Site icon Active Guruji

7 Jully | 7 जुलै दिनविशेष, परिपाठ, Daily Routine

7 Jully

7 जुलै दिनविशेष

शालेय परिपाठ, Daily Routine

आज वार– शुक्रवार

दिनांक- 07/07/2023, 7 Jully

मिती- आषाढ कृ.5

शके– 1945

सुविचार- अपयशाच्या कठीण खडकाखालीच यशाच्या पाण्याचा झरा असतो. Under the hard rock of failure There is a fountain of water of success.

म्हणी व अर्थ – बळी तो कान पिळी – बलवान माणूस इतरांवर हुकमत गाजवतो.

वाक्प्रचार- डोळे ओले होणे – रडणे.
बातम्या-
अवयव प्रत्यारोपण स्वस्त होणार – मुंबई महानगरपालिका आरोग्य विभागाचा दावा
कोकण, मध्यमहाराष्ट्रात ३ ते ४ दिवस जोरदार पावसाचा हवामान खात्याचा इशारा
आता अनेकांना मुख्यमंत्री व्हायचे आहे. ज्यांनी घडविले तेच पळवून न्यायचे सुरु आहे. – उद्धव ठाकरे
बांगलादेशचा स्टार फलंदाज तमिम इक्बाल याने आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून जाहीर केली निवृत्ती
नवी दिल्ली – शहरात शरद पवारांच्या समर्थनार्थ लावलेले बॅनर्स दिल्ली महापालिकेने काढून टाकले
मुंबई – भाजपा आमदारांची उद्या बैठक, अजित पवारांच्या एन्ट्रीनं पक्षातील काही आमदार नाराज असल्याची चर्चा
पुणे – परदेशात नोकरी देण्याच्या आमिषाने कोथरुडमधील ज्येष्ठाला १६ लाखांचा गंडा
आज राष्ट्रवादी काँग्रेसच्या वर्किंग कमिटीची बैठक, तर दुसरीकडे कोल्हापुरात समरजितसिंह घाटगे यांचं शक्तीप्रदर्शन
7 jully

ठळक घटना आणि घडामोडी

पंधरावे शतक

  • १४५६ – मृत्यूच्या २५ वर्षानंतर जोन ऑफ आर्कला निर्दोष ठरवण्यात आले.

सोळावे शतक

  • १५४३ – फ्रांसने लक्झेम्बर्गवर आक्रमण केले.

सतरावे शतक

  • १६६८ – ट्रिनिटी कॉलेजने सर आयझॅक न्यूटनला एम.ए.ची पदवी प्रदान केली.

अठरावे शतक

  • १७७७ – अमेरिकन क्रांती – हबार्टनची लढाई.
  • १७९९ – रणजीतसिंहच्या सैन्याने लाहोरला वेढा घातला.

एकोणिसावे शतक

  • १८०७ – तिल्सितचा तह – फ्रांस, रशिया व प्रशियातील युद्ध समाप्त.
  • १८४६ – अमेरिकन सैन्याने कॅलिफोर्नियातील माँटेरे व येर्बा बोयना काबीज केले.
  • १८५४ – कावसजी दावर यांनी मुंबईत पहिली कापड गिरणी सुरू केली.
  • १८६३ – अमेरिकेत सर्वप्रथम सक्तीची सैन्यभरती. १०० डॉलर भरून मुक्ती मिळवण्याची सोय.
  • १८९८ – अमेरिकेने हवाई बळकावले.

विसावे शतक

  • १९३० – अमेरिकेत हूवर धरणाचे काम सुरू.
  • १९३७ – दुसरे चीन-जपान युद्ध – जपानच्या सैन्याने बैजिंगवर चढाई केली.
  • १९४१ – दुसरे महायुद्ध – अमेरिकेचे सैन्य आइसलॅंडमध्ये उतरले.
  • १९६९ – कॅनडाने सरकारी कामकाजात फ्रेंच भाषेला इंग्लिश भाषेच्या समान स्थान दिले.
  • १९७८ – सोलोमन आयलॅंड्सला युनायटेड किंग्डमपासून स्वातंत्र्य.
  • १९९४ – एडनमध्ये यमनचे एकत्रीकरण संपूर्ण.

