1 September | 1 सप्टेंबर दिनविशेष, शालेय परिपाठ, Daily Routine

1 September

1 सप्टेंबर दिनविशेष

शालेय परिपाठ, Daily Routine

वार- शुक्रवार

दिनांक- 01/09/2023, 1 सप्टेंबर

मिती-  श्रावण कृष्ण 2

शके– 1945

सुविचार- “तुम्ही ज्याची कल्पना करू शकता ते सर्व खरे आहे.”

म्हणी व अर्थ : साखरेचे खाणार त्याला देव देणार – भाग्यवान माणसाला सर्व परिस्थितीच अनुकूल असते.

वाक्प्रचार- काटकसर करणे – बचत करणे.

ठळक घटना आणि घडामोडी

सप्टेंबर १ हा ग्रेगरी दिनदर्शिकेनुसार वर्षातील २४४ वा किंवा लीप वर्षात २४५ वा दिवस असतो.

इ.स.पूर्व छप्पन्नावे शतक

  • ५५०९ – बायझेन्टाईन साम्राज्यातील समजाप्रमाणे या दिवशी सृष्टीची रचना झाली.

अठरावे शतक

  • १७१५ – फ्रांसचा राजा लुई चौदावा ७२वर्षांच्या राज्यकारभारानंतर मृत्यू पावला. त्याचा राज्यकाल कोणत्याही युरोपीय राज्यकर्त्यापेक्षा जास्त होता.

एकोणिसावे शतक

  • १८६२ – अमेरिकन यादवी युद्ध-उत्तरेच्या जनरल विल्यम टी. शेर्मनने घातलेल्या चार महिन्यांच्या वेढ्याला कंटाळून जनरल जॉन बेल हूडने अटलांटातून पळ काढला.
  • १८९४ – हिंकली, मिनेसोटाजवळ लागलेल्या वणव्यात ४००पेक्षा अधिक मृत्युमुखी.
  • १८९७ – बॉस्टन सबवेचे उद्घाटन.

विसावे शतक

  • १९०५ – आल्बर्टा आणि सास्काचेवान कॅनडामध्ये दाखल.
  • १९१४ – सेंट पीटर्सबर्गचे नाव बदलून पेट्रोग्राड करण्यात आले.
  • १९२३ – टोक्यो आणि योकोहामा परिसरात भूकंप १,०५,००० ठार.
  • १९३९ – दुसरे महायुद्ध – जर्मनीने पोलंडवर आक्रमण केले व युद्धास तोंड फुटले.
  • १९६४ – इंडियन ऑइल रिफायनरीझ आणि इंडियन ऑइल कंपनी यांनी एकत्र येउन इंडियन ऑइल कॉर्पोरेशन ही कंपनी स्थापली.
  • १९६९ – लिब्यात कर्नल मुअम्मर गद्दाफीने सत्ता बळकावली.
  • १९७२ – रेक्याविकमध्ये बॉबी फिशरने बोरिस स्पास्कीला हरवून बुद्धिबळाचे जगज्जेतेपद मिळवले.
  • १९७४ – एस.आर.-७१ ब्लॅकबर्ड प्रकारच्या विमानाने न्यू यॉर्क ते लंडन अंतर एक तास ५४ मिनिटे व ५६.४ सेकंदात तोडून जागतिक विक्रम स्थापला.
  • १९७९ – पायोनियर ११ हे अंतराळयान शनीपासून २१,००० किमी अंतरावरून गेले.
  • १९८३ – शीत युद्ध – कोरियन एर फ्लाइट ००७ हे बोईंग ७४७ प्रकारचे विमान सोवियेत हद्दीत घुसल्याने सोवियेत संघाच्या लढाऊ विमानांनी तोडून पाडले. २६९ ठार.
  • १९९१ – उझबेकिस्तानने रशियापासून स्वातंत्र्य जाहीर केले.

