Ya bhartat | या भारतात बंधुभाव कविता | 4थी कविता-Marathi

Ya bhartat

या भारतात बंधुभाव – Ya bhartat

इयत्ता चौथी मराठी पाठ 4 -Ya bhartat ,

या भारतात- Ya bhartat कवितेवर आधारित ऑनलाईन टेस्ट सोडवा.

24 गुणांची मनोरंजक टेस्ट आहे. ज्ञानरचनावर आधारित टेस्ट आहे.

कवितेत भारतात बंधुभाव नांदावा म्हणून संत तुकडोजी महाराज यांनी केलेला उपदेश आहे.

सर्वांनी एकमेंकांशी प्रेमाने व बंधुभावाने राहिले पाहिजे.

या भारतात -राष्ट्रसंत तुकडोजी महाराज

कवितेचा अर्थ-

या भारतातील लोकांमध्ये भावंडांप्रमाणे प्रेम व स्नेह सतत राहू दे.देवा,मला आशीर्वाद दे.सर्व पंथामध्ये व संप्रदायामध्ये एकता दिसू दे,त्यांच्या विचारात आजीबात फरक नसू दे.

सर्व हिंदू,ख्रिश्चन,मुस्लिम बांधव मग त्यातील गरीब आणि श्रीमंत एकजुटीने आनंदात राहोत.या सर्वांमध्ये स्वातंत्र्याचा मनसोक्त आनंद वसू दे,असा मला वर दे.

सगळ्यांना माणुसकी व राष्ट्रप्रेम कळू दे.सर्व प्रार्थना स्थळांवर एकत्र प्रार्थना होऊ दे.या देशातील कष्टाळू ,पराक्रमी तरूण चारित्र्यसंपन्न दिसू दे,असा आशीर्वाद मला लाभू दे.

परस्परातील जातीभेद विसरून आमच्यात एकजूट होऊ दे. या जगातून मुळासकट अस्पृश्यता नाहीशी होऊ दे.जे दुर्जन व निंदक आहेत,त्यांच्या मनातही सत्याची चाड  असू दे,असा वर मला मिळावा.

प्रत्येक घरात सौंदर्य व स्वर्गीय सुख रमु दे.बाहेरील परकी भीती आणि संकट नष्ट होऊ दे.

हे देवा ,हा तुकड्या तुम्हांस असे विनवतो आहे की,मला नेहमी तुमच्या सेवेत तत्पर असू द्या.असा आशीर्वाद मला द्या.

शब्दार्थ-

बंधुभाव-स्नेह ,नित्य-नेहमी,वसू दे-राहू दे,वर-आशीर्वाद,अमीर-श्रीमंत,

मानवता-माणुसकी,उद्योगी-कष्टाळू,शीलवान-चारित्र्यवान,सौंदर्य-सुंदरता,विपत्ती-संकट

हे सुद्धा वाचा  – इयत्ता चौथी टेस्ट      चौथीसाठी उपयोगी अभ्यासमित्र अॅप्लिकेशन डाऊनलोड

Author: Active Guruji

Blogger

15 thoughts

  1. सोडवून झाल्यावर score दीसत नाही,

  2. समीट केल्या वर मार्कस दीसत नाही

  3. परीक्षा झाली की रिझल्ट लवकर दाखवा.

  4. एकदम सोप्या पद्धतीने मुलांचा अभ्यास पुर्ण होत आहे.धन्यवाद !

  5. टेस्ट झाल्या वर रिझल्ट दिसत नाही

  6. टेस्ट दिल्यावर रिजल्ट कसा पहायचा

  7. टेस्ट दिल्यावर रिझल्ट दिसत नाही

  8. टेस्ट दिल्यावर रिझल्ट दिसत नाही

  9. User friendly नाही. चाचणी लवकर सापडत नाही.सोडवून झाल्यावर score पाहण्यासाठी.. अडचणी येतात.

  10. Use friendly नाही. चाचणी लवकर सापडत नाही.सोडवून झाल्यावर score पाहण्यासाठी.. अडचणी येतात.

आपल्या प्रतिक्रिया लिहा.

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.