16 December
16 डिसेंबर दिनविशेष
शालेय परिपाठ, Daily Routine
वार- शनिवार
दिनांक- 16/12/2023, 16 डिसेंबर
मिती- मार्गशीर्ष शुक्ल 4
शके– 1945
सुविचार- अपयश ही यशाची पहिली पायरी आहे.
म्हणी व अर्थ – झाकली मुठ सव्वा लाखाची – मौन पाळून अब्रू राखणे.
ठळक घटना आणि घडामोडी

डिसेंबर १६ हा ग्रेगरी दिनदर्शिकेनुसार वर्षातील ३५० वा किंवा लीप वर्षात ३५१ वा दिवस असतो.
चौदावे शतक
- १३९२ – जपानी सम्राट गो-कामेयामाने पदत्याग केला. गो-कोमात्सु सम्राटपदी.
पंधरावे शतक
- १४९७ – वास्को द गामाने केप ऑफ गुड होपला वळसा घातला.
सतरावे शतक
- १६३९ – इंग्लंडच्या संसदेने नागरी हक्कनामा प्रस्तुत केला.
अठरावे शतक
- १७७३ – अमेरिकन क्रांती-बॉस्टन टी पार्टी – टी ऍक्टच्या विरोधात सन्स ऑफ लिबर्टीच्या सदस्यांनी मॉहॉक वेश धारण करून बॉस्टनच्या बंदरात चहाची खोकी फेकली.
एकोणिसावे शतक
- १८३८ – ब्लड रिव्हरची लढाई – दक्षिण आफ्रिकेत क्वाझुलु, नाताल येथे ऍंड्रीझ प्रिटोरियसच्या नेतृत्वाखाली फूरट्रेक्कर आणि दाम्बुझा(न्झोबो) व न्देला कासोम्पिसी या झुलु ईम्पी सरदारांच्या सैन्यात घनघोर युद्ध. झुलुंच्या भाले आणि बाणांविरूद्ध बोअर बंदुका. तीन फूरट्रेक्कर जखमी ३,००० झुलु ठार.
- १८६४ – अमेरिकन यादवी युद्ध – मेजर जनरल जॉर्ज एच. थॉमसच्या युनियन सैन्याने लेफ्टनंट जनरल जॉन बेल हूडच्या कॉन्फेडरेट आर्मी ऑफ टेनेसीला हरविले.
विसावे शतक
- १९०३ – मुंबईतील ताजमहाल पॅलेस हॉटेल ग्राहकांसाठी खुले करण्यात आले.
- १९२२ – वॉर्सोमध्ये पोलंडचा अध्यक्ष गेब्रियेल नारुतोविझचा खून.
- १९३२ – ’प्रभात’चा ’मायामच्छिंद्र’ हा चित्रपट प्रदर्शित झाला.
- १९४२ – ज्यूंचे शिरकाण – हाईनरिक हिमलरने रोमा(जिप्सी) लोकांना कत्तलीसाठी ऑश्विझला पाठविले.
- १९४४ – दुसरे महायुद्ध-बॅटल ऑफ द बल्ज – बेल्जियमच्या आर्देनेस प्रदेशात जनरल ड्वाइट डी. आयझेनहोवर आणि फील्ड मार्शल गेर्ड फोन रूंड्स्टेटच्या सैन्यात लढाई.
- १९४६ – लेओन ब्लुम फ्रांसच्या पंतप्रधानपदी.
- १९४६ – थायलॅंडला संयुक्त राष्ट्रांत प्रवेश.
- १९५७ – ई.ई.चुंदरीगरने राजीनामा दिल्यावर सर फिरोजखान नून पाकिस्तानच्या पंतप्रधानपदी.
- १९७१ – भारत पाक युद्ध – पाक सैन्याची शरणागती, बांगलादेशची निर्मिती
- १९६० – हिमवादळात न्यू यॉर्कच्या आयडलवाइल्ड विमानतळाजवळ युनायटेड एरलाइन्सचे डग्लस डी.सी.८ आणि ट्रान्स वर्ल्ड एरलाइन्सच्या सुपर कॉन्स्टेलेशन जातीच्या विमानांमध्ये स्टेटन आयलंडवर हवेत टक्कर. १३४ ठार.
