31 august | 31 ऑगस्ट दिनविशेष, शालेय परिपाठ, Daily Routine

31 august

31 ऑगस्ट दिनविशेष

शालेय परिपाठ, Daily Routine

वार- गुरुवार

दिनांक- 31/08/2023, 31 ऑगस्ट

मिती-  श्रावण कृष्ण 1

शके– 1945

सुविचार- तुम्ही ज्याची कल्पना करू शकता ते सर्व खरे आहे.

म्हणी व अर्थ : साखरेचे खाणार त्याला देव देणार – भाग्यवान माणसाला सर्व परिस्थितीच अनुकूल असते.

वाक्प्रचार- काटकसर करणे – बचत करणे.

ठळक घटना आणि घडामोडी

 

ऑगस्ट ३१ हा ग्रेगरी दिनदर्शिकेनुसार वर्षातील २४३ वा किंवा लीप वर्षात २४४ वा दिवस असतो.

एकोणिसावे शतक

  • १८०३ – लुईस आणि क्लार्क पिट्सबर्गहून आपल्या मोहिमेवर निघाले.
  • १८६४ – अमेरिकन यादवी युद्ध-जनरल विल्यम टी. शेरमानने अटलांटावर हल्ला केला.
  • १८७६ – ऑट्टोमन सुलतान मुराद पाचव्याला पदच्युत करून त्याचा भाऊ अब्दुल हमीद दुसरा सम्राटपदी.
  • १८८६ – चार्ल्स्टन, दक्षिण कॅरोलिनामध्ये भूकंप. १०० ठार.
  • १८९७ – थॉमस अल्वा एडिसनने कायनेटोस्कोपचा पेटंट घेतला.

विसावे शतक

  • १९२० – डेट्रॉइटमध्ये पहिल्यांदा रेडियोवरून बातम्या प्रसारित झाल्या.
  • १९३९ – जर्मनीच्या हस्तकांनी जर्मनीतील ग्लाईवित्झ रेडियो स्थानकावर हल्ला केला. हा हल्ला पोलंडने केल्याची सबब सांगून दुसऱ्या दिवशी जर्मनीने पोलंडवर चाल केली व दुसऱ्या महायुद्धास सुरुवात झाली.
  • १९५७ – मलायाला युनायटेड किंग्डमपासून स्वातंत्र्य.
  • १९६२ – त्रिनिदाद आणि टोबॅगोला युनायटेड किंग्डमपासून स्वातंत्र्य.
  • १९६८ – सर गारफील्ड सोबर्सने एका षटकात ६ षटकार फटकावले.
  • १९८६ – सेरिटोस, कॅलिफोर्नियाजवळ एरोमेक्सिको फ्लाइट ४९८ हे विमान पायपर पी.ए.-२८ प्रकारच्या विमानाव आदळले. जमीनीवरील १५सह ७९ ठार.
  • १९८६ – सोवियेत संघाचे प्रवासी जहाज ॲडमिरल नाखिमोव मालवाहू जहाज प्यॉत्र व्हासेवशी आदळून बुडले. ४२३ ठार.
  • १९९१ – किर्गिझस्तानला सोवियेत संघापासून स्वातंत्र्य.
  • १९९७ – पॅरिसमध्ये अपघातात राजकुमारी डायना व तिचा मित्र डोडी फयेद ठार.
  • १९९९ – बॉयनोस एर्सच्या होर्हे न्यूबरी विमानतळावरून उड्डाण केल्यावर लगेच बोईंग ७३७-२०० प्रकारचे विमान कोसळले. जमीनीवरील दोघांसह ६५ ठार.

एकविसावे शतक

  • २००५ – बगदादच्या अल-आइम्माह पूलावर झालेल्या चेंगराचेंगरीत १,१९९ ठार.