एकविसावे शतक

  • २००५ – दहशतवाद्यांनी लंडनमध्ये बॉम्बस्फोट घडवून आणले. ५६ ठार.

जन्म

  • १०५३ – शिराकावा, जपानी सम्राट.
  • १११९ – सुटोकु, जपानी सम्राट.
  • १८४८ – फ्रांसिस्को दि पॉला रॉद्रिगेस आल्वेस, ब्राझिलचा राष्ट्राध्यक्ष.
  • १८५६ – जॉर्ज हर्न, इंग्लिश क्रिकेट खेळाडू.
  • १९१४ – अनिल विश्वास, भारतीय संगीतकार.
  • १९१७ – फिदेल सांचेझ हर्नान्देझ, एल साल्वादोरचा राष्ट्राध्यक्ष.
  • १९७० – मिन पटेल, इंग्लिश क्रिकेट खेळाडू.
  • १९८१ – महेंद्रसिंग धोणी, भारतीय क्रिकेट खेळाडू.
  • १९८४ – मोहम्मद अशरफुल, बांगलादेशी क्रिकेट खेळाडू.

मृत्यू

  • १३०४ – पोप बेनेडिक्ट अकरावा.
  • १३०७ – एडवर्ड पहिला, इंग्लंडचा राजा.
  • १५७२ – सिगिस्मंड दुसरा ऑगस्टस, पोलंडचा राजा.
  • १९६५ – मोशे शॅरेड, इस्रायेलचा दुसरा पंतप्रधान.
  • १९६७ – विव्हियन ली, इंग्लिश अभिनेत्री.
  • १९७२ – तलाल, जॉर्डनचा राजा.
  • १९९९ – एम. एल. जयसिंहा, भारतीय क्रिकेट खेळाडू.

प्रतिवार्षिक पालन

  • गुरू रिनपोचे दिन – भुतान.
  • तनाबाता – जपान.
  • इव्हान कपाला – रशिया, युक्रेन.
  • स्वातंत्र्य दिन – सोलोमन आयलॅंड्स.
  • सान फर्मिन उत्सव (रनिंग ऑफ द बुल्स)- स्पेन.
  • शेतकरी दिन – टांझानिया.
  • जागतिक चॉकलेट दिन – राष्ट्रीय चॉकलेट दिवस अमेरिका.

राष्ट्रगीत

जनगणमन अधिनायक जय हे

भारत भाग्य-विधाता |

पंजाब, सिंधू, गुजरात, मराठा, द्राविड, उत्कल, बंग,

विंध्य, हिमाचल, यमुना, गंगा,

उच्छल जलधितरंग,

तव शुभ नामे जागे तव शुभ आशिस मागे,

गाहे तव जयगाथा,

जनगण मंगलदायक जय हे,

भारत भाग्य-विधाता|

जय हे, जय हे, जय हे,

जय जय जय, जय हे ||

@_राष्ट्रगीत विषयी अधिक माहितीसाठी – येथे क्लिक करा

प्रतिज्ञा

भारत माझा देश आहे.

सारे भारतीय माझे बांधव आहेत.

माझ्या देशावर माझे प्रेम आहे.

माझ्या देशातल्या समृद्ध आणि

विविधतेने नटलेल्या परंपरांचा मला अभिमान आहे.

त्या परंपरांचा पाईक होण्याची पात्रता

माझ्या अंगी यावी म्हणून मी सदैव प्रयत्न करेन.

मी माझ्या पालकांचा, गुरुजनांचा आणि

वडीलधाऱ्या माणसांचा मान ठेवीन

आणि प्रत्येकाशी सौजन्याने वागेन.

