राज्यात मराठी शाळांमध्ये CBSE अभ्यासक्रम कधीपासून ?

राज्यात मराठी शाळांमध्ये CBSE अभ्यासक्रम कधीपासून ?

शिष्यवृत्ती परीक्षा 2025 इयत्ता पाचवी

महाराष्ट्र राज्य पाठ्यपुस्तक निर्मिती व अभ्यासक्रम संशोधन मंडळ बालभारती ने दिनांक 20 मे 2025 रोजी निर्गमित केलेल्या परिपत्रकानुसार

शैक्षणिक वर्ष २०२५-२६ मध्ये नव्याने प्रकाशित करावयाची पाठ्यपुस्तके तसेच पाठ्यस्तकांच्या बदलाबाबत पुढील प्रमाणे निर्देश दिले आहेत.
शैक्षणिक वर्ष २०२५-२०२६ साठी पाठ्यपुस्तकांच्या संदभनि झालेल्या बदलाबाबतची माहिती या परिपत्रका‌द्वारे कळविण्यात येत आहे.
1. संदर्भ क्रमांक २ च्या शासन निर्णयान्वये शैक्षणिक वर्ष २०२५-२०२६ व त्यापुढे पूर्वीप्रमाणेच नियमित (विषयनिहाय) पाठ्यपुस्तके वांच्या पानांशिवाय उपलब्ध करून दिली जातील.
2. संदर्भ क्रमांक ३ च्या शासन निर्णयान्वये राष्ट्रीय शैक्षणिक धोरणानुसार तयार करण्यात आलेल्या नवीन अभ्यासक्रमाची अंमलबजावणी राज्यातील शाळांमध्ये सर्व संबंधित विभागांमार्फत शैक्षणिक वर्ष २०२५-२६ पासून टप्प्या-टप्प्याने खालीलप्रमाणे करण्यात येत आहे.

अंमलबजावणी वर्ष-

इयत्ता 1 ली-
शैक्षणिक वर्ष 2025-2026
इयत्ता 2री, 3री, 4थी व 6वी-
शैक्षणिक वर्ष 2026-2027
इयत्ता 5वी, 7वी, 9वी व 11वी-
शैक्षणिक वर्ष 2027-2028
इयत्ता 8वी, 10वी व 12वी-
शैक्षणिक वर्ष 2028-2029

पुस्तके प्रकाशन कधी ?

3. शैक्षणिक वर्ष २०२५-२६ मध्ये इयत्ता १ लीची पाठ्यपुस्तके नव्याने प्रकाशित होणार असून पूर्वीप्रमाणेच नियमित (विषयनिहाय) पाठ्यपुस्तके वह्यांच्या पानांशिवाय उपलब्ध करून दिली जातील. तसेच अनुक्रमांक २ नुसार राष्ट्रीय शैक्षणिक धोरणानुसार नवीन अभ्यासक्रमाची अंमलबजावणी होणार असल्याने त्या-त्या शैक्षणिक वर्षानुसार सदर इयत्तांच्या पाठ्यपुस्तकांची खरेदी आवश्यकतेनुसार करण्यात यावी.
4. इयत्ता १ ली ते इयत्ता ८ वीची सर्व नियमित (विषयनिहाय) पाठ्यपुस्तके शाळा सुरू होण्यापूर्वी उपलब्ध करून दिली जातील.

अभ्याक्रमात काय बद्दल असेल ?

5. इयत्ता १ लीच्या खेळू करू-शिकू या पाठ्यपुस्तकाऐवजी शिक्षक हस्तपुस्तिकेची निर्मिती राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परीषद, पुणे कार्यालयामार्फत करण्यात येणार आहे.
6. इयत्ता १ लीसाठी “खेल खेल में सिखे हिंदी” (मराठी व इंग्रजी माध्यमांसाठी) या पाठ्यपुस्तकाबाञ्चत सर्व संबंधितांना अलहिदा कळविण्यात येईल.
7. मराठी शिवाय अन्य माध्यमांच्या शाळांतील इयत्ता १ लीच्या विद्यार्थ्यांसाठी ‘मजेत शिकूया’ मराठी या पाठ्यपुस्तकासंदर्भात अलहिदा कळविण्यात येईल.
8. शैक्षणिक वर्ष २०२५-२०२६ (जून २०२५) हे इयत्ता २ री, इयत्ता ३ री, इयत्ता ४ थी व इयत्ता ६ वी या इयत्तांच्या पाठ्यपुस्तकांचे शेवटचे वर्ष राहील. त्यामुळे या इयत्तांच्या पाठ्यपुस्तकांची खरेदी आवश्यकतेनुसार करण्यात यावी.
9. इयत्ता २ री ते इयत्ता ८ वीच्या एकात्मिक व नियमित पाठ्यपुस्तकांमधील आशय, मुल्यमापन योजना समान आहे. तसेच ही दोन्ही प्रकारची पाठ्यपुस्तके प्रचलित अभ्यासक्रमावर आधारीत आहेत. याबाबतची नोंद सर्व संबंधितांनी घेण्यात यावी.

पाठ्यपुस्तक खरेदी –

10. पाठ्यपुस्तक मंडळाचे नोंदणीकृत पुस्तक विक्रेते व शैक्षणिक संस्था यांना पाठ्यपुस्तकांच्या खरेदीवर १५ टक्के वटाव देण्यात येतो. तथापि, दिनांक २६.०३.२०२५ पासून फक्त एकात्मिक पाठ्यपुस्तकांच्या खरेदीवर अधिकचा ५% बटाव देण्यात येईल. सदर रकमेचे समायोजन हंगाम कालावधी संपल्यानंतर करण्यात येईल.
11. पाठ्यपुस्तक मंडळाचे नोंदणीकृत पुस्तक विक्रेते व शैक्षणिक संस्था यांचेकडे इयत्ता ३ री ते ८ वीच्या शिल्लक असलेल्या एकात्मिक पाठ्यपुस्तकांबाबत निवेदन प्राप्त झाल्यास विक्री हंगामानंतर सदचा विषय नियामक मंडळाच्या सभेत सादर करण्यात येईल, तद्नंतर घेतलेला निर्णय सर्व संबंधितांना कळविण्यात येईल.
तरी वरीलप्रमाणे पाठ्यपुस्तकांची रचना व बदलाबाबतची नोंद राज्यातील सर्व नोंदणीकृत पुस्तक विक्रेते, शैक्षणिक संस्था व इतर सर्व संबंधितांनी घ्यावी.
क्रमांक : व/ड/६/112-4
दिनांक : 20 MAY 2025
(कृष्णकुमार पाटील)
संचालक,
पाठ्यपुस्तक मंडळ, पुणे-४.

Tags-

राज्यात मराठी शाळांमध्ये CBSE अभ्यासक्रम कधीपासून ? इयत्ता 1 ली- शैक्षणिक वर्ष 2025-2026,

CBSE Syllabus 2025-26,cbse class 10 syllabus 2025-26,CBSE Syllabus 2025-26 Class 12,class 10 syllabus 2025-26 cbse official website,CBSE syllabus,class 12 syllabus 2025-26 cbse official website,cbse class 11 syllabus 2025-26,CBSE syllabus 2025-26 Class 9

Author: Active Guruji

Blogger

आपल्या प्रतिक्रिया लिहा.

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.