जन्म

  • १२ – कालिगुला, रोमन सम्राट.
  • १६१ – कोमॉडस, रोमन सम्राट.
  • १५६९ – जहांगीर, मुघल सम्राट.
  • १८४३ – जॉर्ज फोन हर्टलिंग,जर्मनीचा चान्सेलर.
  • १८७० – मारिया मॉॅंटेसोरी, इटालियन शिक्षणतज्ञ.
  • १८८० – विल्हेमिना पहिली, नेदरलॅंड्सची राणी.
  • १९०७ – रमोन मॅग्सेसे, फिलिपाईन्सचा राष्ट्राध्यक्ष.
  • १९४४ – क्लाइव्ह लॉईड,वेस्ट इंडीजचे क्रिकेट खेळाडू.
  • १९६९ – जवागल श्रीनाथ,भारतीय क्रिकेट खेळाडू.
  • १९७२ – क्रिस टकर, अमेरिकन अभिनेता.

मृत्यू

  • १०५६ – थियोडोरा, बायझेन्टाईन सम्राज्ञी.
  • १२३४ – गो-होरिकावा जपानी सम्राट.
  • १४२२ – हेन्री पाचवा, इंग्लंडचा राजा.
  • १८१४ – आर्थर फिलिप, ब्रिटीश आरमारी अधिकारी.
  • १९७९ – ई.जे. स्मिथ इंग्लिश क्रिकेट खेळाडू.
  • १९८६ – उर्हो केक्कोनेन फिनलंडचा राष्ट्राध्यक्ष.
  • १९९५ -बियंत सिंग, पंजाबचा मुख्यमंत्री
  • १९९७ – प्रिन्सेस डायना, ब्रिटीश राजकुमारी.
  • १९९७ – डोडी फयेद, ब्रिटीश उद्योगपती.

प्रतिवार्षिक पालन

  • स्वभाषा दिन – मोल्दोव्हा.
  • स्वातंत्र्य दिन – त्रिनिदाद व टोबेगो, किर्गिझीस्तान.

राष्ट्रगीत

जनगणमन अधिनायक जय हे

भारत भाग्य-विधाता |

पंजाब, सिंधू, गुजरात, मराठा, द्राविड, उत्कल, बंग,

विंध्य, हिमाचल, यमुना, गंगा,

उच्छल जलधितरंग,

तव शुभ नामे जागे तव शुभ आशिस मागे,

गाहे तव जयगाथा,

जनगण मंगलदायक जय हे,

भारत भाग्य-विधाता|

जय हे, जय हे, जय हे,

जय जय जय, जय हे ||

@_राष्ट्रगीत विषयी अधिक माहितीसाठी – येथे क्लिक करा

प्रतिज्ञा

भारत माझा देश आहे.

सारे भारतीय माझे बांधव आहेत.

माझ्या देशावर माझे प्रेम आहे.

माझ्या देशातल्या समृद्ध आणि

विविधतेने नटलेल्या परंपरांचा मला अभिमान आहे.

त्या परंपरांचा पाईक होण्याची पात्रता

माझ्या अंगी यावी म्हणून मी सदैव प्रयत्न करेन.

मी माझ्या पालकांचा, गुरुजनांचा आणि

वडीलधाऱ्या माणसांचा मान ठेवीन

आणि प्रत्येकाशी सौजन्याने वागेन.

माझा देश आणि माझे देशबांधव

यांच्याशी निष्ठा राखण्याची

मी प्रतिज्ञा करीत आहे.

त्यांचे कल्याण आणि

त्यांची समृद्धी ह्यांतच माझे

सौख्य सामावले आहे.

