2 June
2 जून
शालेय परिपाठ, दैनंदिन परिपाठ

2 जून हा ग्रेगरी दिनदर्शिकेनुसार वर्षातील १५३ वा किंवा लीप वर्षात १५४ वा दिवस असतो.
JUNE
ठळक घटना आणि घडामोडी
पाचवे शतक
- ४५५ – व्हॅन्डाल टोळ्यांनी रोम लुटले.
सहावे शतक
- ५७६ – बेनेडिक्ट पहिला पोपपदी.
सातवे शतक
- ६५७ – संत युजीन पहिला पोपपदी.
सतरावे शतक
- १६१५ – रुआचे रिकोले धर्मप्रसारक कॅनडात क्वुबेक सिटी येथे पोचले.
अठरावे शतक
- १७७४ – ब्रिटिश सैनिकांना अमेरिकेतील वसाहतीत कोणाच्याही घरात कधीही शिरायची मुभा.
एकोणिसावे शतक
- १८०० – कॅनडातील न्यू फाऊंडलंड प्रांतात जगातील सर्वप्रथम कांजिण्याची लस देण्यात आली.
- १८९६ – गुग्लियेमो मार्कोनीला रेडियोसाठी पेटंट बहाल.
- १८९७ – आपल्या मृत्यूचे वृत्त वर्तमानपत्रात वाचून मार्क ट्वेनने न्यू यॉर्क टाईम्सला सांगितले – माझ्या मृत्यूचे वृत्त ही अतिशयोक्ती आहे.
विसावे शतक
- १९०९ – आल्फ्रेड डीकिन तिसऱ्यांदा ऑस्ट्रेलियाच्या पंतप्रधानपदी.
- १९२४ – देशाच्या हद्दीत राहणाऱ्या अमेरिकेतील मूळ रहिवाशांना अमेरिकेचे नागरिकत्व बहाल केले गेले.
- १९४६ – राजा उंबेर्तो दुसऱ्याला हटवून इटलीने राजेशाही संपवली व स्वतःला प्रजासत्ताक घोषित केले.
- १९५३ – इंग्लंडमध्ये राणी एलिझाबेथ दुसरीला राज्याभिषेक.
- १९६५ – व्हियेतनाम युद्ध – ऑस्ट्रेलियाचे सैनिक दक्षिण व्हियेतनाममध्ये उतरले.
- १९८५ – खुनी लिओनार्ड लेकला सॅन फ्रॅन्सिस्को येथे दुकानातून वस्तु चोरल्याबद्दल अटक.
- १९९५ – बॉस्नियाने अमेरिकेचे लढाऊ विमान पाडले.
- १९९९ – भूतानमध्ये दूरचित्रवाणी प्रसारण सुरू.
एकविसावे शतक
- २००३ – मंगळ ग्रहाचा अधिक अभ्यास करण्यासाठी मार्स एक्सप्रेस प्रोब हे उपकरण अवकाशयानाद्वारे सोडण्यात आले.
- २०२३ – ओडिशाच्या बालासोर शहराजवळ झालेल्या भीषण रेल्वे अपघातात ३०० व्यक्ती मृत्युमुखी.
जन्म
- १३२८ – मुराकामी, जपानी सम्राट.
- १५३५ – पोप लिओ अकरावा.
- १७३१ – मार्था वॉशिंग्टन, अमेरिकेचा प्रथम राष्ट्राध्यक्ष जॉर्ज वॉशिंग्टनची पत्नी.
- १८३५ – पोप पायस दहावा.
- १८६५ – जॉर्ज लोहमन, इंग्लिश क्रिकेट खेळाडू.
- १९०७ – विष्णू विनायक बोकील, मराठी नाटककार, लेखक.
- १९३० – पीट कॉन्राड, अमेरिकन अंतराळवीर.
- १९४० – कॉन्स्टन्टाईन दुसरा, ग्रीसचा राजा.
- १९४३ – ईलया राजा, भारतीय संगीतकार.
- १९६५ – स्टीव वॉ, ऑस्ट्रेलियन क्रिकेट खेळाडू.
- १९६५ – मार्क वॉ, ऑस्ट्रेलियन क्रिकेट खेळाडू.
- १९७४ – गाटा काम्स्की, अमेरिकन बुद्धिबळ खेळाडू.
मृत्यू
- १७९५ – राणी अहिल्याबाई होळकर.
- १८८२ – ज्युसेप्पे गॅरिबाल्डी, इटलीचा क्रांतिकारक.
- १९५८ – कर्ट आल्टर, जर्मन रसायनशास्त्रज्ञ व नोबेल पारितोषिक विजेता
- १९८२ – फझल इलाही चौधरी, पाकिस्तानी राजकारणी.
- १९८४ – नाना पळशीकर, भारतीय अभिनेता
- १९८८ – राज कपूर, भारतीय अभिनेता, चित्रपट निर्माता व दिग्दर्शक.
दिनविशेष, सुविचार, प्रार्थना, वाक्यप्रचार , बोधकथा, म्हणी, पसायदान, संविधान, प्रतिज्ञा, बालगीते, देशभक्तीपर गीते, परिपाठ
@_भारताचे संविधानविषयी अधिक माहितीसाठी – येथे क्लिक करा
@_जय जय महाराष्ट्र माझा mp3 अधिक माहितीसाठी – येथे क्लिक करा
@_जागतिक महिला दिन – येथे क्लिक करा
@_सामान्यज्ञान – येथे क्लिक करा