3 Jully | 3 जुलै दिनविशेष, परिपाठ, Daily Routine

3 Jully

3 जुलै दिनविशेष,

शालेय परिपाठ, Daily Routine

ठळक घटना आणि घडामोडी

3 जुलै हा ग्रेगरी दिनदर्शिकेनुसार वर्षातील १८४ वा किंवा लीप वर्षात १८५ वा दिवस असतो.

चौथे शतक

  • ३२४ – एड्रियानोपलची लढाई.

सहावे शतक

  • ५३३ – ऍड डेसिममची लढाई.

दहावे शतक

  • ९८७ – ह्यु कापे फ्रांसच्या राजेपदी.

तेरावे शतक

  • १२५० – सातवी क्रुसेड – मामलुकसैन्याने फ्रांसचा राजा लुई नवव्याला पकडले.

सतरावे शतक

  • १६०८ – कॅनडात क्वेबेक सिटी शहराची स्थापना.

अठरावे शतक

  • १७५४ – जॉर्ज वॉशिंग्टनने फोर्ट नेसेसिटी हा किल्ला फ्रेंच सैन्याला दिला.
  • १७६७ – रॉबर्ट पिटकैर्नने पिटकैर्न द्वीपसमूह शोधला.
  • १७७८ – अमेरिकन क्रांती – ब्रिटीश सैन्याने वायोमिंग मध्ये ३६० स्त्री, पुरूष व बालकांची कत्तल केली.
  • १७७८ – प्रशियाने ऑस्ट्रिया विरुद्ध युद्ध पुकारले.

एकोणिसावे शतक

  • १८४८ – यु.एस. व्हर्जिन आयलॅंड्समध्ये गुलामांना मुक्ती देण्यात आली.
  • १८५२ – महात्मा फुले यांनी अस्पृश्यांसाठी पहिली शाळा सुरू केली.
  • १८८४ – न्यू यॉर्क शेरबाजारातील शेर्सचा निर्देशांक डौ जोन्स इंडस्ट्रीयल ऍव्हरेज प्रथम प्रकाशित.
  • १८९० – आयडाहो अमेरिकेचे ४३वे राज्य झाले.
  • १८९८ – स्पॅनिश अमेरिकन युद्ध – अमेरिकेच्या आरमाराने सान्टियागो, क्युबा येथे स्पॅनिश युद्धनौका बुडवल्या.

विसावे शतक

  • १९२८ – लंडनमध्ये प्रथमतः रंगीत दूरचित्रवाणी कार्यक्रमांचे प्रक्षेपण करण्यात आले.
  • १९३८ – इंग्लंडमध्ये मलार्ड या वाफेवर चालणाऱ्या रेल्वे ईंजिनाने ताशी २०३ कि.मी. वेगाने धावून सर्वाधिक गतीचा विश्वविक्रम केला.
  • १९५२ – अमेरिकेने पोर्तोरिकोचे संविधान मान्य केले.
  • १९६४ – अमेरिकन राष्ट्राध्यक्ष लिंडन बी. जॉन्सनने १९६४चा नागरी हक्क कायद्यावर सही केली.
  • १९७० – इंग्लंडचे डी हॅविललॅंड कॉमेट प्रकारचे विमान स्पेनमध्ये बार्सेलोना शहराजवळ कोसळले. ११२ ठार.
  • १९७६ – इस्रायेलच्या कमांडो सैनिकांनी युगांडात ओलिस असलेल्या १०५ विमानप्रवाश्यांना सोडवले.
  • १९८८ – अमेरिकेच्या यु.एस.एस. व्हिन्सेनेस या युद्धनौकेने इराण एर फ्लाइट ६५५ हे एरबस ए-३०० प्रकारचे विमान पाडले. २९० ठार.

एकविसावे शतक

  • २००१ – व्लादिवोस्तोकिया एरलाइन्सचे टी.यु.१५४ प्रकारचे विमान इर्कुट्स्क येथे कोसळले. १४५ ठार.
  • २००४ – थायलंडची राजधानी बॅंगकॉकची भुयारी रेल्वे सुरू.
  • २००६ – २००४ एक्स.पी.१४ हा लघुग्रह पृथ्वीच्या जवळून (साधारण चंद्राइतक्या अंतरावरून) गेला.

