शिवजयंती, छत्रपती शिवाजी महाराज जयंती मराठी भाषण
शिवजयंती भाषणे, 19 फेब्रुवारी

| नाव | छत्रपती शिवाजीराजे शहाजीराजे भोसले |
| जन्म | १९ फेब्रुवारी १६३० |
| वडिलांचे नाव | शहाजीराजे भोसले |
| आईचे नाव | राजमाता जिजाऊ |
| राज्याभिषेक | ६ जून इ.स.१६७४ |
| मृत्यू | ३ एप्रिल १६८० |
शिवजयंती मराठी भाषण, Speech On Shivjayanti-1
देशाचा अभिमान शिवाजी…..राष्ट्राची शान शिवाजी !
स्वराज्याचं दुसरं नाव शिवाजी…..संपूर्ण जगाचे दैवत शिवाजी !!
- सर्वांना नमस्कार.
- माझे नाव सचिन आहे.
- आज आपण इथे शिवजयंती साजरी करण्यासाठी एकत्र जमलो आहोत.
- प्रथम, सर्वांना शिवजयंतीच्या खूप खूप शुभेच्छा !
- छत्रपती शिवाजी महाराज हे मराठा साम्राज्याचे संस्थापक व रयतेचे राजे होते.
- छत्रपती शिवाजी महाराजांचा जन्म १९ फेब्रुवारी १६३० रोजी शिवनेरी किल्ल्यावर झाला.
- त्यांच्या आईचे नाव जिजाबाई व वडिलांचे नाव शहाजीराजे भोसले होते.
- शिवाजी महाराजांनी अफजलखानाचा वध करून प्रतापगडावर मोठा पराक्रम गाजवला.
- त्यांनी खूप चतुराईने अनेक गड व किल्ले जिंकले.
- शिवाजी महाराज हे आज जरी आपल्यात नसले तरी त्यांचे कार्य आपल्याला नेहमी प्रेरणा देते.
बोला – शिवाजी महाराज की जय !
जय महाराष्ट्र ! जय जिजाऊ !
शिवजयंती मराठी भाषण, Speech On Shivjayanti-2
श्वासात रोखूनी वादळ, डोळ्यांत रोखली आग, देव आमचा छत्रपती, एकटा मराठी वाघ…!
छत्रपती शिवाजी महाराज हे एक शूर, धाडसी व पराक्रमी योद्धा होते. त्यांनी शून्यातून केलेली स्वराज्य निर्मिती सर्वांसाठी प्रेरणादायी आहे. ते हिंदवी स्वराज्याचे संस्थापक तसेच महान युगपुरुष होते.
छत्रपती शिवाजी महाराजांचा जन्म १९ फेब्रुवारी १६३० रोजी महाराष्ट्रातील शिवनेरी किल्ल्यावर झाला. त्यांचे पूर्ण नाव शिवाजी शहाजी भोसले असे होते. त्यांच्या वडिलांचे नाव शहाजीराजे भोसले व आईचे नाव जिजाबाई होते.
शिवराय लहानपणापासून अत्यंत हुशार व चाणाक्ष बुद्धीचे होते. माता जिजाऊंनी त्यांना उत्तम संस्कार व शिकवण दिली तर वडिलांकडून त्यांना शौर्याचा वारसा मिळाला. तसेच दादोजी कोंडदेवांनी त्यांना युद्धकौशल्य व नीतिशास्त्र शिकवले.
बालवयातच माता जिजाऊ त्यांना रामायण-महाभारतातील पराक्रमाच्या गोष्टी सांगत. त्यामुळे शिवरायांच्या अंगी पराक्रम, प्रजादक्षता हे गुण आले. माता जिजाऊंनी बालवयातच त्यांच्या मनात स्वराज्याचे स्वप्न बिंबवले.
शिवरायांनी मावळ्यांसोबत रायरेश्वराच्या मंदिरात जाऊन स्वराज्याची प्रतिज्ञा केली. तोरणा किल्ला जिंकून स्वराज्याचे तोरण बांधले. शिवरायांना तानाजी मालुसरे, बाजी प्रभू देशपांडे, मुरारबाजी असे जीवाला जीव देणारे मावळे मिळाले. त्यांनी गनिमी कावा, दृढ इच्छाशक्ती व मूठभर मावळ्यांच्या साथीने अनेक गड व किल्ले जिंकले. अनेक बलाढ्य शत्रूना पराभूत केले.
६ जून १६७४ रोजी शिवरायांचा राज्याभिषेक झाला. जनतेला न्यायप्रिय राजा मिळाला. त्यांच्या स्वराज्यात कोणताही भेदभाव नव्हता. स्त्रियांना आदर व सन्मान होता. शेतकयांना मान होता.
