म्हणी व अर्थ : अपयश हे मरणाहून वोखटे: अपयश मरणापेक्षा भयंकर आहे व लाजीरवाणे आहे.
वाक्प्रचार- नवल वाटणे- आश्चर्य वाटणे, चकित होणे.
अण्णाभाऊ साठे
अण्णाभाऊ साठेंचा जन्म १ ऑगस्ट १९२० रोजी सांगली जिल्ह्यातील वाळवा तालुक्यातील वाटेगाव या गावी झाला. त्यांच्या वडिलांचे नाव भाऊराव साठे व आईचे नाव वालुबाई साठे होते. साठे हे शाळेत शिकलेले नाही, केवळ दीड दिवस ते शाळेत गेले नंतर तेथील सवर्णांद्वारे होणाऱ्या भेदभावामुळे त्यांनी शाळा सोडून दिली.
त्यांनी दोन लग्न केलीत, त्यांची पहिली पत्नी कोंडाबाई साठे तर दुसरी जयवंता साठे ह्या होत. त्यांना एकूण तीन अपत्ये होती – मधुकर, शांता आणि शकुंतला.
साठे पहिल्यांदा कॉ. श्रीपाद अमृत डांगे यांच्या कम्युनिस्ट विचारसरणीने प्रभावित झाले.१९४४ मध्ये दत्ता गवाणकर आणि अमर शेख या शाहिरांच्या सोबत त्यांनी लालबावटा कला पथक स्थापन केले.
याद्वारे त्यांनी अनेक सरकारी निर्णयांना आव्हान दिले होते. ते १९४० च्या दशकामध्ये कार्यरत राहिले आणि तेविया अब्राम्स यांच्यानुसार, भारतातील साम्यवादाच्या आधी स्वातंत्र्याच्या नंतरची “१९५० च्या दशकातील सर्वात रोमांचक नाटकीय घटना” होती.
भारतीय स्वातंत्र्य्यानंतर उच्चवर्णीयांचे भारतावरील शासन त्यांना मान्य नव्हते म्हणून त्यांनी १६ ऑगस्ट १९४७ रोजी मुंबई येथे वीस हजार लोकांचा मोर्चा काढला.
and
आणि त्या मोर्च्यातील घोषणा होती, “ये आझादी झूठी है, देश कि जनता भूखी है!” इंडियन पीपल्स थिएटर असोसिएशनमध्येही ते एक महत्त्वपूर्ण व्यक्तिमत्त्व होते, जी भारतीय कम्युनिस्ट पक्षाची एक सांस्कृतिक शाखा होती.
आणि संयुक्त महाराष्ट्र चळवळीमध्ये, ज्याने भाषिक विभागातून वेगळे मराठीभाषी राज्य (बॉम्बे राज्य) निर्माण करण्याची मागणी केली होती.
साठे यांनी डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या शिकवणुकींना अनुसरत दलित कार्याकडे वळले आणि दलित व कामगारांच्या जीवनातील अनुभवांना प्रकट करण्यासाठी त्यांच्या कथांचा वापर केला.
इ.स. १९५८ मध्ये, बॉम्बेमध्ये स्थापन केलेल्या पहिल्या दलित साहित्य संमेलनात आपल्या उद्घाटन भाषणात त्यांनी म्हटले की, “पृथ्वी ही शेषनागाच्या मस्तकावर तरलेली नसून दलित व कामगार लोकांच्या तळहातावर तरलेली आहे”यातून त्यांनी जागतिक संरचनांमध्ये दलित आणि कामगार वर्गांचे महत्त्व स्पष्ट केले.
या काळातील बहुतांश दलित लेखकांच्या विपरित, साठेंचे कार्य मार्क्सवादाच्या प्रभावाखाली होते.
त्यांनी म्हटले आहे की, “दलित लेखकांना सध्याच्या सांसारिक व हिंदू अत्याचारांपासून दलितांना मुक्त करणे आणि त्यांचे संरक्षण करण्याची जबाबदारी देण्यात आली आहे.
कारण दीर्घकालीन पारंपरिक श्रद्धांना त्वरित नष्ट केले जाऊ शकत नाही.
साठे यांनी मराठी भाषेत ३५ कादंबऱ्या लिहिल्या. त्यामध्ये फकिरा (१९५९) समाविष्ट आहे, जिला इ.स. १९६१ मध्ये राज्य सरकारच्या उत्कृष्ट कादंबरीचा पुरस्कार मिळाला आहे. साठेंच्या लघु कथांचा संग्रह १५ आहे, ज्यामध्ये मोठ्या संख्येने बऱ्याच भारतीय भाषांमध्ये आणि २७ अ-भारतीय भाषांमध्ये भाषांतरित केल्या गेल्या आहेत.
कादंबरी आणि लघुकथा यांच्याव्यतिरिक्त साठे यांनी नाटक, रशियातील भ्रमंती, १२ पटकथा आणि मराठी पोवाडा शैलीतील १० गाणी लिहिली.
