13 जानेवारी दिनविशेष
सप्तरंगी परिपाठ
आज वार- शुक्रवार,
दिनांक- 13/01/2023,
मिती- पौष कृ.6
शके– 1944,
सुविचार- शिकणाऱ्याला शिकवावं लागत नाही; तो स्वतःहून शिकतो.
आजचा दिनविशेष-
ठळक घटना आणि घडामोडी-
सोळावे शतक-
१५५९ – एलिझाबेथ पहिली इंग्लंडच्या राणीपदी.
सतरावे शतक-
१६१० – गॅलिलियोने गुरूचा चौथा उपग्रह, कॅलिस्टोचा शोध लावला.
एकोणिसावे शतक-
१८४२ – काबुलमधुन माघार घेणाऱ्या ब्रिटीश-भारतीय सैन्याच्या १६,५०० सैनिक व असैनिकांपैकी असिस्टंट सर्जन विल्यम ब्रायडन हा एकमेव जिवंत व्यक्ती जलालाबादला पोचला.
१८४७ – काहुएन्गाचा तहाने कॅलिफोर्नियातील मेक्सिकन अमेरिकन युद्ध संपले.
१८४९ – चिलियनवालाच्या लढाईमध्ये शीखांचा इंग्रजांविरुद्ध विजय.
१८९९ – गोविंद बल्लाळ देवल यांच्या संगीत शारदा या नाटकाचा पहिला प्रयोग इंदूर येथे झाला.
विसावे शतक-
१९१५ – इटलीतील अवेझानो येथे भूकंप. २९,८०० ठार.
१९३० – मिकी माउसची चित्रकथा प्रथम प्रकाशित.
१९४२ – अमेरिकेने जपानी वंशाच्या अमेरिकन नागरिकांना बंदिवासात पाठविण्यास सुरुवात केली.
१९५३ – मार्शल जोसिप ब्रोझ टिटो युगोस्लाव्हियाच्या अध्यक्षपदी.
१९५७ – हिराकुद धरणाचे उद्घाटन झाले.
१९६४ – कोलकाता येथे झालेल्या मुस्लिमविरोधी दंग्यात १०० जण ठार
१९८२ – वॉशिंग्टन डी.सी.च्या विमानतळावरून निघाल्यावर एर फ्लोरिडा फ्लाइट ९० हे बोईंग ७३७ जातीचे विमान कोसळले. रस्त्यावरील ४ सह ७८ ठार.
१९९१ – लिथुएनियाची राजधानी व्हिल्नियस येथील स्वातंत्र्यसैनिकांवर रशियन सैनिकांनी हल्ला केला
१९९६ – पुणे मुंबई शताब्दी एक्सप्रेस सुरू झाली.
एकविसावे शतक-
२००१ – एल साल्वाडोरमध्ये भूकंप. ८००हून अधिक ठार.
२००२ – घशात प्रेत्झेल अडकून अमेरिकन अध्यक्ष जॉर्ज डब्ल्यू. बुश बेशुद्ध.
२०११ – भारतातील शेवटची पोलियो रुग्ण सापडली.
जन्म-
१३३४ – हेन्री दुसरा, कॅस्टिलचा राजा.
१५९६ – यान फान गोयॉॅं, डच चित्रकार.
१६१० – मरिया आना, ऑस्ट्रियाची राणी
१८९६ -मनोरमा रानडे, मराठी कवयत्री.
१९१९- एम. चेन्ना रेड्डी, आंध्र प्रदेशचे ११ वे मुख्यमंत्री, उत्तर प्रदेशचे राज्यपाल (१९७४ – १९७७), पंजाबचे राज्यपाल (१९८२ – १९८३), राजस्थानचे राज्यपाल (१९९२ – १९९३), तामिळनाडूचे राज्यपाल (१९९३ – १९९६)
१९२६ – शक्ती सामंत, हिंदी व बंगाली चित्रपट दिग्दर्शक व निर्माते
१९३८ – पं. शिवकुमार शर्मा, संतूरवादक व संगीतकार
१९४८ – गज सिंघ, जोधपूरचा राजा.
१९४९ – राकेश शर्मा, एकूण १३८ वा व पहिला भारतीय अंतराळवीर
१९७७ – ऑरलॅन्डो ब्लूम, इंग्लिश चित्रपट अभिनेता.
