Site icon Active Guruji

7 December | 7 डिसेंबर दिनविशेष, शालेय परिपाठ, Daily Routine

7 December

7 डिसेंबर दिनविशेष

शालेय परिपाठ, Daily Routine

वार- गुरुवार 

दिनांक-  07/12/2023, 7 डिसेंबर

मिती-  कार्तिक कृष्ण पक्ष 10

शके- 1945

सुविचार- ज्ञान ही खरी शक्ती आहे..

म्हणी व अर्थ –  मनी वसे ते स्वप्नी दिसे – जशी इच्छा असेल तशी स्वप्ने पडणे.

वाक्यप्रचार- छळ करणे – त्रास देणे.

ठळक घटना आणि घडामोडी

डिसेंबर ७ हा ग्रेगरी दिनदर्शिकेनुसार वर्षातील ३४१ वा किंवा लीप वर्षात ३४२ वा दिवस असतो.

अठरावे शतक

विसावे शतक

एकविसावे शतक

जन्म

मृत्यू

प्रतिवार्षिक पालन

राष्ट्रगीत

जनगणमन अधिनायक जय हे

भारत भाग्य-विधाता |

पंजाब, सिंधू, गुजरात, मराठा, द्राविड, उत्कल, बंग,

विंध्य, हिमाचल, यमुना, गंगा,

उच्छल जलधितरंग,

तव शुभ नामे जागे तव शुभ आशिस मागे,

गाहे तव जयगाथा,

जनगण मंगलदायक जय हे,

भारत भाग्य-विधाता|

जय हे, जय हे, जय हे,

जय जय जय, जय हे ||

@_राष्ट्रगीत विषयी अधिक माहितीसाठी – येथे क्लिक करा

प्रतिज्ञा

भारत माझा देश आहे.

सारे भारतीय माझे बांधव आहेत.

माझ्या देशावर माझे प्रेम आहे.

माझ्या देशातल्या समृद्ध आणि

विविधतेने नटलेल्या परंपरांचा मला अभिमान आहे.

त्या परंपरांचा पाईक होण्याची पात्रता

माझ्या अंगी यावी म्हणून मी सदैव प्रयत्न करेन.

मी माझ्या पालकांचा, गुरुजनांचा आणि

वडीलधाऱ्या माणसांचा मान ठेवीन

आणि प्रत्येकाशी सौजन्याने वागेन.

माझा देश आणि माझे देशबांधव

यांच्याशी निष्ठा राखण्याची

मी प्रतिज्ञा करीत आहे.

त्यांचे कल्याण आणि

त्यांची समृद्धी ह्यांतच माझे

सौख्य सामावले आहे.

जय हिंद…

@_मराठी,हिंदी,संस्कृत व इंग्रजी प्रतिज्ञा अधिक माहितीसाठी – येथे क्लिक करा

राज्यगीत

जय जय महाराष्ट्र माझा, गर्जा महाराष्ट्र माझा

जय जय महाराष्ट्र माझा, गर्जा महाराष्ट्र माझा ॥धृ॥

भिती न आम्हा तुझी मुळी ही गडगडणाऱ्या नभा

अस्मानाच्या सुलतानीला जबाब देती जिभा

सह्याद्रीचा सिंह गर्जतो शिव शंभू राजा

दरी दरीतन नाद गुंजला महाराष्ट्र माझा

जय जय महाराष्ट्र माझा, गर्जा महाराष्ट्र माझा ॥१॥

काळ्या छातीवरी कोरली, अभिमानाची लेणी

पोलादी मनगटेखेळती, खेळ जीव घेणी

दारिद्रयाच्या उन्हात शिजला

निढळाच्या घामाने भिजला

देश गौरवासाठी झिजला

दिल्लीचे ही तख्त राखितो, महाराष्ट्र माझा

जय जय महाराष्ट्र माझा, गर्जा महाराष्ट्र माझा

जय जय महाराष्ट्र माझा ॥२॥

@_जय जय महाराष्ट्र माझा mp3

अधिक माहितीसाठी – येथे क्लिक करा

भारताचे संविधान

उद्देशिका

आम्ही, भारताचे लोक, भारताचे एक सार्वभौम

समाजवादी धर्मनिरपेक्ष लोकशाही गणराज्य घडविण्याचा

व त्याच्या सर्व नागरिकांस

सामाजिक, आर्थिक व राजनैतिक न्याय;

विचार, अभिव्यक्ती, विश्वास, श्रद्धा

व उपासना यांचे स्वातंत्र्य;

दर्जाची व संधीची समानता;

निश्चितपणे प्राप्त करून देण्याचा

आणि त्या सर्वांमध्ये व्यक्तीची प्रतिष्ठा व राष्ट्राची एकता

आणि एकात्मता यांचे आश्वासन देणारी बंधुता

प्रवर्धित करण्याचा संकल्पपूर्वक निर्धार करून;

आमच्या संविधानसभेत

आज दिनांक सव्वीस नोव्हेंबर, १९४९ रोजी

याद्वारे हे संविधान अंगीकृत आणि अधिनियमित

करून स्वतःप्रत अर्पण करीत आहोत.