जन्म

  • १४२३ – लुई अकरावा, फ्रांसचा राजा.
  • १४४२ – गो-त्सुचिमिकाडो, जपानी सम्राट.
  • १६८३ – एडवर्ड यंग, इंग्लिश कवी.
  • १७१७ – जोसेफ लॅसोन, फ्रेंच रसायनशास्त्रज्ञ.
  • १८७० – रिचर्ड बेडफोर्ड बेनेट, कॅनडाचा पंतप्रधान.
  • १९०२ – जॅक न्यूमन, न्यू झीलंडचा क्रिकेट खेळाडू.
  • १९०९ – भाऊसाहेब तारकुडे, भारतीय स्वातंत्र्यसैनिक, कायदेतज्ज्ञ.
  • १९२४ – सेल्लप्पन रामनाथन, तमिळवंशीय सिंगापुरी राजकारणी, सिंगापुराच्या प्रजासत्ताकाचा ६वा राष्ट्राध्यक्ष.
  • १९४६ – लेसेक मिलर, पोलंडचा पंतप्रधान.
  • १९५० – इवन चॅटफील्ड, न्यू झीलंडचा क्रिकेट खेळाडू.
  • १९५१ – सर रिचर्ड हॅडली, न्यू झीलंडचा क्रिकेट खेळाडू.
  • १९५२ – वासिम राजा, पाकिस्तानी क्रिकेट खेळाडू.
  • १९७६ – हेन्री ओलोंगा, झिम्बाब्वेचा क्रिकेट खेळाडू.
  • १९८० – हरभजनसिंग, भारतीय क्रिकेट खेळाडू.

मृत्यू

  • ६८३ – संत लिओ दुसरा.
  • १३५० – संत नामदेव (पंढरपूर येथे समाधिस्थ).
  • १९१८ – महमद पाचवा, ओट्टोमन सम्राट.
  • १९३३ – हिपोलितो य्रिगोयेन, आर्जेन्टीनाचा राष्ट्राध्यक्ष.
  • १९३५ – आंद्रे सिट्रोएन, फ्रेंच अभियंता.

प्रतिवार्षिक पालन

  • स्वातंत्र्य दिन – बेलारुस

राष्ट्रगीत

जनगणमन अधिनायक जय हे

भारत भाग्य-विधाता |

पंजाब, सिंधू, गुजरात, मराठा, द्राविड, उत्कल, बंग,

विंध्य, हिमाचल, यमुना, गंगा,

उच्छल जलधितरंग,

तव शुभ नामे जागे तव शुभ आशिस मागे,

गाहे तव जयगाथा,

जनगण मंगलदायक जय हे,

भारत भाग्य-विधाता|

जय हे, जय हे, जय हे,

जय जय जय, जय हे ||

@_राष्ट्रगीत विषयी अधिक माहितीसाठी – येथे क्लिक करा

प्रतिज्ञा

भारत माझा देश आहे.

सारे भारतीय माझे बांधव आहेत.

माझ्या देशावर माझे प्रेम आहे.

माझ्या देशातल्या समृद्ध आणि

विविधतेने नटलेल्या परंपरांचा मला अभिमान आहे.

त्या परंपरांचा पाईक होण्याची पात्रता

माझ्या अंगी यावी म्हणून मी सदैव प्रयत्न करेन.

मी माझ्या पालकांचा, गुरुजनांचा आणि

वडीलधाऱ्या माणसांचा मान ठेवीन

आणि प्रत्येकाशी सौजन्याने वागेन.

माझा देश आणि माझे देशबांधव

यांच्याशी निष्ठा राखण्याची

मी प्रतिज्ञा करीत आहे.

त्यांचे कल्याण आणि

त्यांची समृद्धी ह्यांतच माझे

सौख्य सामावले आहे.

जय हिंद…

@_मराठी,हिंदी,संस्कृत व इंग्रजी प्रतिज्ञा अधिक माहितीसाठी – येथे क्लिक करा

राज्यगीत

जय जय महाराष्ट्र माझा, गर्जा महाराष्ट्र माझा

जय जय महाराष्ट्र माझा, गर्जा महाराष्ट्र माझा ॥धृ॥

भिती न आम्हा तुझी मुळी ही गडगडणाऱ्या नभा

अस्मानाच्या सुलतानीला जबाब देती जिभा

सह्याद्रीचा सिंह गर्जतो शिव शंभू राजा

दरी दरीतन नाद गुंजला महाराष्ट्र माझा

जय जय महाराष्ट्र माझा, गर्जा महाराष्ट्र माझा ॥१॥

काळ्या छातीवरी कोरली, अभिमानाची लेणी

पोलादी मनगटेखेळती, खेळ जीव घेणी

दारिद्रयाच्या उन्हात शिजला

निढळाच्या घामाने भिजला

देश गौरवासाठी झिजला

दिल्लीचे ही तख्त राखितो, महाराष्ट्र माझा

जय जय महाराष्ट्र माझा, गर्जा महाराष्ट्र माझा

जय जय महाराष्ट्र माझा ॥२॥

@_जय जय महाराष्ट्र माझा mp3 

अधिक माहितीसाठी – येथे क्लिक करा

भारताचे संविधान

उद्देशिका

आम्ही, भारताचे लोक, भारताचे एक सार्वभौम

समाजवादी धर्मनिरपेक्ष लोकशाही गणराज्य घडविण्याचा

व त्याच्या सर्व नागरिकांस

सामाजिक, आर्थिक व राजनैतिक न्याय;

