कुत्रा व मांजर संभाषण | 1ली ,मराठी

कुत्रा व मांजर संभाषण

चित्र बघ.कुत्रा व मांजर काय बोलत असतील ते सांग.

(बाहेर पाऊस पडत आहे,कुत्रा पावसात भिजत उभा आहे)

कुत्रेभाऊ:मनीताई,मी पावसात भिजत आहे,मला घरात येऊ दे ना?

मनीताई:तुला घरात घेतले तर माझी लहान पिल्ले तुला घाबरतील.

कुत्रेभाऊ:मी एका कोपऱ्यात उभा राहीन.

मनीताई:तू आत आल्यावर पिल्ले घाबरतील,त्यापेक्षा तू बाहेर एका बाजूला उभा रहा.मी तुला छत्री देते.छत्री घेऊन तू तुझ्या घरी जा म्हणजे तू भिजणार नाही.

कुत्रेभाऊ:हो,मनीताई.मी छत्री घेऊन घरी जातो,माझी पिल्लेही माझी वाट बघत असतील.

Author: Active Guruji

Blogger

One thought

आपल्या प्रतिक्रिया लिहा.

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.