Site icon Active Guruji

कोण आले मदतीला? | Kon aale madtila,1ली ,बालभारती-4

कोण आले मदतीला?

चला शिकूया.-

घटना, कृती आणि पात्र यांना एकसंघपणे पाहून त्यांचे समजपूर्वक वाचन करता येणे.

[शाळेच्या आवारात मुलामुलींचा घोळका… सगळ्यांचे लक्ष समोरच्या बाजूने आकाशात दिसणाऱ्या धुराच्या दिशेने…रुग्णवाहिका, अग्निशामक दलाची गाडी आवाज करत जाताना…]
अमित – अरे बापरे! समोर पाहा ना. किती मोठा धूर दिसत आहे.
रोहित – हो ना! अरे अमित, त्या बाजूला मेघनाच्या आजोबांचे शेत आहे.
शिक्षक – अरे मुलांनो! शांत राहा….शांत राहा. गोंगाट करू नका. शेतात काहीतरी घटना घडलेली दिसत आहे. [तेवढ्यात शाळेचेसेवक तेथे येतात.]

सेवक – सर, भाऊंच्या शेताच्या बाजूला असलेल्या गोठ्याला आग लागली आहे.
त्यांच्या गाई-म्हशींना आगीची थोडीशी झळ लागली आहे.
शिक्षक – भाऊही शेतात होते का?
सेवक – होते ना……. भाऊंच्या शेतात काही मजूरही काम करत होते. ते मदतीला धावून गेले. त्यांनाही थोडे भाजले आहे.
सुमन – सर, आग कशामुळे लागली असेल?
शिक्षक – याबाबत पोलीस सर्व चौकशी करतील. तेव्हाच नेमके कारण कळू शकेल.

तनया – पण फायर ब्रिगेडची गाडी, ॲम्ब्युलन्स कोणी बोलावली असेल?
सेवक – अगं तनया, भाऊंच्या मुलाने पटापट १००, १०१, १०८ या नंबरवर फोन लावले. फोन करताच अग्निशामक दलाची गाडी आली. त्या जवानांनी भराभर आग विझवली. डॉक्टर आले. त्यांनी भाऊंना व शेतमजुरांना तपासले. औषध दिले. काही मजुरांना थोडे भाजले होते. नर्सने नेत्यांना लावायला मलम दिले. बघ्यांची गर्दी खूप झाली तेवढ्यात पोलीसही आले. गाई-म्हशींवर उपचार करण्यासाठी डॉक्टरही आले.

शिक्षक – पण सर्वजण ठीक आहेत ना?
सेवक – सुदैवाने फारसं काही झालं नाही. वेळेवर सर्वांची मदत मिळाली.
शिक्षक – आपणही भाऊंना भेटायला जायला हवे. पाहिलंत ना मुलांनो, संकटाच्या वेळी कोण-कोण मदतीला धावून आले? सर्वांनी केलेल्या मदतीमुळेच फारसे नुकसान झाले नाही. म्हणूनच आपण या सर्वांचे आभार मानायला हवेत.

मराठी व सेमी माध्यम

पहिलीच्या विषयानुसार, अध्ययन निष्पती – येथे क्लिक करा 
क्र घटकाचे नाव लिंक
1 बालभारती भाग 1 क्लिक करा
2 बालभारती भाग 2 क्लिक करा
3 बालभारती भाग 3 क्लिक करा
4 बालभारती भाग 4 क्लिक करा
5 गणित (सेमी इंग्रजी) क्लिक करा
6 जुना अभ्यासक्रम क्लिक करा
या पाठ्यपुस्तकाचे एकूण चार भाग असून प्रत्येक भागासाठी स्वतंत्र पाठ्यपुस्तक आहे.
विदयार्थ्यांना एकावेळी एकाच भागाच्या पाठ्यपुस्तकाचे अध्ययन करायचे असल्याने विद्यार्थ्यांचे दप्तराचे ओझे कमी होणार आहे.
Exit mobile version