1 Jully | 1 जुलै दिनविशेष, परिपाठ, Daily Routine

1 Jully

1 जुलै दिनविशेष

शालेय परिपाठ, Daily Routine

आज वार– शनिवार

दिनांक- 01/07/2023, 1 Jully

मिती- आषाढ शुक्ल 13

शके– 1945

सुविचार- आज वाईट आहे. उद्या चांगली येईल. वेळच तर आहे, बदलून नक्की जाईल.

म्हणी व अर्थ- अति तेथे माती – कोणत्याही गोष्टीचा अतिरेक वाईट असतो.

वाक्प्रचार- आश्चर्य वाटणे – नवल वाटणे.
1 जुलै दिनविशेष

ठळक घटना आणि घडामोडी

1 जुलै हा ग्रेगरी दिनदर्शिकेनुसार वर्षातील १८२ वा किंवा लीप वर्षात १८३ वा दिवस असतो.

एकविसावे शतक

  • २००२ – बाश्किरियन एरलाइन्स फ्लाइट २९३७ हे तुपोलेव तू-१५४ प्रकारचे विमान आणि डीएचएल कंपनीचे बोईंग ७५७ प्रकारचे विमान जर्मनीतील ऊबेरलिंगेन गावावर आकाशात एकमेकांस आदळली. ७१ ठार.
  • २००६ – चीन मध्ये किंगहाइ-तिबेट रेल्वेचे उद्घाटन.

जन्म

  • १४८१ – क्रिस्चियन दुसरा, डेन्मार्कचा राजा.
  • १५३४ – फ्रेडरिक दुसरा, डेन्मार्कचा राजा.
  • १६४६ – गॉट्फ्रीड लाइबनिझ, जर्मन गणितज्ञ.
  • १७४२ – जॉर्ज क्रिस्तॉफ लिश्टेनबर्ग, जर्मन भौतिकशास्त्रज्ञ.
  • १७८८ – ज्याँ-व्हिक्टर पाँसेले, फ्रेंच गणितज्ञ.
  • १९०६ – एस्टे लॉडर, अमेरिकन उद्योगपती.
  • १९१३ – वसंतराव नाईक, हरितक्रांतीचे आणि रोजगार हमी योजनेचे जनक, महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री.
  • १९२१ – सेरेत्से खामा, बोत्स्वानाचा पहिला राष्ट्राध्यक्ष.
  • १९३८ – पंडित हरिप्रसाद चौरासिया, आंतरराष्ट्रीय कीर्तीचे बासरीवादक.
  • १९४७ – शरद यादव खासदार
  • १९४९ – व्यंकय्या नायडू भाजपा नेते
  • १९५१ – फ्रेड श्नायडर, अमेरिकन संगीतकार.
  • १९६० – सुदेश भोसले गायक
  • १९६१ – कल्पना चावला, अंतराळवीर

मृत्यू

  • १९७१ – सर विल्यम लॉरेन्स ब्रॅग, ऑस्ट्रेलियन-ब्रिटिश भौतिकशास्त्रज्ञ व नोबेल पारितोषिक विजेता.
  • १९९४ – राजाभाऊ नातू, मराठी रंगभूमीवरील नेपथ्यकार.

प्रतिवार्षिक पालन

राष्ट्रगीत

जनगणमन अधिनायक जय हे

भारत भाग्य-विधाता |

पंजाब, सिंधू, गुजरात, मराठा, द्राविड, उत्कल, बंग,

विंध्य, हिमाचल, यमुना, गंगा,

उच्छल जलधितरंग,

तव शुभ नामे जागे तव शुभ आशिस मागे,

गाहे तव जयगाथा,

जनगण मंगलदायक जय हे,

भारत भाग्य-विधाता|

जय हे, जय हे, जय हे,

जय जय जय, जय हे ||

@_राष्ट्रगीत विषयी अधिक माहितीसाठी – येथे क्लिक करा

प्रतिज्ञा

भारत माझा देश आहे.

सारे भारतीय माझे बांधव आहेत.

माझ्या देशावर माझे प्रेम आहे.

माझ्या देशातल्या समृद्ध आणि

विविधतेने नटलेल्या परंपरांचा मला अभिमान आहे.