जन्म

  • १८७५ – एडगर राइस बरोज, अमेरिकन लेखक.
  • १८९६ – ए.सी. भक्तिवेदांत स्वामी प्रभुपाद, वैष्णव तत्त्वज्ञानी, हरे कृष्ण पंथाचे स्थापक.
  • १९०६ – होआकिन बॅलाग्वेर, डॉमिनिकन प्रजासत्ताकचा राष्ट्राध्यक्ष.
  • १९२१ – माधव मंत्री, भारतीय क्रिकेट खेळाडू.
  • १९२६ – अब्दुर रहमान बिश्वास, बांगलादेशचा राष्ट्राध्यक्ष.
  • १९४६ – रोह मू-ह्युन, दक्षिण कोरियाचा राष्ट्राध्यक्ष.
  • १९४९ – पी.ए. संगमा, भारतीय राजकारणी.
  • १९५१ – डेव्हिड बेरस्टो, इंग्लिश क्रिकेट खेळाडू.
  • १९६८ – मोहम्मद अट्टा, सप्टेंबर ११, २००१ च्या दहशतवादी हल्ल्याचा सूत्रधार.
  • १९७६ – क्लेर कॉनोर, इंग्लिश क्रिकेट खेळाडू.
  • १९९७ – जॉन जंगकुक,बीटीएस बँडचा गायक.

मृत्यू

  • १०६७ – बाल्ड्विन पाचवा, फ्लँडर्सचा राजा.
  • ११५९ – पोप एड्रियान चौथा.
  • १२५६ – कुजो योरित्सुने, जपानी शोगन.
  • १५७४ – गुरू अमरदास, तिसरे शीख गुरू.
  • १५८१ – गुरू रामदास, चौथे शीख गुरू.
  • १७१५ – लुई चौदावा, फ्रांसचा राजा.

प्रतिवार्षिक पालन

  • क्रांती दिन – लिब्या.
  • ज्ञान दिन – रशिया.
  • शिक्षक दिन – सिंगापुर.
  • संविधान दिन – स्लोव्हेकिया.
  • स्वातंत्र्य दिन – उझबेकिस्तान.

राष्ट्रगीत

जनगणमन अधिनायक जय हे

भारत भाग्य-विधाता |

पंजाब, सिंधू, गुजरात, मराठा, द्राविड, उत्कल, बंग,

विंध्य, हिमाचल, यमुना, गंगा,

उच्छल जलधितरंग,

तव शुभ नामे जागे तव शुभ आशिस मागे,

गाहे तव जयगाथा,

जनगण मंगलदायक जय हे,

भारत भाग्य-विधाता|

जय हे, जय हे, जय हे,

जय जय जय, जय हे ||

@_राष्ट्रगीत विषयी अधिक माहितीसाठी – येथे क्लिक करा

प्रतिज्ञा

भारत माझा देश आहे.

सारे भारतीय माझे बांधव आहेत.

माझ्या देशावर माझे प्रेम आहे.

माझ्या देशातल्या समृद्ध आणि

विविधतेने नटलेल्या परंपरांचा मला अभिमान आहे.

त्या परंपरांचा पाईक होण्याची पात्रता

माझ्या अंगी यावी म्हणून मी सदैव प्रयत्न करेन.

मी माझ्या पालकांचा, गुरुजनांचा आणि

वडीलधाऱ्या माणसांचा मान ठेवीन

आणि प्रत्येकाशी सौजन्याने वागेन.

माझा देश आणि माझे देशबांधव

यांच्याशी निष्ठा राखण्याची

मी प्रतिज्ञा करीत आहे.

त्यांचे कल्याण आणि

त्यांची समृद्धी ह्यांतच माझे

सौख्य सामावले आहे.

