School open -15 June|महाराष्ट्रातील शाळा 15 जूनला सुरु

महाराष्ट्रात १५ जून पासून शाळा सुरु – school open…

महाराष्ट्रात करोनाच्या संकटात शाळा आणि महाविद्यालयं बंद ठेवण्यात आली आहेत.

आता school open १५ जूनपासून शाळा सुरु करण्याचा विचार सरकार करत आहे असे संकेत शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड यांनी दिले आहेत. 

आठवड्यातले 48 तास शाळा त्या सुरु ठेवल्या जातील.

शनिवार-रविवार अशी सुट्टी देणाऱ्या शाळांना आता 48 तास पूर्ण भरून काढण्यासाठी सुट्टी रद्द करवी लागेल. सुट्टी देताना आता तास पूर्ण कसे होतील असे वर्षा गायकवाड यांनी म्हटलं आहे.

आपल्या देशात लॉकडाउनचा चौथा टप्पा सुरु आहे. मुंबई, पुणे, ठाणे, नागपूर आणि इतर प्रमुख 15 शहरं रेड झोन मध्ये आहेत .

रेड झोन वगळून हळूहळू शाळा सुरु (school open) करण्याचा विचार राज्य सरकार करतं आहे असे शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड यांनी आपल्या मुलाखतीत म्हटलं आहे.

राज्यात 2 शिफ्टमध्ये शाळा सुरु करण्याचा विचार आहे. असं वर्षा गायकवाड यांनी आपल्या मुलाखतीत सांगितलं आहे.
शाळांचे तास कमी करण्याचा विचार असल्याचंही शिक्षणमंत्र्यांनी जाहीर केले.

त्या म्हणाल्या की सोशल डिस्टन्सिंग पाळणं बंधनकारक आहे.

👉पर्याय १ म्हणजे:-

विद्यार्थ्यांना त्यांच्या त्यांच्या शाळेतील हजेरी नंबर नुसार odd आणि even नंबर प्रमाणे दोन शिफ्टमध्ये म्हणजे सकाळच्या सत्रात आणि दुपारच्या सत्रात बोलवायचं असे ठरले आहे.

👉पर्याय २ असा-

प्रत्येक वर्गातील विद्यार्थ्यांचे दोन गट करायचे व दोन्ही गटांना एक दिवसाआड शाळेत बोलवायचं हा 2रा पर्याय आहे.

वरील दोन पर्यायांचा विचार राज्य सरकार करत आहे. Study from home.

महाराष्ट्रातील शाळा सुरु झाल्या तरीही एक विदयार्थी एका बाकावर बसेल. अशी काळजी शाळांना घ्यायची आहे असे शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड असे म्हणाले.

Author: Active Guruji

Blogger

5 thoughts

आपल्या प्रतिक्रिया लिहा.

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.