2 फेब्रुवारी दिनविशेष
शालेय परिपाठ, Daily Routine
आज वार– गुरुवार
दिनांक- 02/02/2023
मिती- माघ शुक्ल-12
शके– 1944
सुविचार- खोटी टीका करू नका, नाहीतर प्रतिटीका ऐकावी लागेल.
मागील महिन्यातील परिपाठ पाहण्यासाठी
डिसेंबर, जानेवारी , फेब्रुवारी महिन्यावर क्लिक करा.
आजचा दिनविशेष-
- आंतरराष्ट्रीय पाणथळ जागा दिवस
- श्रीलंका राष्ट्रीय दिन
ठळक घटना आणि घडामोडी-
दहावे शतक-
९६२ – पोप जॉन बाराव्याने सुमारे ४० वर्षे रिक्त असलेल्या पवित्र रोमन सम्राट पदावर ऑट्टो पहिल्याला बसवले.
अकरावे शतक-
१०३२ – पवित्र रोमन सम्राट कॉन्राड दुसरा बरगंडीचाही राजा झाला.
बारावे शतक-
१११९ – कॅलिक्सटस दुसरा पोप पदी.
सोळावे शतक-
१५३६ – स्पेनच्या पेद्रो दि मेंदोझाने आर्जेन्टिनात बॉयनोस एर्स वसवले.
१५४२ – इथियोपियात पोर्तुगालच्या सैन्याने बासेन्तेचा गड जिंकला.
सतरावे शतक-
१६५३ – अमेरिकेत न्यूऍम्स्टरडॅम गावाची स्थापना. पुढे याचे नाव बदलून न्यू यॉर्क ठेवण्यात आले.
एकोणिसावे शतक-
१८४८ – ग्वादालुपे हिदाल्गोचा तह – मेक्सिको व अमेरिकेची संधी.
१८७८ – ग्रीसने तुर्कस्तान विरुद्ध युद्ध पुकारले.
१८८० – अमेरिकेत वाबाश, ईंडियाना येथे विजेवर चालणारा रस्त्यावरील दिवा सुरू.
१८९७ – अमेरिकेत पेनसिल्व्हेनियाचा विधानसभा आगीच्या भक्ष्यस्थानी.
विसावे शतक-
१९२५ – कुत्र्यांनी ओढलेल्या गाड्या नोम, अलास्का येथे डिप्थेरियाची लस घेउन पोचल्या. या घटनेतुन प्रेरणा घेउन इडिटारॉड स्लेड रेस सुरू झाली.
१९३३ – ऍडोल्फ हिटलरने जर्मनीची संसद बरखास्त केली.
१९४३ – दुसरे महायुद्ध – स्टॅलिनग्राडच्या लढाईनंतर जर्मनीचे सैन्य सोवियेत संघाला शरण.
१९५७ – गोवा मुक्तिसंग्राम : नानासाहेब गोरे,मधू लिमये, जगन्नाथराव जोशी यांची गोव्यातील तुरुंगातून मुक्तता
१९५७ – सिंधु नदी वरच्या गुड्डु बंधाऱ्याचे पाकिस्तानमध्ये भूमिपूजन.
१९६२ – प्लुटो व नेपच्यून ग्रह ४०० वर्षांनी एका रेषेत.
१९८९ – अफगाणिस्तानमधून शेवटचे सोवियेत सैनिक परतले.
१९९८ – फिलिपाईन्समध्ये सेबु पॅसिफिक एरचे डी.सी. ९ जातीचे विमान कोसळले. १०४ ठार.
एकविसावे शतक-
जन्म-
१२०८ – जेम्स पहिला, अरागॉनचा राजा.
१४५५ – जॉन, डेन्मार्कचा राजा.
१६४९ – पोप बेनेडिक्ट तेरावा.
१८५६ – स्वामी श्रद्धानंद, आर्य समाजाचे प्रसारक.
१८८२ – जेम्स जॉईस, आयरिश लेखक.
१८८४ – डॉ.श्रीधर केतकर, महाराष्ट्रीय ज्ञानकोशाचे संपादक, समाजशास्त्रज्ञ
१९०५ – आयन रॅंड, अमेरिकन लेखक.
१९५४ – जयंत अमरसिंघे, श्रीलंकेचा क्रिकेट खेळाडू.
१९६१ – ज्योई बेंजामिन, इंग्लिश क्रिकेट खेळाडू.
१९६८ – अमिनुल इस्लाम, बांगलादेशी क्रिकेट खेळाडू.
१९६९ – इजाझ अहमद, ज्युनियर, पाकिस्तानी क्रिकेट खेळाडू.
मृत्यू-
१२५० – एरिक अकरावा, स्वीडनचा राजा.
१४६१ – ओवेन ट्युडोर, इंग्लंडच्या ट्युडोर वंशाचा राजा.
१७६९ – पोप क्लेमेंट तेरावा.
१९१७ – महर्षी अण्णासाहेब पटवर्धन, लोकमान्य टिळकांचे स्नेही, विख्यात वैद्य.
१९३० – वासुदेव गोविंद आपटे, मराठी लेखक, पत्रकार.
१९७० – बर्ट्रान्ड रसेल, ब्रिटीश गणितज्ञ व तत्त्वज्ञानी.
१९८७ – ऍलिस्टेर मॅकलेन, स्कॉटिश लेखक.
१९९५ – फ्रेड पेरी, इंग्लिश टेनिस खेळाडू.
२००७ – विजय अरोरा, हिंदी चित्रपट अभिनेता.