लोकमान्य टिळक
लोकमान्य टिळकांचा जन्म २३ जुलै १८५६ रोजी झाला. लोकमान्य टिळक एका मराठी कुटुंबात महाराष्ट्रातील रत्नागिरी जिल्ह्यातील चिखली या गावी जन्मले व त्यांचे बालपण देखील येथेच गेले.
लहानपणापासून टिळकांमध्ये देशप्रेमाची भावना निर्माण झालेली होती. टिळक छत्रपती शिवाजी महाराजांना आपले आदर्श मानत असत.
टिळकांनी स्वराज्याची संकल्पना भारतातील लोकांमध्ये रुजवली आणि म्हणून इंग्रजांनी त्यांना ‘भारतीय अशांततेचे जनक’ म्हणून संबोधले आणि टिळकांनी इंग्रज शासनाविरुद्ध बंड पुकारले, ज्यामुळे इंग्रजांनी त्यांना ६ वर्षासाठी कारावासाची शिक्षा सुनावली.
मंडालेच्या तुरुंगात सहा वर्षाची शिक्षा भोगत असताना लोकमान्य टिळकांनी ‘गीतारहस्य’ हा ग्रंथ लिहिला.
देश व समाजात स्वराज्याबद्दल जागृती व प्रेम निर्माण करण्यासाठी लोकमान्य टिळकांनी केसरी व मराठा ही वृत्तपत्र सुरू केली.
लोकांना एकत्र आणून राष्ट्रीयत्वाची भावना निर्माण करण्यासाठी टिळकांनी गणेशोत्सव व शिवजयंती साजरी करणे सुरू केले.
बाळ गंगाधर टिळक यांना आधुनिक भारत आणि आशियाई राष्ट्रवादाचे शिल्पकार म्हणूनही ओळखले जाते.
भारतीयांमध्ये राष्ट्रीयत्वाची भावना निर्माण करणारे महान व्यक्तिमत्व लोकमान्य टिळक यांचे १ ऑगस्ट १९२० रोजी आजारपणामुळे निधन झाले.
ठळक घटना आणि घडामोडी
ऑगस्ट १ हा ग्रेगरी दिनदर्शिकेनुसार वर्षातील २१३ वा किंवा लीप वर्षात २१४ वा दिवस असतो.
सहावे शतक
५२७ – जस्टीनियन पहिला बायझेन्टाईन सम्राटपदी.
तेरावे शतक
१२९१ – स्वित्झर्लंड राष्ट्राची रचना.
पंधरावे शतक
१४६१ – एडवर्ड चौथा इंग्लंडच्या राजेपदी.
१४९२ – ज्यू व्यक्तींची स्पेनमधून हकालपट्टी.
१४९८ – क्रिस्टोफर कोलंबसने व्हेनेझुएलात पाउल ठेवले.
सतरावे शतक
१६९१ – अमेरिकेत पहिले आफ्रिकन गुलाम आणले गेले.
१६६४ – सेंट गॉट्टहार्डची लढाई – ऑट्टोमन साम्राज्याचा पराभव.
अठरावे शतक
१७७४ – जोसेफ प्रीस्टली व कार्ल विल्हेमने ऑक्सिजन मूलद्रव्याचा शोध लावला.
एकोणिसावे शतक
१८०० – ग्रेट ब्रिटन व आयर्लंडच्या राज्यांचे युनायटेड किंग्डममध्ये विलीनीकरण.
१८३१ – लंडन ब्रिज वाहतुकीस खुला.
१८३४ – ब्रिटीश साम्राज्याने गुलामगिरीस बंदी असल्याचे जाहीर केले.
१८३८ – त्रिनिदाद व टोबेगोतील गुलामांना मुक्ती.
१८७६ – कॉलोराडो अमेरिकेचे ३८वे राज्य झाले.
१८९४ – पहिल्या चीन-जपान युद्धास सुरुवात.
विसावे शतक
१९०२ – अमेरिकेने फ्रांसकडून पनामा कालवा बांधून वापरण्याचे हक्क विकत घेतले.
१९१४ – पहिले महायुद्ध – जर्मनीने रशिया विरुद्ध युद्ध पुकारले.
१९२७ – चीनी गृहयुद्ध – नान्चांगचा उठाव.
१९३६ – बर्लिनमध्ये १९३६ उन्हाळी ऑलिंपिक सुरू.
१९४४ – ऍन फ्रॅंकने आपल्या रोजनिशीत शेवटची नोंद केली.
१९४४ – पोलंडची राजधानी वॉर्सोमध्ये नाझींविरुद्ध सशस्त्र उठाव.
१९५७ – अमेरिका व कॅनडाने उत्तर अमेरिकी हवाई संरक्षण कमांड (नोरॅड)ची रचना केली.
१९६० – बेनिनला फ्रांसपासून स्वातंत्र्य.
