1 फेब्रुवारी दिनविशेष | शालेय परिपाठ, Daily Routine

1 फेब्रुवारी दिनविशेष

शालेय परिपाठ, Daily Routine

आज वार– बुधवार

दिनांक- 01/02/2023

मिती- माघ शुक्ल-11

शके– 1944

सुविचार- इतरांचे दुर्गुण शोधणापेक्षा त्यांच्यातील सदगुण शोधावे.

म्हणी व अर्थ-
नकटे व्हावे पण धाकटे होऊ नये-
अर्थ : परिस्थितीशी जुळवून घ्यावे पण लाचारी पत्कारु नये.

मागील महिन्यातील परिपाठ पाहण्यासाठी

डिसेंबर, जानेवारी , फेब्रुवारी महिन्यावर क्लिक करा.

आजचा दिनविशेष- जया एकादशी, कोस्टगार्ड दिवस

ठळक घटना आणि घडामोडी-

सतरावे शतक-

१६६२ – ९ महिने वेढा घातल्यावर चीनच्या सेनापती कॉक्सिंगाने तैवान जिंकले.

अठरावे शतक-

१७९० – न्यू यॉर्कमध्ये अमेरिकेच्या सर्वोच्च न्यायालयाचे पहिले सत्र सुरू झाले.

१७९३ – फ्रांसने नेदरलँड्स व युनायटेड किंग्डम विरुद्ध युद्ध पुकारले.

एकोणिसावे शतक-

१८१४ – फिलिपाईन्सच्या मेयोन ज्वालामुखीचा उद्रेक १,२०० ठार.

१८६१ – अमेरिकन यादवी युद्ध – टेक्सास अमेरिकेपासून विभक्त झाले.

१८८४ – ऑक्सफर्ड इंग्लिश डिक्शनरीची पहिली आवृत्ती प्रकाशित. तेव्हापासून ऑक्सफर्डच्या कोशांचे काम अव्याहतपणे चालूच आहे.

विसावे शतक-

१९०८ – पोर्तुगालचा राजा कार्लोस पहिला व राजकुमार लुइस फिलिपेची हत्या.

१९१२ – कवी बी (नारायण मुरलीधर गुप्ते) यांची “चाफा ” ही कविता मनोरंजन मासिकात प्रसिद्ध झाली.

१९२० – कॅनडात रॉयल केनेडियन माउंटेड पोलिस तथा माउंटीज् या पोलीस संघटनेची स्थापना.

१९४३ – दुसरे महायुद्ध – नाझी सैन्याने व्हिडकुन क्विस्लिंगला नॉर्वेच्या पंतप्रधानपदी बसवले.

१९४६ – नॉर्वेच्या त्रिग्वे लीची संयुक्त राष्ट्रांच्या प्रथम सरचिटणीस पदी निवड.

१९६२ – मराठा रेजिमेंट सिक्सची स्थापना

१९७४ – साओ पाउलो, ब्राझिलमध्ये कार्यालये असलेल्या ईमारतीला आग. १८९ ठार, २९३ जखमी.

१९७९ – रुहोल्ला खोमेनी १५ वर्षांनी परत ईराणमध्ये आला.

१९८१ – ऑस्ट्रेलिया व न्यू झीलंडमधील क्रिकेट एक दिवसीय सामन्यात शेवटच्या चेंडुवर न्यू झीलंडला ६ धावा हव्या असताना ग्रेग चॅपलने आपला भाउ ट्रेव्हर चॅपलला अंडरआर्म फेकी करण्यास सांगितले. ट्रेव्हरने तसे केले, ऑस्ट्रेलिया सामना जिंकले परंतु यानंतर अंडरआर्म फेकी बेकायदा ठरवण्यात आली.

१९९१ – लॉस एंजेलस आंतरराष्ट्रीय विमानतळावर यु.एस. एरचे विमान दुसऱ्या छोट्या विमानाला धडकले. ३५ ठार.

