रूप नको, गुण पाहा.
चला शिकूया-
कथेचे समजपूर्वक आकलन होणे.
गरुडाकडे एकदा सर्व पक्षी जेवायला आले.
मोर आला.
कोंबडा आला.
हंस आला.
पोपट आला.
सारे पक्षी आले.
कोणाचा रंग सुंदर, कोणाचे अंग सुंदर, कोणाची चोच धारदार, कोणाचे पंख ऐटदार. ……. पण कोकीळ आला नाही.
गरुड, पोपट आणि हंस सगळे मिळून कोकिळाकडे गेले.
गरुड म्हणाला, ‘कोकिळभाऊ चला.’
कोकीळ म्हणाला, ‘मी येत नाही. मला चांगला रंग नाही. चांगले रूप नाही. सगळे मला चिडवतील.’
गरुड म्हणाला, ‘असं दुसऱ्याबद्दल बोलणं किंवा चिडवणं बरोबर नाही. आपला रंग काही आपण ठरवत नाही.’
पोपट म्हणाला, ‘आणखी एक सांगू? दिसण्यावरून कोणाला चिडवू नये. कोणाला काय येतं हे बघावं.’
मग कोकीळ तयार झाला. सर्वांबरोबर गेला. जेवणानंतर त्याने गाणे म्हटले. त्याबरोबर सर्व पक्षी आनंदाने नाचू लागले.
मोर म्हणाला, ‘वाहवा! असं गाणं मला येत असतं तर किती छान झालं असतं!’ कोकिळाला फार बरे वाटले.
– वि. वा. शिरवाडकर
पक्षी बोलू लागले तर ….