्तुर दा सिल्वा बर्नार्देस, ब्राझिलचा राष्ट्राध्यक्ष.
  • १८७९ – एमिलियो झपाता, मेक्सिकन क्रांतीकारी.
  • १८८० – अर्ल पेज, ऑस्ट्रेलियाचा ११वा पंतप्रधान.
  • १८८९ – जॅक रायडर, इंग्लिश क्रिकेट खेळाडू.
  • १९०२ – पॉल डिरॅक, इंग्लिश भौतिकशास्त्रज्ञ.
  • १९०९ – बिल व्होस, इंग्लिश क्रिकेट खेळाडू.
  • १९२१ – वुलिमिरी रामलिंगस्वामी, भारतीय वैद्यकीयशास्त्रज्ञ.
  • १९२५ – अलिजा इझेत्बेगोव्हिक, बॉस्निया-हर्झगोव्हेनाचा राष्ट्राध्यक्ष.
  • १९४० – दिलीप सरदेसाई, भारतीय क्रिकेट खेळाडू.
  • १९५१ – फिल कार्लसन, ऑस्ट्रेलियन क्रिकेट खेळाडू.
  • १९५२ – सुधाकर राव, भारतीय क्रिकेट खेळाडू.
  • १९६४ – पॉल टेलर, इंग्लिश क्रिकेट खेळाडू.
  • १९६५ – ॲंगस फ्रेझर, इंग्लिश क्रिकेट खेळाडू.
  • १९६८ – अबेय कुरूविला, भारतीय क्रिकेट खेळाडू.
  • १९७३ – शेन ली, ऑस्ट्रेलियन क्रिकेट खेळाडू.
  • १९७७ – मोहम्मद वासिम, पाकिस्तानी क्रिकेट खेळाडू.
  • १९८१ – रॉजर फेडरर, स्विस टेनिस खेळाडू.

मृत्यू

  • ८६९ – लोथार, लोथारिंजियाचा राजा.

प्रतिवार्षिक पालन

  • पितृ दिन – तैवान (मॅंडेरिन भाषेत बा बा या शब्दांचा अर्थ वडील असा होतो!)

राष्ट्रगीत

जनगणमन अधिनायक जय हे

भारत भाग्य-विधाता |

पंजाब, सिंधू, गुजरात, मराठा, द्राविड, उत्कल, बंग,

विंध्य, हिमाचल, यमुना, गंगा,

उच्छल जलधितरंग,

तव शुभ नामे जागे तव शुभ आशिस मागे,

गाहे तव जयगाथा,

जनगण मंगलदायक जय हे,

भारत भाग्य-विधाता|

जय हे, जय हे, जय हे,

जय जय जय, जय हे ||

@_राष्ट्रगीत विषयी अधिक माहितीसाठी – येथे क्लिक करा

प्रतिज्ञा

भारत माझा देश आहे.

सारे भारतीय माझे बांधव आहेत.

माझ्या देशावर माझे प्रेम आहे.

माझ्या देशातल्या समृद्ध आणि

विविधतेने नटलेल्या परंपरांचा मला अभिमान आहे.

त्या परंपरांचा पाईक होण्याची पात्रता

माझ्या अंगी यावी म्हणून मी सदैव प्रयत्न करेन.

मी माझ्या पालकांचा, गुरुजनांचा आणि

वडीलधाऱ्या माणसांचा मान ठेवीन

आणि प्रत्येकाशी सौजन्याने वागेन.

माझा देश आणि माझे देशबांधव

यांच्याशी निष्ठा राखण्याची

मी प्रतिज्ञा करीत आहे.

त्यांचे कल्याण आणि

त्यांची समृद्धी ह्यांतच माझे

सौख्य सामावले आहे.