१९६६ – अमेरिकेच्या ऑस्टिन, टेक्सास शहरातील युनिव्हर्सिटी ऑफ टेक्सास, ऑस्टिनच्या मुख्य इमारतीतून चार्ल्स व्हिटमनने १५ लोकांना गोळ्या घालून ठार मारले. पोलिसांनी व्हिटमनलाही ठार केले.
एका माणसाला चार मुले होती. त्या चारही भावांचे आपापसात बिलकुल पटत नसे. ते सतत एकमेकांशी छोट्यामोठ्या कारणांवरून भांडत राहायचे. कधी कधी मारामारीही करायचे. त्यांचे आईवडील त्यांना उपदेश करून करून थकले होते, पण त्यांच्यावर काही परिणाम नव्हता. त्या माणसाचे मोठे शेत होते.
तो त्या मुलांना कामासाठी शेतावर घेऊन जायचा. पण तिथेही ते कोणी कोणतं काम करावं, कोणी कमी काम केलं, कोणी जास्त काम केलं अशा क्षुल्लक गोष्टींवरून भांडत राहायचे आणि काम बाजुला राहायचं. गावातली मंडळी त्यांना फार नावे ठेवत असत.
तो माणुस आता म्हातारा होत आला होता.
त्याला आपल्या मुलांची फार काळजी वाटत होती. आपल्यानंतर यांच्यात काहीच सलोखा राहणार नाही, बाकी लोक त्याचा फायदा घेतील अशी त्याला फार भीती वाटत असे.
so
एक दिवस त्याने आपल्या मुलांना वेगळ्या पद्धतीने समजावुन सांगायचे ठरवले. त्याने आपल्या सर्व मुलांना बोलावले, आणि रानात जाऊन सरपणासाठी म्हणुन वाळलेल्या लाकडी काटक्या आणायला सांगितले.
ते सर्व रानात जाऊन आले आणि बऱ्याच काटक्या गोळा करून आले. पुन्हा कोणी जास्त आणल्या यावरून त्यांची स्पर्धा सुरु झाली.
त्यांचे वडील म्हणाले, “पोरांनो जरा इकडे लक्ष द्या. प्रत्येकाने एक एक काडी उचला आणि तोडुन दाखवा.”
मुलांनी क्षणार्धात एकेक काड्या घेऊन काडकन तोडुन टाकल्या.
वडील म्हणाले “शाब्बास. आता या तुम्ही आणलेल्या काटक्यांची घट्ट मोळी बांधा आणि तिला तोडून दाखवा.”
मुलांनी घट्ट बांधलेली मोळी तोडण्याचा प्रयत्न करून पाहिला.
प्रचंड जोर लावुनही एकालाही मोळी तोडता आली नाही.
वडील गालातल्या गालात हसत होते. त्यांनी सांगितले “पाहिलंत मुलांनो? एक एक काडी तोडायला काही बळ लागत नाही. पण हेच जर काही काड्या एकत्र आल्या आणि त्यांना घट्ट बांधले कि कोणालाही तोडता येत नाही.”
“तुम्हा भावांचे पण असेच आहे.
and
तुम्ही एकमेकांशी भांडुन एकेकटेच राहायला लागलात तर कोणीही बाहेरचा येऊन तुम्हाला त्रास देऊ शकेल. पण तेच जर तुम्ही एकमेकांना घट्ट धरून राहिलात, आधार दिलात, तर तुमच्या एकीच्या शक्तीला कोणी तोडू शकणार नाही.”
“आपली माणसे हि एकमेकांना आधार देण्यासाठीच असतात.
क्षुल्लक कारणांवरून भांडत बसायला नाही. आता मी म्हातारा झालो. माझ्यानंतर तुम्हीच एकमेकांसाठी असणार. तेव्हा आता फुटकळ भांडणे सोडा. एकमेकांना मदत करायला शिका.”
त्यादिवशी मुलांनाही जाणीव झाली आणि त्यांनी विनाकारण भांडणे सोडुन दिले.
एकमेकांची मदत करत खेळीमेळीने राहण्यात जो आनंद असतो तो त्यांनाही अनुभवायला मिळाला. त्यांच्या वडिलांनी उरलेले आयुष्य समाधानाने घालवले.
#1 august, 1 august 2023, 1 august 2021 panchang, 1 august 2022 special day, 1 august 2023 weather, 1 august 2022 panchang in hindi, 31 august is celebrated as, what is celebrated on 1 august, 1 august 2022,
शालेय परिपाठ,परिपाठ दाखवा,मराठी परिपाठ,परिपाठ शायरी,शालेय परिपाठ सूत्रसंचालन,परिपाठ सुविचार,हिंदी परिपाठ
DECLAIMER
वरील सर्व माहिती ही संग्रहित असून आपण पडताळून पहावी. काही चुका असू शकतात. फक्त शैक्षणिक माहिती असल्याने आम्ही कोणतेही कायदेशीर हक्क (copy right) सांगत नाही.