22.वडिलांस पत्र | 6वी ,मराठी

22.वडिलांस पत्र

6वी ,मराठी

प्रश्न-1} चार-पाच वाक्यांत उत्तरे लिहा.
१) राजगडला ‘ गडांचा राजा आणि राजांचा गड’ असे का म्हणतात?
उत्तर : राजगड हा जुना पण बळकट, गड आहे. तो अति उंच असून अवघड डोंगरावर वसलेला आहे. म्हणून त्याला ‘ गडांचा राजा’ म्हणतात. छत्रपती शिवाजी महाराजांनी याच गडावर मोहिमांची आखणी केली. हा गड महाराजांच्या राजधानीचे ठिकाण होते. म्हणून राजगडाला ‘ राजांचा गड’ असे म्हणतात.
२) शिक्षकांनी मुलांना राजगडा बाबत कोणती माहिती दिली?
उत्तर : शिक्षकांनी मुलांना राजगडाची प्रतिकृती दाखवली. १६४६ साली छत्रपती शिवाजी महाराजांनी राजगड ताब्यात घेतला, हा गड जुना, दुर्लक्षित, ओसाड पण बळकट आहे. तो अति उंच असून अवघड डोंगरावर आहे. जगातील सर्वोत्कृष्ट अशा चौदा किल्ल्यांच्या प्रतिकृती स्विद्झलंडमधील म्युझियममध्ये ठेवल्या आहेत. त्यात भारतातील एकमेव राजगडाचा समावेश आहे अशी माहिती शिक्षकांनी मुलांना दिली.
३) राजगडाचे भौगोलिक स्थान आगळेवेगळे आहे, असे का म्हटले जाते?
उत्तर : राजगडाच्या उत्तरेला गुंजवणी नदी आहे. दक्षिणेला वेळखंड नदीवर भाटघर धरण असून पूर्वेला पुणे – सातारा रस्ता आहे, तर पश्चिमेला सहयाद्रीचा घाटमाथा आहे. भाटघर धरणाचे अथांग जलाशय आणि सृष्टिसौंदर्य रमणीय आहे. म्हणून राजगडाचे भौगोलिक स्थान आगळेवेगळे आहे, असे म्हटले आहे.
४) मार्गदर्शकाने मुलांना राजगडाविषयी कोणती माहिती पुरवली?
उत्तर : राजगडाची उंची सर्वांत जास्त आहे. गडाचा घेर बारा को्साचा आहे. शिवाजी महाराजांनी या गडाचा विस्तार केला. त्याला राजधानीचे ठिकाण बनवले. राजधानीला आवश्यक असलेले सर्व बांधकाम महाराजांनी करून घेतले. अशी माहिती मार्गदर्शकाने मुलांना सांगितली.
५) समीरला किल्ल्याचा आकार उपडया ठेवलेल्या सिलिंग फॅन सारखा का जाणवला?
उत्तर : समीरला किल्ल्याचा आकार उपडমা ठेवलेल्या सिलिंग फॅनसारखा जाणवला. याचे कारण असे की पंख्याच्या मध्यभागी उंचवटा असतो, तसा किल्ल्याच्या मध्यभागी बाले किल्ला आहे. पंख्याची तीन पाती असतात.तशा पद्मावती, सुवेळा आणि संजीवनी या तीन माच्या आहेत.
६) राजगडाने कोणकोणत्या ऐतिहासिक घटना पाहिल्या आहेत?
उत्तर : राजगडाने शिवाजी महाराजांच्या हिंदवी स्वराज्य स्थापनेचे कार्य पाहिले. अंधान्या रात्रीतील गुप्त खलबते ऐकली. महाराजांच्या अनेक नव्या मोहिमांची तयारी गडाने बघितली. अफझलखानाशी लढण्याचे बेत राजगडावर ठरले. पुरंदर गडाच्या पायथ्याशी तह करण्यासाठी महाराज राजगडावरून खाली उतरले.
आग्य्याहून सुटून महाराज बैराग्याच्या वेशात परत आले ते राजगडावरच. या ऐतिहासिक घटना राजगडाने पाहिलेल्या आहेत.
प्रश्न-2}  समीर असे का म्हणाला असावा?
१) महाराष्ट्र किल्ल्यांचे राज्य आहे.
उत्तर : इतर राज्यांच्या मानाने महाराष्ट्रात खूप किल्ले आहेत; म्हणून महाराष्ट्र हे किल्ल्यांचे राज्य आहे,असे समीर म्हणाला असावा.
२) किल्ल्याहून मला परतावंसं वाटत नव्हतं.
उत्तर : राजगडावरून समीरने आजूबाजूचा परिसर पाहिला. भाटघर धरणाचा अर्थाग जलाशय व सृष्टिसौंदर्य इतके रमणीय होते, की समीर ते पाहून हरखूनत गेला; म्हणून किल्ल्याहून मला परतावंसं वाटत नव्हतं, असे तो म्हणाला.
३) मला एक फलक खूप आवडला.
उत्तर : समीरने परिसरातील सर्व फलक वाचले. परंतु एक फलक मला खूप आवडला, असे तो म्हणाला; कारण त्यावर लिहिले होते – ‘ या गडावर नेताजी पालकर, तानाजी मालुसरे, येसाजी कंक, शिळीमकर या थोर व्यक्तीचे वास्तव्य होते.
४) आपल्या सर्वासाठी अभिमानाची गोष्ट अशी की भारतातील एका किल्ल्याचा त्यात
समावेश आहे.
उत्तर : समीरच्या सरांनी असे सांगितले की जगातील सर्वोत्कृष्ट अशा चौदा किल्ल्यांच्या प्रतिकूत
स्वित्झर्लंडमधील म्युझियममध्ये ठेवल्या आहेत. त्यांत राजगडाची प्रतिकृती आहे. हे ऐकून समीरला अभिमान
वाटला; म्हणून आपल्या सर्वांसाठी अभिमानाची गोष्ट अशी की भारतातील एका किल्ल्याचा त्यात समावेश आहे, असे तो म्हणाला.
५) आपण प्रत्येक मोठ्या सुट्टीत एक किल्ला बघायचे ठरवूया का?
उत्तर : राजगड या भव्य आणि ऐतिहासिक किल्ल्याचे दर्शन घेताना समीरचा ऊर अभिमानाने फुलून आला. असे अनेक किल्ले बघण्याची इच्छा त्याच्या मनात निर्माण झाली. म्हणून आपण प्रत्येक मोठ्या सुट्टीत एक किल्ला बघायचे ठरवूया का? असा प्रश्न त्याने बाबांना विचारला.
६) आईच्या हातच्या जेवणाची खूप आठवण येते.
उत्तर : समीर घरापासून दूर वसतिगृहात राहत होता. वसतिगृहातले जेवण बरे होते पण त्याला आईच्या हातच्या जेवणाची चव नसावी; म्हणून आईच्या हातच्या जेवणाची खूप आठवण येते, असे तो म्हणाला.

Author: Active Guruji

Blogger

आपल्या अनमोल प्रतिक्रियेबद्दल आभार.

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.