21 october
21 ऑक्टोबर दिनविशेष
शालेय परिपाठ, Daily Routine
वार- शनिवार
दिनांक- 21/10/2023, 21 ऑक्टोबर
मिती- आश्विन शुक्ल 7
शके– 1945
सुविचार- “जीवनात आव्हाने टाळण्याचा कोणताही पर्याय नाही, म्हणून एकतर त्यांचा सामना करण्यास शिका किंवा हार मानू नका.”
म्हणी व अर्थ – अंथरूण पाहून पाय पसरावे- आपल्या ऐपतीप्रमाणे खर्च ठेवावा.
ठळक घटना आणि घडामोडी

ऑक्टोबर २१ हा ग्रेगरी दिनदर्शिकेनुसार वर्षातील २९४ वा किंवा लीप वर्षात २९५ वा दिवस असतो.
सोळावे शतक
- १५२० – फर्डिनांड मॅगेलन मॅगेलनच्या सामुद्रधुनीत पोचला.
एकोणिसावे शतक
- १८२४ – जोसेफ ऍस्पडिनने पोर्टलॅंड सिमेंटचा पेटंट घेतला.
- १८६७ – मॅनिफेस्ट डेस्टिनी-मेडिसिन लॉजचा करार – स्थानिक अमेरिकन लोकांना पश्चिम ओक्लाहोमामध्ये स्थलांतर करणे भाग पाडले गेले.
- १८७९ – थॉमस अल्वा एडिसनने पहिल्यांदा कार्बन तंतू वापरून विजेचा दिवा चालवला. साडेतेरा तास चालल्यावर हा दिवा विझला.
- १८९५ – जपानने फॉर्मोसाचे प्रजासत्ताक जिंकले.
विसावे शतक
- १९४३ – नेताजी सुभाषचंद्र बोस यांच्या नेतृत्वात आझाद हिंद सेनेचे प्रामुख्याने भारताचे पहिले स्वतंत्र सरकार स्थापन केले.
- १९४४ – दुसरे महायुद्ध-लेयटे गल्फची लढाई – एच.एम.ए.एस. ऑस्ट्रेलिया वर जपानी विमानांनी आत्मघातकी हल्ला चढवला.
- १९४५ – फ्रांसमध्ये स्त्रीयांना पहिल्यांदाच मतदानाची संधी.
- १९५९ – अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्ष ड्वाइट डी. आयझेनहॉवरने वटहुकुम काढून वर्नर फोन ब्रॉन व त्याच्या सहकाऱ्यांना अमेरिकन सैन्याच्या आधिपत्याखालून काढून घेउन नासामध्ये काम करण्यास फर्मावले.
जन्म
- १८८७ – कृष्ण सिंग बिहारचे पहिले मुख्यमंत्री भारतीय राष्ट्रीय काँग्रेसचे नेते
- १९१४ – मार्टिन गार्डनर, अमेरिकन गणितज्ञ.
- १९१६ – राम मराठे, मराठी संगीतकार.
- १९१७ – राम फाटक, मराठी संगीतकार, गायक.
- १९२३ – सद्गुरू श्री वामनराव पै, जीवन विद्या मिशनचे संस्थापक.
- १९२३ – फारुख अब्दुल्ला, नॅशनल कॉन्फरन्सचे नेते
- १९४० – जॉफ बॉयकॉट, इंग्लिश क्रिकेट खेळाडू.
- १९४४ – कुलभूषण खरबंदा हिंदी चित्रपट अभिनेते
- १९४९ – बिन्यामिन नेतान्याहू, इस्रायेलचा नववा पंतप्रधान.
- १९५२ – ट्रेव्हर चॅपल, ऑस्ट्रेलियन क्रिकेट खेळाडू.
- १९५७ – वॉल्फगांग केटर्ल, जर्मन भौतिकशास्त्रज्ञ.
- १९५९ – केन वाटानाबे, जपानी अभिनेता.
- १९६९ – सलमान विन हमाद बिन इसा अल खलिफा, बहरैनचा युवराज.
- १९७१ – डेमियन मार्टिन, ऑस्ट्रेलियन क्रिकेट खेळाडू.
मृत्यू
- १२६६ – बिर्जर यार्ल, स्टॉकहोमचा स्थापक.
- १४२२ – चार्ल्स सहावा, फ्रांसचा राजा.
- १५०० – गो-त्सुचिमिकाडो, जपानी सम्राट.
- १५०५ – पॉल स्क्रिप्टोरिस, जर्मन गणितज्ञ.