प्रतिवार्षिक पालन-
ग्राउंडहॉग दिन – अमेरिका
आंतरराष्ट्रीय पाणथळ जागा दिवस
श्रीलंका राष्ट्रीय दिन
राष्ट्रगीत-
जनगणमन अधिनायक जय हे
भारत भाग्य-विधाता |
पंजाब, सिंधू, गुजरात, मराठा, द्राविड, उत्कल, बंग,
विंध्य, हिमाचल, यमुना, गंगा,
उच्छल जलधितरंग,
तव शुभ नामे जागे तव शुभ आशिस मागे,
गाहे तव जयगाथा,
जनगण मंगलदायक जय हे,
भारत भाग्य-विधाता|
जय हे, जय हे, जय हे,
जय जय जय, जय हे ||
प्रतिज्ञा-
भारत माझा देश आहे.
सारे भारतीय माझे बांधव आहेत.
माझ्या देशावर माझे प्रेम आहे.
माझ्या देशातल्या समृद्ध आणि
विविधतेने नटलेल्या परंपरांचा मला अभिमान आहे.
त्या परंपरांचा पाईक होण्याची पात्रता
माझ्या अंगी यावी म्हणून मी सदैव प्रयत्न करेन.
मी माझ्या पालकांचा, गुरुजनांचा आणि
वडीलधाऱ्या माणसांचा मान ठेवीन
आणि प्रत्येकाशी सौजन्याने वागेन.
माझा देश आणि माझे देशबांधव
यांच्याशी निष्ठा राखण्याची
मी प्रतिज्ञा करीत आहे.
त्यांचे कल्याण आणि
त्यांची समृद्धी ह्यांतच माझे
सौख्य सामावले आहे.
जय हिंद
भारताचे संविधान
उद्देशिका
आम्ही, भारताचे लोक, भारताचे एक सार्वभौम
समाजवादी धर्मनिरपेक्ष लोकशाही गणराज्य घडविण्याचा
व त्याच्या सर्व नागरिकांस
सामाजिक, आर्थिक व राजनैतिक न्याय;
विचार, अभिव्यक्ती, विश्वास, श्रद्धा
व उपासना यांचे स्वातंत्र्य;
दर्जाची व संधीची समानता;
निश्चितपणे प्राप्त करून देण्याचा
आणि त्या सर्वांमध्ये व्यक्तीची प्रतिष्ठा व राष्ट्राची एकता
आणि एकात्मता यांचे आश्वासन देणारी बंधुता
प्रवर्धित करण्याचा संकल्पपूर्वक निर्धार करून;
आमच्या संविधानसभेत
आज दिनांक सव्वीस नोव्हेंबर, १९४९ रोजी
याद्वारे हे संविधान अंगीकृत आणि अधिनियमित
करून स्वतःप्रत अर्पण करीत आहोत.
प्रार्थना-
बोधकथा-
उंदराची टोपी
उंदराची टोपी एक होता उंदिरमामा. रस्त्याने जाताना त्याला मिळाले एक फडके.फडके घेऊन तो गेला धोब्याकडे. धोब्याला म्हणाला ‘धोबीदादा,धोबीदादा माझे फडके धुवून दे. धोब्याने फडके धुवून दिले.
मग उंदिरमामा गेला शिंप्याकडे. ‘शिंपीदादा, ‘शिंपीदादा,शिंपीदादा मला एक छानशी टोपी शिवून दे, तिला रंगीत गोंडेही लाव. शिंप्याने उंदिरमामाला टोपी शिवून दिली.
उंदिरमामाने टोपी डोक्यावर घातली एक ढोलके घेतले. ते वाजवत तो गाणे गाऊ लागला ‘ राजाच्या टोपीपेक्षा माझी टोपी छान. ढुम,ढुम,ढुमक !’ राजाने हे ऐकले . तो शिपायांना म्हणाला ‘ जा रे, त्या उंदराला पकडून आणा.’
शिपायांनी उंदिरमामाला पकडले. दरबारात आणले. त्याची टोपी काढून राजाकडे दिली. मग उंदिरमामा म्हणाला ‘राजा भिकारी, माझी टोपी घेतली. ढुम,ढुम,ढुमक !’ हे ऐकून राजा खूपच रागावला. त्याने उंदराकडे टोपी भिरकावली.
उंदिरमामाने टोपी पुन्हा डोक्यावर घातली व तो गाणे गाऊ लागला ‘राजा मला भ्याला. माझी टोपी दिली. ढुम,ढुम,ढुमक !’ हे गाणे गात गात तो राजवाडयातून निघून गेला.
पसायदान-
आता विश्वात्मकें देवें । येणे वाग्यज्ञें तोषावें ।
तोषोनिं मज द्यावे । पसायदान हें ॥
जें खळांची व्यंकटी सांडो । तया सत्कर्मी- रती वाढो ।
भूतां परस्परे पडो । मैत्र जिवाचें ॥
दुरितांचे तिमिर जावो । विश्व स्वधर्म सूर्यें पाहो ।
जो जे वांच्छिल तो तें लाहो । प्राणिजात ॥
वर्षत सकळ मंगळी । ईश्वरनिष्ठांची मांदियाळी ।
अनवरत भूमंडळी । भेटतु भूतां ॥
चलां कल्पतरूंचे आरव । चेतना चिंतामणींचें गाव ।
बोलते जे अर्णव । पीयूषाचे ॥
चंद्रमे जे अलांछन । मार्तंड जे तापहीन ।
ते सर्वांही सदा सज्जन । सोयरे होतु ॥
किंबहुना सर्व सुखी । पूर्ण होऊनि तिन्हीं लोकी ।
भजिजो आदिपुरुखी । अखंडित ॥
आणि ग्रंथोपजीविये । विशेषीं लोकीं इयें ।
दृष्टादृष्ट विजयें । होआवे जी ॥
येथ ह्मणे श्री विश्वेशराओ । हा होईल दान पसावो ।
येणें वरें ज्ञानदेवो । सुखिया जाला ॥