18 December
18 डिसेंबर दिनविशेष
शालेय परिपाठ, Daily Routine
वार- सोमवार
दिनांक- 18/12/2023, 18 डिसेंबर
मिती- मार्गशीर्ष शुक्ल 6, चंपाष्ठ्मी
शके– 1945
सुविचार- दानापेक्षाही त्यागाने माणूस मोठा होतो.
म्हणी व अर्थ – आवळा देऊन कोहळा काढणे:- अल्प आमिष दाखवून मोठे काम करून घेणे.
ठळक घटना आणि घडामोडी

डिसेंबर १८ हा ग्रेगरी दिनदर्शिकेनुसार वर्षातील ३५२ वा किंवा लीप वर्षात ३५२ वा दिवस असतो.
एकविसावे शतक
- २०१२ – पुण्यात इमारतीचे बांधका करीत असताना छत कोसळून १३ कामगार ठार.
जन्म
- १६२० – हाइनरिक रॉथ, जर्मनीचा संस्कृतपंडित.
- १६२६ – क्रिस्टीना, स्वीडनची राणी.
- १७७८ – जोसेफ ग्रिमाल्डी, इंग्लिश विदूषक.
- १८५६ – सर जे.जे. थॉमसन, नोबेल पारितोषिक विजेता इंग्लिश भौतिकशास्त्रज्ञ.
- १८६३ – फ्रांझ फर्डिनांड, ऑस्ट्रियाचा आर्चड्यूक.
- १८७८ – जोसेफ स्टालिन, सोवियेत संघाचा नेता.
- १८८६ – टाय कॉब, अमेरिकन बेसबॉल खेळाडू.
- १९१० – एरिक टिंडिल, न्यू झीलंडचा क्रिकेट आणि रग्बी खेळाडू.
- १९१३ – विली ब्रॅंट, पश्चिम जर्मनीचा चान्सेलर.
- १९३० – रमेश तेंडुलकर, मराठी साहित्यिक व समीक्षक.
- १९३१ – स.शि. भावे, मराठी समीक्षक.
- १९४३ – कीथ रिचर्ड्स, इंग्लिश संगीतकार.
- १९४६ – स्टीवन स्पीलबर्ग, अमेरिकन चित्रपट दिग्दर्शक.
- १९४६ – रे लियोटा, अमेरिकन चित्रपट अभिनेता.
- १९५५ – विजय मल्ल्या, भारतीय उद्योगपती
- १९६३ – ब्रॅड पिट, अमेरिकन चित्रपट अभिनेता.
- १९७१ – बरखा दत्त, भारतीय पत्रकार.
- १९७१ – अरांता सांचेझ व्हिकारियो, स्पेनची टेनिस खेळाडू.
- १९७८ – केटी होम्स, अमेरिकन चित्रपट अभिनेत्री.
मृत्यू
- १९९३ – राजा बारगीर, मराठी आणि हिंदी चित्रपट दिग्दर्शक.
- १९९५ – कमलाकरबुवा औरंगाबादकर, कीर्तनकार.
- २००० – मुरलीधर गोपाळ तथा मु.गो.गुळवणी, भारतीय इतिहास संशोधक, वैदिक संस्कृतीचे अभ्यासक.
- २००४ – विजय हजारे, भारतीय क्रिकेट खेळाडू.
प्रतिवार्षिक पालन
- प्रजासत्ताक दिन – नायजर.
- जागतिक स्थलांतरित दिन.
- अरब भाषा दिन.
- अस्पृश्यता निवारण दिन
- अल्पसंख्याक हक्क दिन
राष्ट्रगीत
जनगणमन अधिनायक जय हे
भारत भाग्य-विधाता |
पंजाब, सिंधू, गुजरात, मराठा, द्राविड, उत्कल, बंग,
विंध्य, हिमाचल, यमुना, गंगा,
उच्छल जलधितरंग,
तव शुभ नामे जागे तव शुभ आशिस मागे,
गाहे तव जयगाथा,
जनगण मंगलदायक जय हे,
भारत भाग्य-विधाता|
जय हे, जय हे, जय हे,
जय जय जय, जय हे ||
@_राष्ट्रगीत विषयी अधिक माहितीसाठी – येथे क्लिक करा
प्रतिज्ञा
भारत माझा देश आहे.