माझा देश आणि माझे देशबांधव

यांच्याशी निष्ठा राखण्याची

मी प्रतिज्ञा करीत आहे.

त्यांचे कल्याण आणि

त्यांची समृद्धी ह्यांतच माझे

सौख्य सामावले आहे.

जय हिंद…

@_मराठी,हिंदी,संस्कृत व इंग्रजी प्रतिज्ञा अधिक माहितीसाठी – येथे क्लिक करा

राज्यगीत

जय जय महाराष्ट्र माझा, गर्जा महाराष्ट्र माझा

जय जय महाराष्ट्र माझा, गर्जा महाराष्ट्र माझा ॥धृ॥

भिती न आम्हा तुझी मुळी ही गडगडणाऱ्या नभा

अस्मानाच्या सुलतानीला जबाब देती जिभा

सह्याद्रीचा सिंह गर्जतो शिव शंभू राजा

दरी दरीतन नाद गुंजला महाराष्ट्र माझा

जय जय महाराष्ट्र माझा, गर्जा महाराष्ट्र माझा ॥१॥

काळ्या छातीवरी कोरली, अभिमानाची लेणी

पोलादी मनगटेखेळती, खेळ जीव घेणी

दारिद्रयाच्या उन्हात शिजला

निढळाच्या घामाने भिजला

देश गौरवासाठी झिजला

दिल्लीचे ही तख्त राखितो, महाराष्ट्र माझा

जय जय महाराष्ट्र माझा, गर्जा महाराष्ट्र माझा

जय जय महाराष्ट्र माझा ॥२॥

@_जय जय महाराष्ट्र माझा mp3 

अधिक माहितीसाठी – येथे क्लिक करा

भारताचे संविधान

उद्देशिका

आम्ही, भारताचे लोक, भारताचे एक सार्वभौम

समाजवादी धर्मनिरपेक्ष लोकशाही गणराज्य घडविण्याचा

व त्याच्या सर्व नागरिकांस

सामाजिक, आर्थिक व राजनैतिक न्याय;

विचार, अभिव्यक्ती, विश्वास, श्रद्धा

व उपासना यांचे स्वातंत्र्य;

दर्जाची व संधीची समानता;

निश्चितपणे प्राप्त करून देण्याचा

आणि त्या सर्वांमध्ये व्यक्तीची प्रतिष्ठा व राष्ट्राची एकता

आणि एकात्मता यांचे आश्वासन देणारी बंधुता

प्रवर्धित करण्याचा संकल्पपूर्वक निर्धार करून;

आमच्या संविधानसभेत

आज दिनांक सव्वीस नोव्हेंबर, १९४९ रोजी

याद्वारे हे संविधान अंगीकृत आणि अधिनियमित

करून स्वतःप्रत अर्पण करीत आहोत.

@_भारताचे संविधानविषयी अधिक माहितीसाठी – येथे क्लिक करा

प्रार्थना

देहाची तिजोरी,
भक्तीचाच ठेवा
उघड दार देवा आता उघड दार देवा
पिते दूध डोळे मिटूनी
जात मांजराची
मनी चोरट्याच्या का रे
भिती चांदण्यांची
सरावल्या हातांनाही कंप का सुटावा
उजेडात होते पुण्य,
अंधारात पाप
ज्याचे त्याचे हाती आहे कर्तव्याचे माप
दुष्ट दुर्जनांची कैसी
घडे लोक सेवा
स्वार्थ जणू भिंतीवरचा
आरसा बिलोरी
आपुलीच प्रतिमा होते
आपुलीच वैरी
घडोघडी अपराध्यांचा तोल सावरावा
तुझ्या हाती पांडुरंगा
तिजोरी फुटावी
मुक्तपणे भक्ती माझी
तुझी तू लुटावी
मार्ग तुझ्या राऊळाचा
मला आकळावा
भलेपणासाठी कोणी
बुरेपणा केला
बंधनात असुनी वेडा
जगी मुक्त झाला
आपुल्याच सौख्यालागी करील तो हेवा
  1. असो तुला देवा माझा 
  2. देह मंदिर,चित्त मंदिर
  3. सर्वात्मका शिवसुंदरा
  4. केशवा माधवा 
  5. या भारतात
  6. इतनी शक्ती हमे देना
  7. सत्यम शिवम सुंदरां
  8. हा देश माझा
  9.  खरा तो एकची धर्म
  10. हंस वाहिनी
  11. तुम्ही हो माता
  12. शारदे मां
  13. ऐ मलिक तेरे बंदे
  14. हमको मन की शक्ती 

