हळूच या हो हळूच या
दुसरी मराठी प्रश्नोत्तर
१) काय ते लिही.
अ) दवबिंदूचे पडतात – सडे
आ) फुले आनंदाने उधळतात – सुगंध
२) कसे ते लिही.
१) फुलांकडे जावे – हळूच
२) फुलांची हृदय – इवलीशी
३) कोठे ते लिही.
अ) फुले लपून बसतात ते ठिकाण – पानांच्या आड
आ) तऱ्हेतऱ्हेचे रंग – अंगावरती
४) तर काय झाले असते –
वारा सुटला नसता तर – फुले डोलली नसती
५) एका वाक्यात उत्तरे लिही.
अ) इतरांना देण्यासारखी कोणती गोष्ट तुझ्याजवळ आहे ?
उत्तर- पेन,खोडरबर
आ) फुलाप्रमाणे आणखी कोणाचा सुगंध सगळीकडे पसरतो?
उत्तर- मिठाई,भजी
इ) फुलाप्रमाणे आणखी कोणाचे मन निर्मल , सुंदर असते?
उत्तर- लहान मुलांचे
ई) तुला कोणत्या फुलांचा रंग व वास आवडतो?
उत्तर- गुलाब, चाफा ,मोगरा ,जाई-जुई,झेंडू ,कमळ
६) पुढील शब्दांचे समानार्थी शब्द काय?
उत्तर- अ) लहान-छोटा
आ) खोटे खोटे-लटकेच
इ) सुवास-सुगंध
ई) मन-हृदय

