30 June
30 जून दिनविशेष
शालेय परिपाठ, Daily Routine
आज वार– शुक्रवार
दिनांक- 30/06/2023, 30 June
मिती- आषाढ शुक्ल 12
शके– 1945
सुविचार- परिश्रम म्हणजे जीवनाच्या साफल्याचे रहस्य.
म्हणी व अर्थ-
ठळक घटना आणि घडामोडी
जून ३० हा ग्रेगरी दिनदर्शिकेनुसार वर्षातील १८१ वा किंवा लीप वर्षात १८२ वा दिवस असतो.
अठरावे शतक
- १७५८ – डॉमस्टाटलची लढाई.
एकोणिसावे शतक
- १८०५ – मिशिगनला अमेरिकेचा प्रांत म्हणून मान्यता.
विसावे शतक
- १९०५ – अल्बर्ट आइनस्टाइन यांनी त्यांचा क्रांतिकारक सापेक्षतेचा सिद्धांत मांडला.
- १९०८ – तुंगस्का स्फोट.
- १९३४ – ऍडोल्फ हिटलरने आपल्या राजकीय प्रतीस्पर्ध्यांना तुरुंगात टाकले वा ठार मारले.
- १९३६ – गॉन विथ द विंड ही कादंबरी प्रकाशित.
- १९५६ – युनायटेड एरलाइन्स फ्लाइट ७१८ हे डी.सी.७ प्रकारचे व ट्रान्स वर्ल्ड एरलाइन्सचे सुपर कॉन्स्टेलेशन प्रकारचे विमान अमेरिकेतील अॅरिझोना राज्यात ग्रॅंड कॅन्यन वर एकमेकांवर आदळली. १२८ ठार.
- १९६० – कॉॅंगोला बेल्जियमपासून स्वातंत्र्य.
- १९७१ – सोवियेत संघाच्या सोयुझ ११ अंतराळयानास अपघात. ३ अंतराळवीर मृत्युमुखी.
- १९७८ – अमेरिकेच्या संविधानातील २६वा बदल संमत. मतदानाचे वय १८ वर्षे.
- १९९७ – हॉंग कॉंग चीनच्या आधिपत्याखाली.
एकविसावे शतक
- २००२ – ब्राझिलने फुटबॉल विश्वकप जिंकला.
- २००५ – स्पेनमध्ये समलिंगी लग्नास मुभा.
जन्म
- १४७० – चार्ल्स आठवा, फ्रांसचा राजा.
- १९३३ – माईक स्मिथ, इंग्लिश क्रिकेट खेळाडू.
- १९४१ – पीटर पॉलॉक, दक्षिण आफ्रिकेचा क्रिकेट खेळाडू.
- १९५४ – पिएर चार्ल्स, डॉमिनिकाचा पंतप्रधान.
- १९६६ – माईक टायसन, अमेरिकन मुष्टियोद्धा.
- १९६९ – सनत जयसुर्या, श्रीलंकेचा क्रिकेट खेळाडू.
- १९७३ – दोड्डा गणेश, भारतीय क्रिकेट खेळाडू.
मृत्यू
- १९१७ – दादाभाई नौरोजी, भारतीय नेता व अर्थशास्त्रज्ञ.
- १९१९ – जॉन विल्यम स्टूट रॅले, ब्रिटिश भौतिकशास्त्रज्ञ व नोबेल पारितोषिक विजेता.
- १९३४ – चिंतामणी नागेश रामचंद्र राव, भारतीय रसायनशास्त्रज्ञ.
- १९३४ – कर्ट फोन श्लाइशेर, जर्मनीचा चान्सेलर.
- १९९४ – बाळ कोल्हटकर, मराठी नाटककार, कवी.
प्रतिवार्षिक पालन
- स्वातंत्र्य दिन – कॉॅंगो.
