अग्गोबाई ढग्गोबाई | 1ली,मराठी

अग्गोबाई ढग्गोबाई

(पान. २, वरील स्वाध्याय)-अग्गोबाई ढग्गोबाई

स्वाध्याय पहा …

१. प्रश्न-ढगाला कशाची झळ लागली आहे?

उत्तर-ढगाला उन्हाची झळ लागली आहे.

२. डोंगराच्या डोळ्याला कशाची धार लागली आहे?

उत्तर-डोंगराच्या डोळ्याला पाण्याची धार लागली आहे.

३. तोऱ्यामध्ये कोण उभी आहे?

उत्तर-तोऱ्यामध्ये वीजबाई उभी आहे.

४. रिकाम्या जागी योग्य शब्द भरा.

खोल खोल जमिनीचे उघडून दार

बुड बुड …..बडबड फार!

(आकाशाची,बेडकाची,डोंगराची)  ( उत्तरे-प्रश्न.४-बेडकाची )

५. शब्द मोठ्याने वाचा.

१. कळ – झळ

२. फार – धार

३. खडी – छडी

४. दार – फार

६.अग्गोबाई ढग्गोबाई हे गाणे कृती करून म्हणा.
Solve Test

Author: Active Guruji

Blogger

आपल्या प्रतिक्रिया लिहा.

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.