15 December | 15 डिसेंबर दिनविशेष, शालेय परिपाठ, Daily Routine

15 December

15 डिसेंबर दिनविशेष

शालेय परिपाठ, Daily Routine

वार- शुक्रवार

दिनांक-  15/12/2023, 15 डिसेंबर

मिती- मार्गशीर्ष शुक्ल 3

शके– 1945

सुविचार- अपयश ही यशाची पहिली पायरी आहे.

म्हणी व अर्थ –

आलिया भोगासी असावे सादर-
अर्थ : – आलेल्या संकटास कुरकुर न करता तोंड देणे भाग असते.
वाक्यप्रचार- तारीफ होणे – कौतुक होणे , वाहवा करणे.

ठळक घटना आणि घडामोडी

डिसेंबर १५ हा ग्रेगरी दिनदर्शिकेनुसार वर्षातील ३४९ वा किंवा लीप वर्षात ३५० वा दिवस असतो.

सहावे शतक

  • ५३३ – टिकामेरोनची लढाई – व्हॅन्डाल राजा जेलिमर आणि रोमन सेनापति बेलिसारियस यांच्या सैन्यात.

सातवे शतक

  • ६८७ – संत सर्जियस पहिला पोपपदी.

तेरावे शतक

  • १२५६ – मोंगोल सेनानी हुलागु खानने ईराणमधील अलामतचा बालेकिल्ला हश्शाशिन काबीज करून ऊध्वस्त केले. मोंगोलांची ईशान्य आशियातील आगेकूच सुरू.

अठरावे शतक

  • १७९१ – व्हर्जिनीयाच्या विधानसभेने मान्य केल्यावर अमेरिकन नागरिकांचा हक्कनामा कायदा म्हणून अस्तित्वात आला.

विसावे शतक

  • १९११ – नवी दिल्लीचा पायाभरणी समारंभ सम्राट पंचम जॉर्जच्या हस्ते झाला.
  • १९४५ – दुसरे महायुद्ध – जनरल डग्लस मॅकआर्थरने हुकुमनाम्याद्वारे जपानमधील शिंटो धर्माची राज्यधर्म म्हणूनची मान्यता काढूल घेतली.
  • १९६१ – ऍडोल्फ ऐकमनला पंधरा आरोपांखाली मृत्यूदंड. आरोपांमध्ये ज्यूंचे शिरकाण, मानवतेविरूद्ध गुन्हे आणि बेकायदा संस्थाचे सदस्यत्व, वगैरेची गणना.
  • १९७० – व्हेनेरा – ७ हे सोवियेत संघाचे अंतराळयान यशस्वीपणे शुक्र ग्रहावर उतरले. पृथ्वी सोडुन इतर कुठल्याही ग्रहावर उतरणारे हे पहिलेच यान होते.
  • १९७६ – सामोआला संयुक्त राष्ट्रसंघाचे सदस्यत्व.
  • १९९१ – चित्रपट दिग्दर्शक सत्यजित रे यांना ऑस्कर पारितोषिक जाहीर
  • १९९४ – नेटस्केप नॅव्हिगेटर या आंतरजाल न्याहाळकाची पहिली आवृत्ती प्रकाशित.
  • १९९४ – पलाउला संयुक्त राष्ट्रसंघाचे सदस्यत्व.
  • १९९७ – शारजाजवळील वाळवंटात ताजिकीस्तानचे टी.यु.१५४ जातीचे विमान कोसळले. ८५ ठार.
  • १९९८ – बँकॉक येथील आशियाई क्रीडा स्पर्धेत भारताला कबड्डीमधे सलग तिसऱ्यांदा सुवर्णपदक
  • २००० – चेर्नोबिलची अणुभट्टी अखेर कायमस्वरूपी बंद.

जन्म

  • ३७ – नीरो, रोमन सम्राट.
  • १३० – लुसियस व्हेरस, रोमन सम्राट.
  • १२४२ – राजकुमार मुनेताका, जपानी शोगन.
  • १९०३ – स्वामी स्वरूपानंद, रत्‍नागिरीजवळच्या पावस गावातील गुरू.
  • १९०५ – इरावती कर्वे, साहित्य अकादमी व महाराष्ट्र शासन पुरस्कार विजेत्या मानववंशशास्त्रज्ञ, समाजशास्त्रज्ञ व शिक्षणतज्ञ .
  • १९३२ – टी.एन. शेषन, भारताचे मुख्य निवडणूक आयुक्त.
  • १९३५ – उषा मंगेशकर, भारतीय पार्श्वगायिका व संगीतकार.
  • १९७६ – बैचुंग भुतिया, भारतीय फुटबॉलपटू.