जय हिंद…

@_मराठी,हिंदी,संस्कृत व इंग्रजी प्रतिज्ञा अधिक माहितीसाठी – येथे क्लिक करा

राज्यगीत

जय जय महाराष्ट्र माझा, गर्जा महाराष्ट्र माझा

जय जय महाराष्ट्र माझा, गर्जा महाराष्ट्र माझा ॥धृ॥

भिती न आम्हा तुझी मुळी ही गडगडणाऱ्या नभा

अस्मानाच्या सुलतानीला जबाब देती जिभा

सह्याद्रीचा सिंह गर्जतो शिव शंभू राजा

दरी दरीतन नाद गुंजला महाराष्ट्र माझा

जय जय महाराष्ट्र माझा, गर्जा महाराष्ट्र माझा ॥१॥

काळ्या छातीवरी कोरली, अभिमानाची लेणी

पोलादी मनगटेखेळती, खेळ जीव घेणी

दारिद्रयाच्या उन्हात शिजला

निढळाच्या घामाने भिजला

देश गौरवासाठी झिजला

दिल्लीचे ही तख्त राखितो, महाराष्ट्र माझा

जय जय महाराष्ट्र माझा, गर्जा महाराष्ट्र माझा

जय जय महाराष्ट्र माझा ॥२॥

@_जय जय महाराष्ट्र माझा mp3

अधिक माहितीसाठी – येथे क्लिक करा

भारताचे संविधान

उद्देशिका

आम्ही, भारताचे लोक, भारताचे एक सार्वभौम

समाजवादी धर्मनिरपेक्ष लोकशाही गणराज्य घडविण्याचा

व त्याच्या सर्व नागरिकांस

सामाजिक, आर्थिक व राजनैतिक न्याय;

विचार, अभिव्यक्ती, विश्वास, श्रद्धा

व उपासना यांचे स्वातंत्र्य;

दर्जाची व संधीची समानता;

निश्चितपणे प्राप्त करून देण्याचा

आणि त्या सर्वांमध्ये व्यक्तीची प्रतिष्ठा व राष्ट्राची एकता

आणि एकात्मता यांचे आश्वासन देणारी बंधुता

प्रवर्धित करण्याचा संकल्पपूर्वक निर्धार करून;

आमच्या संविधानसभेत

आज दिनांक सव्वीस नोव्हेंबर, १९४९ रोजी

याद्वारे हे संविधान अंगीकृत आणि अधिनियमित

करून स्वतःप्रत अर्पण करीत आहोत.

@_भारताचे संविधानविषयी अधिक माहितीसाठी – येथे क्लिक करा

प्रार्थना

देहाची तिजोरी, भक्तीचाच ठेवा
उघड दार देवा आता उघड दार देवा
पिते दूध डोळे मिटूनी
जात मांजराची
मनी चोरट्याच्या का रे
भिती चांदण्यांची
सरावल्या हातांनाही कंप का सुटावा
उजेडात होते पुण्य,
अंधारात पाप
ज्याचे त्याचे हाती आहे
कर्तव्याचे माप
दुष्ट दुर्जनांची कैसी घडे लोक सेवा
स्वार्थ जणू भिंतीवरचा
आरसा बिलोरी
आपुलीच प्रतिमा होते
आपुलीच वैरी
घडोघडी अपराध्यांचा
तोल सावरावा
तुझ्या हाती पांडुरंगा
तिजोरी फुटावी
मुक्तपणे भक्ती माझी
तुझी तू लुटावी
मार्ग तुझ्या राऊळाचा
मला आकळावा
भलेपणासाठी कोणी
बुरेपणा केला बंधनात
असुनी वेडा जगी
मुक्त झाला आपुल्याच
सौख्यालागी करील तो हेवा
  1. असो तुला देवा माझा
  2. देह मंदिर,चित्त मंदिर
  3. सर्वात्मका शिवसुंदरा
  4. केशवा माधवा
  5. या भारतात
  6. इतनी शक्ती हमे देना
  7. सत्यम शिवम सुंदरां
  8. हा देश माझा
  9. खरा तो एकची धर्म
  10. हंस वाहिनी
  11. तुम्ही हो माता
  12. शारदे मां
  13. ऐ मलिक तेरे बंदे
  14. हमको मन की शक्ती