- १६८७ – सर एडमंड वॉलर, इंग्लिश लेखक.
- १७७७ – सॅम्युएल फूट, इंग्लिश नाटककार व अभिनेता.
- १८०५ – होरेशियो नेल्सन, इंग्लिश दर्यासारंग.
- १८७२ – जाक बॅबिने, फ्रेंच भौतिकशास्त्रज्ञ.
- १८७३ – योहान सेबास्टियन वेलहावेन, नॉर्वेजियन कवी.
- १९९८ – अजित, हिदी चित्रपट अभिनेता.
- २०१२ – यश चोप्रा, भारतीय चित्रपट निर्माते हिंदी चित्रपट दिग्दर्शक
- २०१५ – सुहास विठ्ठल मापुस्कर पद्मश्री पुरस्कारविजेते
प्रतिवार्षिक पालन
- सफरचंद दिन – युनायटेड किंग्डम.
- अनिवासी चिनी दिन – चीन.
राष्ट्रगीत
जनगणमन अधिनायक जय हे
भारत भाग्य-विधाता |
पंजाब, सिंधू, गुजरात, मराठा, द्राविड, उत्कल, बंग,
विंध्य, हिमाचल, यमुना, गंगा,
उच्छल जलधितरंग,
तव शुभ नामे जागे तव शुभ आशिस मागे,
गाहे तव जयगाथा,
जनगण मंगलदायक जय हे,
भारत भाग्य-विधाता|
जय हे, जय हे, जय हे,
जय जय जय, जय हे ||
@_राष्ट्रगीत विषयी अधिक माहितीसाठी – येथे क्लिक करा
प्रतिज्ञा
भारत माझा देश आहे.
सारे भारतीय माझे बांधव आहेत.
माझ्या देशावर माझे प्रेम आहे.
माझ्या देशातल्या समृद्ध आणि
विविधतेने नटलेल्या परंपरांचा मला अभिमान आहे.
त्या परंपरांचा पाईक होण्याची पात्रता
माझ्या अंगी यावी म्हणून मी सदैव प्रयत्न करेन.
मी माझ्या पालकांचा, गुरुजनांचा आणि
वडीलधाऱ्या माणसांचा मान ठेवीन
आणि प्रत्येकाशी सौजन्याने वागेन.
माझा देश आणि माझे देशबांधव
यांच्याशी निष्ठा राखण्याची
मी प्रतिज्ञा करीत आहे.
त्यांचे कल्याण आणि
त्यांची समृद्धी ह्यांतच माझे
सौख्य सामावले आहे.
जय हिंद…
@_मराठी,हिंदी,संस्कृत व इंग्रजी प्रतिज्ञा अधिक माहितीसाठी – येथे क्लिक करा
राज्यगीत
जय जय महाराष्ट्र माझा, गर्जा महाराष्ट्र माझा
जय जय महाराष्ट्र माझा, गर्जा महाराष्ट्र माझा ॥धृ॥
भिती न आम्हा तुझी मुळी ही गडगडणाऱ्या नभा
अस्मानाच्या सुलतानीला जबाब देती जिभा
सह्याद्रीचा सिंह गर्जतो शिव शंभू राजा
दरी दरीतन नाद गुंजला महाराष्ट्र माझा
जय जय महाराष्ट्र माझा, गर्जा महाराष्ट्र माझा ॥१॥
काळ्या छातीवरी कोरली, अभिमानाची लेणी
पोलादी मनगटेखेळती, खेळ जीव घेणी
दारिद्रयाच्या उन्हात शिजला
निढळाच्या घामाने भिजला
देश गौरवासाठी झिजला
दिल्लीचे ही तख्त राखितो, महाराष्ट्र माझा
जय जय महाराष्ट्र माझा, गर्जा महाराष्ट्र माझा
जय जय महाराष्ट्र माझा ॥२॥
@_जय जय महाराष्ट्र माझा mp3
अधिक माहितीसाठी – येथे क्लिक करा
भारताचे संविधान
उद्देशिका
आम्ही, भारताचे लोक, भारताचे एक सार्वभौम
समाजवादी धर्मनिरपेक्ष लोकशाही गणराज्य घडविण्याचा
व त्याच्या सर्व नागरिकांस
सामाजिक, आर्थिक व राजनैतिक न्याय;
विचार, अभिव्यक्ती, विश्वास, श्रद्धा
व उपासना यांचे स्वातंत्र्य;
दर्जाची व संधीची समानता;
निश्चितपणे प्राप्त करून देण्याचा
आणि त्या सर्वांमध्ये व्यक्तीची प्रतिष्ठा व राष्ट्राची एकता
आणि एकात्मता यांचे आश्वासन देणारी बंधुता
प्रवर्धित करण्याचा संकल्पपूर्वक निर्धार करून;
आमच्या संविधानसभेत
आज दिनांक सव्वीस नोव्हेंबर, १९४९ रोजी
याद्वारे हे संविधान अंगीकृत आणि अधिनियमित
करून स्वतःप्रत अर्पण करीत आहोत.