मृत्यू

  • १०२५ – बेसिल दुसरा, बायझेन्टाईन सम्राट.
  • १०७२ – आल्प अर्स्लान, तुर्कीचा राजा, पर्शिया (ईराण) मध्ये.
  • १२६३ – हाकोन चौथा, नॉर्वेचा राजा.
  • १७४९ : छत्रपती शाहू महाराज
  • १९५० : सरदार वल्लभभाई पटेल – स्वातंत्र्य सेनानी, स्वतंत्र भारताचे पहिले उपपंतप्रधान व पहिले गृहमंत्री, भारताचे लोहपुरुष, भारतरत्‍न (मरणोत्तर – १९९१)

प्रतिवार्षिक पालन

  • जागतिक चहा दिन

राष्ट्रगीत

जनगणमन अधिनायक जय हे

भारत भाग्य-विधाता |

पंजाब, सिंधू, गुजरात, मराठा, द्राविड, उत्कल, बंग,

विंध्य, हिमाचल, यमुना, गंगा,

उच्छल जलधितरंग,

तव शुभ नामे जागे तव शुभ आशिस मागे,

गाहे तव जयगाथा,

जनगण मंगलदायक जय हे,

भारत भाग्य-विधाता|

जय हे, जय हे, जय हे,

जय जय जय, जय हे ||

@_राष्ट्रगीत विषयी अधिक माहितीसाठी – येथे क्लिक करा

प्रतिज्ञा

भारत माझा देश आहे.

सारे भारतीय माझे बांधव आहेत.

माझ्या देशावर माझे प्रेम आहे.

माझ्या देशातल्या समृद्ध आणि

विविधतेने नटलेल्या परंपरांचा मला अभिमान आहे.

त्या परंपरांचा पाईक होण्याची पात्रता

माझ्या अंगी यावी म्हणून मी सदैव प्रयत्न करेन.

मी माझ्या पालकांचा, गुरुजनांचा आणि

वडीलधाऱ्या माणसांचा मान ठेवीन

आणि प्रत्येकाशी सौजन्याने वागेन.

माझा देश आणि माझे देशबांधव

यांच्याशी निष्ठा राखण्याची

मी प्रतिज्ञा करीत आहे.

त्यांचे कल्याण आणि

त्यांची समृद्धी ह्यांतच माझे

सौख्य सामावले आहे.

जय हिंद…

@_मराठी,हिंदी,संस्कृत व इंग्रजी प्रतिज्ञा अधिक माहितीसाठी – येथे क्लिक करा

राज्यगीत

जय जय महाराष्ट्र माझा, गर्जा महाराष्ट्र माझा

जय जय महाराष्ट्र माझा, गर्जा महाराष्ट्र माझा ॥धृ॥

भिती न आम्हा तुझी मुळी ही गडगडणाऱ्या नभा

अस्मानाच्या सुलतानीला जबाब देती जिभा

सह्याद्रीचा सिंह गर्जतो शिव शंभू राजा

दरी दरीतन नाद गुंजला महाराष्ट्र माझा

जय जय महाराष्ट्र माझा, गर्जा महाराष्ट्र माझा ॥१॥

काळ्या छातीवरी कोरली, अभिमानाची लेणी

पोलादी मनगटेखेळती, खेळ जीव घेणी

दारिद्रयाच्या उन्हात शिजला

निढळाच्या घामाने भिजला

देश गौरवासाठी झिजला

दिल्लीचे ही तख्त राखितो, महाराष्ट्र माझा

जय जय महाराष्ट्र माझा, गर्जा महाराष्ट्र माझा

जय जय महाराष्ट्र माझा ॥२॥

@_जय जय महाराष्ट्र माझा mp3

अधिक माहितीसाठी – येथे क्लिक करा

भारताचे संविधान

उद्देशिका

आम्ही, भारताचे लोक, भारताचे एक सार्वभौम

समाजवादी धर्मनिरपेक्ष लोकशाही गणराज्य घडविण्याचा

व त्याच्या सर्व नागरिकांस

सामाजिक, आर्थिक व राजनैतिक न्याय;

विचार, अभिव्यक्ती, विश्वास, श्रद्धा

व उपासना यांचे स्वातंत्र्य;

दर्जाची व संधीची समानता;

निश्चितपणे प्राप्त करून देण्याचा

आणि त्या सर्वांमध्ये व्यक्तीची प्रतिष्ठा व राष्ट्राची एकता

आणि एकात्मता यांचे आश्वासन देणारी बंधुता

प्रवर्धित करण्याचा संकल्पपूर्वक निर्धार करून;

आमच्या संविधानसभेत

आज दिनांक सव्वीस नोव्हेंबर, १९४९ रोजी

याद्वारे हे संविधान अंगीकृत आणि अधिनियमित

करून स्वतःप्रत अर्पण करीत आहोत.