विचार, अभिव्यक्ती, विश्वास, श्रद्धा

व उपासना यांचे स्वातंत्र्य;

दर्जाची व संधीची समानता;

निश्चितपणे प्राप्त करून देण्याचा

आणि त्या सर्वांमध्ये व्यक्तीची प्रतिष्ठा व राष्ट्राची एकता

आणि एकात्मता यांचे आश्वासन देणारी बंधुता

प्रवर्धित करण्याचा संकल्पपूर्वक निर्धार करून;

आमच्या संविधानसभेत

आज दिनांक सव्वीस नोव्हेंबर, १९४९ रोजी

याद्वारे हे संविधान अंगीकृत आणि अधिनियमित

करून स्वतःप्रत अर्पण करीत आहोत.

@_भारताचे संविधानविषयी अधिक माहितीसाठी – येथे क्लिक करा

पसायदान

आता विश्वात्मकें देवें । येणे वाग्यज्ञें तोषावें ।

तोषोनिं मज द्यावे । पसायदान हें ॥

जें खळांची व्यंकटी सांडो । तया सत्कर्मी- रती वाढो ।

भूतां परस्परे पडो । मैत्र जिवाचें ॥

दुरितांचे तिमिर जावो । विश्व स्वधर्म सूर्यें पाहो ।

जो जे वांच्छिल तो तें लाहो । प्राणिजात ॥

वर्षत सकळ मंगळी । ईश्वरनिष्ठांची मांदियाळी ।

अनवरत भूमंडळी । भेटतु भूतां ॥

चलां कल्पतरूंचे आरव । चेतना चिंतामणींचें गाव ।

बोलते जे अर्णव । पीयूषाचे ॥

चंद्रमे जे अलांछन । मार्तंड जे तापहीन ।

ते सर्वांही सदा सज्जन । सोयरे होतु ॥

किंबहुना सर्व सुखी । पूर्ण होऊनि तिन्हीं लोकी ।

भजिजो आदिपुरुखी । अखंडित ॥

आणि ग्रंथोपजीविये । विशेषीं लोकीं इयें ।

दृष्टादृष्ट विजयें । होआवे जी ॥

येथ ह्मणे श्री विश्वेशराओ । हा होईल दान पसावो ।

येणें वरें ज्ञानदेवो । सुखिया जाला ॥

@_पसायदान विषयी अधिक माहितीसाठी – येथे क्लिक करा

अधिक माहिती मिळवण्यासाठी …..

@_राष्ट्रगीत विषयी अधिक माहितीसाठी – येथे क्लिक करा

@_मराठी,हिंदी,संस्कृत व इंग्रजी प्रतिज्ञा अधिक माहितीसाठी – येथे क्लिक करा

@_बालगीते अधिक माहितीसाठी – येथे क्लिक करा

@_पसायदान विषयी अधिक माहितीसाठी – येथे क्लिक करा

@_बोधकथा अधिक माहितीसाठी – येथे क्लिक करा

@_छान छान गोष्टी अधिक माहितीसाठी – येथे क्लिक करा

@_भारताचे संविधानविषयी अधिक माहितीसाठी – येथे क्लिक करा

@_जय जय महाराष्ट्र माझा mp3 अधिक माहितीसाठी – येथे क्लिक करा

@_जागतिक महिला दिन – येथे क्लिक करा 

@_सामान्यज्ञान – येथे क्लिक करा 

@_5वी शिष्यवृत्ती – येथे क्लिक करा

@_8वी शिष्यवृत्ती – येथे क्लिक करा

DECLAIMER

वरील सर्व माहिती ही संग्रहित असून आपण पडताळून पहावी. काही चुका असू शकतात. फक्त शैक्षणिक माहिती असल्याने आम्ही कोणतेही कायदेशीर हक्क (copy right) सांगत नाही.

Author: Active Guruji

Blogger

आपल्या प्रतिक्रिया लिहा.

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.