28 जानेवारी दिनविशेष | शालेय परिपाठ, Daily Routine

28 जानेवारी दिनविशेष

शालेय परिपाठ, Daily Routine

आज वार– शनिवार

दिनांक- 28/01/2023

मिती- माघ शुक्ल-7

शके– 1944

सुविचार- जीवन हे सुख व दुःख यांचा संगम होय.

म्हणी व अर्थ-
अंथरूण पाहून पाय पसरावे.
अर्थ- आपल्या ऐपतीप्रमाणे खर्च ठेवावा.

आजचा दिनविशेष-

जागतिक सूर्यनमस्कार दिन, रथसप्तमी, भारतीय पर्यटन दिवस

28 जानेवारी दिनविशेष
28 जानेवारी दिनविशेष

जानेवारी महिन्यातील परिपाठ पाहण्यासाठी

येथे क्लिक करा

ठळक घटना आणि घडामोडी-

एकोणिसावे शतक-

१८४६ – सर हॅरी स्मिथच्या ब्रिटीश सैन्याने अलीवालची लढाई जिंकली.

विसावे शतक-

१९३२ – दुसऱ्या महायुद्धात जपानने शांघाय काबीज केले.

१९८६ – अंतराळ शटल(स्पेस शटल) चॅलेंजरचा उड्डाण करताना विस्फोटात विनाश. सात अंतराळयात्र्यांचा मृत्यू.

१९९९ – देशिकोत्तम हा विश्वभारती विद्यापीठाचा सर्वोच्च सन्मान बांगलादेशच्या पंतप्रधान शेख हसीना वाजेद यांना प्रदान.

२००० – इंग्रजी मजकुराचे हिंदीत भाषांतर करणाऱ्या ‘अनुवादक’ या देशातील पहिल्याच प्रकारच्या संगणक प्रणालीचे गृहमंत्री लालकृष्ण अडवानी यांच्या हस्ते प्रकाशन.

एकविसावे शतक-

२००२ – टी.ए.एम.ई. फ्लाइट १२० हे बोईंग ७२७-१०० प्रकारचे विमान कोलंबियाच्या दक्षिण भागात अँडीझ पर्वतरांगेवर कोसळले. ९२ ठार.

२००३ – मराठी कवी मंगेश पाडगावकर यांना कुसुमाग्रज प्रतिष्ठानचा जनस्थान पुरस्कार जाहीर.

जन्म-

१४५७ – सातवा हेन्री, इंग्लंडचा राजा.

१८६५ – लाला लजपतराय, लाल बाल पाल या त्रयींतील.

१९०० – के.एम.करिअप्पा, भारताचे पहिले सरसेनापती जनरल.

१९२५ – डॉ.राजारामण्णा, भारतीय अणूशास्त्रज्ञ, अणुउर्जा आयोगाचे चौथे अध्यक्ष.

१९३० – पंडित जसराज, भारतीय शास्त्रीय गायक.

१९८१ – एलायजाह वूड, अमेरिकन अभिनेता.

मृत्यू-

८१४ – शार्लमेन, ब्रिटीश क्रांतिकारी.

१९८४ – सोहराब मोदी, भारतीय चित्रपट निर्माता व दिग्दर्शक.

१९८६ – स्पेस शटल चॅलेंजरचे प्रवासी

ग्रेग जार्व्हिस

क्रिस्टा मॅकऑलिफ

रोनाल्ड मॅकनेर

एलिसन ओनिझुका

ज्युडिथ रेसनिक

फ्रांसिस आर. स्कोबी

मायकेल जे. स्मिथ

१९८९ – हसमुख धीरजलाल सांकलिया, भारतातील उत्खननविषयक संशोधनाचा पाया रचणारे पुरातत्त्ववेत्ते.

१९९६ – बर्न होगार्थ, जंगलसम्राट टारझनला कार्टूनद्वारे अजरामर करणारे.

१९९७ – डॉ.पां.वा. सुखात्मे, भारतीय संख्याशास्त्रज्ञ व आहारतज्ज्ञ.