१९८३ – इम्रान खान, भारतीय चित्रपट अभिनेता.
मृत्यू-
७०३ – जिटो, जपानी सम्राज्ञी.
८५८ – वेसेक्सचा एथेलवुल्फ.
८८८ – जाड्या चार्ल्स, पवित्र रोमन सम्राट.
११७७ – हेन्री दुसरा, ऑस्ट्रियाचा राजा.
१३३० – फ्रेडरिक पहिला, ऑस्ट्रियाचा राजा.
१६९१ – जॉर्ज फॉक्स, क्वेकर्स या ख्रिश्चन पंथाचा स्थापक.
१७६६ – फ्रेडरिक पाचवा, डेन्मार्कचा राजा.
१८३२ – थॉमस लॉर्ड, लॉर्ड्स क्रिकेट मैदानाचे संस्थापक.
१९२६ – मनोरमा रानडे, मराठी कवयत्री.
१९२९ – वायट अर्प, अमेरिकन शेरिफ
१९७६ – अहमद जॉं थिरकवा, तबला वादक
१९७८ – ह्युबर्ट एच. हम्फ्री, अमेरिकेचा उपराष्ट्राध्यक्ष.
१९८५ – मदन पुरी, हिंदी व पंजाबी चित्रपटअभिनेता
१९८८ – च्यांग चिंग-कुओ, तैवानचा राष्ट्राध्यक्ष.
१९९७ – शंभू सेन, भारतीय संगीत व नृत्य दिग्दर्शक
२००१ – श्रीधर गणेश दाढे, संस्कृतपंडित व लेखक.
२०११ – प्रभाकर पणशीकर, मराठी अभिनेता.
२०१३ – रुसी सुरती, भारतीय क्रिकेट खेळाडू.
प्रतिवार्षिक पालन-
केप वेर्देचा लोकशाही दिन
स्वातंत्र्यदिन : टोगो
राष्ट्रगीत-
जनगणमन अधिनायक जय हे
भारत भाग्य-विधाता |
पंजाब, सिंधू, गुजरात, मराठा, द्राविड, उत्कल, बंग,
विंध्य, हिमाचल, यमुना, गंगा,
उच्छल जलधितरंग,
तव शुभ नामे जागे तव शुभ आशिस मागे,
गाहे तव जयगाथा,
जनगण मंगलदायक जय हे,
भारत भाग्य-विधाता|
जय हे, जय हे, जय हे,
जय जय जय, जय हे ||
प्रतिज्ञा-
भारत माझा देश आहे.
सारे भारतीय माझे बांधव आहेत.
माझ्या देशावर माझे प्रेम आहे.
माझ्या देशातल्या समृद्ध आणि
विविधतेने नटलेल्या परंपरांचा मला अभिमान आहे.
त्या परंपरांचा पाईक होण्याची पात्रता
माझ्या अंगी यावी म्हणून मी सदैव प्रयत्न करेन.
मी माझ्या पालकांचा, गुरुजनांचा आणि
वडीलधाऱ्या माणसांचा मान ठेवीन
आणि प्रत्येकाशी सौजन्याने वागेन.
माझा देश आणि माझे देशबांधव
यांच्याशी निष्ठा राखण्याची
मी प्रतिज्ञा करीत आहे.
त्यांचे कल्याण आणि
त्यांची समृद्धी ह्यांतच माझे
सौख्य सामावले आहे.
जय हिंद
भारताचे संविधान
उद्देशिका
आम्ही, भारताचे लोक, भारताचे एक सार्वभौम
समाजवादी धर्मनिरपेक्ष लोकशाही गणराज्य घडविण्याचा
व त्याच्या सर्व नागरिकांस
सामाजिक, आर्थिक व राजनैतिक न्याय;
विचार, अभिव्यक्ती, विश्वास, श्रद्धा
व उपासना यांचे स्वातंत्र्य;
दर्जाची व संधीची समानता;
निश्चितपणे प्राप्त करून देण्याचा
आणि त्या सर्वांमध्ये व्यक्तीची प्रतिष्ठा व राष्ट्राची एकता
आणि एकात्मता यांचे आश्वासन देणारी बंधुता
प्रवर्धित करण्याचा संकल्पपूर्वक निर्धार करून;
आमच्या संविधानसभेत
आज दिनांक सव्वीस नोव्हेंबर, १९४९ रोजी
याद्वारे हे संविधान अंगीकृत आणि अधिनियमित
करून स्वतःप्रत अर्पण करीत आहोत.
