जागतिक पुस्तक दिन
दिशादर्शक उपक्रम–
सध्या कोरोना रोगामुळे प्रत्येकजण घरी आहे. चला जागतिक पुस्तक दिवस साजरा करूया.
प्रत्येकजण आपापल्या मोबाईलवर व्यस्त आहे. इंटरनेटच्या जमान्यात कुदळे सरांनी वाचनवेड जोपासले आहे.जागतिक पुस्तक दिन त्यांनी रद्दी कागद,मासिके व वर्तमानपत्रे यांच्या पासून ५० पेक्षा जास्त पुस्तके तयार केली आहेत.
२३ एप्रिल हा जगप्रसिद्ध साहित्यिक शेक्सपिअर यांचा जन्म व मृत्यु दिवस आहे. आपण पुस्तक दिन म्हणून साजरा करतो.
‘वाचाल तर वाचाल’ या प्रमाणे कुदळे सरांनी समाजासाठी दिशादर्शक उपक्रम सुरु केला आहे.

जागतिक पुस्तक दिवस –
आपल्या उपक्रमापासून तयार झालेली आधुनिक बोधकथा,इंग्रजी अंकलिपी ,चला सहलीला जाऊ ,चित्रकला चित्रे संग्रह अशी पुस्तके त्यांनी तयार केली आहेत.
ही पुस्तके ते आपल्या नंदादेवी प्राथमिक शाळेत बालवाचनालयासाठी वापरणार आहेत.आज तरुणपिढीला पुस्तके वाचणे हे बोअर वाटते.जो तो आपापल्या मोबाईलमध्ये बिझी आहे.
आपल्या मुलांना वेळ न देता जागतिक गप्पा मारण्यात पालक व्यस्त असतात.कुदळे सरांनी एका जागरूक पालक व आदर्श शिक्षकाची समाजाप्रती असलेली भूमिका आपल्या कृतीतून दाखवून दिली आहे.
स्तुत्य उपक्रम