राष्ट्रगीत-

जनगणमन अधिनायक जय हे

भारत भाग्य-विधाता |

पंजाब, सिंधू, गुजरात, मराठा, द्राविड, उत्कल, बंग,

विंध्य, हिमाचल, यमुना, गंगा,

उच्छल जलधितरंग,

तव शुभ नामे जागे तव शुभ आशिस मागे,

गाहे तव जयगाथा,

जनगण मंगलदायक जय हे,

भारत भाग्य-विधाता|

जय हे, जय हे, जय हे,

जय जय जय, जय हे ||

प्रतिज्ञा-

भारत माझा देश आहे.

सारे भारतीय माझे बांधव आहेत.

माझ्या देशावर माझे प्रेम आहे.

माझ्या देशातल्या समृद्ध आणि

विविधतेने नटलेल्या परंपरांचा मला अभिमान आहे.

त्या परंपरांचा पाईक होण्याची पात्रता

माझ्या अंगी यावी म्हणून मी सदैव प्रयत्न करेन.

मी माझ्या पालकांचा, गुरुजनांचा आणि

वडीलधाऱ्या माणसांचा मान ठेवीन

आणि प्रत्येकाशी सौजन्याने वागेन.

माझा देश आणि माझे देशबांधव

यांच्याशी निष्ठा राखण्याची

मी प्रतिज्ञा करीत आहे.

त्यांचे कल्याण आणि

त्यांची समृद्धी ह्यांतच माझे

सौख्य सामावले आहे.

जय हिंद

भारताचे संविधान 

उद्देशिका

आम्ही, भारताचे लोक, भारताचे एक सार्वभौम

समाजवादी धर्मनिरपेक्ष लोकशाही गणराज्य घडविण्याचा

व त्याच्या सर्व नागरिकांस

सामाजिक, आर्थिक व राजनैतिक न्याय;

विचार, अभिव्यक्ती, विश्वास, श्रद्धा

व उपासना यांचे स्वातंत्र्य;

दर्जाची व संधीची समानता;

निश्चितपणे प्राप्त करून देण्याचा

आणि त्या सर्वांमध्ये व्यक्तीची प्रतिष्ठा व राष्ट्राची एकता

आणि एकात्मता यांचे आश्वासन देणारी बंधुता

प्रवर्धित करण्याचा संकल्पपूर्वक निर्धार करून;

आमच्या संविधानसभेत

आज दिनांक सव्वीस नोव्हेंबर, १९४९ रोजी

याद्वारे हे संविधान अंगीकृत आणि अधिनियमित

करून स्वतःप्रत अर्पण करीत आहोत.

प्रार्थना-

सत्यम शिवम सुंदरा
नमस्कार माझा या ज्ञान मंदिरा
सत्यम शिवम सुंदरा,
सत्यम शिवम सुंदरा ।। धृ.।।
शब्दरूप शक्ति दे,
भावरूप भक्ती दे
प्रगतीचे पंख दे
चिमणपाखरा, चिमणपाखरा
ज्ञान मंदिरा …
सत्यम शिवम सुंदरा, सत्यम शिवम सुंदरा ।।१।।
विद्याधन दे आम्हांस,
एक छंद एक ध्यास
नाव नेई पैलतीरी
दयासागरा, दयासागरा
ज्ञान मंदिरा … …
सत्यम शिवम सुंदरा,
सत्यम शिवम सुंदरा ।।२।।
होऊ आम्ही नीतिमंत,
कलागुणी बुद्धीमंत,
कीर्तिचा कळस जाई उंच अंबरा, उंच अंबरा
ज्ञान मंदिरा …
सत्यम शिवम सुंदरा,
सत्यम शिवम सुंदरा ।।३।।