प्रार्थना-
मनाचे श्लोक
बोधकथा-
पसायदान-
आता विश्वात्मकें देवें । येणे वाग्यज्ञें तोषावें ।
तोषोनिं मज द्यावे । पसायदान हें ॥
जें खळांची व्यंकटी सांडो । तया सत्कर्मी- रती वाढो ।
भूतां परस्परे पडो । मैत्र जिवाचें ॥
दुरितांचे तिमिर जावो । विश्व स्वधर्म सूर्यें पाहो ।
जो जे वांच्छिल तो तें लाहो । प्राणिजात ॥
वर्षत सकळ मंगळी । ईश्वरनिष्ठांची मांदियाळी ।
अनवरत भूमंडळी । भेटतु भूतां ॥
चलां कल्पतरूंचे आरव । चेतना चिंतामणींचें गाव ।
बोलते जे अर्णव । पीयूषाचे ॥
चंद्रमे जे अलांछन । मार्तंड जे तापहीन ।
ते सर्वांही सदा सज्जन । सोयरे होतु ॥
किंबहुना सर्व सुखी । पूर्ण होऊनि तिन्हीं लोकी ।
भजिजो आदिपुरुखी । अखंडित ॥
आणि ग्रंथोपजीविये । विशेषीं लोकीं इयें ।
दृष्टादृष्ट विजयें । होआवे जी ॥
येथ ह्मणे श्री विश्वेशराओ । हा होईल दान पसावो ।
येणें वरें ज्ञानदेवो । सुखिया जाला ॥
देशभक्तीपर गीत-
बालगीत-
सामान्यज्ञान
किल्ले माहिती-
चंदेरी किल्ला
हा २३०० फुट उंचीचा गिरीदुर्ग प्रकारातील किल्ला आहे. ठाणे जिल्ह्यातील माथेरान डोंगर रांगेतील हा किल्ला ट्रेकर्सच्या दृष्टीने कठीण समजला जातो. भरपूर प्रमाणत लोक या ठिकाणी भेट देण्यासाठी व किल्ला पाहण्यासाठी येत असतात.
मुंबई-पुणे लोहमार्गावरून कल्याणहून कर्जतकडे जाताना एक डोंगररांग आहे. त्यातून आपला भला थोरला माथा उंचावलेला एक प्रचंड सुळका दिसतो. त्याचे नाव चंदेरी. बदलापूर-वांगणी स्थानकादरम्यान बदलापूर-कर्जत रस्त्यावर गोरेगाव नावाचे गाव आहे. येथूनच चंदेरीची वाट आहे.
नाखिंड, चंदेरी, म्हसमाळ नवरी बोयी या डोंगररांगेतील एक व पनवेलच्या प्रभागमंडळाचे मानकरी असणाऱ्या कर्नाळा, प्रबळगड, इरशाळगड, माणिकगड, पेब, माथेरान आणि अशा कितीतरी गडांपैकी एक म्हणजे चंदेरी होय. चंदेरीच्या पायथ्याशी असलेली घनदाट वृक्षराजी, गवताळ घसरडी वाट अन मुरमाड निसरडा कातळमाथा म्हणजे सह्याद्रीतील एक बेजोड असा हा कठीण परिसर आहे. तामसाई गावाच्या हद्दीत असणारा असा हा दुर्ग प्रस्तरारोहण कलेची आवड असणाऱ्या गिर्यारोहकांचे खास आकर्षण आहे.
इतिहास
खरे तर रायगड जिल्ह्याचे दुर्गभूषण शोभणारा हा किल्ला असूनही तसे नाव घेण्याजोगे इथे काही घडले नाही. किल्ल्यावरील गुहेच्या अलिकडे एक पडक्या अवस्थेतील शेष तटबंदी दिसते. किल्लेपणाची हीच काय ती खूण. मे १६५६ मध्ये शिवरायांनी कल्याण भिवंडी-रायरी पर्यंतचा सारा मुलुख घेतला. तेव्हा त्यात हा गडही मराठ्यांच्या ताब्यात आला अल्प विस्तार, पाण्याची कमी साठवणूक, बांधकामाचा अभाव मर्यादित लोकांची मुक्कामाची सोय. अतिशय अवघड वाट हे सारे पाहून हा किल्ला नसून एक लष्करी चौकी असेच वाटते. काही जणांच्या मते ७ ऑक्टोबर १९५७ रोजी चंदेरी किल्ल्याच्या सुळक्यावर संघटित प्रस्तरारोहणाचा प्रारंभ झाला.
