31 जानेवारी दिनविशेष | शालेय परिपाठ, Daily Routine

31 जानेवारी दिनविशेष

शालेय परिपाठ, Daily Routine

आज वार– मंगळवार

दिनांक- 31/01/2023

मिती- माघ शुक्ल-10

शके– 1944

सुविचार- आज वाईट आहे.उद्या चांगली येईल.वेळच तर आहे, बदलून नक्की जाईल.

म्हणी व अर्थ-
अंथरूण पाहून पाय पसरावे.
अर्थ- आपल्या ऐपतीप्रमाणे खर्च ठेवावा.
31 जानेवारी दिनविशेष
31 जानेवारी दिनविशेष

आजचा दिनविशेष-

जानेवारी ३१ हा ग्रेगरी दिनदर्शिकेनुसार वर्षातील ३१ वा किंवा लीप वर्षात ३१ वा दिवस असतो.

जानेवारी महिन्यातील परिपाठ पाहण्यासाठी

येथे क्लिक करा

ठळक घटना आणि घडामोडी-

सोळावे शतक-

१५०४ – फ्रान्सने नेपल्स आरागोनच्या राज्याला दिले.

एकोणिसावे शतक-

१८६५ – अमेरिकन यादवी युद्ध – रॉबर्ट ई. ली दक्षिणेच्या सरसेनापतीपदी.

१८७६ – अमेरिकेने स्थानिक रहिवाश्यांना आरक्षित जमिनींवर स्थलांतर करण्यास भाग पाडणारा हुकूम काढला.

विसावे शतक-

१९१५ – पहिले महायुद्ध – जर्मनीने रशियाच्या सैन्याविरुद्ध विषारी वायूचा उपयोग केला.

१९२० – डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी मूकनायक या साप्ताहिकाचा पहिला अंक प्रसिद्ध केला.

१९२९ – सोवियेत संघाने लिओन ट्रोट्स्कीला हद्दपार केले.

१९३० – ३एम या अमेरिकन कंपनीने स्कॉच टेप विकायला सुरुवात केली.

१९४५ – अमेरिकेने एडी स्लोव्हिक या सैनिकाला युद्धातून पळ काढल्याबद्दल मृत्युदंड दिला.

१९५० – राष्ट्रपती म्हणून डॉ.राजेंद्रप्रसाद यांचे संसदेपुढे पहिले भाषण. त्यापूर्वी ते घटना समितीचे अध्यक्ष होते.

१९५३ – नेदरलॅंड्समध्ये पूर. १,८०० ठार.

१९५६ – गाय मोले फ्रांसच्या पंतप्रधानपदी.

१९५८ – अमेरिकेच्या पहिला कृत्रिम उपग्रह एक्स्प्लोरर १ ने पृथ्वीप्रदक्षिणा सुरू केली.

१९६८ – व्हियेतकॉंग ने सैगोनमधील अमेरिकन राजदूतावासावर हल्ला केला.

१९६८ – नौरूला ऑस्ट्रेलियापासून स्वातंत्र्य.

१९७१ – अपोलो १४ चंद्राकडे निघाले.

१९९६ – अतिरेक्यांनी श्रीलंकेत कोलंबोमध्ये स्फोटके भरलेला ट्रक मध्यवर्ती बँकेच्या दारावर उडवला. ८६ ठार. १,४०० जखमी.

एकविसावे शतक-

२००० – अलास्का एअरलाईन्सचे एम.डी.८३ जातीचे विमान कॅलिफोर्नियात मालिबु जवळ कोसळले. ८८ ठार.

जन्म-

१३३८ – चार्ल्स पाचवा, फ्रान्सचा राजा.

१५१२ – हेन्री, पोर्तुगालचा राजा.

१८८५ – ॲना पावलोव्ह, विख्यात रशियन नर्तिका.

१८९६ – दत्तात्रय रामचंद्र बेंद्रे, ज्ञानपीठ पुरस्कार विजेते कन्नड महाकवी.

१९३१ – गंगाधर महांबरे, ज्येष्ठ संगीतकार

१९३८ – बियाट्रिक्स, नेदरलॅंड्सची राणी.

१९७५ – प्रिती झिंटा, हिंदी चित्रपट अभिनेत्री.