जय हिंद…

@_मराठी,हिंदी,संस्कृत व इंग्रजी प्रतिज्ञा अधिक माहितीसाठी – येथे क्लिक करा

राज्यगीत

जय जय महाराष्ट्र माझा, गर्जा महाराष्ट्र माझा

जय जय महाराष्ट्र माझा, गर्जा महाराष्ट्र माझा ॥धृ॥

भिती न आम्हा तुझी मुळी ही गडगडणाऱ्या नभा

अस्मानाच्या सुलतानीला जबाब देती जिभा

सह्याद्रीचा सिंह गर्जतो शिव शंभू राजा

दरी दरीतन नाद गुंजला महाराष्ट्र माझा

जय जय महाराष्ट्र माझा, गर्जा महाराष्ट्र माझा ॥१॥

काळ्या छातीवरी कोरली, अभिमानाची लेणी

पोलादी मनगटेखेळती, खेळ जीव घेणी

दारिद्रयाच्या उन्हात शिजला

निढळाच्या घामाने भिजला

देश गौरवासाठी झिजला

दिल्लीचे ही तख्त राखितो, महाराष्ट्र माझा

जय जय महाराष्ट्र माझा, गर्जा महाराष्ट्र माझा

जय जय महाराष्ट्र माझा ॥२॥

@_जय जय महाराष्ट्र माझा mp3

अधिक माहितीसाठी – येथे क्लिक करा

भारताचे संविधान

उद्देशिका

आम्ही, भारताचे लोक, भारताचे एक सार्वभौम

समाजवादी धर्मनिरपेक्ष लोकशाही गणराज्य घडविण्याचा

व त्याच्या सर्व नागरिकांस

सामाजिक, आर्थिक व राजनैतिक न्याय;

विचार, अभिव्यक्ती, विश्वास, श्रद्धा

व उपासना यांचे स्वातंत्र्य;

दर्जाची व संधीची समानता;

निश्चितपणे प्राप्त करून देण्याचा

आणि त्या सर्वांमध्ये व्यक्तीची प्रतिष्ठा व राष्ट्राची एकता

आणि एकात्मता यांचे आश्वासन देणारी बंधुता

प्रवर्धित करण्याचा संकल्पपूर्वक निर्धार करून;

आमच्या संविधानसभेत

आज दिनांक सव्वीस नोव्हेंबर, १९४९ रोजी

याद्वारे हे संविधान अंगीकृत आणि अधिनियमित

करून स्वतःप्रत अर्पण करीत आहोत.

@_भारताचे संविधानविषयी अधिक माहितीसाठी – येथे क्लिक करा

प्रार्थना

असो तुला देवा !
माझा सदा नमस्कार
तुझ्या दयादातृत्वाला अंत नाही पार ॥धृ॥
तुझ्या कृपेने रे होतील
फुले फत्तराची
तुझ्या कृपेने रे होतील
मोती मृत्तिकेची
तुझ्या कृपेने रे होतील
सर्प रम्य हार
असो तुला देवा ! माझा सदा नमस्कार ॥१॥
तुझ्या कृपेने होइल
उषा त्या निशेची
तुझ्या कृपेने होइल
सुधा त्या विषाची
तुझ्या कृपेने होइल
पंगु सिंधुपार
असो तुला देवा ! माझा सदा नमस्कार ॥२॥
तुझ्या कृपासिंधूमधला
बिंदू जरी मिळेल
तरि प्रभो ! शतजन्मांची
मतृषा शमेल
तुझे म्हणुनि आलो राया !
बघत बघत दार
असो तुला देवा ! माझा सदा नमस्कार ॥३॥
  1. असो तुला देवा माझा
  2. देह मंदिर,चित्त मंदिर
  3. सर्वात्मका शिवसुंदरा
  4. केशवा माधवा
  5. या भारतात
  6. इतनी शक्ती हमे देना
  7. सत्यम शिवम सुंदरां
  8. हा देश माझा
  9. खरा तो एकची धर्म
  10. हंस वाहिनी
  11. तुम्ही हो माता
  12. शारदे मां
  13. ऐ मलिक तेरे बंदे
  14. हमको मन की शक्ती