त्या परंपरांचा पाईक होण्याची पात्रता

माझ्या अंगी यावी म्हणून मी सदैव प्रयत्न करेन.

मी माझ्या पालकांचा, गुरुजनांचा आणि

वडीलधाऱ्या माणसांचा मान ठेवीन

आणि प्रत्येकाशी सौजन्याने वागेन.

माझा देश आणि माझे देशबांधव

यांच्याशी निष्ठा राखण्याची

मी प्रतिज्ञा करीत आहे.

त्यांचे कल्याण आणि

त्यांची समृद्धी ह्यांतच माझे

सौख्य सामावले आहे.

जय हिंद…

@_मराठी,हिंदी,संस्कृत व इंग्रजी प्रतिज्ञा अधिक माहितीसाठी – येथे क्लिक करा

राज्यगीत

जय जय महाराष्ट्र माझा, गर्जा महाराष्ट्र माझा

जय जय महाराष्ट्र माझा, गर्जा महाराष्ट्र माझा ॥धृ॥

भिती न आम्हा तुझी मुळी ही गडगडणाऱ्या नभा

अस्मानाच्या सुलतानीला जबाब देती जिभा

सह्याद्रीचा सिंह गर्जतो शिव शंभू राजा

दरी दरीतन नाद गुंजला महाराष्ट्र माझा

जय जय महाराष्ट्र माझा, गर्जा महाराष्ट्र माझा ॥१॥

काळ्या छातीवरी कोरली, अभिमानाची लेणी

पोलादी मनगटेखेळती, खेळ जीव घेणी

दारिद्रयाच्या उन्हात शिजला

निढळाच्या घामाने भिजला

देश गौरवासाठी झिजला

दिल्लीचे ही तख्त राखितो, महाराष्ट्र माझा

जय जय महाराष्ट्र माझा, गर्जा महाराष्ट्र माझा

जय जय महाराष्ट्र माझा ॥२॥

@_जय जय महाराष्ट्र माझा mp3 

अधिक माहितीसाठी – येथे क्लिक करा

भारताचे संविधान

उद्देशिका

आम्ही, भारताचे लोक, भारताचे एक सार्वभौम

समाजवादी धर्मनिरपेक्ष लोकशाही गणराज्य घडविण्याचा

व त्याच्या सर्व नागरिकांस

सामाजिक, आर्थिक व राजनैतिक न्याय;

विचार, अभिव्यक्ती, विश्वास, श्रद्धा

व उपासना यांचे स्वातंत्र्य;

दर्जाची व संधीची समानता;

निश्चितपणे प्राप्त करून देण्याचा

आणि त्या सर्वांमध्ये व्यक्तीची प्रतिष्ठा व राष्ट्राची एकता

आणि एकात्मता यांचे आश्वासन देणारी बंधुता

प्रवर्धित करण्याचा संकल्पपूर्वक निर्धार करून;

आमच्या संविधानसभेत

आज दिनांक सव्वीस नोव्हेंबर, १९४९ रोजी

याद्वारे हे संविधान अंगीकृत आणि अधिनियमित

करून स्वतःप्रत अर्पण करीत आहोत.

@_भारताचे संविधानविषयी अधिक माहितीसाठी – येथे क्लिक करा

प्रार्थना

देह मंदिर चित्तमंदिर 
देह मंदिर, चित्तमंदिर, एक तेथे प्रार्थना
सत्य सुंदर मंगलाची नित्य हो आराधना
दु:खितांचे दु:ख जावो ही मनाची कामना
वेदना जाणावयाला जागवू संवेदना
दुर्बलांच्या रक्षणाला पौरूषाची साधना
सत्य सुंदर मंगलाची नित्य हो आराधना
जीवनी नवतेज राहो अंतरंगी भावना
सुंदराचा वेध लागो मानवाच्या जीवना
शौर्य लाभो, धैर्य लाभो, सत्यता संशोधना
सत्य सुंदर मंगलाची नित्य हो आराधना
भेद सारे मावळू द्या वैर सार्‍या वासना
मानवांच्या एकतेची पूर्ण होवो कल्पना
मुक्त आम्ही फक्त मानू बंधुतेच्या बंधना
सत्य सुंदर मंगलाची नित्य हो आराधना
  1. असो तुला देवा माझा 
  2. देह मंदिर,चित्त मंदिर
  3. सर्वात्मका शिवसुंदरा
  4. केशवा माधवा 
  5. या भारतात
  6. इतनी शक्ती हमे देना
  7. सत्यम शिवम सुंदरां
  8. हा देश माझा
  9.  खरा तो एकची धर्म
  10. हंस वाहिनी
  11. तुम्ही हो माता
  12. शारदे मां
  13. ऐ मलिक तेरे बंदे
  14. हमको मन की शक्ती 