बोधकथा

बैल आणि बेडूक 
एके दिवशी बेडकाची मुलं खेळता-खेळता तलावाच्या बाहेर गेले. ते तलावाच्या नजीकच्या गावात जाऊन पोहोचले त्यांनी तिथे एक बैलाला बघितले. त्या बैलाला बघतातच त्यांना खूप आश्चर्य झाले.
या पूर्वी त्यांनी एवढे मोठे प्राणी बघितले नव्हते. त्या बैलाला बघून ते फार घाबरले. ते आश्चर्याने त्या बैलाला बघत होते तो आरामात गवत खात होता. गवत खाताना त्या बैलाने जोरात आवाज काढला.
बेडकाची मुलं घाबरून तिथून पळाली आणि तलावात येऊन लपून बसली. त्यांना घाबरलेले बघून त्यांच्या वडिलांनी घाबरण्याचे कारण विचारले.
तेव्हा त्यांनी घडलेले सर्व सांगितले आणि त्यांनी इतका मोठा प्राणी बघितला असे सांगत होते. त्यांना वाटत होते की तो बैलच खूप ताकतवर आहे आणि असं त्यांनी बोलून देखील दाखवले. हे ऐकतातच बेडकाचे अहंकार दुखावले गेले .
त्याने गर्वाने छाती फुगवून आपल्या मुलांना विचारले की “एवढा मोठा प्राणी होता का तो ?” त्याच्या मुलाने म्हटले की ” हो तो तुमच्या पेक्षा अधिक मोठा प्राणी होता. “
आता मात्र बेडकाला राग आला आणि त्याने अधिक छाती फुगवून विचारले ” की एवढा मोठा होता का तो प्राणी ? ” मुलांनी सांगितले की, हे तर काहीच नाही या पेक्षा देखील मोठा होता तो.”
असं ऐकल्यावर त्याने अजून स्वतःला फुगवायला सुरू केले असं करता करता अचानक त्याचे शरीर फुग्यारखे फाटले आणि त्याला खोट्या गर्वामुळे स्वतःचे प्राण गमवावे लागले.
तात्पर्य – कधीही कोणत्याही गोष्टीचा गर्व करू नका. गर्व केल्याने स्वतःचे नुकसान होतात.

