2.समांतर रेषा | 9वी , गणित भाग-2

2.समांतर रेषा

9वी , गणित भाग-2

महत्त्वाचे काही गुणधर्म-
(1) दाेन रेषा एकमेकींना छेदल्यावर होणारे विरुद्ध कोन समान मापाचे असतात.
(2) रेषीय जोडीतील कोन परस्परांचे पूरक असतात.
(3) जेव्हा संगतकोनांची एक जोडी एकरूप असते तेव्हा संगत कोनांच्या उरलेल्या सर्व जोड्या एकरूप
असतात.
(4) जेव्हा व्युत्क्रम कोनांची एक जोडी एकरूप असते तेव्हा व्युत्क्रम कोनांच्या इतर सर्व जोड्या एकरूप
असतात.
(5) जेव्हा छेदिकेच्या एकाच बाजूच्या आंतरकोनांची बेरीज 180° होते तेव्हा आंतरकोनांच्या दुसऱ्या
जोडीतील कोनांची बेरीजही 180° होते.

दोन समांतर रेषांना एका छेदिकेने छेदल्यावर छेदिकेच्या कोणत्याही एका बाजूचे असणारे आंतरकोन हे
एकमेकांचे पूरककोन असतात.
दोन समांतर रेषांना एका छेदिकेने छेदल्यावर होणाऱ्या संगत कोनांच्या जोडीतील कोनांची मापे समान
असतात.
त्रिकोणाच्या सर्व कोनांच्या मापांची बेरीज 180° च असते.

रेषांच्या समांतरतेच्या कसोट्या (Tests for parallel lines)-
दोन रेषा व त्यांची छेदिका त्यांच्यामुळे होणारे कोन तपासून आपण त्या दोन रेषा समांतर आहेत का ते ठरवू
शकतो.
(1) छेदिकेच्या एका बाजूच्या आंतरकोनांची जोडी पूरक कोनांची असेल तर त्या रेषा समांतर असतात.
(2) व्युत्क्रम कोनांची एक जोडी समान असेल तर त्या रेषा समांतर असतात.
(3) संगत कोनांची एक जोडी समान असेल तर त्या रेषा समांतर असतात.

समांतर रेषांची आंतरकोन कसोटी (Interior angles test)-
दोन भिन्न रेषांना एका छेदिकेने छेदले असता छेदिकेच्या एका बाजूच्या आंतरकोनांची बेरीज 180°
असेल तर त्या रेषा समांतर असतात.

व्युत्क्रम कोन कसाेटी (Alternate angles test)-
दोन रेषांना एका छेदिकेने छेदले असता होणाऱ्या व्युत्क्रम काेनांची एक जोडी एकरूप असेल तर त्या
रेषा समांतर असतात.

संगतकोन कसोटी (Corresponding angles Test)-
दोन रेषांना एका छेदिकेने छेदले असता होणाऱ्या संगत कोनांची एक जोडी एकरूप असेल तर त्या रेषा
समांतर असतात.
जर एक रेषा त्याच प्रतलातील दोन रेषांना लंब असेल तर त्या दोन रेषा परस्परांना समांतर असतात.

Author: Active Guruji

Blogger

आपल्या प्रतिक्रिया लिहा.

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.