बोधकथा

पर्वत आणि उंदीर
एकदा एक पर्वत आणि उंदीर यांच्यात वाद सुरू होता. ‘श्रेष्ठ कोण?’ यावर ते भांडत होते. पर्वत म्हणाला, “तू किती छोटा प्राणी आहेस, तू माझ्याहून अजिबात श्रेष्ठ नाहीस.”
उंदीर पटकन म्हणाला, “मला माहित आहे की, मी तुझ्या एवढा मोठा नाही. पण तू तरी कुठे माझ्या एवढा लहान आहेस!” पर्वत म्हणाला, “मोठ्या आकाराचे अनेक फायदे असतात.
मी मोठा असल्याने आकाशात वाहणाऱ्या ढगांना अडकवू शकतो. “उंदीर म्हणाला, “तू त्या ढगांना अडवू शकतोस. पण तुझ्या पायथ्याशी मी मोठी बिळे करतो.
तेव्हा तू मला अडवू शकतोस का?” छोट्या उंदराने आपल्या चतुराईने पर्वतावर मात केली व तो आपल्या बिळात घुसला.
तात्पर्य: छोटा असो की मोठा, प्रत्येकाला स्वतःचे महत्त्व असतेच.

@_बोधकथा अधिक माहितीसाठी – येथे क्लिक करा

पसायदान

आता विश्वात्मकें देवें । येणे वाग्यज्ञें तोषावें ।

तोषोनिं मज द्यावे । पसायदान हें ॥

जें खळांची व्यंकटी सांडो । तया सत्कर्मी- रती वाढो ।

भूतां परस्परे पडो । मैत्र जिवाचें ॥

दुरितांचे तिमिर जावो । विश्व स्वधर्म सूर्यें पाहो ।

जो जे वांच्छिल तो तें लाहो । प्राणिजात ॥

वर्षत सकळ मंगळी । ईश्वरनिष्ठांची मांदियाळी ।

अनवरत भूमंडळी । भेटतु भूतां ॥

चलां कल्पतरूंचे आरव । चेतना चिंतामणींचें गाव ।

बोलते जे अर्णव । पीयूषाचे ॥

चंद्रमे जे अलांछन । मार्तंड जे तापहीन ।

ते सर्वांही सदा सज्जन । सोयरे होतु ॥

किंबहुना सर्व सुखी । पूर्ण होऊनि तिन्हीं लोकी ।

भजिजो आदिपुरुखी । अखंडित ॥

आणि ग्रंथोपजीविये । विशेषीं लोकीं इयें ।

दृष्टादृष्ट विजयें । होआवे जी ॥

येथ ह्मणे श्री विश्वेशराओ । हा होईल दान पसावो ।

येणें वरें ज्ञानदेवो । सुखिया जाला ॥

@_पसायदान विषयी अधिक माहितीसाठी – येथे क्लिक करा

देशभक्तीपर गीत

ऐ मेरे प्यारे वतन, ऐ मेरे बिछड़े चमन
तुझ पे दिल कुरबान
तू ही मेरी आरजू़, तू ही मेरी आबरू
तू ही मेरी जान
तेरे दामन से जो आए
उन हवाओं को सलाम
चूम लूँ मैं उस जुबाँ को
जिसपे आए तेरा नाम
सबसे प्यारी सुबह तेरी
सबसे रंगी तेरी शाम
तुझ पे दिल कुरबान
माँ का दिल बनके कभी
सीने से लग जाता है तू
और कभी नन्हीं-सी बेटी
बन के याद आता है तू
जितना याद आता है मुझको
उतना तड़पाता है तू
तुझ पे दिल कुरबान
छोड़ कर तेरी ज़मीं को
दूर आ पहुँचे हैं हम
फिर भी है ये ही तमन्ना
तेरे ज़र्रों की कसम
हम जहाँ पैदा हुए उस
जगह पे ही निकले दम
तुझ पे दिल कुरबान
 ~प्रेम धवन