१९९२ – भोपाळच्या मुख्य न्यायाधीशांनी युनियन कार्बाइडचा मुख्य अधिकारी वॉरेन अँडरसनला फरारी घोषित केले.

एकविसावे शतक-

२००२ – आयर्लंडमधील शांतता प्रक्रियेला चालना देणाऱ्या ‘गुड फ्रायडे’ कराराचे शिल्पकार जॉन ह्यूम यांना राष्ट्रपती के.आर.नारायणन यांच्या हस्ते प्रतिष्ठेचा गांधी शांतता पुरस्कार प्रदान.

२००३ – अंतराळातून परतताना स्पेस शटल कोलंबियाचा स्फोट. सात अंतराळवीर मृत्युमुखी.

२००४ – मक्केत हज चालु असताना चेंगराचेंगरीत २४४ ठार.

जन्म-

१८८१ – टिप स्नूक, दक्षिण आफ्रिकेचा क्रिकेट खेळाडू.

१८८२ – लुई स्टीवन सेंट लॉरें, कॅनडाचा १२वा पंतप्रधान.

१८८४ – सिद्धेश्वरशास्त्री चित्राव, प्राच्यविद्यापंडित, मराठी कोशकार.

१९०१ – क्लार्क गेबल, अमेरिकन अभिनेता.

१९०४ – बाबूराव घोलप , शिक्षणमहर्षी

१९१० – जहांगीर खान, भारतीय क्रिकेट खेळाडू.

१९१२ – राजा नीलकंठ बढे, मराठी कवी.

१९२२ – क्लिफर्ड मॅकवॉट, वेस्ट ईंडीझचा क्रिकेट खेळाडू.

१९२७ – म. द. हातकणंगलेकर, मराठी साहित्यिक.

१९२९ – जयंतराव साळगावकर, ज्योतिषी, कालनिर्णयकार

१९३० – शहाबुद्दीन अहमद, बांगलादेशी राष्ट्राध्यक्ष.

१९३१ – बोरिस येल्त्सिन, रशियन राष्ट्राध्यक्ष.

१९३१ – इयाजुद्दीन अहमद, बांगलादेशी राष्ट्राध्यक्ष.

१९४२ – डेव्हिड सिनकॉक, ऑस्ट्रेलियन क्रिकेट खेळाडू.

१९४४ – अरुण टिकेकर, मराठी पत्रकार.

१९५० – नसीर मलिक, पाकिस्तानी क्रिकेट खेळाडू.

१९५८ – जॅकी श्रॉफ, भारतीय चित्रपट अभिनेता.

१९६५ – डेव्ह कॅलाहन, दक्षिण आफ्रिकेचा क्रिकेट खेळाडू.

१९६९ – महबुबुर रहमान, बांगलादेशी क्रिकेट खेळाडू.

१९७१ – अजय जडेजा, भारतीय क्रिकेट खेळाडू.

१९७२ – कर्टली ऍम्ब्रोझ, वेस्ट ईंडीझचा क्रिकेट खेळाडू.

१९८१ – ग्रेम स्मिथ, दक्षिण आफ्रिकेचा क्रिकेट खेळाडू.

१९८२ – शोएब मलिक, पाकिस्तानी क्रिकेट खेळाडू.

मृत्यू-

१३२८ – चार्ल्स चौथा, फ्रांसचा राजा.

१५६३ – मेनास, इथियोपियाचा सम्राट.

१६९१ – पोप अलेक्झांडर आठवा.

१७३३ – ऑगस्टस दुसरा, पोलंडचा राजा.

१९०८ – कार्लोस पहिला, पोर्तुगालचा राजा.

१९८१ – डोनाल्ड विल्स डग्लस, सिनियर, अमेरिकन विमानतंत्रज्ञ.

