केंद्रप्रमुख भरती

कें.प्रमुख भरती परीक्षा- 17 जून 2023 रोजी
मा. मंत्री, शालेय शिक्षण विभाग यांचे अध्यक्षतेखाली दिनांक 26/05/2023 रोजी राज्य मंडळ, पुणे येथे बैठक घेण्यात आली.
सदरील बैठकीसाठी राज्य शैक्षणिक संशोधन प्रशिक्षण परिषद, शिक्षण संचालक, संबंधित अधिकारी तसेच इतर अधिकारी उपस्थित होते.
खालीलप्रमाणे सूचना
महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेमार्फत याबाबत कार्यवाही सुरू आहे. आयबीपीएस या कंपनी मार्फत याबाबतचे परीक्षा घेण्यात येणार असून सदरची परीक्षा 17 जून रोजी घेण्याचे प्रस्तावित असले बाबत सांगण्यात आले.
17 जून रोजी परीक्षा घेऊन सदर परीक्षेचा निकाल 25 जून च्या दरम्यान जाहीर करणे. 30 जून पर्यंत केंद्रप्रमुखांचे निवड पूर्ण करून त्यांना नियुक्ती देणे बाबत कार्यवाही करावी.
असे बैठकीच्या इतिवृत्त मध्ये स्पष्ट करण्यात आले आहे.
केंद्रप्रमुख पदांचा अभ्यासक्रम व पुस्तके
@शिक्षण विस्तार अधिकारी व केंद्रप्रमुख पदांचा अभ्यासक्रम व महत्वाची संदर्भ पुस्तके
#केंद्र प्र. पदे प्राथमिक शिक्षकांमधून 50 टक्के पदोन्नतीने व 50 टक्के विभागीय स्पर्धा परीक्षाने भरणार शासन निर्णय दिनांक ०१.१२.२०२२- केंद्रप्रमुख पदे ५०-५० टक्के GR
कें.प्र. पदाच्या भरतीसाठी शासनाचे नवे शुद्धीपत्रक केंद्रप्रमुख होण्यासाठी कोण आहेत पात्र शिक्षक ?
1. विभागीय परीक्षेसाठी सर्व जिल्हा परिषद शिक्षक ज्यांनी पदवी ही अहर्ता 50 टक्के गुणांसह प्राप्त केली आहे. आणि पदवी प्राप्त केल्याच्या दिनांकापासून 3 वर्षे सलग सेवा (शिक्षण सेवक कालावधी वगळून) केली आहे,
ज्यांचं वय 50 पेक्षा कमी आहे. ते सर्व जिल्हा परिषद शिक्षक विभागीय परीक्षेसाठी पात्र ठरतात.
दिनांक 01 डिसेंबरच्या शासन निर्णयानुसार प्रशिक्षित पदवीधर शिक्षक (प्राथमिक) या पदावर काम करणारे शिक्षक पात्र होते. त्यात बदल करण्यात येऊन विभागीय परीक्षा आता सर्व शैक्षणिक अहर्ता असणाऱ्या जिल्हा परिषद शिक्षकांना देता येईल.
२. पदोन्नतीसाठी पुढीलप्रमाणे बदल करण्यात आला आहे.
वरील बदलामुळे आता पदोन्नतीने केंद्रप्रमुख होण्यासाठी मात्र तो प्रशिक्षित पदवीधर शिक्षक पदावर तीन वर्षे सेवा केलेला असावा,
यासाठी गुणांच्या 50 टक्केची अट नाही.
सेवाजेष्ठतेने प्रशिक्षित पदवीधर शिक्षकांमधून पदोन्नती होईल असे दोन महत्वाचे बदल झाले आहेत.
One thought