Site icon Active Guruji

19 october | 19 ऑक्टोबर दिनविशेष, शालेय परिपाठ, Daily Routine

19 october

19 ऑक्टोबर दिनविशेष

शालेय परिपाठ, Daily Routine

वार- गुरुवार

दिनांक- 19/10/2023, 19 ऑक्टोबर

मिती-  आश्विन शुक्ल 5

शके– 1945

सुविचार- “जो निष्पाप असतो, त्याला सुखाची झोप लागते.”

म्हणी व अर्थ – नव्याचे नऊ दिवस- नवेपणा असतानाचे कौतुक नंतर टिकत नाही.

वाक्यप्रचार- आकांताने प्रयत्न करणे- जिवाची पर्वा न करता प्रयत्न करणे.

ठळक घटना आणि घडामोडी

 

ऑक्टोबर १९ हा ग्रेगरी दिनदर्शिकेनुसार वर्षातील २९२ वा किंवा लीप वर्षात २९३ वा दिवस असतो.

तेरावे शतक

पंधरावे शतक

अठरावे शतक

एकोणिसावे शतक

विसावे शतक

जन्म

मृत्यू

राष्ट्रगीत

जनगणमन अधिनायक जय हे

भारत भाग्य-विधाता |

पंजाब, सिंधू, गुजरात, मराठा, द्राविड, उत्कल, बंग,

विंध्य, हिमाचल, यमुना, गंगा,

उच्छल जलधितरंग,

तव शुभ नामे जागे तव शुभ आशिस मागे,

गाहे तव जयगाथा,

जनगण मंगलदायक जय हे,

भारत भाग्य-विधाता|

जय हे, जय हे, जय हे,

जय जय जय, जय हे ||

@_राष्ट्रगीत विषयी अधिक माहितीसाठी – येथे क्लिक करा

प्रतिज्ञा

भारत माझा देश आहे.

सारे भारतीय माझे बांधव आहेत.

माझ्या देशावर माझे प्रेम आहे.

माझ्या देशातल्या समृद्ध आणि

विविधतेने नटलेल्या परंपरांचा मला अभिमान आहे.

त्या परंपरांचा पाईक होण्याची पात्रता

माझ्या अंगी यावी म्हणून मी सदैव प्रयत्न करेन.

मी माझ्या पालकांचा, गुरुजनांचा आणि

वडीलधाऱ्या माणसांचा मान ठेवीन

आणि प्रत्येकाशी सौजन्याने वागेन.

माझा देश आणि माझे देशबांधव

यांच्याशी निष्ठा राखण्याची

मी प्रतिज्ञा करीत आहे.

त्यांचे कल्याण आणि

त्यांची समृद्धी ह्यांतच माझे

सौख्य सामावले आहे.

जय हिंद…

@_मराठी,हिंदी,संस्कृत व इंग्रजी प्रतिज्ञा अधिक माहितीसाठी – येथे क्लिक करा

राज्यगीत

जय जय महाराष्ट्र माझा, गर्जा महाराष्ट्र माझा

जय जय महाराष्ट्र माझा, गर्जा महाराष्ट्र माझा ॥धृ॥

भिती न आम्हा तुझी मुळी ही गडगडणाऱ्या नभा

अस्मानाच्या सुलतानीला जबाब देती जिभा

सह्याद्रीचा सिंह गर्जतो शिव शंभू राजा

दरी दरीतन नाद गुंजला महाराष्ट्र माझा

जय जय महाराष्ट्र माझा, गर्जा महाराष्ट्र माझा ॥१॥

काळ्या छातीवरी कोरली, अभिमानाची लेणी

पोलादी मनगटेखेळती, खेळ जीव घेणी

दारिद्रयाच्या उन्हात शिजला

निढळाच्या घामाने भिजला

देश गौरवासाठी झिजला

दिल्लीचे ही तख्त राखितो, महाराष्ट्र माझा

जय जय महाराष्ट्र माझा, गर्जा महाराष्ट्र माझा

जय जय महाराष्ट्र माझा ॥२॥

@_जय जय महाराष्ट्र माझा mp3

अधिक माहितीसाठी – येथे क्लिक करा

भारताचे संविधान

उद्देशिका

आम्ही, भारताचे लोक, भारताचे एक सार्वभौम

समाजवादी धर्मनिरपेक्ष लोकशाही गणराज्य घडविण्याचा

व त्याच्या सर्व नागरिकांस

सामाजिक, आर्थिक व राजनैतिक न्याय;

विचार, अभिव्यक्ती, विश्वास, श्रद्धा

व उपासना यांचे स्वातंत्र्य;

दर्जाची व संधीची समानता;

निश्चितपणे प्राप्त करून देण्याचा

आणि त्या सर्वांमध्ये व्यक्तीची प्रतिष्ठा व राष्ट्राची एकता

आणि एकात्मता यांचे आश्वासन देणारी बंधुता

प्रवर्धित करण्याचा संकल्पपूर्वक निर्धार करून;

आमच्या संविधानसभेत

आज दिनांक सव्वीस नोव्हेंबर, १९४९ रोजी

याद्वारे हे संविधान अंगीकृत आणि अधिनियमित

करून स्वतःप्रत अर्पण करीत आहोत.

