30 जानेवारी दिनविशेष | शालेय परिपाठ, Daily Routine

30 जानेवारी दिनविशेष

शालेय परिपाठ, Daily Routine

आज वार– सोमवार

दिनांक- 30/01/2023

मिती- माघ शुक्ल-9

शके– 1944

सुविचार- जीवन हे सुख व दुःख यांचा संगम होय.

म्हणी व अर्थ-
अंथरूण पाहून पाय पसरावे.
अर्थ- आपल्या ऐपतीप्रमाणे खर्च ठेवावा.

आजचा दिनविशेष-

जागतिक कृष्ठरोग निर्मूलन दिन

हुतात्मा दिन, (महात्मा गांधींची पुण्यतिथी)-

३० जानेवारी १९४८ ला, दिल्लीच्या बिर्ला भवनच्या बागेतून लोकांबरोबर फिरत असतांना गांधीजींची गोळी मारून हत्या करण्यात आली. त्यांचा मारेकरू नथुराम गोडसे हा एक पुरोगामी हिंदू होता व त्याचे संबंध जहालमतवादी हिंदू महासभेशी होते. नथुराम गोडसेने महात्मा गांधी यांची हत्या करण्यासाठी बरेटा मॉडेलचे पिस्तूल वापरले होते.त्याच्या मते पाकिस्तानला पैसे देऊन भारताला दुबळे पाडण्यासाठी गांधीजी जबाबदार होते.

गोडसे आणि त्याचा सहकारी नारायण आपटे यांच्यावर खटला दाखल करून त्यांना दोषी ठरवण्यात आले. त्यांना १५ नोव्हेंबर १९४९ला फाशी देण्यात आली. गांधीजींच्या राजघाट येथील समाधीवर ’हे राम’ असे लिहिले आहे.

हे त्यांचे शेवटचे शब्द होते असे अनेक जण मानतात, पण त्याची सत्यासत्यता वादग्रस्त आहे.गांधीजींच्या मृत्यूनंतर पंडित जवाहरलाल नेहरूंनी रेडियोवरून देशाला संबोधित केले:

“माझ्या मित्र आणि सहकाऱ्यांनो, आपल्या आयुष्यातून प्रकाश निघून गेला आहे आणि सर्वत्र अंधाराचे साम्राज्य पसरले आहे आणि मला कळत नाही आहे तुम्हाला काय आणि कसे सांगावे. आपले आवडते नेते-राष्ट्रपिता, ज्यांना आपण प्रेमाने ’बापू’ म्हणत असू, आता आपल्यामध्ये नाही आहेत. कदाचित तसे म्हणणे चूकच ठरेल,

पण आपण त्यांना आता बघू शकणार नाहीत, जसे आपण त्यांना इतके वर्ष बघत आलो आहोत. (संकटांमध्ये) त्यांचा सल्ला घ्यायला आपण आता धावत जाऊ शकणार नाही.

त्यांच्या सानिध्यातील शांती आणि समाधान आपल्याला मिळणार नाही. हा एक प्रचंड धक्का आहे, केवळ माझ्यासाठीच नव्हे, तर या देशातील कोट्यवधी लोकांसाठीसुद्धा.”

तत्त्वे-

गांधीजीनी एकादश (अकरा) व्रतांचा स्वीकार केला होता. ती पुढीलप्रमाणे-

अहिंसा, सत्य, अस्तेय, ब्रम्हचर्य, अपरिग्रह, शरीरश्रम, आस्वाद, सर्वत्र भयवर्जन (निर्भयता), सर्वधर्म सामान्ताव्य (सर्वधर्म समभाव), स्वदेशी, स्पर्शभावना (अस्पृश्यतेचा त्याग). निर्भयता

या तत्त्वाला गांधीजी आधारभूत मानत. त्यांच्यामते निर्भयतेमुळेच इतर तत्त्वांचे पालन करता येऊ शकते.

30 जानेवारी दिनविशेष
30 जानेवारी दिनविशेष

जानेवारी महिन्यातील परिपाठ पाहण्यासाठी

येथे क्लिक करा

ठळक घटना आणि घडामोडी-

सतरावे शतक-

१६४९ – इंग्लंडचा राजा चार्ल्स पहिल्याचा शिरच्छेद.

१६६१ – ऑलिव्हर क्रॉमवेल, ज्याच्या राजवटीत चार्ल्स पहिल्याचा शिरच्छेद झाला, त्याचा स्वतःचा शिरच्छेद केला गेला. क्रॉमवेल २ वर्षांपूर्वीच मृत्यु पावला होता.