१९९५ – मोतीराम गजानन रांगणेकर, मराठी नाटककार

२००३ – स्पेस शटल कोलंबियातील अंतराळवीर –

मायकेल पी. अँडरसनडेव्हिड ब्राउन

कल्पना चावला

लॉरेल क्लार्क

रिक डी. हसबंड

विली मॅककूल

इलान रमोन

प्रतिवार्षिक पालन-

शेती तंत्रज्ञान प्रसार दिन

तटरक्षक दिन

राष्ट्रगीत-

जनगणमन अधिनायक जय हे

भारत भाग्य-विधाता |

पंजाब, सिंधू, गुजरात, मराठा, द्राविड, उत्कल, बंग,

विंध्य, हिमाचल, यमुना, गंगा,

उच्छल जलधितरंग,

तव शुभ नामे जागे तव शुभ आशिस मागे,

गाहे तव जयगाथा,

जनगण मंगलदायक जय हे,

भारत भाग्य-विधाता|

जय हे, जय हे, जय हे,

जय जय जय, जय हे ||

प्रतिज्ञा-

भारत माझा देश आहे.

सारे भारतीय माझे बांधव आहेत.

माझ्या देशावर माझे प्रेम आहे.

माझ्या देशातल्या समृद्ध आणि

विविधतेने नटलेल्या परंपरांचा मला अभिमान आहे.

त्या परंपरांचा पाईक होण्याची पात्रता

माझ्या अंगी यावी म्हणून मी सदैव प्रयत्न करेन.

मी माझ्या पालकांचा, गुरुजनांचा आणि

वडीलधाऱ्या माणसांचा मान ठेवीन

आणि प्रत्येकाशी सौजन्याने वागेन.

माझा देश आणि माझे देशबांधव

यांच्याशी निष्ठा राखण्याची

मी प्रतिज्ञा करीत आहे.

त्यांचे कल्याण आणि

त्यांची समृद्धी ह्यांतच माझे

सौख्य सामावले आहे.

जय हिंद

भारताचे संविधान 

उद्देशिका

आम्ही, भारताचे लोक, भारताचे एक सार्वभौम

समाजवादी धर्मनिरपेक्ष लोकशाही गणराज्य घडविण्याचा

व त्याच्या सर्व नागरिकांस

सामाजिक, आर्थिक व राजनैतिक न्याय;

विचार, अभिव्यक्ती, विश्वास, श्रद्धा

व उपासना यांचे स्वातंत्र्य;

दर्जाची व संधीची समानता;

निश्चितपणे प्राप्त करून देण्याचा

आणि त्या सर्वांमध्ये व्यक्तीची प्रतिष्ठा व राष्ट्राची एकता

आणि एकात्मता यांचे आश्वासन देणारी बंधुता

प्रवर्धित करण्याचा संकल्पपूर्वक निर्धार करून;

आमच्या संविधानसभेत

आज दिनांक सव्वीस नोव्हेंबर, १९४९ रोजी

याद्वारे हे संविधान अंगीकृत आणि अधिनियमित

करून स्वतःप्रत अर्पण करीत आहोत.

प्रार्थना-

देह मंदिर चित्तमंदिर 
देह मंदिर, चित्तमंदिर, एक तेथे प्रार्थना
सत्य सुंदर मंगलाची नित्य हो आराधना
दु:खितांचे दु:ख जावो ही मनाची कामना
वेदना जाणावयाला जागवू संवेदना
दुर्बलांच्या रक्षणाला पौरूषाची साधना
सत्य सुंदर मंगलाची नित्य हो आराधना
जीवनी नवतेज राहो अंतरंगी भावना
सुंदराचा वेध लागो मानवाच्या जीवना
शौर्य लाभो, धैर्य लाभो, सत्यता संशोधना
सत्य सुंदर मंगलाची नित्य हो आराधना
भेद सारे मावळू द्या वैर सार्‍या वासना
मानवांच्या एकतेची पूर्ण होवो कल्पना
मुक्त आम्ही फक्त मानू बंधुतेच्या बंधना
सत्य सुंदर मंगलाची नित्य हो आराधना