@_भारताचे संविधानविषयी अधिक माहितीसाठी – येथे क्लिक करा

प्रार्थना

तू सुखकर्ता, सिद्धिविनायक
शुभकारक तू आम्हाला
विघ्नेश्वर तू भवतारक तू
प्रथम नमन गणराज तुला
कर्पूरगौरा, मंगलदायक
भक्तगणांना तू सुखकारक
सकल जनांच्या हरिसी चिंता
चिंतामणी जन म्हणती तुला
गौरीसुता, शिवशंकर तनया
विद्यापती तू करिसी किमया
श्रद्धेने जे धरिती पाया
देसी तयांना तुच लळा
  1. असो तुला देवा माझा
  2. देह मंदिर,चित्त मंदिर
  3. सर्वात्मका शिवसुंदरा
  4. केशवा माधवा
  5. या भारतात
  6. इतनी शक्ती हमे देना
  7. सत्यम शिवम सुंदरां
  8. हा देश माझा
  9. खरा तो एकची धर्म
  10. हंस वाहिनी
  11. तुम्ही हो माता
  12. शारदे मां
  13. ऐ मलिक तेरे बंदे
  14. हमको मन की शक्ती

बोधकथा

हरणाची चतुराई
एका जंगलात मोठ्या संख्‍येने हरणांचा वावर होता. परंतु आपल्‍या सहका-यांची संख्‍या कमी होत चालल्‍याचे एका हरणाच्‍या लक्षात आले. त्‍याने आपल्‍या इतर सहका-यांना सावध केले परंतु कोणीच त्‍याच्‍याकडे लक्ष दिले नाही.
त्‍या हरणाने आपल्‍या मित्राला सांगितले की डेरेदार व गच्च पानांनी भरलेल्‍या वृक्षांच्‍या फांद्यावर दडून शिकारी मचाण बांधतात.
यासाठी आपण या वृक्षाखाली जाणेच न बरे.
त्‍याचा मित्र त्‍याची गोष्‍ट ऐकून तेथेच थांबला. तिकडे त्‍या पानाआड दडलेल्‍या शिका-याने दोघांकडे फळे फेकण्‍यास सुरुवात केली. चतुर हरणास समजले की, झाडावर शिकारी बसलेला आहे.
त्‍याने मित्राला सावध केले पण मित्र हरीण लोभाच्‍या बळी पडून फळे खाण्‍यासाठी पुढे गेला आणि शिका-याने त्‍याची लगेचच शिकार केली. चतुर हरणाला वाईट वाटले.
पण मित्राने त्‍याचे म्‍हणणे ऐकायला हवे होते हे ही खरेच की नाही.
तात्‍पर्य :- आजच्‍या काळात कोणी जर आपल्‍याला प्रलोभन दाखवून जर फसवत असेल तर आपण सावध राहायला हवे.
किंवा कोणी जर सावध करत असेल तर त्‍याचे ऐकायला हवे.