बोधकथा

साधू आणि गवळण
एका गावात एक साधू राहत होता लोक त्याचा फार आदर करत असत. त्या गावात दुसऱ्या गावातून दुध विकण्यासाठी एक गरीब गवळण येत असे. सर्वात प्रथम ती साधूला दुध आणून देत असे.
त्यानंतर ती गावातील इतर लोकांकडे दुध वाढत असे. एके दिवशी तिला येण्यास उशीर झाला. साधूने तिला कारण विचारले तेंव्हा तिने उत्तर दिले, “आज नदी पार करायला नाव उशिरा मिळाली, त्यामुळे येण्यास उशीर झाला.”
साधू हसत म्हणाला “लोक तर ईश्वराच्या नावावर संसारसागर पार करतात आणि तुला नदी पार करायला नाव लागते. असे वाटते कि तुला ईश्वरावर विश्वास नाही.” त्या भोळ्या गवळणीवर या बोलण्याचा खूपच परिणाम झाला.
दुसऱ्या दिवशी पहाटेच ती गवळण साधूच्या आश्रमाच्या दारात साधूला हाक मारू लागली. साधू त्यावेळी अजून झोपलेले होते. तिच्या हाकेने साधू जागा झाला. दार उघडताच तिला पाहून साधू हैराण झाला.
त्याने विचारले, “रोजच्या वेळेपेक्षा आज तुम्ही लवकर कशा काय आलात?” गवळण म्हणाली,”महाराज! तुमच्या उपदेशाने माझे काम झाले, नावेची समस्या कायमची संपली. रोजचे भाडे वाचले,
आपल्या सांगण्यानुसार ईश्वराचे नाव घेतले आणि नदी पार करून आले” साधूचा या गोष्टीवर विश्वास बसला नाही.
जेंव्हा ती नदीच्या रस्त्याने जाऊ लागली, तेंव्हा साधूही तिच्यापाठोपाठ नदीत गेला. जेंव्हा पाण्याची पातळी वाढली तेंव्हा साधू घाबरून पाण्यात पडला आणि वाचविण्यासाठी आवाज देवू लागला, तेंव्हा गवळणीने त्यांना पाण्यातून बाहेर काढले आणि विचारले,” तुम्ही आपलाच उपदेश अंमलात आणून जर ईश्वराकडे प्रार्थना केली असती तर तुम्ही नदी पार करू शकला असता.”
गवळणीचा ईश्वरावरील गाढ विश्वास पाहून शरमिंदा झाला.
तात्पर्य : दृढ निश्चयाने सर्व काही साध्य होते.

@_बोधकथा अधिक माहितीसाठी – येथे क्लिक करा

पसायदान

आता विश्वात्मकें देवें । येणे वाग्यज्ञें तोषावें ।

तोषोनिं मज द्यावे । पसायदान हें ॥

जें खळांची व्यंकटी सांडो । तया सत्कर्मी- रती वाढो ।

भूतां परस्परे पडो । मैत्र जिवाचें ॥

दुरितांचे तिमिर जावो । विश्व स्वधर्म सूर्यें पाहो ।

जो जे वांच्छिल तो तें लाहो । प्राणिजात ॥

वर्षत सकळ मंगळी । ईश्वरनिष्ठांची मांदियाळी ।

अनवरत भूमंडळी । भेटतु भूतां ॥

चलां कल्पतरूंचे आरव । चेतना चिंतामणींचें गाव ।

बोलते जे अर्णव । पीयूषाचे ॥

चंद्रमे जे अलांछन । मार्तंड जे तापहीन ।

ते सर्वांही सदा सज्जन । सोयरे होतु ॥

किंबहुना सर्व सुखी । पूर्ण होऊनि तिन्हीं लोकी ।

भजिजो आदिपुरुखी । अखंडित ॥

आणि ग्रंथोपजीविये । विशेषीं लोकीं इयें ।

दृष्टादृष्ट विजयें । होआवे जी ॥

येथ ह्मणे श्री विश्वेशराओ । हा होईल दान पसावो ।

येणें वरें ज्ञानदेवो । सुखिया जाला ॥

@_पसायदान विषयी अधिक माहितीसाठी – येथे क्लिक करा

देशभक्तीपर गीत

बलसागर भारत होवो, विश्वात शोभुनी राहो
हे कंकण करि बांधियले, जनसेवे जीवन दिधले
राष्ट्रार्थ प्राण हे उरले, मी सिद्ध मरायाला हो
वैभवी देश चढवीन, सर्वस्व त्यास अर्पीन
तिमीर घोर संहारीन, या बंधु सहाय्याला हो
हातांत हात घेऊन, हृदयास हृदय जोडून
ऐक्याचा मंत्र जपून, या कार्य करायाला हो
करि दिव्य पताका घेऊ, प्रिय भारतगीते गाऊ
विश्वास पराक्रम दावू, ही माय निजपदा लाहो
या उठा करू हो शर्थ, संपादु दिव्य पुरुषार्थ
हे जीवन ना तरि व्यर्थ, भाग्यसूर्य तळपत राहो
ही माय थोर होईल, वैभवे दिव्य शोभेल
जगतास शांति देईल, तो सोन्याचा दिन येवो
कवी : साने गुरुजी