सारे भारतीय माझे बांधव आहेत.
माझ्या देशावर माझे प्रेम आहे.
माझ्या देशातल्या समृद्ध आणि
विविधतेने नटलेल्या परंपरांचा मला अभिमान आहे.
त्या परंपरांचा पाईक होण्याची पात्रता
माझ्या अंगी यावी म्हणून मी सदैव प्रयत्न करेन.
मी माझ्या पालकांचा, गुरुजनांचा आणि
वडीलधाऱ्या माणसांचा मान ठेवीन
आणि प्रत्येकाशी सौजन्याने वागेन.
माझा देश आणि माझे देशबांधव
यांच्याशी निष्ठा राखण्याची
मी प्रतिज्ञा करीत आहे.
त्यांचे कल्याण आणि
त्यांची समृद्धी ह्यांतच माझे
सौख्य सामावले आहे.
जय हिंद…
@_मराठी,हिंदी,संस्कृत व इंग्रजी प्रतिज्ञा अधिक माहितीसाठी – येथे क्लिक करा
राज्यगीत
जय जय महाराष्ट्र माझा, गर्जा महाराष्ट्र माझा
जय जय महाराष्ट्र माझा, गर्जा महाराष्ट्र माझा ॥धृ॥
भिती न आम्हा तुझी मुळी ही गडगडणाऱ्या नभा
अस्मानाच्या सुलतानीला जबाब देती जिभा
सह्याद्रीचा सिंह गर्जतो शिव शंभू राजा
दरी दरीतन नाद गुंजला महाराष्ट्र माझा
जय जय महाराष्ट्र माझा, गर्जा महाराष्ट्र माझा ॥१॥
काळ्या छातीवरी कोरली, अभिमानाची लेणी
पोलादी मनगटेखेळती, खेळ जीव घेणी
दारिद्रयाच्या उन्हात शिजला
निढळाच्या घामाने भिजला
देश गौरवासाठी झिजला
दिल्लीचे ही तख्त राखितो, महाराष्ट्र माझा
जय जय महाराष्ट्र माझा, गर्जा महाराष्ट्र माझा
जय जय महाराष्ट्र माझा ॥२॥
@_जय जय महाराष्ट्र माझा mp3
अधिक माहितीसाठी – येथे क्लिक करा
भारताचे संविधान
उद्देशिका
आम्ही, भारताचे लोक, भारताचे एक सार्वभौम
समाजवादी धर्मनिरपेक्ष लोकशाही गणराज्य घडविण्याचा
व त्याच्या सर्व नागरिकांस
सामाजिक, आर्थिक व राजनैतिक न्याय;
विचार, अभिव्यक्ती, विश्वास, श्रद्धा
व उपासना यांचे स्वातंत्र्य;
दर्जाची व संधीची समानता;
निश्चितपणे प्राप्त करून देण्याचा
आणि त्या सर्वांमध्ये व्यक्तीची प्रतिष्ठा व राष्ट्राची एकता
आणि एकात्मता यांचे आश्वासन देणारी बंधुता
प्रवर्धित करण्याचा संकल्पपूर्वक निर्धार करून;
आमच्या संविधानसभेत
आज दिनांक सव्वीस नोव्हेंबर, १९४९ रोजी
याद्वारे हे संविधान अंगीकृत आणि अधिनियमित
करून स्वतःप्रत अर्पण करीत आहोत.