राष्ट्रगीत
जनगणमन अधिनायक जय हे
भारत भाग्य-विधाता |
पंजाब, सिंधू, गुजरात, मराठा, द्राविड, उत्कल, बंग,
विंध्य, हिमाचल, यमुना, गंगा,
उच्छल जलधितरंग,
तव शुभ नामे जागे तव शुभ आशिस मागे,
गाहे तव जयगाथा,
जनगण मंगलदायक जय हे,
भारत भाग्य-विधाता|
जय हे, जय हे, जय हे,
जय जय जय, जय हे ||
@_राष्ट्रगीत विषयी अधिक माहितीसाठी – येथे क्लिक करा
प्रतिज्ञा
भारत माझा देश आहे.
सारे भारतीय माझे बांधव आहेत.
माझ्या देशावर माझे प्रेम आहे.
माझ्या देशातल्या समृद्ध आणि
विविधतेने नटलेल्या परंपरांचा मला अभिमान आहे.
त्या परंपरांचा पाईक होण्याची पात्रता
माझ्या अंगी यावी म्हणून मी सदैव प्रयत्न करेन.
मी माझ्या पालकांचा, गुरुजनांचा आणि
वडीलधाऱ्या माणसांचा मान ठेवीन
आणि प्रत्येकाशी सौजन्याने वागेन.
माझा देश आणि माझे देशबांधव
यांच्याशी निष्ठा राखण्याची
मी प्रतिज्ञा करीत आहे.
त्यांचे कल्याण आणि
त्यांची समृद्धी ह्यांतच माझे
सौख्य सामावले आहे.
जय हिंद…
@_मराठी,हिंदी,संस्कृत व इंग्रजी प्रतिज्ञा अधिक माहितीसाठी – येथे क्लिक करा
राज्यगीत
जय जय महाराष्ट्र माझा, गर्जा महाराष्ट्र माझा
जय जय महाराष्ट्र माझा, गर्जा महाराष्ट्र माझा ॥धृ॥
भिती न आम्हा तुझी मुळी ही गडगडणाऱ्या नभा
अस्मानाच्या सुलतानीला जबाब देती जिभा
सह्याद्रीचा सिंह गर्जतो शिव शंभू राजा
दरी दरीतन नाद गुंजला महाराष्ट्र माझा
जय जय महाराष्ट्र माझा, गर्जा महाराष्ट्र माझा ॥१॥
काळ्या छातीवरी कोरली, अभिमानाची लेणी
पोलादी मनगटेखेळती, खेळ जीव घेणी
दारिद्रयाच्या उन्हात शिजला
निढळाच्या घामाने भिजला
देश गौरवासाठी झिजला
दिल्लीचे ही तख्त राखितो, महाराष्ट्र माझा
जय जय महाराष्ट्र माझा, गर्जा महाराष्ट्र माझा
जय जय महाराष्ट्र माझा ॥२॥
@_जय जय महाराष्ट्र माझा mp3
अधिक माहितीसाठी – येथे क्लिक करा
भारताचे संविधान
उद्देशिका
आम्ही, भारताचे लोक, भारताचे एक सार्वभौम
समाजवादी धर्मनिरपेक्ष लोकशाही गणराज्य घडविण्याचा
व त्याच्या सर्व नागरिकांस
सामाजिक, आर्थिक व राजनैतिक न्याय;
विचार, अभिव्यक्ती, विश्वास, श्रद्धा
व उपासना यांचे स्वातंत्र्य;
दर्जाची व संधीची समानता;
निश्चितपणे प्राप्त करून देण्याचा
आणि त्या सर्वांमध्ये व्यक्तीची प्रतिष्ठा व राष्ट्राची एकता
आणि एकात्मता यांचे आश्वासन देणारी बंधुता
प्रवर्धित करण्याचा संकल्पपूर्वक निर्धार करून;
आमच्या संविधानसभेत
आज दिनांक सव्वीस नोव्हेंबर, १९४९ रोजी
याद्वारे हे संविधान अंगीकृत आणि अधिनियमित
करून स्वतःप्रत अर्पण करीत आहोत.