@_बोधकथा अधिक माहितीसाठी – येथे क्लिक करा

पसायदान

आता विश्वात्मकें देवें । येणे वाग्यज्ञें तोषावें ।

तोषोनिं मज द्यावे । पसायदान हें ॥

जें खळांची व्यंकटी सांडो । तया सत्कर्मी- रती वाढो ।

भूतां परस्परे पडो । मैत्र जिवाचें ॥

दुरितांचे तिमिर जावो । विश्व स्वधर्म सूर्यें पाहो ।

जो जे वांच्छिल तो तें लाहो । प्राणिजात ॥

वर्षत सकळ मंगळी । ईश्वरनिष्ठांची मांदियाळी ।

अनवरत भूमंडळी । भेटतु भूतां ॥

चलां कल्पतरूंचे आरव । चेतना चिंतामणींचें गाव ।

बोलते जे अर्णव । पीयूषाचे ॥

चंद्रमे जे अलांछन । मार्तंड जे तापहीन ।

ते सर्वांही सदा सज्जन । सोयरे होतु ॥

किंबहुना सर्व सुखी । पूर्ण होऊनि तिन्हीं लोकी ।

भजिजो आदिपुरुखी । अखंडित ॥

आणि ग्रंथोपजीविये । विशेषीं लोकीं इयें ।

दृष्टादृष्ट विजयें । होआवे जी ॥

येथ ह्मणे श्री विश्वेशराओ । हा होईल दान पसावो ।

येणें वरें ज्ञानदेवो । सुखिया जाला ॥

@_पसायदान विषयी अधिक माहितीसाठी – येथे क्लिक करा

देशभक्तीपर गीत

या भारतात बंधुभाव..
या भारतात बंधुभाव नित्य वसू दे, दे वरचि असा दे
हे सर्व पंथ संप्रदाय एक दिसू दे, मतभेद नसू दे
नांदोत सुखे गरीब-अमीर एक मतांनी
मग हिंदू असो ख्रिश्चन वा हो इस्लामी
स्वातंत्र्य-सुखा या सकलांमाजि वसू दे
दे वरचि असा दे
सकळांस कळो मानवता, राष्ट्रभावना
हो सर्व स्थळी मिळुनी समुदाय प्रार्थना
उद्योगी तरुण शीलवान येथ असू दे
दे वरचि असा दे
जातिभाव विसरूनिया एक हो आम्ही
अस्पृश्यता समूळ नष्ट हो जगातुनी
खलनिंदका मनीही सत्य न्याय वसू दे
दे वरचि असा दे
सौंदर्य रमो घराघरात स्वर्गीयापरी
ही नष्ट हो‍उ दे विपत्ती भीती बावरी
तुकड्यास सदा या सेवेमाजी वसू दे
दे वरचि असा दे

बालगीत

उठा उठा चिऊताई
सारीकडे उजाडले
डोळे तरी मिटलेले
अजूनही अजूनही ।।धृ।।
सोनेरी हे दूत आले
घरट्याच्या दारापाशी
डोळ्यांवर झोप कशी
अजूनही अजूनही ।।१।।
लगबग पाखरे ही
गात गात गोड गाणे
टिपतात बघा दाणे
चोहीकडे चोहीकडे ।।२।।
झोपलेल्या अशा तुम्ही
आणायाचे मग कोणी
बाळासाठी चारापाणी
चिमुकल्या चिमुकल्या ।।३।।
बाळाचे मी घेता नाव
जागी झाली चिऊताई
उठोनिया दूर जाई
भूर भूर भूर भूर ।।४।।

@_बालगीते अधिक माहितीसाठी – येथे क्लिक करा

प्रश्नमंजुषा

✪  सम्राट अशोकाच्या राजधानीचे नाव काय होते ?
  ➜ पाटलीपुत्र.
 ✪  जागतिक कामगार दिन केव्हा असतो ?
  ➜ १ मे.
 ✪  जगातील सर्वांत मोठा महासागर कोणता ?
  ➜ पॅसिफिक महासागर.
 ✪  खान अब्दुल गफारखान यांनी कोणती संघटना स्थापन केली ?
  ➜ खुदा-ई-खिदमदगार.
 ✪  छत्रपती शिवाजी महाराजांचा राज्यभिषेक कोणत्या गडावर झाला ?
➜ रायगड

इंग्रजी प्रश्न

1) How many angels does a triangle has ?
Ans : Three
2) How many angels does a rectangle has ?
Ans : Four
3) How many angels does a pentagon has ?
Ans : Five
4) How many angels does a hexagon has ?
Ans : Six

अधिक माहिती मिळवण्यासाठी …..

@_राष्ट्रगीत विषयी अधिक माहितीसाठी – येथे क्लिक करा

@_मराठी,हिंदी,संस्कृत व इंग्रजी प्रतिज्ञा अधिक माहितीसाठी – येथे क्लिक करा

@_बालगीते अधिक माहितीसाठी – येथे क्लिक करा

@_पसायदान विषयी अधिक माहितीसाठी – येथे क्लिक करा

@_बोधकथा अधिक माहितीसाठी – येथे क्लिक करा

@_छान छान गोष्टी अधिक माहितीसाठी – येथे क्लिक करा

@_भारताचे संविधानविषयी अधिक माहितीसाठी – येथे क्लिक करा

@_जय जय महाराष्ट्र माझा mp3 अधिक माहितीसाठी – येथे क्लिक करा

Tags

#15 december, 15 december, 15 december 2023, 15 december 2021 panchang, 15 december 2022 special day, 15 december 2023 weather, 15 december 2022 panchang in hindi, 15 december is celebrated as, what is celebrated on 15 december, 15 december 2023,

शालेय परिपाठ,परिपाठ दाखवा,मराठी परिपाठ,परिपाठ शायरी,शालेय परिपाठ सूत्रसंचालन,परिपाठ सुविचार,हिंदी परिपाठ

DECLAIMER

वरील सर्व माहिती ही संग्रहित असून आपण पडताळून पहावी. काही चुका असू शकतात. फक्त शैक्षणिक माहिती असल्याने आम्ही कोणतेही कायदेशीर हक्क (copy right) सांगत नाही.

Author: Active Guruji

Blogger

आपल्या प्रतिक्रिया लिहा.

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.