गडावरील पाहण्यासारखी ठिकाणे
गुहेत पूर्वी एक शिवलिंग व नंदी होता. शिवपिंड भंगलेल्या अवस्थेत आहे. तर नंदीचे अपहरण झाले आहे. गुहेच्या अलीकडेच एक सुमधुर पाण्याचे टाके आहे ऑक्टोबर शेवटपर्यंतच त्यात पाणी असते. ८ ते १० जणांच्या मुक्कामासाठी गुहा उत्तम आहे.
गुहेच्या थोडे पुढे सुळक्याच्या पायथ्याशी देखील एक टाके आहे. कातळमाथ्याचा विस्तार फक्त लांबी पुरताच आहे. सुळक्यावरून उगवतीला माथेरान, पेब, रबळची डोंगररांग इ. दिसते. तर मावळतीला भीमाशंकरचे पठार, सिद्धगड, गोरक्षगड, पेठचा किल्ला इ. दिसतात. गडाच्या पायथ्याचा परीसर पावसाळ्यात फारच रमणीय व विलोभनीय असतो. धबधब्याचा आस्वाद घ्यायला अनेक पर्यटक येथे येतात.
गडावर जाण्याच्या वाटा
मुंबई-कर्जत लोहमार्गवरील ‘वांगणी’ या रेल्वे स्थानकावर उतरावे. तेथून लोहमार्गाच्या कडेकडेने (बदलापूरच्या दिशेस) जाणाऱ्या वाटेने गोरेगाव गाठावे. मुख्य रस्त्यावरून डावीकडे जाणारी वाट (कच्ची सडक) चिंचोली या पयथ्याच्या गावी घेऊन जाते. बदलापूर स्थानकात उतरून चिंचोलीस साधारण पाऊण तासाची पायपीट करूनही पोहचता येते. (वांगणी स्थानकातून गोरेगाव पर्यंत जाण्यास भाड्याची वाहनेही मिळतात.) चिंचोली गावास उजवीकडे ठेऊन वर जाणाऱ्या दोन वाटा आहेत. एका लहानशा टेकाडाच्या दोन बाजूंनी ह्या वाटा जातात.
गुहेत ६ ते १० जणांची राहण्याची सोय आहे. पाण्याची सोय ऑक्टोबर शेवटपर्यंत पावसावर अवलंबून असते. तसेच टाक्यांत पाणी असते. चिंचोली गावातून किल्ल्यावर जाण्यासाठी दीड तासांचा वेळ लागतो.
व्यक्ती विशेष-
राकेश शर्मा
(जन्म : १३ जानेवारी १९४९) हे अंतरिक्षात जाणारे पहिले भारतीय आहेत. भारताचा पहिला आणि जगाचा १३८ वा अंतराळवीर बनण्याचा सन्मान विंग कमांडर राकेश शर्मा यांनी पटकावला तो २ एप्रिल १९८४ रोजी. भारत-रशिया अवकाश संशोधन मंडळ कार्यक्रमांतर्गत रशियाच्या सोयूझ टी-११ यानातून दोन रशियन अंतराळ संशोधकासमवेत राकेश शर्माने अवकाश सफरीचा अनुभव घेऊन या क्षेत्रात प्रगतीचे नवे दालन भारतीयांसाठी खुले केले.
राकेश शर्मा पंतप्रधान इंदिरा गांधी यांच्याशी अंतराळातून बोलत होते. “अंतराळातून भारत कसा दिसतो?”, या प्रश्नाला त्यांनी “सारे जहॉंसे अच्छा हिंदोस्तॉं हमारा’ असे अभिमानी उत्तर दिले होते.
पतियाळात जन्मलेला राकेश भारतीय वायू दलात वैमानिक होता. नंतरच्या काळात त्यांचा अशोक चक्र देऊन सन्मान केला गेला.