बोधकथा-

लोभी राजा
फार फार वर्षापूर्वीची गोष्ट. इंद्रप्रस्थ एका आटपाट नगराचा राजा होता. त्याच्या राज्यात सर्व काही छान चालले होते. पण तरीही राजा अस्वस्थ होता. कारण त्याच्याकडे भरपूर धन होते. तरीही त्याला अजून धन मिळावे असे वाटे.
एके दिवशी त्याच्या दरबारात एक थोर तपस्वी येतो. राजा दोन दिवस त्यांची मनोभावे सेवा करतो. ते पाहून तो तपस्वी खूश होतो व त्याला म्हणतो, ‍’राजा, तू माझी जी सेवा केली त्याने मी प्रसन्न झालो आहे. तू पाहिजे तो वर माग’. तो लोभी राजा म्हणातो, ‘मला असा वर द्या की मी ज्या वस्तूला हात लावेन ती सोन्याची होईल.’ तपस्वी म्हणतो, ‘नीट विचार कर. नंतर पश्चाताप करशील.’
राजा आपल्या मागणीवर ठाम असतो. तपस्वी तथास्तू म्हणतो. राजा लगेच शेजारच्या सिंहासनाला हात लावतो. ते सोन्याचे होते. तो खूष होतो. मग तो पुढे ज्या वस्तूंना हात लावतो, त्या सोन्याच्या व्हायला लागतात. थोड्यावेळाने त्याला भूक लागते. म्हणन तो फलाहार करायला जातो, पण ती फळेही सोन्याची होतात.
त्याला काहीच खाता, पिता येत नाही. कारण ज्याला तो हात लावी ते सोन्याचे होई. निराश झालेला राजा आपल्या सिंहासनावर बसलेला असताना त्याची मुलगी बागेतून खेळून त्याच्याकडे येते. तो आनंदातने तिला घेण्यासाठी हात करतो, तर ती ती सोन्याची होऊन जाते. राजा अतिशय दु:खी होतो.
त्याला एकदम रडू कोसळते. त्याची लाडकी मुलगी त्याला मिळालेल्या वरामुळे सोन्याची मूर्ती होऊन बसली होती. त्याला आपली चुक कळते, पण आता फार उशीर झालेला असतो.
तात्‍पर्य:- कोणत्याही गोष्टीचा अति लोभ वाईटच.

