24.रोजनिशी
6वी ,मराठी
प्रश्नोत्तरे
प्रश्न- तीन-चार वाक्यांत उत्तरे लिहा.
१) वैभवच्या रोजनिशीतील कोणते पान तुम्हांला सर्वांत जास्त आवडले, ते लिहा.
उत्तर : वैभवच्या रोजनिशीतील १६ नोव्हेंबरचे पान सर्वांत जास्त आवडले. सहलीला गेलेल्या मुलांमध्ये सहज जरासा मोकाटपणा येतो व हातून एखादी चूक होते. तशी चूक हरभरा उपटताना मुलांची झाली. परंतु चूक समजल्यावर तत्काळ माफी मागण्याचे वर्तनहो त्यांनी केले.
२) रोजनिशी का लिहावी, तुमच्या शब्दांत लिहा.
उत्तर : रोजनिशी लिहिण्याने आपले विचार स्पष्ट होतात. मनातले भाव व्यक्त करता येतात. ठळक घटनांची नोंद होते, विश्लेषणाची सवय लागते. माणसांच्या भावना कळतात. आपले वर्तन कसे झाले व कसे असायला हवे, याचे आत्मपरीक्षण होते. सहानुभूती म्हणजे काय, ते कळते. जीवनाची समज येते.
प्रश्न- का ते लिहा.
१) आजोबांची नात जोराने रडू लागली.
उत्तर : आजोबा व कंडक्टर यांच्यातील चिडलेल्या आवाजातील संवाद ऐकल्यामुळे नात जोराने रडायला लागली.
उत्तर : आजोबांचे पाकीट कुणीतरी बसस्टॉपवर चोरले. त्यांच्याकडे तिकीट काढायला पैसे नव्हते;
वैभवने आजोबांचे व त्यांच्या नातीचे तिकीट काढले.
२) आजोबांची नात खुदकन हसली.
उत्तर : वैभवने आजोबांच्या नातीला बिस्किटांचा पूड़ा दिला; म्हणून ती खुदकन हसली.
३) मुलांनी शेतकऱ्याची माफी मागितली.
उत्तर : शेतकरयाच्या परवानगीशिवाय मुलांनी डहाळे उपटले. यावर गुरुजी मुलांवर खूप रागावले; म्हणून स्वत:ची चूक समजून मुलांनी शेतकऱ्याची माफी मागितली.
४) शेतकऱ्यानी मुलांना थोडेसे डहाळे दिले.
उत्तर : हातून नकळत झालेल्या चुकीची मुलांनी माफी मागितली. त्यामुळे खूश होऊन शेतकऱ्याने मुलांना थोडेसे डहाळे दिले.
५) वैभवची विशेष काम करण्याची संधी हुकली.
उत्तर : वैभवची व राजूची वादावादी झाली. त्यामुळे सर त्यांच्यावर रागावले. वैभवने केलेल्या गैरवर्तनामुळे वैभवची विशेष काम करण्याची संधी हुकली.
*वैभवच्या रोजनिशीचे चौथे पान रिकामे आहे. त्यावर तुमची रोजनिशी लिहा.
उत्तर :
१८ नोव्हेंबर
आज माझा वाढदिवस होता:खूप मजा आली.आई-बाबांनी खूप छान सजवलेला केक आणला. माझे सर्व मित्र-मैत्रिणी घरी आले. हॅपी बर्थ डे टु यू म्हणून त्यांनी माझ्याकडून केक कापून घेतला. मी पहिला घास आईला भरवला. तिने प्रेमाने मला जवळ घेतले. सर्वांनी गाणी म्हटली, कोणी स्वत:चे वाढदिवसाचे मजेदार किस्से सांगितले. अचानक सर आले. त्यांनी मला भेटवस्तू दिली. वाढदिवसाला माझ्यापाशी जे पैसे जमले होते ते मी शाळेच्या गरीब विद्यार्थी फंडाला सरांकडे दिले.
सर्वांनी टाळया वाजवून माझे अभिनंदन केले. खूप आनंदात दिवस गेला.
इयत्ता सहावी पुस्तक मराठी धडा 24 रोजनिशी वैभव चरबीसीची चौथी पान रिकामी आहे ते पूर्ण करून द्या