बोधकथा

सेवा हाच धर्म
एका पत्रकारांनी स्वामी विवेकानंदांची कीर्ती ऐकलेली होती. स्वामी विवेकानंदांना भेटून त्यांच्याकडून चार ज्ञानाच्या गोष्टी शिकाव्याात अशी त्यांची तीव्र इच्छा होती.
त्यां पत्रकारांचे दोन मित्र त्यांना भेटावयास आले व बोलता-बोलता स्वामी विवेकानंदांचा उल्लेख निघाला. तिघांनी विवेकानंदांना भेटायला जाण्याचे ठरविले. तिघेही मिळून स्वामीजींकडे गेले.
विवेकानंदांनी तिघांचीही आस्थेने विचारपूस केली.
 यादरम्यान स्वामीजींना असे कळाले की तिघेही पंजाब प्रांतात राहणारे आहेत. त्या काळात पंजाबात दुष्काळ पडलेला होता. त्यांनी त्यासंदर्भात चर्चा केली. दुष्कांळग्रस्तांसाठी चाललेल्याा मदतकार्याची माहिती घेतली.
त्यानंतर शैक्षणिक, नैतिक आणि सामाजिक बाबींवर चर्चा केली. ब-याच वेळ चर्चा झाल्या.नंतर तिघेही निघाले.
 निघताना पत्रकार महाशय विवेकानंदांना म्हणाले,”स्वा मीजी, आम्हीच तुमच्यांकडे धार्मिक उपदेश मिळेल या उद्देशाने आले होतो. पण तुम्ही मात्र सामान्य‍ अशा बाबींवरच चर्चा केलीत.
आम्हाला यातून ज्ञानवर्धक असे काहीच मिळाले नाही.” यावर  स्वामी विवेकानंदांनी मोठे मार्मिक उत्तर दिले ते असे की,” मित्रवर्य, जोपर्यत या देशात एक जरी मूल उपाशी राहिले तर धर्माची चर्चा करण्या पेक्षा त्याची भूक कशी भागवता येईल हे पाहणे जास्त महत्वाचे आहे.
ज्याचे पोट भरलेले नाही त्याला धर्मोपदेश देण्यापेक्षा भाकरी देणे हे महत्वाचे आहे.
तात्पर्य : रिकाम्या पोटी तत्वज्ञानाचा उपदेश उपयोगी नाही.

@_बोधकथा अधिक माहितीसाठी – येथे क्लिक करा

पसायदान

आता विश्वात्मकें देवें । येणे वाग्यज्ञें तोषावें ।

तोषोनिं मज द्यावे । पसायदान हें ॥

जें खळांची व्यंकटी सांडो । तया सत्कर्मी- रती वाढो ।

भूतां परस्परे पडो । मैत्र जिवाचें ॥

दुरितांचे तिमिर जावो । विश्व स्वधर्म सूर्यें पाहो ।

जो जे वांच्छिल तो तें लाहो । प्राणिजात ॥

वर्षत सकळ मंगळी । ईश्वरनिष्ठांची मांदियाळी ।

अनवरत भूमंडळी । भेटतु भूतां ॥

चलां कल्पतरूंचे आरव । चेतना चिंतामणींचें गाव ।

बोलते जे अर्णव । पीयूषाचे ॥

चंद्रमे जे अलांछन । मार्तंड जे तापहीन ।

ते सर्वांही सदा सज्जन । सोयरे होतु ॥

किंबहुना सर्व सुखी । पूर्ण होऊनि तिन्हीं लोकी ।

भजिजो आदिपुरुखी । अखंडित ॥

आणि ग्रंथोपजीविये । विशेषीं लोकीं इयें ।

दृष्टादृष्ट विजयें । होआवे जी ॥

येथ ह्मणे श्री विश्वेशराओ । हा होईल दान पसावो ।

येणें वरें ज्ञानदेवो । सुखिया जाला ॥

@_पसायदान विषयी अधिक माहितीसाठी – येथे क्लिक करा

देशभक्तीपर गीत

बलसागर भारत होवो
बलसागर भारत होवो, विश्वात शोभुनी राहो
हे कंकण करि बांधियले, जनसेवे जीवन दिधले
राष्ट्रार्थ प्राण हे उरले, मी सिद्ध मरायाला हो
वैभवी देश चढवीन, सर्वस्व त्यास अर्पीन
तिमीर घोर संहारीन, या बंधु सहाय्याला हो
हातांत हात घेऊन, हृदयास हृदय जोडून
ऐक्याचा मंत्र जपून, या कार्य करायाला हो
करि दिव्य पताका घेऊ, प्रिय भारतगीते गाऊ
विश्वास पराक्रम दावू, ही माय निजपदा लाहो
या उठा करू हो शर्थ, संपादु दिव्य पुरुषार्थ
हे जीवन ना तरि व्यर्थ, भाग्यसूर्य तळपत राहो
ही माय थोर होईल, वैभवे दिव्य शोभेल
जगतास शांति देईल, तो सोन्याचा दिन येवो
कवी : साने गुरुजी