@_भारताचे संविधानविषयी अधिक माहितीसाठी – येथे क्लिक करा

प्रार्थना

 नमने वाहुनि स्तवने
नमने वाहुनि स्तवने उधळा, जयजयकार करा
बंधुहो, जयजयकार करा
सकल मनांचा विकास येतो आज आपुल्या घरा.
विमलहास्यसुमवृष्टीमध्ये असो तुझे स्वागत
निरंतर असो तुझे स्वागत
परमात्म्याच्या चित्सौंदर्या, येई बा हासत.
आत्मवेलिच्या स्फूर्तिफुलांवर वसंत जे विकसती
बुद्धिचे वसंत जे विकसती
त्याच वसंता त्वदीय विकासा, सरस्वती बोलती.
विश्वकाव्य वाचीत बैसली चित्तमयूरावरी
दीप्‍ती जी चित्तमयूरावरी
त्या दीप्‍तीला, त्या ज्ञप्‍तीला, वदती वागीश्वरी.
  1. असो तुला देवा माझा
  2. देह मंदिर,चित्त मंदिर
  3. सर्वात्मका शिवसुंदरा
  4. केशवा माधवा
  5. या भारतात
  6. इतनी शक्ती हमे देना
  7. सत्यम शिवम सुंदरां
  8. हा देश माझा
  9. खरा तो एकची धर्म
  10. हंस वाहिनी
  11. तुम्ही हो माता
  12. शारदे मां
  13. ऐ मलिक तेरे बंदे
  14. हमको मन की शक्ती

बोधकथा

लबाड कोल्हा
एक कोल्हा एका विहिरीवर पाणी प्यावयास गेला असता, आत पडला. त्याने विहिरीतून वर येण्याचा फार प्रयत्न केला, परंतु काही उपाय चालेना. इतक्यात एक बोकड तेथे आला.
त्याने कोल्ह्यास विचारले, ‘अरे, हे चांगले आहे काय ? ’ कोल्हा उत्तर करतो, ‘गडया, किती चांगले म्हणून सांगू ? हे पाणी अमृतासारखे गोड आहे. पिता पिता माझी इच्छा तृप्तच होत नाही आणि येथून निघावे असे वाटत नाही.’
ते ऐकताच बोकडाने आत उडी टाकली. त्याची शिंगे मोठी होती, त्यांजवर पाय देऊन, कोल्हा उडी मारून, ताबडतोब विहिरीबाहेर निघून गेला.
बिचारा बोकड पाण्यात गटकळ्या खाता खात बुडून मरण पावला !
तात्पर्य : कोणावरही आंधळेपणाने विश्वास ठेवू नये .

