Site icon Active Guruji

28.चांदोबाच्या देशात | 2री,मराठी

28.चांदोबाच्या देशात

१) आकाशात गेल्यावर मुले काय करणार आहेत?

उत्तर-आकाशात गेल्यावर ढगाच्या गादीवर झोपणार आहे.आकाशगंगा पाहणार आहे.

२) चांदोबा मुलांशी काय काय बोलणार आहे?

उत्तर-चांदोबा मुलांना म्हणेल कि चालून चालून तुझे पाय दुखत आहेत का,माझ्या पाठीवर बसून फिरायला चल.

३) शेवटचा उच्चार सारखा असणाऱ्या कवितेतील शब्दांच्या जोड्या पाटीवर लिही.

जसे ,बसू  -हसू

उत्तर-उडू-पडू ,लोळू-खेळू ,धावू -जेवू,बोलू-चालू ,पाय-काय,पाहू-जाऊ

४) एकच शब्द दोन वेळा येऊन तयार झालेले कवितेतील शब्द सांग.

उत्तर-मागे मागे ,मऊमऊ,चमचम,खूप-खूप,चालून चालून

५) चांदोबाच्या पाठीवर बसून फिरायला मिळाले तर तू काय करशील ते सांग.

उत्तर-मी आकाशात फिरून येईल,आकाशगंगा पाहीन,आकाशात मनसोक्त फिरून येईल,परीला भेटेल.

६) तक्त्यात सुचविल्याप्रमाणे शब्द लिही.

मूळ शब्द

तयार शब्द

मूळ शब्द

तयार शब्द

झाड

 झाडावर

तारा

ताऱ्यांसारखे

आकाश

आकाशात

पाठ

पाठीवर

ढग

ढगांवर

ताट

ताटात

घडी

घडीभर

खेळ

खेळू

चांदोबा

चांदोबाच्या

वेळ

वेळा

पंगत

पंगतीला

घर

घरात

पोट

पोटभर

मन 

मनात

Exit mobile version