एकोणिसावे शतक-

१८३५ – रिचर्ड लॉरेन्स नावाच्या माथेफिरू माणसाने अमेरिकेचा अध्यक्ष अँड्र्यू जॅक्सनचा खून करण्याचा प्रयत्न केला. लॉरेन्सची दोन्ही पिस्तुले ऐनवेळी बिघडली. चिडलेल्या जॅक्सनने लॉरेन्सला काठीने मारून पळवून लावले.

१८४७ – कॅलिफोर्नियातील येर्बा बॉयना गावाचे सान फ्रांसिस्को म्हणून पुनर्नामकरण.

विसावे शतक-

१९११ – जॅक्सन खून प्रकरणी स्वातंत्र्यवीर सावरकर यांना जन्मठेपेची शिक्षा.

१९१३ – इंग्लंडच्या संसदेने आयरिश होमरूलचा ठराव नामंजूर केला.

१९३३ – ऍडॉल्फ हिटलर जर्मनीच्या चान्सेलर(अध्यक्षपदी).

१९४४ – दुसरे महायुद्ध – अमेरिकेच्या सैन्याने मजुरो, मार्शल द्वीप वर हल्ला केला.

१९४५ – दुसरे महायुद्ध – गोटेनहाफेन, पोलंडहून जखमी जर्मन सैनिक व बेघर लोकांना घेउन कियेलला निघालेले जहाज विल्हेम गुस्टलॉफ रशियन पाणबुडीने बुडवले. अंदाजे ९,४०० ठार.

१९४८ – नथुराम गोडसेने महात्मा गांधींचा पिस्तुलाने खून केला.

१९४८ – पाचवे हिवाळी ऑलिम्पिक खेळ सेंट मॉरिट्झ, स्वित्झरलंड येथे सुरू.

१९६८ – व्हियेतनाम युद्ध – टेटचा हल्ला सुरू.

१९७२ – ब्रिटीश सैनिकांनी उत्तर आयर्लंडमध्ये १४ निदर्शकांना गोळ्या घातल्या.

१९७२ – पाकिस्तानने ब्रिटीश राष्ट्रकुलातून अंग काढून घेतले.

१९७९ – टोक्योहून निघालेले व्हारिग एरलाइन्सचे बोईंग ७०७-३२३सी जातीचे विमान नाहीसे झाले.

१९८९ – अमेरिकेने अफगाणिस्तानमधील आपला राजदूतावास बंद केला.

१९९४ – पीटर लोको बुद्धिबळातील सगळ्यात लहान ग्रॅंडमास्टर झाला.

एकविसावे शतक-

२००० – केन्या एरवेझ फ्लाइट ४३१ हे एरबस ए३१० जातीचे विमान कोटे द’आयव्हार जवळ अटलांटिक महासागरात कोसळले. १६९ ठार.

२००२ – भारतातील गरीब मुलांवर जवळजवळ ५७ हजार प्लॅस्टिक सर्जरी करणारे अनिवासी भारतीय डॉक्टर शरदकुमार दीक्षित यांना एनआरआय ऑफ द इयर २००१ हा पुरस्कार जाहीर.

२००५ – १९५३ नंतर इराकमध्ये पहिल्यांदा राष्ट्रीय निवडणुका.

जन्म-

१३३ – मार्कस सेव्हेरस डिडियस ज्युलियानस, रोमन सम्राट.

१८५३ – लेलॅंड होन, इंग्लिश क्रिकेट खेळाडू.

१८८२ – फ्रॅंकलिन डिलानो रूझवेल्ट, अमेरिकन अध्यक्ष.

१८९४ – बोरिस तिसरा, बल्गेरियाचा राजा.

१९१० – चिदंबरम् सुब्रमण्यम्, भारतीय राजकारणी.

१९१३ – डिकी फुलर, वेस्ट ईंडीझचा क्रिकेट खेळाडू.

१९२७ – ओलोफ पाल्मे, स्वीडनचा पंतप्रधान.

१९२९ – ह्यु टेफिल्ड, दक्षिण आफ्रिकेचा क्रिकेट खेळाडू.

१९३७ – बोरिस स्पास्की, रशियन बुद्धिबळपटू.

१९३९ – अलेहांद्रो टोलेडो, पेरूचा राष्ट्राध्यक्ष.