जय हिंद…

@_मराठी,हिंदी,संस्कृत व इंग्रजी प्रतिज्ञा अधिक माहितीसाठी – येथे क्लिक करा

राज्यगीत

जय जय महाराष्ट्र माझा, गर्जा महाराष्ट्र माझा

जय जय महाराष्ट्र माझा, गर्जा महाराष्ट्र माझा ॥धृ॥

भिती न आम्हा तुझी मुळी ही गडगडणाऱ्या नभा

अस्मानाच्या सुलतानीला जबाब देती जिभा

सह्याद्रीचा सिंह गर्जतो शिव शंभू राजा

दरी दरीतन नाद गुंजला महाराष्ट्र माझा

जय जय महाराष्ट्र माझा, गर्जा महाराष्ट्र माझा ॥१॥

काळ्या छातीवरी कोरली, अभिमानाची लेणी

पोलादी मनगटेखेळती, खेळ जीव घेणी

दारिद्रयाच्या उन्हात शिजला

निढळाच्या घामाने भिजला

देश गौरवासाठी झिजला

दिल्लीचे ही तख्त राखितो, महाराष्ट्र माझा

जय जय महाराष्ट्र माझा, गर्जा महाराष्ट्र माझा

जय जय महाराष्ट्र माझा ॥२॥

@_जय जय महाराष्ट्र माझा mp3

अधिक माहितीसाठी – येथे क्लिक करा

भारताचे संविधान

उद्देशिका

आम्ही, भारताचे लोक, भारताचे एक सार्वभौम

समाजवादी धर्मनिरपेक्ष लोकशाही गणराज्य घडविण्याचा

व त्याच्या सर्व नागरिकांस

सामाजिक, आर्थिक व राजनैतिक न्याय;

विचार, अभिव्यक्ती, विश्वास, श्रद्धा

व उपासना यांचे स्वातंत्र्य;

दर्जाची व संधीची समानता;

निश्चितपणे प्राप्त करून देण्याचा

आणि त्या सर्वांमध्ये व्यक्तीची प्रतिष्ठा व राष्ट्राची एकता

आणि एकात्मता यांचे आश्वासन देणारी बंधुता

प्रवर्धित करण्याचा संकल्पपूर्वक निर्धार करून;

आमच्या संविधानसभेत

आज दिनांक सव्वीस नोव्हेंबर, १९४९ रोजी

याद्वारे हे संविधान अंगीकृत आणि अधिनियमित

करून स्वतःप्रत अर्पण करीत आहोत.

@_भारताचे संविधानविषयी अधिक माहितीसाठी – येथे क्लिक करा

प्रार्थना

 खरा तो एकची धर्म जगाला प्रेम अर्पावे
जगी जे हीन अतिपतित, जगी जे दीन पददलित
तया जाऊन उठवावे, जगाला प्रेम अर्पावे
सदा जे आर्त अतिविकल, जयांना गांजती सकल
तया जाऊन हसवावे, जगाला प्रेम अर्पावे
कुणा ना व्यर्थ शिणवावे, कुणा ना व्यर्थ हिणवावे
समस्तां बंधु मानावे, जगाला प्रेम अर्पावे
प्रभूची लेकरे सारी तयाला सर्वही प्यारी
कुणा ना तुच्छ लेखावे, जगाला प्रेम अर्पावे
असे हे सार धर्माचे असे हे सार सत्याचे
परार्थी प्राणही द्यावे, जगाला प्रेम अर्पावे
कवी : साने गुरुजी
  1. असो तुला देवा माझा
  2. देह मंदिर,चित्त मंदिर
  3. सर्वात्मका शिवसुंदरा
  4. केशवा माधवा
  5. या भारतात
  6. इतनी शक्ती हमे देना
  7. सत्यम शिवम सुंदरां
  8. हा देश माझा
  9. खरा तो एकची धर्म
  10. हंस वाहिनी
  11. तुम्ही हो माता
  12. शारदे मां
  13. ऐ मलिक तेरे बंदे
  14. हमको मन की शक्ती

