महिला शिक्षण दिन | 3 जानेवारी | सावित्रीबाई फुले यांची जयंती

महिला शिक्षण दिन

3 जानेवारी ,सावित्रीबाई फुले यांची जयंती

महिला शिक्षण दिन
मनोरंजक टेस्ट सोडवा….

सावित्रीबाई फुलेंची जयंती सर्वत्र साजरी होणार….

क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले शिक्षिका क्रांतीज्योती यांच्या जीवनावर आधारीत भाषणे,सावित्रीबाई फुले यांचा ३ जानेवारी निबंध, वक्तृत्व स्पर्धा, परिसंवाद व
एकांकिकांचे आयोजन करण्यात येणार.

त्याचप्रमाणे सर्व शासकीय निमशासकीय कार्यालयात, शाळेत क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात येईल.                                          क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांचे त्यांच्या नावाने स्त्री शिक्षणात कार्यरत शिक्षिका, अधिकारी,स्त्री शिक्षाणातील योगदान, त्यांचे सामाजिक कार्यकर्त्या यांना पुरस्कार देणार.

क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांचे समाजातील सर्व घटकांपर्यंत पोहचवण्यासाठी ऑनलाईन तसेच ऑफलाईन चर्चासत्र आयोजित केले जातील. क्रांतीज्योती सावित्रीबाई फुलें यांची हँशटॅग वापरून नव्या पिढीला यात सामावून घेतले जाईल.

सावित्रीबाई फुले यांनी रुजविलेली शैक्षणिक मुल्ये पुढील जातील आणि समाजमाध्यमांवर पुढच्या पिढीपर्यंत संक्रमित करण्यासाठी  सावित्री महिला शिक्षण दिन साजरा केला जात आहे.

सावित्रीबाई फुले स्री शिक्षणाच्या प्रणेत्या, भारतातील पहिली मुलींची शाळा पुणे येथे स्थापन करुन या शाळेच्या मुख्याध्यापक बनल्या. त्यांनी १८ शाळा सुरु केल्या. बालकांच्या हत्या थांबाव्यात म्हणून बालक व विधवा आश्रमांची स्थापना केली.

विधवा पुनर्विवाहाच्या कायद्यासाठी यांनी खूप प्रयत्न केले. महिलांच्या केशवपना विरोधात संप घडवला.

शिक्षणाच्या प्रणेत्या, स्त्रीयांच्या मुक्तीदात्या, क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांचे शिक्षणातील योगदान खूप आहे. त्यांनी रुजवलेली  शैक्षणिक मूल्ये पुढील पिढीत संक्रमित करण्यासाठी ३ जानेवारी हा त्यांचा जन्मदिवस राज्यात ‘महिला शिक्षण दिन’ राज्यात साजरा करण्यात येणार.  this info. माहिती शालेय शिक्षणमंत्री प्रा. वर्षाताई गायकवाड यांनी दिली.

Author: Active Guruji

Blogger

One thought

आपल्या प्रतिक्रिया लिहा.

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.