@_भारताचे संविधानविषयी अधिक माहितीसाठी – येथे क्लिक करा
प्रार्थना
- असो तुला देवा माझा
- देह मंदिर,चित्त मंदिर
- सर्वात्मका शिवसुंदरा
- केशवा माधवा
- या भारतात
- इतनी शक्ती हमे देना
- सत्यम शिवम सुंदरां
- हा देश माझा
- खरा तो एकची धर्म
- हंस वाहिनी
- तुम्ही हो माता
- शारदे मां
- ऐ मलिक तेरे बंदे
- हमको मन की शक्ती
बोधकथा
@_बोधकथा अधिक माहितीसाठी – येथे क्लिक करा
पसायदान
आता विश्वात्मकें देवें । येणे वाग्यज्ञें तोषावें ।
तोषोनिं मज द्यावे । पसायदान हें ॥
जें खळांची व्यंकटी सांडो । तया सत्कर्मी- रती वाढो ।
भूतां परस्परे पडो । मैत्र जिवाचें ॥
दुरितांचे तिमिर जावो । विश्व स्वधर्म सूर्यें पाहो ।
जो जे वांच्छिल तो तें लाहो । प्राणिजात ॥
वर्षत सकळ मंगळी । ईश्वरनिष्ठांची मांदियाळी ।
अनवरत भूमंडळी । भेटतु भूतां ॥
चलां कल्पतरूंचे आरव । चेतना चिंतामणींचें गाव ।
बोलते जे अर्णव । पीयूषाचे ॥
चंद्रमे जे अलांछन । मार्तंड जे तापहीन ।
ते सर्वांही सदा सज्जन । सोयरे होतु ॥
किंबहुना सर्व सुखी । पूर्ण होऊनि तिन्हीं लोकी ।
भजिजो आदिपुरुखी । अखंडित ॥
आणि ग्रंथोपजीविये । विशेषीं लोकीं इयें ।
दृष्टादृष्ट विजयें । होआवे जी ॥
येथ ह्मणे श्री विश्वेशराओ । हा होईल दान पसावो ।
येणें वरें ज्ञानदेवो । सुखिया जाला ॥
@_पसायदान विषयी अधिक माहितीसाठी – येथे क्लिक करा
देशभक्तीपर गीत
बालगीत
@_बालगीते अधिक माहितीसाठी – येथे क्लिक करा
प्रश्नमंजुषा
ENGLISH QUESTION
अधिक माहिती मिळवण्यासाठी …..
@_राष्ट्रगीत विषयी अधिक माहितीसाठी – येथे क्लिक करा
@_मराठी,हिंदी,संस्कृत व इंग्रजी प्रतिज्ञा अधिक माहितीसाठी – येथे क्लिक करा
@_बालगीते अधिक माहितीसाठी – येथे क्लिक करा
@_पसायदान विषयी अधिक माहितीसाठी – येथे क्लिक करा
@_बोधकथा अधिक माहितीसाठी – येथे क्लिक करा
@_छान छान गोष्टी अधिक माहितीसाठी – येथे क्लिक करा
@_भारताचे संविधानविषयी अधिक माहितीसाठी – येथे क्लिक करा
@_जय जय महाराष्ट्र माझा mp3 अधिक माहितीसाठी – येथे क्लिक करा
Tags
#30 june, 30 june 2023, 30 june 2021 panchang, 30 june 2022 special day, 30 june 2023 weather, 30 june 2022 panchang in hindi, 30 june is celebrated as, what is celebrated on 30 june, 30 june 2022,
शालेय परिपाठ,परिपाठ दाखवा,मराठी परिपाठ,परिपाठ शायरी,शालेय परिपाठ सूत्रसंचालन,परिपाठ सुविचार,हिंदी परिपाठ
DECLAIMER
वरील सर्व माहिती ही संग्रहित असून आपण पडताळून पहावी. काही चुका असू शकतात. फक्त शैक्षणिक माहिती असल्याने आम्ही कोणतेही कायदेशीर हक्क (copy right) सांगत नाही.