बोधकथा

सेवा हाच धर्म
एका पत्रकारांनी स्वामी विवेकानंदांची कीर्ती ऐकलेली होती. स्वामी विवेकानंदांना भेटून त्यांच्याकडून चार ज्ञानाच्या गोष्टी शिकाव्याात अशी त्यांची तीव्र इच्छा होती.
त्यां पत्रकारांचे दोन मित्र त्यांना भेटावयास आले व बोलता-बोलता स्वामी विवेकानंदांचा उल्लेख निघाला. तिघांनी विवेकानंदांना भेटायला जाण्याचे ठरविले. तिघेही मिळून स्वामीजींकडे गेले.
विवेकानंदांनी तिघांचीही आस्थेने विचारपूस केली. या दरम्यान स्वामीजींना असे कळाले की तिघेही पंजाब प्रांतात राहणारे आहेत. त्या काळात पंजाबात दुष्काळ पडलेला होता.
त्यांनी त्यासंदर्भात चर्चा केली. दुष्कांळग्रस्तांसाठी चाललेल्याा मदतकार्याची माहिती घेतली. त्यानंतर शैक्षणिक, नैतिक आणि सामाजिक बाबींवर चर्चा केली. ब-याच वेळ चर्चा झाल्या.
नंतर तिघेही निघाले. निघताना पत्रकार महाशय विवेकानंदांना म्हणाले,”स्वा मीजी, आम्हीच तुमच्यांकडे धार्मिक उपदेश मिळेल या उद्देशाने आले होतो. पण तुम्ही मात्र सामान्य‍ अशा बाबींवरच चर्चा केलीत.
आम्हाला यातून ज्ञानवर्धक असे काहीच मिळाले नाही.” यावर  स्वामी विवेकानंदांनी मोठे मार्मिक उत्तर दिले ते असे की,” मित्रवर्य, जोपर्यत या देशात एक जरी मूल उपाशी राहिले तर धर्माची चर्चा करण्या पेक्षा त्याची भूक कशी भागवता येईल हे पाहणे जास्त महत्वाचे आहे.
ज्याचे पोट भरलेले नाही त्याला धर्मोपदेश देण्यापेक्षा भाकरी देणे हे महत्वाचे आहे.
तात्पर्य : रिकाम्या पोटी तत्वज्ञानाचा उपदेश उपयोगी नाही.

@_बोधकथा अधिक माहितीसाठी – येथे क्लिक करा

पसायदान

आता विश्वात्मकें देवें । येणे वाग्यज्ञें तोषावें ।

तोषोनिं मज द्यावे । पसायदान हें ॥

जें खळांची व्यंकटी सांडो । तया सत्कर्मी- रती वाढो ।

भूतां परस्परे पडो । मैत्र जिवाचें ॥

दुरितांचे तिमिर जावो । विश्व स्वधर्म सूर्यें पाहो ।

जो जे वांच्छिल तो तें लाहो । प्राणिजात ॥

वर्षत सकळ मंगळी । ईश्वरनिष्ठांची मांदियाळी ।

अनवरत भूमंडळी । भेटतु भूतां ॥

चलां कल्पतरूंचे आरव । चेतना चिंतामणींचें गाव ।

बोलते जे अर्णव । पीयूषाचे ॥

चंद्रमे जे अलांछन । मार्तंड जे तापहीन ।

ते सर्वांही सदा सज्जन । सोयरे होतु ॥

किंबहुना सर्व सुखी । पूर्ण होऊनि तिन्हीं लोकी ।

भजिजो आदिपुरुखी । अखंडित ॥

आणि ग्रंथोपजीविये । विशेषीं लोकीं इयें ।

दृष्टादृष्ट विजयें । होआवे जी ॥

येथ ह्मणे श्री विश्वेशराओ । हा होईल दान पसावो ।

येणें वरें ज्ञानदेवो । सुखिया जाला ॥

@_पसायदान विषयी अधिक माहितीसाठी – येथे क्लिक करा

देशभक्तीपर गीत

बलसागर भारत होवो
बलसागर भारत होवो, विश्वात शोभुनी राहो
हे कंकण करि बांधियले, जनसेवे जीवन दिधले
राष्ट्रार्थ प्राण हे उरले, मी सिद्ध मरायाला हो
वैभवी देश चढवीन, सर्वस्व त्यास अर्पीन
तिमीर घोर संहारीन, या बंधु सहाय्याला हो
हातांत हात घेऊन, हृदयास हृदय जोडून
ऐक्याचा मंत्र जपून, या कार्य करायाला हो
करि दिव्य पताका घेऊ, प्रिय भारतगीते गाऊ
विश्वास पराक्रम दावू, ही माय निजपदा लाहो
या उठा करू हो शर्थ, संपादु दिव्य पुरुषार्थ
हे जीवन ना तरि व्यर्थ, भाग्यसूर्य तळपत राहो
ही माय थोर होईल, वैभवे दिव्य शोभेल
जगतास शांति देईल, तो सोन्याचा दिन येवो
कवी : साने गुरुजी