@_भारताचे संविधानविषयी अधिक माहितीसाठी – येथे क्लिक करा

प्रार्थना

गंजल्या ओठांस माझ्या धार वज्राची मिळू दे !
आंधळ्या आत्म्यात माझ्या सूर्य सत्याचा जळू दे !
पांगळा बंदिस्त माझा जन्म आकाशून जावो
वादळी आवेग माझा चार भिंतींना कळू दे !
सारखे सौंदर्य माझ्या कोरड्या गात्री खळाळो
सारखे अस्तित्व माझे पेटतांना दर्वळू दे !
लाभु दे लाचार छाया मोठमोठ्यांना परंतू
तापल्या मातीत माझा घाम मानाने गळू दे !
  1. असो तुला देवा माझा
  2. देह मंदिर,चित्त मंदिर
  3. सर्वात्मका शिवसुंदरा
  4. केशवा माधवा
  5. या भारतात
  6. इतनी शक्ती हमे देना
  7. सत्यम शिवम सुंदरां
  8. हा देश माझा
  9. खरा तो एकची धर्म
  10. हंस वाहिनी
  11. तुम्ही हो माता
  12. शारदे मां
  13. ऐ मलिक तेरे बंदे
  14. हमको मन की शक्ती

बोधकथा

प्रवृत्ती 
एकदा एका साधूकडे राम आणि शाम असे दोन मित्र गेले. रामने विचारले. महाराज मोक्षासाठी घर का सोडावे लागते? घरीच राहिल्याने मोक्ष मिळणार नाही काय?
यावर साधू महाराजांनी रामकडे पाहिले आणि म्हणाले, ‘कोण म्हणतो, मोक्षासाठी घर सोडायलाच पाहिजे. जनकासारख्या राजाला राजावाड्यात राहूनच मोक्ष मिळाला तर मग तुला घर सोडायची काय गरज आहे?
बाहेर थांबलेला शामही मग साधू महाराजांकडे आला आणि म्हणाला, ‘घर सोडल्याशिवाय मोक्ष मिळेल का?
क्षणभर साधूंनी शामकडे पाहिले आणि म्हणाले, ‘घरात राहून सुखासुखी मोक्ष मिळाला असता तर
शुक्रासारख्यांनी गृहत्याग का केला असता?
राम आणि शाम यांना त्यांच्या प्रश्नांची उत्तरे मिळाली. पण वाटेत जाता जाता त्यांचे भांडण लागले.
राम म्हणाला, ‘मोक्ष मिळवण्यासाठी घर सोडायचेच कशाला?
घरात, राहूनदेखील मोक्ष मिळू शकतो.
तर शाम म्हणाला, ‘घर सोडल्याखेरीज मोक्ष मिळत नाही.’ ते दोघे भांडू लागले.
नंतर ते साधू महाराजांकडे गेले आणि आपल्या भांडणाचे कारण सांगितले. साधू महाराज म्हणाले, ‘दोन्ही गोष्टी बरोबर आहेत.
फक्त फरक इतकाच की ज्याची जशी वृत्ती तसा त्याचा विचार.
तुमच्या दोघांचेही जसे विचार आहेत तसाचा मोक्ष मिळणार.’
तात्पर्य : जीवनात वृत्ती आणि प्रवृत्तीला महत्त्व असते.

