अध्यक्ष महोदय ,
पूज्य गुरुजनवर्य आणि येथे जमलेल्या माझ्या बालमित्रांनो,
आज मी तुम्हांला “लेक वाचवा देश वाचवा” या विषयावर दोन चार शब्द सांगणार आहे ते तुम्ही शांत चित्ताने ऐकून घ्यावे ही विनंती.
आज आपण बर्याच ठिकाणी लेक वाचवा देश वाचवा,स्त्री जन्माचे स्वागत करू असे ऐकतो पण तरीही पोटातच मुलीची हत्या करतो.
का हा मुलींवर अन्याय करता ?
मुलीनाही जगण्याचा हक्क आहे,त्यांना जगू द्या.पोटातील हे छोटेसे बाळही म्हणत असेल ,मला जगू द्या.
फक्त मुलगाच वंशाचा दिवा असतो का?
नाही ना ?
मग का मारता मुलीना?
मुलीसुद्धा आई वडिलांचा आधार बनतात.मुलींचाही गौरव झाला पाहिजे.मुलीना मारू नका,त्यांना जन्माला घाला.
मी सुद्धा एक मुलगी आहे याचा मला अभिमान आहे.
एवढे बोलून मी माझे चार शब्द पूर्ण करते.
जय हिंद ……जय महाराष्ट्र !