- १९७१ – बांगलादेश मुक्ति युद्ध – बांगलादेश विजय दिन. पाकिस्तानी फौजेने मित्रो बाहिनी समोर सपशेल शरणागति पत्करली.
- १९८५ – कल्पक्कम येथील ’इंदिरा गांधी अणूसंशोधन केंद्रातील (IGCAR) प्रायोगिक ’फास्ट ब्रीडर रिअॅक्टर’ राष्ट्राला समर्पित
- १९८९ – रोमेनियातील क्रांति – हंगेरीच्या पास्टर लास्लो तोकेसला देशनिकाल देण्याविरूद्ध तिमिसोआरा मध्ये नागरिकांनी सरकारचा निषेध केला.
- १९९१ – पुर्वीच्या सोविएत संघराज्यातुन (USSR) फुटून कझाकस्तान हा स्वतंत्र देश झाला.
- १९९८ – ऑपरेशन डेझर्ट फॉक्स – अमेरिका व युनायटेड किंग्डमने इराकवर बॉंबफेक केली.
एकविसावे शतक
- २०१२ – दिल्लीत एका तरुणीवर बसमध्ये निर्घृण सामूहिक बलात्कार व अत्याचार. तरुणीचा मृत्यू झाल्यावर सरकारने बलात्कार कायदा बदलला.
- २०१४ – पाकिस्तानी तालिबानने पेशावरमधील एक लष्करी शाळेवर हल्ला चढवून १३२ विद्यार्थ्यांना ठार मारले.
जन्म
- १४८५ – अरागॉनची कॅथेरीन, इंग्लंडची राणी.
- १७७० – लुडविग फान बीथोव्हेन, जर्मन संगीतज्ञ.
- १७७५ – जेन ऑस्टेन, ब्रिटीश लेखक.
- १७९० – लिओपोल्ड पहिला, बेल्जियमचा राजा.
- १८८२ – सर जॅक हॉब्स, इंग्लिश क्रिकेट खेळाडू.
- १८८८ – अलेक्झांडर, युगोस्लाव्हियाचा राजा.
- १९१७ – सर आर्थर सी. क्लार्क, ब्रिटीश लेखक.
- १९२६ – बबन प्रभू, प्रहसन अभिनेता.
- १९३३ – डॉ. प्रभाकर मांडे, लोकसाहित्याचे अभ्यासक.
- १९५२ – जोएल गार्नर, वेस्ट ईंडीझचा क्रिकेट खेळाडू.
मृत्यू
- १५१५ – अफोन्सो दि आल्बुकर्क, पोर्तुगालचा भ्रमंत.
- १९२२ – गेब्रियेल नारुतोविझ, पोलंडचा पहिला राष्ट्राध्यक्ष.
- १९६० – चिंतामण गणेश कर्वे, मराठी कोशकार व लेखक, महाराष्ट्र शब्दकोश, महाराष्ट्र वाक्संप्रदाय कोश, शास्त्रीय परिभाषा कोश यांचे संपादक.
- २००० – काशीनाथ सखाराम देवल, मराठी सर्कसमालक.
- २००४ – लक्ष्मीकांत बेर्डे, अभिनेता.
प्रतिवार्षिक पालन
- बहरैन – राष्ट्रीय दिन.
- बांगलादेश – विजय दिन.
- कझाकस्तान – स्वातंत्र्य दिन.
- दक्षिण आफ्रिका – सामंजस्य दिन (पूर्वीचा शपथ दिन).
