Site icon Active Guruji

Mithacha shod | मिठाचा शोध | चौथी मराठी पाठ-14

Mithacha shod

Mithacha shod

Mithacha shod

14वा पाठ – इयत्ता चौथी – Mithacha shod, मिठाचा शोध

 मिठाचा शोध – Mithacha shod पाठावर स्वाध्यायटेस्ट 

 मिठाचा शोध (Mithacha shod) पाठाचा सारांश  –

आदिमानवाला मिठाचा शोध कसा लागला याची रंजक गोष्ट या पाठात दिली आहे.

थोडक्यात उत्तरे लिहा.

प्रश्न-१) पूर्वीच्या काळी माणूस कोठे राहत असे?

उत्तर- पूर्वीच्या काळी माणूस जंगलामध्ये राहत असे.

प्रश्न-२) खनिज मीठाला आपण काय म्हणतो?

उत्तर- खनिज मीठाला आपण सैंधव मिठ म्हणतो.

प्रश्न-३) माणसाने समुद्राचे पाणी यापासून मीठ कसे तयार झाले?

उत्तर- उन्हामुळे खात्यातल्या पाण्याची वाफ झाली व तळाशी पाण्यातले क्षार म्हणजे मीठ तयार झाले.

दीर्घोत्तरी प्रश्न

प्रश्न- 1) समुद्राचे पाणी आदिमानवाच्या हातापायांना झोंबू लागले.

उत्तर- आदिमानवाच्या हातापायावर खरचटून जखमा झाल्या होत्या, म्हणून समुद्राचे क्षारयुक्त पाणी आदिमानवाच्या हातापायांना झोंबू लागले.

प्रश्न- 2) समुद्रकिनाऱ्यावर आदिमानवाने लांब खड्डा खणला? 

उत्तर- समुद्रकिनाऱ्यावर आदिमानवाने लांब खड्डा खणला कारण त्याला समुद्राचे पाणी त्यात साठवायचे होते.

प्रश्न- 3) आदिमानवाने दगड चाटून का पाहिला?

उत्तर- काही हरणे एका झाडाच्या बुंध्याशी असलेला दगड चाटताना आदिमानवाने पाहिले म्हणून कुतुहलाने त्याने दगड चाटून पाहिला.

प्रश्न- समानार्थी शब्द लिहा.

जंगल – वन, झाड – वृक्ष, दिवस – दिन, समुद्र – सागर, पाणी – जल

प्रश्न-  विरुद्धार्थी शब्द लिहा.

पूर्वी – हल्ली, शंका – खात्री, आधी – नंतर, आवड – नावड, आनंद – दुःख,  समाधान – असमाधान, ओळखी – अनोळखी.

प्रश्न- अनेकवचन लिहा.

हरिण – हरिणे , गोष्ट -गोष्टी,  दगड – दगड.

प्रश्न- शब्दसमुहाचा वाक्यात उपयोग करा.

निरीक्षण करणे –

मनोजने काढलेल्या चित्रांचे  बाईनी निरीक्षण केले.

कुतूहल वाटणे-

प्राणिसंग्रहालयात कोणकोणते प्राणी पहायला मिळतील याचे शरदला कुतूहल वाटले.

Exit mobile version