KHARA TO EKCHI DHARAM
खरा तो एकचि धर्म, प्रार्थना
खरा तो एकचि धर्म LYRICS
खरा तो एकचि धर्म
खरा तो एकचि धर्म।
जगाला प्रेम अर्पावे ॥धृ॥
जगी जे हीन अतिपतित,
जगी जे दीन पद-दलित
तया जाऊन उठवावे।
जगाला प्रेम अर्पावे ॥१॥
सदा जे आर्त अति विकल,
ज्यांना गांजिती सकल
तया जाऊन हसवावे।
जगाला प्रेम अर्पावे।।२।।
कुणा ना व्यर्थ शिणवावे,
कुणा ना व्यर्थ हिणवावे
समस्ता बंधु मानावें।
जगाला प्रेम अर्पावे ॥३॥
प्रभुची लेकरे सारी,
तयाला सर्व ही प्यारी
कुणा ना तुच्छ लेखावें
जगाला प्रेम अर्पावे॥४॥
असे हे सार धर्माचे,
असे हे सार सत्याचे
परार्था प्राण ही द्यावे।
जगाला प्रेम अर्पावे
– साने गुरूजी
अधिक माहिती मिळवण्यासाठी …..
राष्ट्रगीत विषयी अधिक माहितीसाठी – येथे क्लिक करा
मराठी,हिंदी,संस्कृत व इंग्रजी प्रतिज्ञा अधिक माहितीसाठी – येथे क्लिक करा
5वी शिष्यवृत्ती – येथे क्लिक करा
8वी शिष्यवृत्ती – येथे क्लिक करा
TAGS
DECLAIMER
वरील सर्व माहिती ही संग्रहित असून आपण पडताळून पहावी. काही चुका असू शकतात. फक्त शैक्षणिक माहिती असल्याने आम्ही कोणतेही कायदेशीर हक्क (copy right) सांगत नाही.