राष्ट्रगीत
जनगणमन अधिनायक जय हे
भारत भाग्य-विधाता |
पंजाब, सिंधू, गुजरात, मराठा, द्राविड, उत्कल, बंग,
विंध्य, हिमाचल, यमुना, गंगा,
उच्छल जलधितरंग,
तव शुभ नामे जागे तव शुभ आशिस मागे,
गाहे तव जयगाथा,
जनगण मंगलदायक जय हे,
भारत भाग्य-विधाता|
जय हे, जय हे, जय हे,
जय जय जय, जय हे ||
@_राष्ट्रगीत विषयी अधिक माहितीसाठी – येथे क्लिक करा
प्रतिज्ञा
भारत माझा देश आहे.
सारे भारतीय माझे बांधव आहेत.
माझ्या देशावर माझे प्रेम आहे.
माझ्या देशातल्या समृद्ध आणि
विविधतेने नटलेल्या परंपरांचा मला अभिमान आहे.
त्या परंपरांचा पाईक होण्याची पात्रता
माझ्या अंगी यावी म्हणून मी सदैव प्रयत्न करेन.
मी माझ्या पालकांचा, गुरुजनांचा आणि
वडीलधाऱ्या माणसांचा मान ठेवीन
आणि प्रत्येकाशी सौजन्याने वागेन.
माझा देश आणि माझे देशबांधव
यांच्याशी निष्ठा राखण्याची
मी प्रतिज्ञा करीत आहे.
त्यांचे कल्याण आणि
त्यांची समृद्धी ह्यांतच माझे
सौख्य सामावले आहे.
जय हिंद…
@_मराठी,हिंदी,संस्कृत व इंग्रजी प्रतिज्ञा अधिक माहितीसाठी – येथे क्लिक करा
राज्यगीत
जय जय महाराष्ट्र माझा, गर्जा महाराष्ट्र माझा
जय जय महाराष्ट्र माझा, गर्जा महाराष्ट्र माझा ॥धृ॥
भिती न आम्हा तुझी मुळी ही गडगडणाऱ्या नभा
अस्मानाच्या सुलतानीला जबाब देती जिभा
सह्याद्रीचा सिंह गर्जतो शिव शंभू राजा
दरी दरीतन नाद गुंजला महाराष्ट्र माझा
जय जय महाराष्ट्र माझा, गर्जा महाराष्ट्र माझा ॥१॥
काळ्या छातीवरी कोरली, अभिमानाची लेणी
पोलादी मनगटेखेळती, खेळ जीव घेणी
दारिद्रयाच्या उन्हात शिजला
निढळाच्या घामाने भिजला
देश गौरवासाठी झिजला
दिल्लीचे ही तख्त राखितो, महाराष्ट्र माझा
जय जय महाराष्ट्र माझा, गर्जा महाराष्ट्र माझा
जय जय महाराष्ट्र माझा ॥२॥
@_जय जय महाराष्ट्र माझा mp3
अधिक माहितीसाठी – येथे क्लिक करा
भारताचे संविधान
उद्देशिका
आम्ही, भारताचे लोक, भारताचे एक सार्वभौम
समाजवादी धर्मनिरपेक्ष लोकशाही गणराज्य घडविण्याचा
व त्याच्या सर्व नागरिकांस
सामाजिक, आर्थिक व राजनैतिक न्याय;
विचार, अभिव्यक्ती, विश्वास, श्रद्धा
व उपासना यांचे स्वातंत्र्य;
दर्जाची व संधीची समानता;
निश्चितपणे प्राप्त करून देण्याचा
आणि त्या सर्वांमध्ये व्यक्तीची प्रतिष्ठा व राष्ट्राची एकता
आणि एकात्मता यांचे आश्वासन देणारी बंधुता
प्रवर्धित करण्याचा संकल्पपूर्वक निर्धार करून;
आमच्या संविधानसभेत
आज दिनांक सव्वीस नोव्हेंबर, १९४९ रोजी
याद्वारे हे संविधान अंगीकृत आणि अधिनियमित
करून स्वतःप्रत अर्पण करीत आहोत.