@_भारताचे संविधानविषयी अधिक माहितीसाठी – येथे क्लिक करा
प्रार्थना
- असो तुला देवा माझा
- देह मंदिर,चित्त मंदिर
- सर्वात्मका शिवसुंदरा
- केशवा माधवा
- या भारतात
- इतनी शक्ती हमे देना
- सत्यम शिवम सुंदरां
- हा देश माझा
- खरा तो एकची धर्म
- हंस वाहिनी
- तुम्ही हो माता
- शारदे मां
- ऐ मलिक तेरे बंदे
- हमको मन की शक्ती
बोधकथा
पापाचा जनक
@_बोधकथा अधिक माहितीसाठी – येथे क्लिक करा
पसायदान
आता विश्वात्मकें देवें । येणे वाग्यज्ञें तोषावें ।
तोषोनिं मज द्यावे । पसायदान हें ॥
जें खळांची व्यंकटी सांडो । तया सत्कर्मी- रती वाढो ।
भूतां परस्परे पडो । मैत्र जिवाचें ॥
दुरितांचे तिमिर जावो । विश्व स्वधर्म सूर्यें पाहो ।
जो जे वांच्छिल तो तें लाहो । प्राणिजात ॥
वर्षत सकळ मंगळी । ईश्वरनिष्ठांची मांदियाळी ।
अनवरत भूमंडळी । भेटतु भूतां ॥
चलां कल्पतरूंचे आरव । चेतना चिंतामणींचें गाव ।
बोलते जे अर्णव । पीयूषाचे ॥
चंद्रमे जे अलांछन । मार्तंड जे तापहीन ।
ते सर्वांही सदा सज्जन । सोयरे होतु ॥
किंबहुना सर्व सुखी । पूर्ण होऊनि तिन्हीं लोकी ।
भजिजो आदिपुरुखी । अखंडित ॥
आणि ग्रंथोपजीविये । विशेषीं लोकीं इयें ।
दृष्टादृष्ट विजयें । होआवे जी ॥
येथ ह्मणे श्री विश्वेशराओ । हा होईल दान पसावो ।
येणें वरें ज्ञानदेवो । सुखिया जाला ॥
@_पसायदान विषयी अधिक माहितीसाठी – येथे क्लिक करा
देशभक्तीपर गीत
बालगीत
@_बालगीते अधिक माहितीसाठी – येथे क्लिक करा
प्रश्नमंजुषा
इंग्रजी प्रश्न
अधिक माहिती मिळवण्यासाठी …..
@_राष्ट्रगीत विषयी अधिक माहितीसाठी – येथे क्लिक करा
@_मराठी,हिंदी,संस्कृत व इंग्रजी प्रतिज्ञा अधिक माहितीसाठी – येथे क्लिक करा
@_बालगीते अधिक माहितीसाठी – येथे क्लिक करा
@_पसायदान विषयी अधिक माहितीसाठी – येथे क्लिक करा
@_बोधकथा अधिक माहितीसाठी – येथे क्लिक करा
@_छान छान गोष्टी अधिक माहितीसाठी – येथे क्लिक करा
@_भारताचे संविधानविषयी अधिक माहितीसाठी – येथे क्लिक करा
@_जय जय महाराष्ट्र माझा mp3 अधिक माहितीसाठी – येथे क्लिक करा
Tags
#21 october, 21 october 2023, 21 october 2021 panchang, 21 october 2022 special day, 21 october 2023 weather, 21 october 2022 panchang in hindi, 21 october is celebrated as, what is celebrated on 21, 21 october 2023,
शालेय परिपाठ,परिपाठ दाखवा,मराठी परिपाठ,परिपाठ शायरी,शालेय परिपाठ सूत्रसंचालन,परिपाठ सुविचार,हिंदी परिपाठ
DECLAIMER
वरील सर्व माहिती ही संग्रहित असून आपण पडताळून पहावी. काही चुका असू शकतात. फक्त शैक्षणिक माहिती असल्याने आम्ही कोणतेही कायदेशीर हक्क (copy right) सांगत नाही.