अखेर ३ एप्रिल १६८० मध्ये आपल्या राजांची प्राणज्योत मालवली. छत्रपती शिवाजी हे महाराज हे संपूर्ण देशासाठी एक आदर्श आहेत.
जय जिजाऊ ! जय शिवाजी !
छत्रपती शिवाजी महाराज जबरदस्त मराठी शायरी
1) स्वराज्याचे बांधून तोरण, शत्रूंना आणले शरण ….
देशाला आहे त्यांचा अभिमान, छत्रपती शिवबांचे गाऊ गुणगान ….
2) आले किती, गेले किती, उडून गेले भरारा ….
संपला नाही आणि संपणारही नाही, माझ्या शिवबांचा दरारा …
3) कलम नव्हते, कायदा नव्हता, तरीही सुखी होती प्रजा,
कारण सिंहासनावर होता ….माझा छत्रपती शिवाजी राजा ….
4) इतिहासाच्या पानावर…..रयतेच्या मनावर,
मातीच्या कणावर अन्…. विश्वासाच्या प्रमाणावर,
राज्य करणारा राजा म्हणजे…..राजा शिवछत्रपती !!.
5) प्रजेला ज्यांनी समजले मायबाप…शत्रूचा झाला थरकाप !
स्त्रीला दिला मातेचा सन्मान…छत्रपती शिवरायांचा….आहे आम्हाला अभिमान !
6) राजे तुम्हीच अस्मिता…..तुम्हीच महाराष्ट्राची शान !
जगती तुम्हीच छत्रपती…. तुम्हीच आमचा स्वाभिमान !
7) दगडालाही पाझर फुटला, वाराही शांत झाला ….
१९ फेब्रुवारी १६३० ला, जिजाऊ पोटी शिवबा जन्मला ….
8) शब्दही पडतील अपुरे, अशी शिवबांची किर्ती…
राजा शोभूनी दिसे जगती, अवघ्या जगाचा शिवछत्रपती !
9) सह्याद्रीचा सिंह गर्जतो, शिवशंभू राजा ….
दरीदरीतून नाद गुंजला, महाराष्ट्र माझा ….
10) जाणता राजा असा, एकच होऊन गेला …
इतिहासाच्या पानामध्ये, नाव आपले कोरून गेला….
11) शिवनेरीवर एक तारा चमकला, जिजाऊंच्या पोटी सिंह जन्मला !
मानाचा मुजरा करतो शिवाजी महाराजांना, ज्यांनी मराठी मातीत भगवा झेंडा रोवला !!
12) लखलख, चमचम तळपत होती, शिवबांची तलवार ….
महाराष्ट्राला घडवणारे, तेच खरे शिल्पकार ….
13) सह्याद्रीच्या कुशीतून, एक हिरा चमकला ….
भगवा टिळा चंदनाचा, शिवनेरीवर प्रकटला ….
Quotes On ShivJayanti in Marathi
छत्रपती शिवाजी महाराजांनी मुठभर मावळ्यांना सोबत घेऊन हिंदवी स्वराज्याची स्थापना केली. जुलमी राजसत्तांविरुद्ध लढा देऊन रयतेचं राज्य निर्माण केलं.
तुम्ही आपल्या व्हॉट्सअप स्टेटसला छत्रपती शिवाजी महाराजांचे सुंदर स्टेटस ठेवू शकता. तुमची छाती अभिमानानं भरून येईल.
1) श्वासात रोखूनी वादळ, डोळ्यांत रोखली आग, देव आमचा छत्रपती, एकटा मराठी वाघ…!
2) इतिहासाच्या पानावर, रयतेच्या मनावर.. मातीच्या कणावर आणि विश्वासाच्या प्रमाणावर, राज्य करणारा राजा म्हणजे राजा शिवछत्रपती
3) जगणारे ते मावळे होते.. जगवणारा तो महाराष्ट्र होता.. पण स्वत:च्या कुटुंबाला विसरुन जनतेवर मायेने हात फिरवणारा ‘आपला शिवबा’ होता..
4) सह्याद्रीचा सिंह गर्जतो शिवशंभू राजा…. दरीदरीतून नाद गुंजला महाराष्ट्र माझा….!!!
5) एक होतं गाव महाराष्ट्र त्याचं नाव आणि स्वराज्य ज्यांनी घडवलं शिवराय त्यांचे नाव राजांना त्रिवार मानाचा मुजरा
Quotes On ShivJayanti In ENGLISH
- “Of all the rights of women, the greatest is to be a Mother.”
- “Even if there were a sword in the hands of everyone, it is willpower that establishes a government.”
- “Freedom is a boon, which everyone has the right to receive.”
- “Never bend your head, always hold it high.”