Bolnari nadi
2.बोलणारी नदी- bolnari nadi lesson
इयत्ता चौथी मराठी पाठ ,
बोलणारी नदी- Bolnari nadi या पाठावर आधारित ऑनलाईन टेस्ट सोडवा.
Bolnari nadi -20 गुणांची मनोरंजक टेस्ट आहे. ज्ञानरचनावर आधारित टेस्ट आहे.
इयत्ता चौथीत शिकणाऱ्या खोडकर लीलाला बर्फाचा गोळा खायचा असतो.तिला शाळा सुद्धा बुडवायची असते.नदीने परवानगी दिली असे समजून ती खोड्या करते.तिची आजी,आई,ताई व मामा हे तिच्या खोड्या तिच्यावरच उलटवतात.अशी एकदम मजेशीर कथा आहे.
पाठ -२) बोलणारी नदी
प्रश्न-१) लीलाला कसली हौस होती?
उत्तर- लीलाला खोड्या करायची हौस होती.
प्रश्न-२) लीलाला काय खायची इच्छा होती?
उत्तर- लीलाला बर्फाचा गोळा खायचा होता.
प्रश्न-३) नदीबाई कोण कोणापेक्षा मोठी होती?
उत्तर- नदीबाई ताई,आई व माईपेक्षा मोठी होती.
प्रश्न-४) आईने पेढयांचा डब्बा कोठे ठेवला होता?
उत्तर- आईने पेढयांचा डब्बा शिंकाळ्यावरच्या बुट्टीत ठेवला होता.
प्रश्न-५) पेढा घेऊन लीला कोठे गेली?
उत्तर- पेढा घेऊन लीला गोठ्याकडे गेली.
प्रश्न-६) कोण ते लिही?
अ) बोलणारी -नदी
आ) बर्फाचा गोळा खाणारी -लीला
इ) पेढे घेऊन आलेला -भोलामामा
ई) बुट्टीत पेढ्यांचा डब्बा ठेवणारी -लीलाची आई
प्रश्न-७) लिंग बदल.
१) आई -बाबा
२) ताई -दादा
३) मामा-मामी
४) मुलगी-मुलगा
५) रेडा-म्हैस
प्रश्न-८) अनेकवचन कर.
१) डब्बा-डब्बे
२) नदी-नद्या
३) दिवस-दिवस
४) बैल-बैल
५) डोळा-डोळे
६) पेढा-पेढे
प्रश्न-९) घरदर्शक शब्द सांग.
१) गाई-म्ह्सींचा -गोठा
२) उंदराचे -बीळ
३) कोंबड्यांचा -खुराडा
४) पक्ष्यांचे -घरटे
५) मुंग्या-सापाचे -वारूळ
६) वाघाची -गुहा
प्रश्न-१०) कोण कोणास म्हणाले?
१) “नको बुडवू शाळा.”
उत्तर-लीलाची आई लीलाला म्हणाली.
२) “काय खाऊ आणलास?”
उत्तर- लीला भोलामामाला म्हणाली.
३) “तू बदामी पेढे नदीत टाकलेस!”
उत्तर-आई नीलाला म्हणाली.
४) “का गं लीला,नदी तुझ्याशी बोलते?”
उत्तर-लीलाची आजी लीलाला म्हणाली.
अधिक माहिती पहा – इयत्ता चौथी टेस्ट चौथीसाठी उपयोगी अभ्यासमित्र अॅप्लिकेशन – डाऊनलोड