बालगीत

चांदोबा चांदोबा भागलास का ?
निंबोणीच्या झाडामागे लपलास का ?
निंबोणीचे झाड करवंदी,
मामाचा वाडा चिरेबंदी !
आई-बाबांवर रुसलास का ?
असाच एकटा बसलास का ?
आता तरी परतुनी जाशील का ?
दूध न्‌ शेवया खाशील का ?
आई बिचारी रडत असेल,
बाबांचा पारा चढत असेल !
असाच बसून राहशील का ?
बाबांची बोलणी खाशील का ?
चांदोबा, चांदोबा कुठे रे गेला ?
दिसता दिसता गडप झाला !
हाकेला ‘ओ’ माझ्या देशील का ?
पुन्हा कधी आम्हाला दिसशील का ?
कवी : ग. दि. माडगुळकर

@_बालगीते अधिक माहितीसाठी – येथे क्लिक करा

प्रश्नमंजुषा

१) आहार म्हणजे काय ?
उत्तर: दिवसभरात आपण जे खाद्यपदार्थ खातो व पेयपदार्थ पितो त्या सर्वांना मिळून आहार असे म्हणतात.
२) कोकणात जास्त  काय पिकतो ?
उत्तर : कोकणात भात भरपूर पिकतो .
३) कोकणातील लोकांच्या आहारात काय असते?
उत्तर : कोकणातील लोकांच्या आहारात मासे व भात असतो.
४) खूप भूक कोणती कामे केल्यावर लागते ?
उत्तर : अंग मेहनतीची कामे केल्यावर खूप भूक लागते.
५ ) ओला हरभरा बाजारात कोणत्या ऋतूत येतो ?
उत्तर : ओला हरभरा बाजारात हिवाळा ऋतूत येतो.

ENGLISH QUESTION

1) Where does the Sheep live?
Ans : Pen
2) Where does the Tiger live?
Ans : Den
3) Where does the Frog  live?
Ans : Pond
4) Where does the Sparrow live?
Ans : Nest
5) Where does the Snake  live?
Ans : Hole

अधिक माहिती मिळवण्यासाठी …..

@_राष्ट्रगीत विषयी अधिक माहितीसाठी – येथे क्लिक करा

@_मराठी,हिंदी,संस्कृत व इंग्रजी प्रतिज्ञा अधिक माहितीसाठी – येथे क्लिक करा

@_बालगीते अधिक माहितीसाठी – येथे क्लिक करा

@_पसायदान विषयी अधिक माहितीसाठी – येथे क्लिक करा

@_बोधकथा अधिक माहितीसाठी – येथे क्लिक करा

@_छान छान गोष्टी अधिक माहितीसाठी – येथे क्लिक करा

@_भारताचे संविधानविषयी अधिक माहितीसाठी – येथे क्लिक करा

@_जय जय महाराष्ट्र माझा mp3 अधिक माहितीसाठी – येथे क्लिक करा

Tags

#8 august, 8 august 2023, 8 august 2021 panchang, 8 august 2022 special day, 8 august 2023 weather, 8 august 2022 panchang in hindi, 8 august is celebrated as, what is celebrated on 8 august, 8 august 2022,

शालेय परिपाठ,परिपाठ दाखवा,मराठी परिपाठ,परिपाठ शायरी,शालेय परिपाठ सूत्रसंचालन,परिपाठ सुविचार,हिंदी परिपाठ

DECLAIMER

वरील सर्व माहिती ही संग्रहित असून आपण पडताळून पहावी. काही चुका असू शकतात. फक्त शैक्षणिक माहिती असल्याने आम्ही कोणतेही कायदेशीर हक्क (copy right) सांगत नाही.

Author: Active Guruji

Blogger

आपल्या प्रतिक्रिया लिहा.

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.