@_भारताचे संविधानविषयी अधिक माहितीसाठी – येथे क्लिक करा
प्रार्थना
- असो तुला देवा माझा
- देह मंदिर,चित्त मंदिर
- सर्वात्मका शिवसुंदरा
- केशवा माधवा
- या भारतात
- इतनी शक्ती हमे देना
- सत्यम शिवम सुंदरां
- हा देश माझा
- खरा तो एकची धर्म
- हंस वाहिनी
- तुम्ही हो माता
- शारदे मां
- ऐ मलिक तेरे बंदे
- हमको मन की शक्ती
बोधकथा
@_बोधकथा अधिक माहितीसाठी – येथे क्लिक करा
पसायदान
आता विश्वात्मकें देवें । येणे वाग्यज्ञें तोषावें ।
तोषोनिं मज द्यावे । पसायदान हें ॥
जें खळांची व्यंकटी सांडो । तया सत्कर्मी- रती वाढो ।
भूतां परस्परे पडो । मैत्र जिवाचें ॥
दुरितांचे तिमिर जावो । विश्व स्वधर्म सूर्यें पाहो ।
जो जे वांच्छिल तो तें लाहो । प्राणिजात ॥
वर्षत सकळ मंगळी । ईश्वरनिष्ठांची मांदियाळी ।
अनवरत भूमंडळी । भेटतु भूतां ॥
चलां कल्पतरूंचे आरव । चेतना चिंतामणींचें गाव ।
बोलते जे अर्णव । पीयूषाचे ॥
चंद्रमे जे अलांछन । मार्तंड जे तापहीन ।
ते सर्वांही सदा सज्जन । सोयरे होतु ॥
किंबहुना सर्व सुखी । पूर्ण होऊनि तिन्हीं लोकी ।
भजिजो आदिपुरुखी । अखंडित ॥
आणि ग्रंथोपजीविये । विशेषीं लोकीं इयें ।
दृष्टादृष्ट विजयें । होआवे जी ॥
येथ ह्मणे श्री विश्वेशराओ । हा होईल दान पसावो ।
येणें वरें ज्ञानदेवो । सुखिया जाला ॥
@_पसायदान विषयी अधिक माहितीसाठी – येथे क्लिक करा
देशभक्तीपर गीत
बालगीत
@_बालगीते अधिक माहितीसाठी – येथे क्लिक करा
प्रश्नमंजुषा
इंग्रजी प्रश्न
अधिक माहिती मिळवण्यासाठी …..
@_राष्ट्रगीत विषयी अधिक माहितीसाठी – येथे क्लिक करा
@_मराठी,हिंदी,संस्कृत व इंग्रजी प्रतिज्ञा अधिक माहितीसाठी – येथे क्लिक करा
@_बालगीते अधिक माहितीसाठी – येथे क्लिक करा
@_पसायदान विषयी अधिक माहितीसाठी – येथे क्लिक करा
@_बोधकथा अधिक माहितीसाठी – येथे क्लिक करा
@_छान छान गोष्टी अधिक माहितीसाठी – येथे क्लिक करा
@_भारताचे संविधानविषयी अधिक माहितीसाठी – येथे क्लिक करा
@_जय जय महाराष्ट्र माझा mp3 अधिक माहितीसाठी – येथे क्लिक करा
Tags
#16 december, 16 december, 16 december 2023, 15 december 2021 panchang, 16 december 2022 special day, 16 december 2023 weather, 16 december 2022 panchang in hindi, 16 december is celebrated as, what is celebrated on 16 december, 16 december 2023,
शालेय परिपाठ,परिपाठ दाखवा,मराठी परिपाठ,परिपाठ शायरी,शालेय परिपाठ सूत्रसंचालन,परिपाठ सुविचार,हिंदी परिपाठ
DECLAIMER
वरील सर्व माहिती ही संग्रहित असून आपण पडताळून पहावी. काही चुका असू शकतात. फक्त शैक्षणिक माहिती असल्याने आम्ही कोणतेही कायदेशीर हक्क (copy right) सांगत नाही.