जिल्हांतर्गत शिक्षक बदली प्रक्रिया
Latest बदल्या वेळापत्रक
जिल्हाअंतर्गत बदली प्रक्रिया सुरु ….बदल्यांबाबत latest वेळापत्रक
किती दिवस चालणार बदली प्रक्रिया ?
सन 2022 मधील जिल्हा परिषद प्राथमिक शिक्षकांच्या जिल्हांतर्गत बदल्यांबाबत वेळापत्रक
विशेष संवर्ग भाग 1 साठी प्राधान्यक्रम भरणे–दि. 20/12/2022 ते 23/12/2022 (4 दिवस)
विशेष संवर्ग भाग 2 साठी प्राधान्यक्रम भरणे- दि. 30/12/2022 ते 04/01/2023 (6 दिवस)
बदली अधिकार प्राप्त शिक्षकांनी प्राधान्यक्रम भरणे- दि. 10/01/2023 ते 14/01/2023 (5 दिवस)
बदलीपात्र शिक्षकांनी प्राधान्यक्रम भरणे- दि. 21/01/2023 ते 24/01/2023 (4 दिवस)
विस्थापित शिक्षकांच्या राऊंडसाठी पर्याय भरणे. दि. 31/01/2023 ते 03/02/2023 (4 दिवस)
अवघड क्षेत्रातील राहिलेल्या रिक्त भरण्यासाठी बदली प्रक्रिया चालवणे. दि. 10/02/2023 ते 13/02/2023 (4 दिवस)
बदलीचे आदेश प्रकाशित करणे. दि. 18/02/2023 ते 18/02/2023 (1 दिवस)
संदर्भ :
१) ग्रामविकास विभाग, शासन निर्णय क्र. जिपब-४८२०/प्र.क्र.२९० / आस्था.१४, दिनांक ०७.०४.२०२१.
२) ग्रामविकास विभाग, शासन निर्णय क्र. जिपब-४८२०/प्र.क्र.२९०/ आस्था. १४, दिनांक ०४.०५.२०२२.
३) ग्रामविकास विभाग, शासन निर्णय क्र. जिपब-२०२२/प्र.क्र.२९/आस्था.१४, दिनांक २९.०६.२०२२.
जिल्हा परिषद प्राथमिक शिक्षकांच्या जिल्हांतर्गत बदल्या ऑनलाईन संगणकीय प्रणालीद्वारे करण्याबाबतचे सुधारित धोरण संदर्भ क्र. १ येथील दिनांक ०७.०४.२०२१ च्या शासन निर्णयान्वये विहित करण्यात आले आहे.
सन २०२२ मध्ये होणाऱ्या बदल्यांकरिता पदावधीची परिगणना दिनांक ३१ मे ऐवजी दिनांक ३० जून, २०२२ पर्यंत करण्यास संदर्भ क्र. २ येथील दिनांक ४.५.२०२२ च्या शासन निर्णयान्वये तरतुद करण्यात आली आहे. तसेच सन २०२२ मध्ये होणाऱ्या जिल्हा परिषद प्राथमिक शिक्षकांच्या जिल्हांतर्गत बदल्यांसाठी संदर्भ क्र. ३ येथील दिनांक २९.६.२०२२ च्या शासन निर्णयात विहित केलेल्या कालावधीनुसार बदल्यांबाबतची कार्यवाही संगणक प्रणालीद्वारे करण्यात येणार आहे. उक्त दिनांक ४.५.२०२२ व दिनांक २९.६.२०२२ च्या शासन निर्णयानुसार होणारी कार्यवाही फक्त सन २०२२ मध्ये होणाऱ्या बदल्यांकरिताच लागू राहील.
आता ऑनलाईन संगणकीय प्रणालीद्वारे राज्यातील जिल्हा परिषद प्राथमिक शिक्षकांच्या जिल्हांतर्गत बदल्यांबाबत खालीलप्रमाणे
वेळापत्रक
अनु. | बदली विशेष | लिंक |
1 | बदली जी आर | क्लिक करा |
2 | बदली प्रक्रिया टप्पे | क्लिक करा |
3 | जिल्हाअंतर्गत बदली प्रक्रिया वेळापत्रक | क्लिक करा |
4 | संवर्ग 1 आजारी शिक्षक अर्ज pdf | क्लिक करा |
5 | संवर्ग 2 पती-पत्नी एकत्रीकरण शिक्षक अर्ज pdf | क्लिक करा |
6 | संवर्ग 3 बदली अधिकार प्राप्त शिक्षक अर्ज pdf | क्लिक करा |
7 | संवर्ग 4 बदली प्राप्त शिक्षक अर्ज pdf | क्लिक करा |