पसायदान-

आता विश्वात्मकें देवें । येणे वाग्यज्ञें तोषावें ।

तोषोनिं मज द्यावे । पसायदान हें ॥

जें खळांची व्यंकटी सांडो । तया सत्कर्मी- रती वाढो ।

भूतां परस्परे पडो । मैत्र जिवाचें ॥

दुरितांचे तिमिर जावो । विश्व स्वधर्म सूर्यें पाहो ।

जो जे वांच्छिल तो तें लाहो । प्राणिजात ॥

वर्षत सकळ मंगळी । ईश्वरनिष्ठांची मांदियाळी ।

अनवरत भूमंडळी । भेटतु भूतां ॥

चलां कल्पतरूंचे आरव । चेतना चिंतामणींचें गाव ।

बोलते जे अर्णव । पीयूषाचे ॥

चंद्रमे जे अलांछन । मार्तंड जे तापहीन ।

ते सर्वांही सदा सज्जन । सोयरे होतु ॥

किंबहुना सर्व सुखी । पूर्ण होऊनि तिन्हीं लोकी ।

भजिजो आदिपुरुखी । अखंडित ॥

आणि ग्रंथोपजीविये । विशेषीं लोकीं इयें ।

दृष्टादृष्ट विजयें । होआवे जी ॥

येथ ह्मणे श्री विश्वेशराओ । हा होईल दान पसावो ।

येणें वरें ज्ञानदेवो । सुखिया जाला ॥

देशभक्तीपर गीत-

विजयी विश्व तिरंगा प्यारा, झंडा ऊँचा रहे हमारा।
सदा शक्ति बरसाने वाला,
प्रेम सुधा सरसाने वाला
वीरों को हरषाने वाला
मातृभूमि का तन-मन सारा, झंडा ऊँचा रहे हमारा।
स्वतंत्रता के भीषण रण में,
लखकर जोश बढ़े क्षण-क्षण में,
काँपे शत्रु देखकर मन में,
मिट जावे भय संकट सारा, झंडा ऊँचा रहे हमारा।
इस झंडे के नीचे निर्भय,
हो स्वराज जनता का निश्चय,
बोलो भारत माता की जय,
स्वतंत्रता ही ध्येय हमारा, झंडा ऊँचा रहे हमारा।
आओ प्यारे वीरों आओ,
देश-जाति पर बलि-बलि जाओ,
एक साथ सब मिलकर गाओ,
प्यारा भारत देश हमारा, झंडा ऊँचा रहे हमारा।
इसकी शान न जाने पावे,
चाहे जान भले ही जावे,
विश्व-विजय करके दिखलावे,
तब होवे प्रण-पूर्ण हमारा, झंडा ऊँचा रहे हमारा।

बालगीत-

असावा सुंदर चॉकलेटचा बंगला
चंदेरी सोनेरी चमचमता चांगला
चॉकलेटच्या बंगल्याला टॉफीचं दार
शेपटीच्या झुपक्यानं झाडून जाईल खार
गोल गोल लेमनच्या खिडक्या दोन
“हॅलो, हॅलो !” करायला छोटासा फोन !
बिस्कटांच्या गच्‍चीवर मोर छानदार
पेपरमिंटच्या अंगणात फुलं लाललाल
चांदीच्या झाडामागं चांदोबा रहातो
मोत्यांच्या फुलांतून लपाछपी खेळतो
उंच उंच झोक्याचा खेळ रंगला
मैनेचा पिंजरा वर टांगला
किती किती सुंदर चॉकलेटचा बंगला
चंदेरी सोनेरी चमचमता चांगला
कवी : राजा मंगळवेढेकर

सामान्यज्ञान

स्वतंत्र भारताचे पहिले शिक्षणमंत्री कोण होते?
मौलाना आझाद हे स्वतंत्र भारताचे पहिले शिक्षणमंत्री  होते.
जन गण मन  हे राष्ट्रगीत कोणी रचले?
जन गण मन हे राष्ट्रगीत रवींद्रनाथ टागोर यांनी रचले.
रवींद्रनाथ टागोर यांना किती साली नोबेल पारितोषिक मिळाले?
रवींद्रनाथ टागोर यांना १९१३ साली पारितोषिक मिळाले.
आपले राष्ट्रीय दिवस कोणते आहेत?
स्वातंत्र्यदिन व प्रजासत्ताक दिन हे आपले राष्ट्रीय उत्सव आहेत.
भारतीय संविधानाची अंमलबजावणी कधीपासून सुरू करण्यात आली?
भारतीय संविधानाची अंमलबजावणी २६ जानेवारी १९५० पासून सुरू करण्यात आली.
How many minutes are there in an hour?
-60 minutes
How many seconds are there in a minute?
-60 seconds
How many seconds make one hour?
-3600 seconds
How many hours are there in a day?
-24 hours
How many minutes are in half hour?
-30 minutes
How many minutes are there in a quarter of an hour?
-15 minutes

मराठी परिपाठ

परिपाठ,
सुविचार,
Marathi paripath pdf,
Paripath,
Sutrasanchalan,
आजचा दिनविशेष,
दिनविशेष,
आजचा दिनविशेष,
मराठी दिनविशेष,
इतिहासातील जागतिक दिवस,
ठळक घटना,
वाढदिवस,
स्मृती दिवसांची संदर्भासहित

Author: Active Guruji

Blogger

आपल्या प्रतिक्रिया लिहा.

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.