@_भारताचे संविधानविषयी अधिक माहितीसाठी – येथे क्लिक करा
प्रार्थना
- असो तुला देवा माझा
- देह मंदिर,चित्त मंदिर
- सर्वात्मका शिवसुंदरा
- केशवा माधवा
- या भारतात
- इतनी शक्ती हमे देना
- सत्यम शिवम सुंदरां
- हा देश माझा
- खरा तो एकची धर्म
- हंस वाहिनी
- तुम्ही हो माता
- शारदे मां
- ऐ मलिक तेरे बंदे
- हमको मन की शक्ती
बोधकथा
@_बोधकथा अधिक माहितीसाठी – येथे क्लिक करा
पसायदान
आता विश्वात्मकें देवें । येणे वाग्यज्ञें तोषावें ।
तोषोनिं मज द्यावे । पसायदान हें ॥
जें खळांची व्यंकटी सांडो । तया सत्कर्मी- रती वाढो ।
भूतां परस्परे पडो । मैत्र जिवाचें ॥
दुरितांचे तिमिर जावो । विश्व स्वधर्म सूर्यें पाहो ।
जो जे वांच्छिल तो तें लाहो । प्राणिजात ॥
वर्षत सकळ मंगळी । ईश्वरनिष्ठांची मांदियाळी ।
अनवरत भूमंडळी । भेटतु भूतां ॥
चलां कल्पतरूंचे आरव । चेतना चिंतामणींचें गाव ।
बोलते जे अर्णव । पीयूषाचे ॥
चंद्रमे जे अलांछन । मार्तंड जे तापहीन ।
ते सर्वांही सदा सज्जन । सोयरे होतु ॥
किंबहुना सर्व सुखी । पूर्ण होऊनि तिन्हीं लोकी ।
भजिजो आदिपुरुखी । अखंडित ॥
आणि ग्रंथोपजीविये । विशेषीं लोकीं इयें ।
दृष्टादृष्ट विजयें । होआवे जी ॥
येथ ह्मणे श्री विश्वेशराओ । हा होईल दान पसावो ।
येणें वरें ज्ञानदेवो । सुखिया जाला ॥
@_पसायदान विषयी अधिक माहितीसाठी – येथे क्लिक करा
देशभक्तीपर गीत
बालगीत
@_बालगीते अधिक माहितीसाठी – येथे क्लिक करा
प्रश्नमंजुषा
इंग्रजी प्रश्न
अधिक माहिती मिळवण्यासाठी …..
@_राष्ट्रगीत विषयी अधिक माहितीसाठी – येथे क्लिक करा
@_मराठी,हिंदी,संस्कृत व इंग्रजी प्रतिज्ञा अधिक माहितीसाठी – येथे क्लिक करा
@_बालगीते अधिक माहितीसाठी – येथे क्लिक करा
@_पसायदान विषयी अधिक माहितीसाठी – येथे क्लिक करा
@_बोधकथा अधिक माहितीसाठी – येथे क्लिक करा
@_छान छान गोष्टी अधिक माहितीसाठी – येथे क्लिक करा
@_भारताचे संविधानविषयी अधिक माहितीसाठी – येथे क्लिक करा
@_जय जय महाराष्ट्र माझा mp3 अधिक माहितीसाठी – येथे क्लिक करा
Tags
#18 december, 18 december, 18 december 2023, 18 december 2021 panchang, 18 december 2022 special day, 18 december 2023 weather, 18 december 2022 panchang in hindi, 18 december is celebrated as, what is celebrated on 18 december, 18 december 2023,
शालेय परिपाठ,परिपाठ दाखवा,मराठी परिपाठ,परिपाठ शायरी,शालेय परिपाठ सूत्रसंचालन,परिपाठ सुविचार,हिंदी परिपाठ
DECLAIMER
वरील सर्व माहिती ही संग्रहित असून आपण पडताळून पहावी. काही चुका असू शकतात. फक्त शैक्षणिक माहिती असल्याने आम्ही कोणतेही कायदेशीर हक्क (copy right) सांगत नाही.