१९४१ – रिचर्ड चेनी, अमेरिकेचा उपराष्ट्राध्यक्ष.

१९४२ – डेव्हिड ब्राउन, इंग्लिश क्रिकेट खेळाडू.

१९५१ – ट्रेव्हर लाफलिन, ऑस्ट्रेलियन क्रिकेट खेळाडू.

१९६१ – रणजित मदुरासिंघे, श्रीलंकेचा क्रिकेट खेळाडू.

१९६२ – अब्दुल्ला दुसरा, जॉर्डनचा राजा.

मृत्यू-

११८१ – टाकाकुरा, जपानी सम्राट.

१६४९ – चार्ल्स पहिला, इंग्लंडचा राजा.

१८६७ – कोमेइ, जपानी सम्राट.

१९४८ – महात्मा गांधी.

१९४८ – ऑर्व्हिल राइट, अमेरिकन विमानतंत्रज्ञ.

१९९६ – गोविंदराव पटवर्धन, हार्मोनियम व ऑर्गन वादक.

२००० – आचार्य जनार्दन हरी चिंचाळकर, मानववंशशास्त्रज्ञ व सामाजिक कार्यकर्ते.

२००१ – प्रा. वसंत कानेटकर, ज्येष्ठ नाटककार.

२००४ – रमेश अणावकर, प्रसिद्ध गीतकार.

२०१८-  उर्दूचे सुप्रसिद्ध शायर मोहम्मद अल्वीयांचं  अहमदाबाद येथे निधन झाले. अल्वी हे आधुनिक शायर म्हणून प्रसिद्ध होते.

प्रतिवार्षिक पालन-

शहीद दिन – भारत

राष्ट्रगीत-

जनगणमन अधिनायक जय हे

भारत भाग्य-विधाता |

पंजाब, सिंधू, गुजरात, मराठा, द्राविड, उत्कल, बंग,

विंध्य, हिमाचल, यमुना, गंगा,

उच्छल जलधितरंग,

तव शुभ नामे जागे तव शुभ आशिस मागे,

गाहे तव जयगाथा,

जनगण मंगलदायक जय हे,

भारत भाग्य-विधाता|

जय हे, जय हे, जय हे,

जय जय जय, जय हे ||

प्रतिज्ञा-

भारत माझा देश आहे.

सारे भारतीय माझे बांधव आहेत.

माझ्या देशावर माझे प्रेम आहे.

माझ्या देशातल्या समृद्ध आणि

विविधतेने नटलेल्या परंपरांचा मला अभिमान आहे.

त्या परंपरांचा पाईक होण्याची पात्रता

माझ्या अंगी यावी म्हणून मी सदैव प्रयत्न करेन.

मी माझ्या पालकांचा, गुरुजनांचा आणि

वडीलधाऱ्या माणसांचा मान ठेवीन

आणि प्रत्येकाशी सौजन्याने वागेन.

माझा देश आणि माझे देशबांधव

यांच्याशी निष्ठा राखण्याची

मी प्रतिज्ञा करीत आहे.

त्यांचे कल्याण आणि

त्यांची समृद्धी ह्यांतच माझे

सौख्य सामावले आहे.

जय हिंद

भारताचे संविधान 

उद्देशिका

आम्ही, भारताचे लोक, भारताचे एक सार्वभौम

समाजवादी धर्मनिरपेक्ष लोकशाही गणराज्य घडविण्याचा

व त्याच्या सर्व नागरिकांस

सामाजिक, आर्थिक व राजनैतिक न्याय;

विचार, अभिव्यक्ती, विश्वास, श्रद्धा

व उपासना यांचे स्वातंत्र्य;

दर्जाची व संधीची समानता;

निश्चितपणे प्राप्त करून देण्याचा

आणि त्या सर्वांमध्ये व्यक्तीची प्रतिष्ठा व राष्ट्राची एकता

आणि एकात्मता यांचे आश्वासन देणारी बंधुता

प्रवर्धित करण्याचा संकल्पपूर्वक निर्धार करून;

आमच्या संविधानसभेत

आज दिनांक सव्वीस नोव्हेंबर, १९४९ रोजी

याद्वारे हे संविधान अंगीकृत आणि अधिनियमित

करून स्वतःप्रत अर्पण करीत आहोत.