मनाचे श्लोक

महासंकटी सोडिले देव जेणे।
प्रतापे बळे आगळा सर्वगूणे॥
जयाते स्मरे शैलजा शूलपाणी ।
नुपेक्षी कदा राम दासाभिमानी ॥१॥
अहल्या शिळा राघवे मुक्त केली ।
पदी लागता दिव्य होऊनि गेली ॥
जया वर्णिता शीणली वेदवाणी ।
नुपेक्षी कदा राम दासाभिमानी ॥२॥
वसे मेरुमांदार हे सृष्टिलीला ।
शशी सूर्य तारांगणे मेघमाला॥
चिरंजीव केले जनीं दास दोन्ही ।
नुपेक्षी कदा राम दासाभिमानी ॥३॥
उपेक्षी कदा रामरूपी असेना।
जिवा मानवा निश्चयो तो वसेना ॥
शिरी भार वाहेन बोले पुराणी।
नुपेक्षी कदा राम दासाभिमानी ॥४॥
असे हो जया अंतरी भाव जैसा ।
वसे हो तया अंतरी देव तैसा॥
अनन्यास रक्षीतसे चापपाणी।
नुपेक्षी कदा राम दासाभिमानी ॥३५॥

बोधकथा-

खटला
दोघां भावात जमिनीवरून तंटा निर्माण झाला. मामला कोर्टात पोहोचला. त्‍यात एक भाऊ लखपती होता तर दुसरा गरीब होता. त्‍या दोघांना प्रत्‍येकी दहा लाख रूपये वाटणीमध्‍ये आले होते. न्‍यायाधिशांनी एका भावाला विचारले, तुझ्या भावाने सात वर्षात दहा लाख रूपये कसे काय खर्च केले. श्रीमंत भाऊ म्‍हणाला, माझा भाऊ प्रत्‍येक काम नोकराकडून करवून घेत असे. कोणतेही काम त्‍याने केले नाही. नोकरही मनमानी करू लागले. एक रूपया खर्च येत असेल तर शंभर रूपये आल्‍याचे दाखवत असत. तो अन्नाला महाग झाला.
न्यायाधीशांनी विचारले, तुझी श्रीमंती कशी काय टिकून राहिली. तो म्‍हणाला, माझ्या वाडवडिलांची देणगी दिली म्‍हणजे मी परिश्रम करूच नये की काय?
संपत्ती मिळाल्‍यावरही मी परिश्रम करण्‍याचे सोडले नाही. मी नोकरांवर कधीच अवलंबून राहिलो नाही. प्रत्‍येक कामात माझा सहभाग असल्‍याने नोकरांची बोलण्‍याची हिंमत होत नव्‍हती.
आता जेव्‍हा याच्‍याकडे फुटकी कवडीही उरली नाही म्‍हणून याने माझ्यावर दावा ठोकला आहे. याला परिश्रम करायला नको आहेत. याने स्‍वत:ची संपत्ती तर आळसाने घालविली. आता माझ्या संपत्तीवर याचा डोळा आहे. यावर न्‍यायाधीश महोदयांनी इतर साक्षीपुरावे तपासले व श्रीमंत भाऊच खरे असल्‍याचा निर्वाळा दिला.
तात्‍पर्य : मिळालेले धन हे टिकवून ठेवणे हे फार अवघड काम आहे.