बालगीत

चांदोबा चांदोबा भागलास का ?
निंबोणीच्या झाडामागे लपलास का ?
निंबोणीचे झाड करवंदी,
मामाचा वाडा चिरेबंदी !
आई-बाबांवर रुसलास का ?
असाच एकटा बसलास का ?
आता तरी परतुनी जाशील का ?
दूध न्‌ शेवया खाशील का ?
आई बिचारी रडत असेल,
बाबांचा पारा चढत असेल !
असाच बसून राहशील का ?
बाबांची बोलणी खाशील का ?
चांदोबा, चांदोबा कुठे रे गेला ?
दिसता दिसता गडप झाला !
हाकेला ‘ओ’ माझ्या देशील का ?
पुन्हा कधी आम्हाला दिसशील का ?
कवी : ग. दि. माडगुळकर

@_बालगीते अधिक माहितीसाठी – येथे क्लिक करा

प्रश्नमंजुषा

१) हरियाणा राज्याची राजधानी कोणती ?
उत्तर : चंदिगड
२) हिमाचल प्रदेश राज्याची राजधानी कोणती ?
उत्तर : सिमला
३) जम्मू काश्मिर राज्याची राजधानी कोणती ?
उत्तर : श्रीनगर
४) झारखंड राज्याची राजधानी कोणती ?
उत्तर : रांची
५) केरळ राज्याची राजधानी कोणती ?
उत्तर : तिरूअनंतपुरम

ENGLISH QUESTION

1) How many colors are there in the national flag of India?
Ans : Three
2) Which color is at the top of the national flag of India?
Ans: Saffron
3) Which color is in the center of the national flag of India?
Ans: White
4) Which is the lowest color in the national flag of India?
Ans: Green
5) How many spoke are there in Ashoka Chakra in India’s national flag?
Ans : 24

अधिक माहिती मिळवण्यासाठी …..

@_राष्ट्रगीत विषयी अधिक माहितीसाठी – येथे क्लिक करा

@_मराठी,हिंदी,संस्कृत व इंग्रजी प्रतिज्ञा अधिक माहितीसाठी – येथे क्लिक करा

@_बालगीते अधिक माहितीसाठी – येथे क्लिक करा

@_पसायदान विषयी अधिक माहितीसाठी – येथे क्लिक करा

@_बोधकथा अधिक माहितीसाठी – येथे क्लिक करा

@_छान छान गोष्टी अधिक माहितीसाठी – येथे क्लिक करा

@_भारताचे संविधानविषयी अधिक माहितीसाठी – येथे क्लिक करा

@_जय जय महाराष्ट्र माझा mp3 अधिक माहितीसाठी – येथे क्लिक करा

Tags

#31 august, 31 august 2023, 31 august 2021 panchang, 31 august 2022 special day, 31 august 2023 weather, 31 august 2022 panchang in hindi, 31 august is celebrated as, what is celebrated on 31 august, 31 august 2023,

शालेय परिपाठ,परिपाठ दाखवा,मराठी परिपाठ,परिपाठ शायरी,शालेय परिपाठ सूत्रसंचालन,परिपाठ सुविचार,हिंदी परिपाठ

DECLAIMER

वरील सर्व माहिती ही संग्रहित असून आपण पडताळून पहावी. काही चुका असू शकतात. फक्त शैक्षणिक माहिती असल्याने आम्ही कोणतेही कायदेशीर हक्क (copy right) सांगत नाही.

Author: Active Guruji

Blogger

आपल्या प्रतिक्रिया लिहा.

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.