3 फेब्रुवारी दिनविशेष
शालेय परिपाठ, Daily Routine
आज वार– शुक्रवार
दिनांक- 03/02/2023
मिती- माघ शुक्ल-13
शके– 1944
सुविचार- नम्रता हा खरा अलंकार आहे.
मागील महिन्यातील परिपाठ पाहण्यासाठी
डिसेंबर, जानेवारी , फेब्रुवारी महिन्यावर क्लिक करा.
आजचा दिनविशेष- विश्वकर्मा जयंती
ठळक घटना आणि घडामोडी-
पंधरावे शतक-
- १४५१ – महमद तिसरा ऑट्टोमान सम्राटपदी.
- १४८८ – बार्थोलोम्यु डायसने केप ऑफ गुड होपला वळसा घालुन मॉसेल बे येथे नांगर टाकला.
सोळावे शतक-
- १५०९ – तुर्कस्तान व पोर्तुगालमध्ये दीवची लढाई.
सतरावे शतक-
- १६९० – मासेच्युसेट्सने अमेरिकेतील पहिले कागदी चलन वापरायला सुरुवात केली.
अठरावे शतक-
- १७८३ – अमेरिकन क्रांती – स्पेनने अमेरिकेचे स्वातंत्र्य मान्य केले.
एकोणिसावे शतक-
- १८०९ – अमेरिकेत ईलिनॉय प्रांताची रचना.
- १८६७ – जपानचा युवराज मात्सुहितोचा सम्राट मैजी या नावाने राज्याभिषेक.
- १८७० – अमेरिकेच्या संविधानातील १५वा बदल अमलात. मतदानातील वंशभेद संपुष्टात.
विसावे शतक-
- १९१३ – अमेरिकेच्या संविधानातील १६वा बदल अमलात. केंद्रीय सरकारला आयकर घेण्यास मुभा.
- १९१६ – कॅनडात ओट्टावातील संसदेची ईमारत आगीत भस्मसात.
- १९१७ – पहिले महायुद्ध – अमेरिकेने जर्मनीशी राजकीय संबंध तोडले.
- १९३१ – न्यू झीलंडच्या नेपियर शहरात भूकंप. २३८ ठार.
- १९४२ – दुसरे महायुद्ध – नाझींनी पिएर लव्हालला फ्रांसच्या पंतप्रधानपदी बसवले.
- १९४४ – दुसरे महायुद्ध – अमेरिकन सैन्याने मार्शल द्वीपसमूह काबीज केला.
- १९५९ – विमान अपघातात अमेरिकन संगीतकार बडी हॉली, रिची व्हॅलेन्स व बिग बॉपर मृत्युमुखी.
- १९६६ – सोवियेत संघाचे लुना ९ हे मानवविरहीत अंतराळयान चंद्रावर उतरले.
- १९७२ – जपानच्या सप्पोरो शहरात हिवाळी ऑलिंपिक खेळ सुरू.
- १९८४ – स्पेस शटल चॅलेंजरच्या अंतराळवीरांनी अंतराळात प्रथमतः अनिर्बंध पदार्पण केले.
- १९८९ – दक्षिण आफ्रिकेच्या राष्ट्राध्यक्ष पी.डब्ल्यु. बोथाने राजीनामा दिला.
- १९९७ – पाकिस्तानमध्ये निवडणुका.
एकविसावे शतक-
- २००६ – लाल समुद्रात फेरी बुडाली. १,२०० ठार झाल्याची भीती.
जन्म-
- १८११ – होरेस ग्रीली, अमेरिकन पत्रकार, संपादक व प्रकाशक.
- १८३० – रॉबर्ट आर्थर टॅलबोट, युनायटेड किंग्डमचा पंतप्रधान.
- १८८७ – हुआन नेग्रिन, स्पेनचा पंतप्रधान.
- १९२० – हेन्री हाइमलिख, अमेरिकन डॉक्टर.
- १९६३ – रघुराम राजन, भारतीय अर्थशास्त्री.
मृत्यू-
- १०१४ – स्वेन पहिला, डेन्मार्कचा राजा.
- १११६ – कोलोमान, हंगेरीचा राजा.
- १४५१ – मुराद दुसरा, ऑट्टोमन सम्राट.
- १४६८ – योहान्स गटेनबर्ग, जर्मन प्रकाशक, स्वयंचलित मुद्रणाचा संशोधक.
- १९२४ – वूड्रो विल्सन, अमेरिकन राष्ट्राध्यक्ष.
- १९८५ – फ्रॅंक ऑपनहाइमर, अमेरिकन भौतिकशास्त्रज्ञ.
- २००५ – झुराब झ्वानिया, जॉर्जियाचा पंतप्रधान.
राष्ट्रगीत-
जनगणमन अधिनायक जय हे
भारत भाग्य-विधाता |
पंजाब, सिंधू, गुजरात, मराठा, द्राविड, उत्कल, बंग,
विंध्य, हिमाचल, यमुना, गंगा,
उच्छल जलधितरंग,
तव शुभ नामे जागे तव शुभ आशिस मागे,
गाहे तव जयगाथा,
जनगण मंगलदायक जय हे,
भारत भाग्य-विधाता|
जय हे, जय हे, जय हे,
जय जय जय, जय हे ||
प्रतिज्ञा-
भारत माझा देश आहे.
सारे भारतीय माझे बांधव आहेत.
माझ्या देशावर माझे प्रेम आहे.
माझ्या देशातल्या समृद्ध आणि
विविधतेने नटलेल्या परंपरांचा मला अभिमान आहे.