पसायदान-

आता विश्वात्मकें देवें । येणे वाग्यज्ञें तोषावें ।

तोषोनिं मज द्यावे । पसायदान हें ॥

जें खळांची व्यंकटी सांडो । तया सत्कर्मी- रती वाढो ।

भूतां परस्परे पडो । मैत्र जिवाचें ॥

दुरितांचे तिमिर जावो । विश्व स्वधर्म सूर्यें पाहो ।

जो जे वांच्छिल तो तें लाहो । प्राणिजात ॥

वर्षत सकळ मंगळी । ईश्वरनिष्ठांची मांदियाळी ।

अनवरत भूमंडळी । भेटतु भूतां ॥

चलां कल्पतरूंचे आरव । चेतना चिंतामणींचें गाव ।

बोलते जे अर्णव । पीयूषाचे ॥

चंद्रमे जे अलांछन । मार्तंड जे तापहीन ।

ते सर्वांही सदा सज्जन । सोयरे होतु ॥

किंबहुना सर्व सुखी । पूर्ण होऊनि तिन्हीं लोकी ।

भजिजो आदिपुरुखी । अखंडित ॥

आणि ग्रंथोपजीविये । विशेषीं लोकीं इयें ।

दृष्टादृष्ट विजयें । होआवे जी ॥

येथ ह्मणे श्री विश्वेशराओ । हा होईल दान पसावो ।

येणें वरें ज्ञानदेवो । सुखिया जाला ॥

देशभक्तीपर गीत-

विजयी विश्व तिरंगा प्यारा, झंडा ऊँचा रहे हमारा।
सदा शक्ति बरसाने वाला,
प्रेम सुधा सरसाने वाला
वीरों को हरषाने वाला
मातृभूमि का तन-मन सारा, झंडा ऊँचा रहे हमारा।
स्वतंत्रता के भीषण रण में,
लखकर जोश बढ़े क्षण-क्षण में,
काँपे शत्रु देखकर मन में,
मिट जावे भय संकट सारा, झंडा ऊँचा रहे हमारा।
इस झंडे के नीचे निर्भय,
हो स्वराज जनता का निश्चय,
बोलो भारत माता की जय,
स्वतंत्रता ही ध्येय हमारा, झंडा ऊँचा रहे हमारा।
आओ प्यारे वीरों आओ,
देश-जाति पर बलि-बलि जाओ,
एक साथ सब मिलकर गाओ,
प्यारा भारत देश हमारा, झंडा ऊँचा रहे हमारा।
इसकी शान न जाने पावे,
चाहे जान भले ही जावे,
विश्व-विजय करके दिखलावे,
तब होवे प्रण-पूर्ण हमारा, झंडा ऊँचा रहे हमारा।

बालगीत-

असावा सुंदर चॉकलेटचा बंगला
चंदेरी सोनेरी चमचमता चांगला
चॉकलेटच्या बंगल्याला टॉफीचं दार
शेपटीच्या झुपक्यानं झाडून जाईल खार
गोल गोल लेमनच्या खिडक्या दोन
“हॅलो, हॅलो !” करायला छोटासा फोन !
बिस्कटांच्या गच्‍चीवर मोर छानदार
पेपरमिंटच्या अंगणात फुलं लाललाल
चांदीच्या झाडामागं चांदोबा रहातो
मोत्यांच्या फुलांतून लपाछपी खेळतो
उंच उंच झोक्याचा खेळ रंगला
मैनेचा पिंजरा वर टांगला
किती किती सुंदर चॉकलेटचा बंगला
चंदेरी सोनेरी चमचमता चांगला
कवी : राजा मंगळवेढेकर

सामान्यज्ञान

स्वतंत्र भारताचे पहिले शिक्षणमंत्री कोण होते?
मौलाना आझाद हे स्वतंत्र भारताचे पहिले शिक्षणमंत्री  होते .
जन गण मन  हे राष्ट्रगीत कोणी रचले?
जन गण मन ‘ हे राष्ट्रगीत रवींद्रनाथ टागोर यांनी रचले.
रवींद्रनाथ टागोर यांना किती साली नोबेल पारितोषिक मिळाले?
रवींद्रनाथ टागोर यांना १९१३ साली पारितोषिक मिळाले.
आपले राष्ट्रीय दिवस कोणते आहेत?
स्वातंत्र्यदिन व प्रजासत्ताक दिन हे आपले राष्ट्रीय उत्सव आहेत.
भारतीय संविधानाची अंमलबजावणी कधीपासून सुरू करण्यात आली?
भारतीय संविधानाची अंमलबजावणी २६ जानेवारी १९५० पासून सुरू करण्यात आली.

मराठी परिपाठ

परिपाठ,
सुविचार,
Marathi paripath pdf,
Paripath,
Sutrasanchalan,
आजचा दिनविशेष,
दिनविशेष,
आजचा दिनविशेष,
मराठी दिनविशेष,
इतिहासातील जागतिक दिवस,
ठळक घटना,
वाढदिवस,
स्मृती दिवसांची संदर्भासहित

Author: Active Guruji

Blogger

आपल्या प्रतिक्रिया लिहा.

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.