मृत्यू-

१३९८ – सुको, जपानी सम्राट.

१४३५ – सुवांदे, चीनी सम्राट.

१५८० – हेन्री, पोर्तुगालचा राजा.

१७८८ – चार्ल्स एडवर्ड स्टुअर्ट, इंग्लंडचा स्वयंघोषित राजा.

१८१५ – होजे फेलिक्स रिबास, व्हेनेझुएलाचा स्वातंत्र्यसैनिक.

१९७२ – महेंद्र नेपाळचा राजा.

१९९४ – वसंत जोगळेकर, मराठी व हिंदी चित्रपट निर्माते व दिग्दर्शक.

२००० – के.एन.सिंग, प्रसिद्ध चित्रपट अभिनेते.

२००४ – सुरैय्या, ज्येष्ठ गायिका व अभिनेत्री.

२००६ – कोरेटा स्कॉट किंग, मार्टिन ल्युथर किंगची पत्नी.

प्रतिवार्षिक पालन-

स्वातंत्र्य दिन – नौरू.

राष्ट्रगीत-

जनगणमन अधिनायक जय हे

भारत भाग्य-विधाता |

पंजाब, सिंधू, गुजरात, मराठा, द्राविड, उत्कल, बंग,

विंध्य, हिमाचल, यमुना, गंगा,

उच्छल जलधितरंग,

तव शुभ नामे जागे तव शुभ आशिस मागे,

गाहे तव जयगाथा,

जनगण मंगलदायक जय हे,

भारत भाग्य-विधाता|

जय हे, जय हे, जय हे,

जय जय जय, जय हे ||

प्रतिज्ञा-

भारत माझा देश आहे.

सारे भारतीय माझे बांधव आहेत.

माझ्या देशावर माझे प्रेम आहे.

माझ्या देशातल्या समृद्ध आणि

विविधतेने नटलेल्या परंपरांचा मला अभिमान आहे.

त्या परंपरांचा पाईक होण्याची पात्रता

माझ्या अंगी यावी म्हणून मी सदैव प्रयत्न करेन.

मी माझ्या पालकांचा, गुरुजनांचा आणि

वडीलधाऱ्या माणसांचा मान ठेवीन

आणि प्रत्येकाशी सौजन्याने वागेन.

माझा देश आणि माझे देशबांधव

यांच्याशी निष्ठा राखण्याची

मी प्रतिज्ञा करीत आहे.

त्यांचे कल्याण आणि

त्यांची समृद्धी ह्यांतच माझे

सौख्य सामावले आहे.

जय हिंद

भारताचे संविधान 

उद्देशिका

आम्ही, भारताचे लोक, भारताचे एक सार्वभौम

समाजवादी धर्मनिरपेक्ष लोकशाही गणराज्य घडविण्याचा

व त्याच्या सर्व नागरिकांस

सामाजिक, आर्थिक व राजनैतिक न्याय;

विचार, अभिव्यक्ती, विश्वास, श्रद्धा

व उपासना यांचे स्वातंत्र्य;

दर्जाची व संधीची समानता;

निश्चितपणे प्राप्त करून देण्याचा

आणि त्या सर्वांमध्ये व्यक्तीची प्रतिष्ठा व राष्ट्राची एकता

आणि एकात्मता यांचे आश्वासन देणारी बंधुता

प्रवर्धित करण्याचा संकल्पपूर्वक निर्धार करून;

आमच्या संविधानसभेत

आज दिनांक सव्वीस नोव्हेंबर, १९४९ रोजी

याद्वारे हे संविधान अंगीकृत आणि अधिनियमित

करून स्वतःप्रत अर्पण करीत आहोत.

