21. संतवाणी: संत नरहरी सोनार ;संत कान्होपात्रा
अभंगांचा भावार्थ-
१ संत नरहरी सोनार म्हणतात,
पंढरीच्या तीर्थक्षेत्री श्रीविठ्ठल माझे आराध्य दैवत आहे. सर्व वारकरी
नित्यनेमाने व व्रतस्थपणे श्रीविठ्ठलाचे दर्शन घेतात.
आषाढी व कार्तिकी एकादशीला महान उत्सवाचे पर्व सुरु असते. वारकरी तेथे भजनाचा घोष करीत
असतात.
आषाढी-कार्तिकीला महान साधूसंत /भक्तगण दिंङ्या-पताकांची दाटी करतात नि मुखाने श्राविठ्ठलाचे
अमृतमय नाव उच्चारतात.
या दिवशी जणू आनंदाचा गोपाळकाला होतो. सर्व भक्तगण तल्लीन होतात. संत नरहरी म्हणतात, हा
पवित्र सोहळा माझ्या मनात कायम ठसला आहे.
2- संत कान्होपात्रा म्हणतात,
पंढरपूर हे माझे माहेर आहे. चंद्रभागेच्या काठी मी सुखाने नांदते आहे.
पंढरीला माझे आईवडील आहेत. त्यांच्या दर्शनाने माझी सगळी विवंचना संपून जाते.
श्रीविठ्ठलाने माझी चिंता, वेदना, अस्वस्थता घालवून दिली आहे. माझ्या मनातले दुःख निवारले आहे.
माझी विठु माऊली कशी विटेवर शोभून दिसते आहे ! तिचे हे रूप पाहून संत कान्होपात्रा आनंदली आहे,
समाधान पावली आहे.