प्रार्थना-

सत्यम शिवम सुंदरा
नमस्कार माझा या ज्ञान मंदिरा
सत्यम शिवम सुंदरा,
सत्यम शिवम सुंदरा ।। धृ.।।
शब्दरूप शक्ति दे,
भावरूप भक्ती दे
प्रगतीचे पंख दे
चिमणपाखरा, चिमणपाखरा
ज्ञान मंदिरा …
सत्यम शिवम सुंदरा, सत्यम शिवम सुंदरा ।।१।।
विद्याधन दे आम्हांस,
एक छंद एक ध्यास
नाव नेई पैलतीरी
दयासागरा, दयासागरा
ज्ञान मंदिरा … …
सत्यम शिवम सुंदरा,
सत्यम शिवम सुंदरा ।।२।।
होऊ आम्ही नीतिमंत,
कलागुणी बुद्धीमंत,
कीर्तिचा कळस जाई उंच अंबरा, उंच अंबरा
ज्ञान मंदिरा …
सत्यम शिवम सुंदरा,
सत्यम शिवम सुंदरा ।।३।।

मनाचे श्लोक

महासंकटी सोडिले देव जेणे।
प्रतापे बळे आगळा सर्वगूणे॥
जयाते स्मरे शैलजा शूलपाणी ।
नुपेक्षी कदा राम दासाभिमानी ॥१॥
अहल्या शिळा राघवे मुक्त केली ।
पदी लागता दिव्य होऊनि गेली ॥
जया वर्णिता शीणली वेदवाणी ।
नुपेक्षी कदा राम दासाभिमानी ॥२॥
वसे मेरुमांदार हे सृष्टिलीला ।
शशी सूर्य तारांगणे मेघमाला॥
चिरंजीव केले जनीं दास दोन्ही ।
नुपेक्षी कदा राम दासाभिमानी ॥३॥
उपेक्षी कदा रामरूपी असेना।
जिवा मानवा निश्चयो तो वसेना ॥
शिरी भार वाहेन बोले पुराणी।
नुपेक्षी कदा राम दासाभिमानी ॥४॥
असे हो जया अंतरी भाव जैसा ।
वसे हो तया अंतरी देव तैसा॥
अनन्यास रक्षीतसे चापपाणी।
नुपेक्षी कदा राम दासाभिमानी ॥३५॥

बोधकथा-

एका बाईला एक मुलगा व एक मुलगी होती. देवाने मुलाला रूप, तर मुलीला गुण दिले होते. आईचे दोन्ही मुलांवर खूप प्रेम होते. एकदा भाऊ आरशासमोर उभा राहून गर्वाने आपल्या बहिणीला म्हणाला, “ताई गं, मी बघ किती सुंदर, नाही तर तू ?
भावाचे हे बोलणे बहिणीच्या मनाला लागले. ती आपल्या आईकडे गेली भावाची तक्रार केली. यावर आईने दोघांनाही जवळ बोलावले, प्रेमाने समजूत काढली.
आई पहिल्यांदा मुलाला म्हणाली, अरे बाळा, नुसते रूप काय कामाचे? नुसत्या रूपाला या जगात किंमत नाही.
तेव्हा तू जसा दिसायला सुंदर आहेस, तसा गुणानेही सुंदर हो. त्यानंतर आई आपल्या मुलीला म्हणाली, हे बघ बाळे, तू गुणी तर आहेसच. देवाने तुला रूप दिले नाही म्हणून वाईट वाटू नकोस. छान नीटनेटकी रहा, सर्वांशी इतकी चांगली वाग. तुझ्या रूपाकडे कुणाचेच लक्ष जाणार नाही.
तात्पर्य:-
जगात पुढे जाण्यासाठी नुसते चांगले रूप असून चालत नाही, तर त्याला सद्गुणाची जोड द्यावी लागते.