प्रार्थना-

सत्यम शिवम सुंदरा
नमस्कार माझा या ज्ञान मंदिरा
सत्यम शिवम सुंदरा,
सत्यम शिवम सुंदरा ।। धृ.।।
शब्दरूप शक्ति दे,
भावरूप भक्ती दे
प्रगतीचे पंख दे
चिमणपाखरा, चिमणपाखरा
ज्ञान मंदिरा …
सत्यम शिवम सुंदरा, सत्यम शिवम सुंदरा ।।१।।
विद्याधन दे आम्हांस,
एक छंद एक ध्यास
नाव नेई पैलतीरी
दयासागरा, दयासागरा
ज्ञान मंदिरा … …
सत्यम शिवम सुंदरा,
सत्यम शिवम सुंदरा ।।२।।
होऊ आम्ही नीतिमंत,
कलागुणी बुद्धीमंत,
कीर्तिचा कळस जाई उंच अंबरा, उंच अंबरा
ज्ञान मंदिरा …
सत्यम शिवम सुंदरा,
सत्यम शिवम सुंदरा ।।३।।

मनाचे श्लोक

महासंकटी सोडिले देव जेणे।
प्रतापे बळे आगळा सर्वगूणे॥
जयाते स्मरे शैलजा शूलपाणी ।
नुपेक्षी कदा राम दासाभिमानी ॥१॥
अहल्या शिळा राघवे मुक्त केली ।
पदी लागता दिव्य होऊनि गेली ॥
जया वर्णिता शीणली वेदवाणी ।
नुपेक्षी कदा राम दासाभिमानी ॥२॥
वसे मेरुमांदार हे सृष्टिलीला ।
शशी सूर्य तारांगणे मेघमाला॥
चिरंजीव केले जनीं दास दोन्ही ।
नुपेक्षी कदा राम दासाभिमानी ॥३॥
उपेक्षी कदा रामरूपी असेना।
जिवा मानवा निश्चयो तो वसेना ॥
शिरी भार वाहेन बोले पुराणी।
नुपेक्षी कदा राम दासाभिमानी ॥४॥
असे हो जया अंतरी भाव जैसा ।
वसे हो तया अंतरी देव तैसा॥
अनन्यास रक्षीतसे चापपाणी।
नुपेक्षी कदा राम दासाभिमानी ॥३५॥

बोधकथा-

एका बाईला एक मुलगा व एक मुलगी होती. देवाने मुलाला रूप, तर मुलीला गुण दिले होते. आईचे दोन्ही मुलांवर खूप प्रेम होते. एकदा भाऊ आरशासमोर उभा राहून गर्वाने आपल्या बहिणीला म्हणाला, “ताई गं, मी बघ किती सुंदर, नाही तर तू ?
भावाचे हे बोलणे बहिणीच्या मनाला लागले. ती आपल्या आईकडे गेली भावाची तक्रार केली. यावर आईने दोघांनाही जवळ बोलावले, प्रेमाने समजूत काढली.
आई पहिल्यांदा मुलाला म्हणाली, अरे बाळा, नुसते रूप काय कामाचे? नुसत्या रूपाला या जगात किंमत नाही.
तेव्हा तू जसा दिसायला सुंदर आहेस, तसा गुणानेही सुंदर हो. त्यानंतर आई आपल्या मुलीला म्हणाली, हे बघ बाळे, तू गुणी तर आहेसच. देवाने तुला रूप दिले नाही म्हणून वाईट वाटू नकोस. छान नीटनेटकी रहा, सर्वांशी इतकी चांगली वाग. तुझ्या रूपाकडे कुणाचेच लक्ष जाणार नाही.
तात्पर्य:-
जगात पुढे जाण्यासाठी नुसते चांगले रूप असून चालत नाही, तर त्याला सद्गुणाची जोड द्यावी लागते.