बालगीत

चांदोबा चांदोबा भागलास का ?
निंबोणीच्या झाडामागे लपलास का ?
निंबोणीचे झाड करवंदी,
मामाचा वाडा चिरेबंदी !
आई-बाबांवर रुसलास का ?
असाच एकटा बसलास का ?
आता तरी परतुनी जाशील का ?
दूध न्‌ शेवया खाशील का ?
आई बिचारी रडत असेल,
बाबांचा पारा चढत असेल !
असाच बसून राहशील का ?
बाबांची बोलणी खाशील का ?
चांदोबा, चांदोबा कुठे रे गेला ?
दिसता दिसता गडप झाला !
हाकेला ‘ओ’ माझ्या देशील का ?
पुन्हा कधी आम्हाला दिसशील का

@_बालगीते अधिक माहितीसाठी – येथे क्लिक करा

प्रश्नमंजुषा

१) हदयविकार असणाऱ्या व्यक्तीसाठी कोणते तेल उपयुक्त आहे?
उत्तर : करडई
२) वातावरणात कार्बनडाय ऑक्साईडचे प्रमाण किती टक्के आहे ?
उत्तर- ०.०४ टक्के
३) खाद्यपदार्थात खाण्याच्या सोड्याचा सर्वाधिक वापर केल्यास कोणत्या
जीवनसत्वाचा नाश होतो?
उत्तर – ‘क’ जीवनसत्व
४) निद्रानाश हा रोग कोणत्या जीवनसत्वाच्या कमतरतेमुळे मनुष्यात आढळतो?
उत्तर- ‘ब’ जीवनसत्व
५) हाडांच्या वाढीसाठी कोणते जीवनसत्व आवश्यक असते ?
उत्तर:’ ड’ जीवनसत्व

ENGLISH QUESTION

1) Which is the national bird of India?
Ans: Peacock
2) Which is the state bird of Maharashtra?
Ans: Green Pigeon
3) Which bird flies the highest in the sky?
Ans : Kite
4) Who is called the king of birds?
Ans: Eagle
5) Which is the fastest bird of land?
Ans: Ostrich

अधिक माहिती मिळवण्यासाठी …..

@_राष्ट्रगीत विषयी अधिक माहितीसाठी – येथे क्लिक करा

@_मराठी,हिंदी,संस्कृत व इंग्रजी प्रतिज्ञा अधिक माहितीसाठी – येथे क्लिक करा

@_बालगीते अधिक माहितीसाठी – येथे क्लिक करा

@_पसायदान विषयी अधिक माहितीसाठी – येथे क्लिक करा

@_बोधकथा अधिक माहितीसाठी – येथे क्लिक करा

@_छान छान गोष्टी अधिक माहितीसाठी – येथे क्लिक करा

@_भारताचे संविधानविषयी अधिक माहितीसाठी – येथे क्लिक करा

@_जय जय महाराष्ट्र माझा mp3 अधिक माहितीसाठी – येथे क्लिक करा

Tags

#1 september,1 september 2023, 1 september 2021 panchang, 1 september 2022 special day, 1 september 2023 weather, 1 september 2022 panchang in hindi, 1 september is celebrated as, what is celebrated on 1 september, 1 september 2023,

शालेय परिपाठ,परिपाठ दाखवा,मराठी परिपाठ,परिपाठ शायरी,शालेय परिपाठ सूत्रसंचालन,परिपाठ सुविचार,हिंदी परिपाठ

DECLAIMER

वरील सर्व माहिती ही संग्रहित असून आपण पडताळून पहावी. काही चुका असू शकतात. फक्त शैक्षणिक माहिती असल्याने आम्ही कोणतेही कायदेशीर हक्क (copy right) सांगत नाही.

Author: Active Guruji

Blogger

आपल्या प्रतिक्रिया लिहा.

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.