पसायदान-

आता विश्वात्मकें देवें । येणे वाग्यज्ञें तोषावें ।

तोषोनिं मज द्यावे । पसायदान हें ॥

जें खळांची व्यंकटी सांडो । तया सत्कर्मी- रती वाढो ।

भूतां परस्परे पडो । मैत्र जिवाचें ॥

दुरितांचे तिमिर जावो । विश्व स्वधर्म सूर्यें पाहो ।

जो जे वांच्छिल तो तें लाहो । प्राणिजात ॥

वर्षत सकळ मंगळी । ईश्वरनिष्ठांची मांदियाळी ।

अनवरत भूमंडळी । भेटतु भूतां ॥

चलां कल्पतरूंचे आरव । चेतना चिंतामणींचें गाव ।

बोलते जे अर्णव । पीयूषाचे ॥

चंद्रमे जे अलांछन । मार्तंड जे तापहीन ।

ते सर्वांही सदा सज्जन । सोयरे होतु ॥

किंबहुना सर्व सुखी । पूर्ण होऊनि तिन्हीं लोकी ।

भजिजो आदिपुरुखी । अखंडित ॥

आणि ग्रंथोपजीविये । विशेषीं लोकीं इयें ।

दृष्टादृष्ट विजयें । होआवे जी ॥

येथ ह्मणे श्री विश्वेशराओ । हा होईल दान पसावो ।

येणें वरें ज्ञानदेवो । सुखिया जाला ॥

देशभक्तीपर गीत-

विजयी विश्व तिरंगा प्यारा, झंडा ऊँचा रहे हमारा।
सदा शक्ति बरसाने वाला,
प्रेम सुधा सरसाने वाला
वीरों को हरषाने वाला
मातृभूमि का तन-मन सारा, झंडा ऊँचा रहे हमारा।
स्वतंत्रता के भीषण रण में,
लखकर जोश बढ़े क्षण-क्षण में,
काँपे शत्रु देखकर मन में,
मिट जावे भय संकट सारा, झंडा ऊँचा रहे हमारा।
इस झंडे के नीचे निर्भय,
हो स्वराज जनता का निश्चय,
बोलो भारत माता की जय,
स्वतंत्रता ही ध्येय हमारा, झंडा ऊँचा रहे हमारा।
आओ प्यारे वीरों आओ,
देश-जाति पर बलि-बलि जाओ,
एक साथ सब मिलकर गाओ,
प्यारा भारत देश हमारा, झंडा ऊँचा रहे हमारा।
इसकी शान न जाने पावे,
चाहे जान भले ही जावे,
विश्व-विजय करके दिखलावे,
तब होवे प्रण-पूर्ण हमारा, झंडा ऊँचा रहे हमारा।

बालगीत-

असावा सुंदर चॉकलेटचा बंगला
चंदेरी सोनेरी चमचमता चांगला
चॉकलेटच्या बंगल्याला टॉफीचं दार
शेपटीच्या झुपक्यानं झाडून जाईल खार
गोल गोल लेमनच्या खिडक्या दोन
“हॅलो, हॅलो !” करायला छोटासा फोन !
बिस्कटांच्या गच्‍चीवर मोर छानदार
पेपरमिंटच्या अंगणात फुलं लाललाल
चांदीच्या झाडामागं चांदोबा रहातो
मोत्यांच्या फुलांतून लपाछपी खेळतो
उंच उंच झोक्याचा खेळ रंगला
मैनेचा पिंजरा वर टांगला
किती किती सुंदर चॉकलेटचा बंगला
चंदेरी सोनेरी चमचमता चांगला
कवी : राजा मंगळवेढेकर

सामान्यज्ञान

स्वतंत्र भारताचे पहिले शिक्षणमंत्री कोण होते?
मौलाना आझाद हे स्वतंत्र भारताचे पहिले शिक्षणमंत्री  होते.
जन गण मन  हे राष्ट्रगीत कोणी रचले?
जन गण मन हे राष्ट्रगीत रवींद्रनाथ टागोर यांनी रचले.
रवींद्रनाथ टागोर यांना किती साली नोबेल पारितोषिक मिळाले?
रवींद्रनाथ टागोर यांना १९१३ साली पारितोषिक मिळाले.
आपले राष्ट्रीय दिवस कोणते आहेत?
स्वातंत्र्यदिन व प्रजासत्ताक दिन हे आपले राष्ट्रीय उत्सव आहेत.
भारतीय संविधानाची अंमलबजावणी कधीपासून सुरू करण्यात आली?
भारतीय संविधानाची अंमलबजावणी २६ जानेवारी १९५० पासून सुरू करण्यात आली.

मराठी परिपाठ

परिपाठ,
सुविचार,
Marathi paripath pdf,
Paripath,
Sutrasanchalan,
आजचा दिनविशेष,
दिनविशेष,
आजचा दिनविशेष,
मराठी दिनविशेष,
इतिहासातील जागतिक दिवस,
ठळक घटना,
वाढदिवस,
स्मृती दिवसांची संदर्भासहित

Author: Active Guruji

Blogger

आपल्या प्रतिक्रिया लिहा.

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.