बालगीत

असावा सुंदर चॉकलेटचा बंगला
चंदेरी सोनेरी चमचमता चांगला
चॉकलेटच्या बंगल्याला टॉफीचं दार
शेपटीच्या झुपक्यानं झाडून जाईल खार
गोल गोल लेमनच्या खिडक्या दोन
“हॅलो, हॅलो !” करायला छोटासा फोन !
बिस्कटांच्या गच्‍चीवर मोर छानदार
पेपरमिंटच्या अंगणात फुलं लाललाल
चांदीच्या झाडामागं चांदोबा रहातो
मोत्यांच्या फुलांतून लपाछपी खेळतो
उंच उंच झोक्याचा खेळ रंगला
मैनेचा पिंजरा वर टांगला
किती किती सुंदर चॉकलेटचा बंगला
चंदेरी सोनेरी चमचमता चांगला
कवी : राजा मंगळवेढेकर

@_बालगीते अधिक माहितीसाठी – येथे क्लिक करा

प्रश्नमंजुषा

१) फुलपाखराला किती पाय असतात ?
उत्तर : सहा
२) फुलपाखराच्या जन्मापासून ते वाढी पर्यंतच्या अवस्था कोणत्या ?
उत्तर :  अंडी, आळी, कोष ,  प्रौढ फुलपाखरू
३) फुलपाखराच्या अळीला काय म्हणतात?
उत्तर : सुरवंट
४) बिबळ्या कडवा जातीचे फुलपाखरू कोणत्या झाडाच्या पानावर अंडे घालते ?
उत्तर : रुईच्या पानावर
५) भारतामध्ये फुलपाखराच्या एकूण किती प्रजाती आढळतात?
उत्तर : २४ हजार

ENGLISH QUESTION

1) What’s your name?
Ans : My name is ——-
2) Where are you from?
Answer:  I’m from India.
3) Where do you live?
Ans : I live in ———
4) How old are you?
Answer:  I’m —–  years old.
5) When is your birthday?
Ans : My birthday is on January 1st.

अधिक माहिती मिळवण्यासाठी …..

@_राष्ट्रगीत विषयी अधिक माहितीसाठी – येथे क्लिक करा

@_मराठी,हिंदी,संस्कृत व इंग्रजी प्रतिज्ञा अधिक माहितीसाठी – येथे क्लिक करा

@_बालगीते अधिक माहितीसाठी – येथे क्लिक करा

@_पसायदान विषयी अधिक माहितीसाठी – येथे क्लिक करा

@_बोधकथा अधिक माहितीसाठी – येथे क्लिक करा

@_छान छान गोष्टी अधिक माहितीसाठी – येथे क्लिक करा

@_भारताचे संविधानविषयी अधिक माहितीसाठी – येथे क्लिक करा

@_जय जय महाराष्ट्र माझा mp3 अधिक माहितीसाठी – येथे क्लिक करा

Tags

#1 jully, 1 jully 2023, 1 jully 2021 panchang, 1 jully 2022 special day, 1 jully 2023 weather, 1 jully 2022 panchang in hindi, 1 jully is celebrated as, what is celebrated on 1 jully, 1 jully 2022,

शालेय परिपाठ,परिपाठ दाखवा,मराठी परिपाठ,परिपाठ शायरी,शालेय परिपाठ सूत्रसंचालन,परिपाठ सुविचार,हिंदी परिपाठ

DECLAIMER

वरील सर्व माहिती ही संग्रहित असून आपण पडताळून पहावी. काही चुका असू शकतात. फक्त शैक्षणिक माहिती असल्याने आम्ही कोणतेही कायदेशीर हक्क (copy right) सांगत नाही.

Author: Active Guruji

Blogger

आपल्या प्रतिक्रिया लिहा.

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.