Shala aani Shikshan | शिक्षण नव्हे,पुस्तकी शिक्षण थांबले होते …

Shala aani Shikshan

शिक्षण नव्हे, पुस्तकी शिक्षण थांबले होते …
लक्ष्मण जगताप ,बारामती

कोरोनामुळे लॉकडाऊन जाहीर झालं आणि शाळा बंद झाल्या. मुलांचे शिक्षण थांबून खूप नुकसान झाले अशी चर्चा झाली. शाळा हे शिक्षणाचे एक केंद्र असले शिक्षण ही निरंतर चालणारी प्रक्रिया आहे.

Shala aani Shikshan
Shala aani Shikshan

मुले निसर्गातून ,परिसरातून ,समाजातून आणि आपल्या घरातून खूप काही शिकत असतात. निरीक्षणातून,अनुभवातून ज्ञान मिळवत असतात .
म्हणून मुलांचे पुस्तकी शिक्षण थांबले होते परंतु अनुभवातून शिक्षण सुरुच होते.
मन ,मेंदू आणि मनगट सक्षम करतं तेच खरं शिक्षण असं म्हटलं जाते.या कोरोनाच्या काळात मुले घरात होती.

या काळात मुलांनी जे पाहिलं ,ऐकलं ,अनुभवलं तेही एक प्रकारचे शिक्षणच होते. ते पुस्तकी शिक्षणाच्या बाहेरचे होते. आंब्याचा झाडाखाली म्हणजे निसर्गाच्या सानिध्यातच न्यूटनला गुरुत्वाकर्षाचा सिद्धांत गवसला.

शिक्षण हे आपल्या आजूबाजूला क्षणाक्षणाला घडत असतं. सोडविता येईल. या लॉकडाऊनच्या काळात मुलांचे जीवन कौशल्याचं शिक्षण झालं.

Shala aani Shikshan
Shala aani Shikshan

ते कसं झालं ते पाहूयात?

१. कोरोना काळात सगळीकडे वातावरण भीतीदायक होते हे जरी खरं असले तरी अशा वातावरणात अशा संकटाचा धीराने व संयमाने कसा सामना करायचा हे मुलांनी प्रत्यक्ष अनुभवलं.

२.माणसाच्या जीवनात असणारे आरोग्याचे महत्त्व याची मुलांना चांगलीच ओळख झाली. त्याचबरोबर स्वच्छतेच्या सवयी यांचे महत्त्व समजले.

३.आहे त्या परिस्थितीत कसं जगायचं ,काटकसर ,बचत कशी करायची याचा धडा मिळाला.

४.कोरोना काळात डॉक्टर ,नर्स ,पोलिस करत असलेले काम पाहून कर्तव्याबरोबरच दुसऱ्याची सेवा करणे ,काळजी घेणे ,इतरांच्या उपयोगी पडणे हा मुल्यसंस्कार नकळत रुजला गेला.

५.नातेवाईकांशी ,मिञांशी संवाद झाला त्यातून संवाद कौशल्ये वाढले.

६.कुटुंबात असणारे आईचे महत्त्व,अविरतपणे कुटुंबाची घेत असलेली काळजी तसेच वडीलांचे कुटुंबासाठी असणारी धडपड याची नव्याने जाणीव झाली.

७.घरातील छोट्या मोठ्या कामात आईला मदत करण्याचा आनंद मिळाला.सहकार्य ,श्रमप्रतिष्ठा या भावना वाढीस लागल्या.

८.मुलींचे पाककलेचे शिक्षण झाले.स्वयंपाक कसा करावा,वेगवेगळे पदार्थ कसे बनवावेत हे शिकता आले.

९. घरातील वस्तूंची व सामानाची आवराआवर झाली यातून नीटनेटकेपणा व स्वावलंबन याचा वस्तूपाठच मिळाला.

१०. बुद्धीबळ ,कॕरम या खेळांमधून यामधून एकाग्रता ,निर्णयक्षमता विकसित होण्यास मदत झाली.

११.सर्व जग बंद असताना आपला अन्नदाता शेतकरी शेतात राबत होता. ग्रामीण भागातील मुलांचे पालकांच्या मदतीने शेतीचे शिक्षण झाले.

Author: Active Guruji

Blogger

आपल्या प्रतिक्रिया लिहा.

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.