@_बोधकथा अधिक माहितीसाठी – येथे क्लिक करा

पसायदान

आता विश्वात्मकें देवें । येणे वाग्यज्ञें तोषावें ।

तोषोनिं मज द्यावे । पसायदान हें ॥

जें खळांची व्यंकटी सांडो । तया सत्कर्मी- रती वाढो ।

भूतां परस्परे पडो । मैत्र जिवाचें ॥

दुरितांचे तिमिर जावो । विश्व स्वधर्म सूर्यें पाहो ।

जो जे वांच्छिल तो तें लाहो । प्राणिजात ॥

वर्षत सकळ मंगळी । ईश्वरनिष्ठांची मांदियाळी ।

अनवरत भूमंडळी । भेटतु भूतां ॥

चलां कल्पतरूंचे आरव । चेतना चिंतामणींचें गाव ।

बोलते जे अर्णव । पीयूषाचे ॥

चंद्रमे जे अलांछन । मार्तंड जे तापहीन ।

ते सर्वांही सदा सज्जन । सोयरे होतु ॥

किंबहुना सर्व सुखी । पूर्ण होऊनि तिन्हीं लोकी ।

भजिजो आदिपुरुखी । अखंडित ॥

आणि ग्रंथोपजीविये । विशेषीं लोकीं इयें ।

दृष्टादृष्ट विजयें । होआवे जी ॥

येथ ह्मणे श्री विश्वेशराओ । हा होईल दान पसावो ।

येणें वरें ज्ञानदेवो । सुखिया जाला ॥

@_पसायदान विषयी अधिक माहितीसाठी – येथे क्लिक करा

देशभक्तीपर गीत

आता पेटवू सारे रान
शेतकऱ्यांच्या राज्यासाठी लावू पणाला प्राण
किसान मजूर उठतील
कंबर लढण्या कसतील
एकजुटीची मशाल घेउनी पेटवतिल हे रान !
कोण आम्हा अडवील
कोण आम्हा रडवील
अडवणूक करणाऱ्यांची उडवू दाणादाण !
शेतकऱ्यांची फौज निघे
हातात त्यांच्या बेडी पडे
तिरंगी झेंडे घेती, गाती स्वातंत्र्याचे गान !
पडून ना राहू आता खाऊ ना आता लाथा
शेतकरी अन् कामकरी मांडणार हो ठाण !

बालगीत

मामाच्या गावाला जाऊया
झुक झुक झुक झुक अगीनगाडी
धुरांच्या रेघा हवेत काढी
पळती झाडे पाहूया
मामाच्या गावाला जाऊया
मामाचा गाव मोठा
सोन्याचांदीच्या पेठा
शोभा पाहुन घेऊया
मामाची बायको गोरटी
म्हणेल कुठली पोरटी
भाच्यांची नावे सांगूया
मामाची बायको सुगरण
रोज रोज पोळी शिकरण
गुलाबजामुन खाऊया
मामा मोठा तालेवार
रेशीम घेईल हजार वार
कोट विजारी लेऊया
कवी : ग. दि. माडगूळकर

@_बालगीते अधिक माहितीसाठी – येथे क्लिक करा

प्रश्नमंजुषा

१) राज्याची राजधानी कोणती ?
उत्तर : चंदिगड
२) हिमाचल प्रदेश राज्याची राजधानी कोणती ?
उत्तर : सिमला
३) जम्मू काश्मिर राज्याची राजधानी कोणती ?
उत्तर : श्रीनगर
४) झारखंड राज्याची राजधानी कोणती ?
उत्तर : रांची
५) केरळ राज्याची राजधानी कोणती ?
उत्तर : तिरूअनंतपुरम

इंग्रजी प्रश्न

1) What is the colour of a sunflower?
Ans : Yellow
2) What is the colour of blood in a human body?
Ans : Red
3) What is the colour of a leaf in a plant?
Ans : Green
4) What  colour is the Crow ?
Ans : Black
5) Which color is at the top of the Indian national flag?
Ans : Saffron

अधिक माहिती मिळवण्यासाठी …..

@_राष्ट्रगीत विषयी अधिक माहितीसाठी – येथे क्लिक करा

@_मराठी,हिंदी,संस्कृत व इंग्रजी प्रतिज्ञा अधिक माहितीसाठी – येथे क्लिक करा

@_बालगीते अधिक माहितीसाठी – येथे क्लिक करा

@_पसायदान विषयी अधिक माहितीसाठी – येथे क्लिक करा

@_बोधकथा अधिक माहितीसाठी – येथे क्लिक करा

@_छान छान गोष्टी अधिक माहितीसाठी – येथे क्लिक करा

@_भारताचे संविधानविषयी अधिक माहितीसाठी – येथे क्लिक करा

@_जय जय महाराष्ट्र माझा mp3 अधिक माहितीसाठी – येथे क्लिक करा

Tags

#19 october, 19 october 2023, 19 october 2021 panchang, 19 october 2022 special day, 19 october 2023 weather, 19 october 2022 panchang in hindi, 19 october is celebrated as, what is celebrated on 19,19 october 2023,

शालेय परिपाठ,परिपाठ दाखवा,मराठी परिपाठ,परिपाठ शायरी,शालेय परिपाठ सूत्रसंचालन,परिपाठ सुविचार,हिंदी परिपाठ

DECLAIMER

वरील सर्व माहिती ही संग्रहित असून आपण पडताळून पहावी. काही चुका असू शकतात. फक्त शैक्षणिक माहिती असल्याने आम्ही कोणतेही कायदेशीर हक्क (copy right) सांगत नाही.

Exit mobile version