पसायदान-

आता विश्वात्मकें देवें । येणे वाग्यज्ञें तोषावें ।

तोषोनिं मज द्यावे । पसायदान हें ॥

जें खळांची व्यंकटी सांडो । तया सत्कर्मी- रती वाढो ।

भूतां परस्परे पडो । मैत्र जिवाचें ॥

दुरितांचे तिमिर जावो । विश्व स्वधर्म सूर्यें पाहो ।

जो जे वांच्छिल तो तें लाहो । प्राणिजात ॥

वर्षत सकळ मंगळी । ईश्वरनिष्ठांची मांदियाळी ।

अनवरत भूमंडळी । भेटतु भूतां ॥

चलां कल्पतरूंचे आरव । चेतना चिंतामणींचें गाव ।

बोलते जे अर्णव । पीयूषाचे ॥

चंद्रमे जे अलांछन । मार्तंड जे तापहीन ।

ते सर्वांही सदा सज्जन । सोयरे होतु ॥

किंबहुना सर्व सुखी । पूर्ण होऊनि तिन्हीं लोकी ।

भजिजो आदिपुरुखी । अखंडित ॥

आणि ग्रंथोपजीविये । विशेषीं लोकीं इयें ।

दृष्टादृष्ट विजयें । होआवे जी ॥

येथ ह्मणे श्री विश्वेशराओ । हा होईल दान पसावो ।

येणें वरें ज्ञानदेवो । सुखिया जाला ॥

देशभक्तीपर गीत-

विजयी विश्व तिरंगा प्यारा, झंडा ऊँचा रहे हमारा।
सदा शक्ति बरसाने वाला,
प्रेम सुधा सरसाने वाला
वीरों को हरषाने वाला
मातृभूमि का तन-मन सारा, झंडा ऊँचा रहे हमारा।
स्वतंत्रता के भीषण रण में,
लखकर जोश बढ़े क्षण-क्षण में,
काँपे शत्रु देखकर मन में,
मिट जावे भय संकट सारा, झंडा ऊँचा रहे हमारा।
इस झंडे के नीचे निर्भय,
हो स्वराज जनता का निश्चय,
बोलो भारत माता की जय,
स्वतंत्रता ही ध्येय हमारा, झंडा ऊँचा रहे हमारा।
आओ प्यारे वीरों आओ,
देश-जाति पर बलि-बलि जाओ,
एक साथ सब मिलकर गाओ,
प्यारा भारत देश हमारा, झंडा ऊँचा रहे हमारा।
इसकी शान न जाने पावे,
चाहे जान भले ही जावे,
विश्व-विजय करके दिखलावे,
तब होवे प्रण-पूर्ण हमारा, झंडा ऊँचा रहे हमारा।

बालगीत-

असावा सुंदर चॉकलेटचा बंगला
चंदेरी सोनेरी चमचमता चांगला
चॉकलेटच्या बंगल्याला टॉफीचं दार
शेपटीच्या झुपक्यानं झाडून जाईल खार
गोल गोल लेमनच्या खिडक्या दोन
“हॅलो, हॅलो !” करायला छोटासा फोन !
बिस्कटांच्या गच्‍चीवर मोर छानदार
पेपरमिंटच्या अंगणात फुलं लाललाल
चांदीच्या झाडामागं चांदोबा रहातो
मोत्यांच्या फुलांतून लपाछपी खेळतो
उंच उंच झोक्याचा खेळ रंगला
मैनेचा पिंजरा वर टांगला
किती किती सुंदर चॉकलेटचा बंगला
चंदेरी सोनेरी चमचमता चांगला
कवी : राजा मंगळवेढेकर

सामान्यज्ञान

स्वतंत्र भारताचे पहिले शिक्षणमंत्री कोण होते?
मौलाना आझाद हे स्वतंत्र भारताचे पहिले शिक्षणमंत्री  होते.
जन गण मन  हे राष्ट्रगीत कोणी रचले?
जन गण मन हे राष्ट्रगीत रवींद्रनाथ टागोर यांनी रचले.
रवींद्रनाथ टागोर यांना किती साली नोबेल पारितोषिक मिळाले?
रवींद्रनाथ टागोर यांना १९१३ साली पारितोषिक मिळाले.
आपले राष्ट्रीय दिवस कोणते आहेत?
स्वातंत्र्यदिन व प्रजासत्ताक दिन हे आपले राष्ट्रीय उत्सव आहेत.
भारतीय संविधानाची अंमलबजावणी कधीपासून सुरू करण्यात आली?
भारतीय संविधानाची अंमलबजावणी २६ जानेवारी १९५० पासून सुरू करण्यात आली.

मराठी परिपाठ

परिपाठ,
सुविचार,
Marathi paripath pdf,
Paripath,
Sutrasanchalan,
आजचा दिनविशेष,
दिनविशेष,
आजचा दिनविशेष,
मराठी दिनविशेष,
इतिहासातील जागतिक दिवस,
ठळक घटना,
वाढदिवस,
स्मृती दिवसांची संदर्भासहित

Author: Active Guruji

Blogger

आपल्या प्रतिक्रिया लिहा.

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.