त्या परंपरांचा पाईक होण्याची पात्रता
माझ्या अंगी यावी म्हणून मी सदैव प्रयत्न करेन.
मी माझ्या पालकांचा, गुरुजनांचा आणि
वडीलधाऱ्या माणसांचा मान ठेवीन
आणि प्रत्येकाशी सौजन्याने वागेन.
माझा देश आणि माझे देशबांधव
यांच्याशी निष्ठा राखण्याची
मी प्रतिज्ञा करीत आहे.
त्यांचे कल्याण आणि
त्यांची समृद्धी ह्यांतच माझे
सौख्य सामावले आहे.
जय हिंद
भारताचे संविधान
उद्देशिका
आम्ही, भारताचे लोक, भारताचे एक सार्वभौम
समाजवादी धर्मनिरपेक्ष लोकशाही गणराज्य घडविण्याचा
व त्याच्या सर्व नागरिकांस
सामाजिक, आर्थिक व राजनैतिक न्याय;
विचार, अभिव्यक्ती, विश्वास, श्रद्धा
व उपासना यांचे स्वातंत्र्य;
दर्जाची व संधीची समानता;
निश्चितपणे प्राप्त करून देण्याचा
आणि त्या सर्वांमध्ये व्यक्तीची प्रतिष्ठा व राष्ट्राची एकता
आणि एकात्मता यांचे आश्वासन देणारी बंधुता
प्रवर्धित करण्याचा संकल्पपूर्वक निर्धार करून;
आमच्या संविधानसभेत
आज दिनांक सव्वीस नोव्हेंबर, १९४९ रोजी
याद्वारे हे संविधान अंगीकृत आणि अधिनियमित
करून स्वतःप्रत अर्पण करीत आहोत.
प्रार्थना-
बोधकथा-
घामाचा पैसा
धन्नाशेटचा मुलगा राम अगदीच आळशी. घरांत गडगंज संपत्ती. एकुलता एक लाडाचा. काम कधी करावंच लागलं नाही. आता २१ वर्षाचा झाला. शेठजींना काळजी पडली. याचे कसे होणार साठलेला पैसा किती दिवस पुरेल.
दुसरे दिवशी त्यांनी मुलाला बोलावले व म्हणाले, ‘हे बघ, आज तू सकाळीच बाहेर जा. काहींतरी काम करून पैसे मिळवुन आण; तरच तुला जेवायला मिळेल’. मुलाला काहीच कळेना. तो बहिणीकडे गेला. तिने त्याला एक रूपया दिला. शेठजींनी तो विहीरीत फेकून दिला. दुसर्या दिवशी आईकडून घेतला.
तिसर्या दिवशी मात्र कोणीही पैसे द्यायचे नाहीत हे उमजल्यावर स्वारी घराबाहेर पडली. स्वारी घराबाहेर काम शोधायला निघाली. पण काय काम करणार ? बारा वाजे पर्यंत हिंडला. काम मिळेना. पोटात कावळे कोकलायला लागले.
स्टेशनवरून एक जड बॅग घेऊन येणारा माणूस दिसला त्याला हमाल हवा होता. हा धावत पुढे गेला. ‘साहेब, इकडे आणा’. ती बॅग त्याने डोक्यावर उचलली. घामाघूम झाला. साहेबांनी आठ आणे हातावर ठेवले. घरी आला. शेठजींच्या हातावर आठ आणे ठेवले. दोन दिवसाप्रमाणेच शेठजींनी ते विहीरीत फेकले हा चवताळून उठला. ‘बाबा अहो तेवढे आठ आणे मिळवायला मला किती वणवण करावी लागली आणि तुम्ही ते फेकून दिलेत ?
शेठजींनी त्याला जवळ घेतले. पाठीवरून हात फिरवला, ‘बाळा आता मला काही काळजी नाही कारण खर्या कष्टाची किंमत तुला आज कळली. दोन दिवस ह्याच्या दुप्पट रक्कम फेकली पण तुला राग आला नव्हता कारण त्या मागे कष्ट नव्हते.
स्वकष्टाची कमाई तीच खरी कमाई.
पसायदान-
आता विश्वात्मकें देवें । येणे वाग्यज्ञें तोषावें ।
तोषोनिं मज द्यावे । पसायदान हें ॥
जें खळांची व्यंकटी सांडो । तया सत्कर्मी- रती वाढो ।
भूतां परस्परे पडो । मैत्र जिवाचें ॥
दुरितांचे तिमिर जावो । विश्व स्वधर्म सूर्यें पाहो ।
जो जे वांच्छिल तो तें लाहो । प्राणिजात ॥
वर्षत सकळ मंगळी । ईश्वरनिष्ठांची मांदियाळी ।
अनवरत भूमंडळी । भेटतु भूतां ॥
चलां कल्पतरूंचे आरव । चेतना चिंतामणींचें गाव ।
बोलते जे अर्णव । पीयूषाचे ॥
चंद्रमे जे अलांछन । मार्तंड जे तापहीन ।
ते सर्वांही सदा सज्जन । सोयरे होतु ॥
किंबहुना सर्व सुखी । पूर्ण होऊनि तिन्हीं लोकी ।
भजिजो आदिपुरुखी । अखंडित ॥
आणि ग्रंथोपजीविये । विशेषीं लोकीं इयें ।
दृष्टादृष्ट विजयें । होआवे जी ॥
येथ ह्मणे श्री विश्वेशराओ । हा होईल दान पसावो ।
येणें वरें ज्ञानदेवो । सुखिया जाला ॥