@_बोधकथा अधिक माहितीसाठी – येथे क्लिक करा

पसायदान

आता विश्वात्मकें देवें । येणे वाग्यज्ञें तोषावें ।

तोषोनिं मज द्यावे । पसायदान हें ॥

जें खळांची व्यंकटी सांडो । तया सत्कर्मी- रती वाढो ।

भूतां परस्परे पडो । मैत्र जिवाचें ॥

दुरितांचे तिमिर जावो । विश्व स्वधर्म सूर्यें पाहो ।

जो जे वांच्छिल तो तें लाहो । प्राणिजात ॥

वर्षत सकळ मंगळी । ईश्वरनिष्ठांची मांदियाळी ।

अनवरत भूमंडळी । भेटतु भूतां ॥

चलां कल्पतरूंचे आरव । चेतना चिंतामणींचें गाव ।

बोलते जे अर्णव । पीयूषाचे ॥

चंद्रमे जे अलांछन । मार्तंड जे तापहीन ।

ते सर्वांही सदा सज्जन । सोयरे होतु ॥

किंबहुना सर्व सुखी । पूर्ण होऊनि तिन्हीं लोकी ।

भजिजो आदिपुरुखी । अखंडित ॥

आणि ग्रंथोपजीविये । विशेषीं लोकीं इयें ।

दृष्टादृष्ट विजयें । होआवे जी ॥

येथ ह्मणे श्री विश्वेशराओ । हा होईल दान पसावो ।

येणें वरें ज्ञानदेवो । सुखिया जाला ॥

@_पसायदान विषयी अधिक माहितीसाठी – येथे क्लिक करा

देशभक्तीपर गीत

स्वातंत्र्य प्राण
भारतीय नागरिकाचा घास रोज अडतो ओठी
सैनिक हो तुमच्यासाठी
वावरतो फिरतो आम्ही नित्यकर्म अवघे करतो
राबतो आपुल्या क्षेत्री चिमण्यांची पोटे भरतो
परि आठव येता तुमचा आतडे तुटतसे पोटी
आराम विसरलो आम्ही आळसा मुळी ना थारा
उत्तरेकडुनि या इकडे वार्तांसह येतो वारा
ऐकताच का अश्रुंची डोळ्यांत होतसे दाटी
उगवला दिवस मावळतो अंधार दाटतो रात्री
माउली नीज फिरवीते कर अपुले थकल्या गात्री
स्वप्‍नात येउनी चिंता काळजा दुखविते देठी
रक्षिता तुम्ही स्वातंत्र्या प्राणांस घेउनी हाती
तुमच्यास्तव आमुची लक्ष्मी तुमच्यास्तव शेतीभाती
एकट्या शिपायासाठी झुरतात अंतरे कोटी

बालगीत

असावा सुंदर चॉकलेटचा बंगला
चंदेरी सोनेरी चमचमता चांगला
चॉकलेटच्या बंगल्याला टॉफीचं दार
शेपटीच्या झुपक्यानं झाडून जाईल खार
गोल गोल लेमनच्या खिडक्या दोन
“हॅलो, हॅलो !” करायला छोटासा फोन !
बिस्कटांच्या गच्‍चीवर मोर छानदार
पेपरमिंटच्या अंगणात फुलं लाललाल
चांदीच्या झाडामागं चांदोबा रहातो
मोत्यांच्या फुलांतून लपाछपी खेळतो
उंच उंच झोक्याचा खेळ रंगला
मैनेचा पिंजरा वर टांगला
किती किती सुंदर चॉकलेटचा बंगला
चंदेरी सोनेरी चमचमता चांगला
कवी : राजा मंगळवेढेकर

@_बालगीते अधिक माहितीसाठी – येथे क्लिक करा

प्रश्नमंजुषा

१) सहकारी संस्था कोणाला म्हणतात?
उत्तर : लोकांच्या सहकार्यातून निर्माण झालेल्या संस्थांना सहकारी संस्था म्हणतात.
२) लोकांना सार्वजनिक सुविधा कशातून मिळतात?
उत्तर : लोकांनी दिलेल्या करातून त्यांना सार्वजनिक सुविधा मिळतात.
३) खेड्यांचा कारभार कोण करते ?
उत्तर : खेड्यांचा कारभार ग्रामपंचायत करते.
४) नगराचा कारभार कोण पाहते?
उत्तर : नगराचा कारभार नगरपालिका पाहते.
५) मोठ्या शहरांचा कारभार कोण पाहते ?
उत्तर: मोठ्या शहरांचा कारभार महानगरपालिका पाहते.

इंग्रजी प्रश्न

1) Which animal guards the house?
Ans: The dog guards the house
2) animal is useful for agricultural work?
Ans: Bullock is useful for agricultural work
3) What does a cow give?
Ans: Cow gives a milk
4) Which is the fastest running animal?
Ans: Cheetah is the fastest running animal.
5) Who is called tiger aunt?
Ans: The cat is called the tiger’s aunt

अधिक माहिती मिळवण्यासाठी …..

@_राष्ट्रगीत विषयी अधिक माहितीसाठी – येथे क्लिक करा

@_मराठी,हिंदी,संस्कृत व इंग्रजी प्रतिज्ञा अधिक माहितीसाठी – येथे क्लिक करा

@_बालगीते अधिक माहितीसाठी – येथे क्लिक करा

@_पसायदान विषयी अधिक माहितीसाठी – येथे क्लिक करा

@_बोधकथा अधिक माहितीसाठी – येथे क्लिक करा

@_छान छान गोष्टी अधिक माहितीसाठी – येथे क्लिक करा

@_भारताचे संविधानविषयी अधिक माहितीसाठी – येथे क्लिक करा

@_जय जय महाराष्ट्र माझा mp3 अधिक माहितीसाठी – येथे क्लिक करा

Tags

#7 december, 7 december 2023, 7 december 2021 panchang, 7 december 2022 special day, 7 december 2023 weather, 7 december 2022 panchang in hindi, 7 december is celebrated as, what is celebrated on 7 december, 7 december 2023,

शालेय परिपाठ,परिपाठ दाखवा,मराठी परिपाठ,परिपाठ शायरी,शालेय परिपाठ सूत्रसंचालन,परिपाठ सुविचार,हिंदी परिपाठ

DECLAIMER

वरील सर्व माहिती ही संग्रहित असून आपण पडताळून पहावी. काही चुका असू शकतात. फक्त शैक्षणिक माहिती असल्याने आम्ही कोणतेही कायदेशीर हक्क (copy right) सांगत नाही.

Exit mobile version