@_बोधकथा अधिक माहितीसाठी – येथे क्लिक करा

पसायदान

आता विश्वात्मकें देवें । येणे वाग्यज्ञें तोषावें ।

तोषोनिं मज द्यावे । पसायदान हें ॥

जें खळांची व्यंकटी सांडो । तया सत्कर्मी- रती वाढो ।

भूतां परस्परे पडो । मैत्र जिवाचें ॥

दुरितांचे तिमिर जावो । विश्व स्वधर्म सूर्यें पाहो ।

जो जे वांच्छिल तो तें लाहो । प्राणिजात ॥

वर्षत सकळ मंगळी । ईश्वरनिष्ठांची मांदियाळी ।

अनवरत भूमंडळी । भेटतु भूतां ॥

चलां कल्पतरूंचे आरव । चेतना चिंतामणींचें गाव ।

बोलते जे अर्णव । पीयूषाचे ॥

चंद्रमे जे अलांछन । मार्तंड जे तापहीन ।

ते सर्वांही सदा सज्जन । सोयरे होतु ॥

किंबहुना सर्व सुखी । पूर्ण होऊनि तिन्हीं लोकी ।

भजिजो आदिपुरुखी । अखंडित ॥

आणि ग्रंथोपजीविये । विशेषीं लोकीं इयें ।

दृष्टादृष्ट विजयें । होआवे जी ॥

येथ ह्मणे श्री विश्वेशराओ । हा होईल दान पसावो ।

येणें वरें ज्ञानदेवो । सुखिया जाला ॥

@_पसायदान विषयी अधिक माहितीसाठी – येथे क्लिक करा

देशभक्तीपर गीत

ऐ मेरे प्यारे वतन, ऐ मेरे बिछड़े चमन
तुझ पे दिल कुरबान
तू ही मेरी आरजू़, तू ही मेरी आबरू
तू ही मेरी जान
तेरे दामन से जो आए
उन हवाओं को सलाम
चूम लूँ मैं उस जुबाँ को
जिसपे आए तेरा नाम
सबसे प्यारी सुबह तेरी
सबसे रंगी तेरी शाम
तुझ पे दिल कुरबान
माँ का दिल बनके कभी
सीने से लग जाता है तू
और कभी नन्हीं-सी बेटी
बन के याद आता है तू
जितना याद आता है मुझको
उतना तड़पाता है तू
तुझ पे दिल कुरबान
छोड़ कर तेरी ज़मीं को
दूर आ पहुँचे हैं हम
फिर भी है ये ही तमन्ना
तेरे ज़र्रों की कसम
हम जहाँ पैदा हुए उस
जगह पे ही निकले दम
तुझ पे दिल कुरबान
 ~प्रेम धवन

बालगीत

गोरी गोरीपान, फुलासारखी छान
दादा, मला एक वहिनी आण ।।धृ।। दादा, मला एक…
गोर्‍या गोर्‍या वहिनीची अंधाराची साडी
अंधाराच्या साडीवर चांदण्यांची खडी
चांदण्यांच्या पदराला बिजलीचा बाण ।।१।। दादा, मला एक…
वहिनीला आणायाला चांदोबाची गाडी
चांदोबाच्या गाडीला हरणांची जोडी
हरणांची गाडी तुडवी गुलाबाचे रान ।।२।। दादा, मला एक…
वहिनीशी गट्टी होता तुला दोन थापा
तुला दोन थापा, तिला साखरेचा पापा
बाहुल्यांच्यापरी होऊ दोघी आम्ही सान ।।३।। दादा, मला एक…

@_बालगीते अधिक माहितीसाठी – येथे क्लिक करा

प्रश्नमंजुषा

१) एका तासाचे किती मिनिटे होतात ?
उत्तर = ६० मिनिटे
२) एका मिनिटाचे किती सेकंद होतात ?
उत्तर: ६० सेकंद
३) एका तासाचे किती सेकंद होतात ?
उत्तर: ३६०० सेकंद
४) घड्याळातील मोठा काटा काय दाखवतो ?
उत्तर : मिनीट
५) घड्याळातील लहान काटा काय दाखवतो?
उत्तर : तास

ENGLISH QUESTION

1) How many days are there in a week?
Ans. 7 days
2) How many hours are there in a day?
Ans. 24 hours
3) How many letters are there in the English alphabet?
Ans. 26 letters
4) What is the National Anthem of India?
Ans. The National Anthem of India is Jana Gana Mana.
5) Name the national flower of India?
Ans. Lotus flower

अधिक माहिती मिळवण्यासाठी …..

@_राष्ट्रगीत विषयी अधिक माहितीसाठी – येथे क्लिक करा

@_मराठी,हिंदी,संस्कृत व इंग्रजी प्रतिज्ञा अधिक माहितीसाठी – येथे क्लिक करा

@_बालगीते अधिक माहितीसाठी – येथे क्लिक करा

@_पसायदान विषयी अधिक माहितीसाठी – येथे क्लिक करा

@_बोधकथा अधिक माहितीसाठी – येथे क्लिक करा

@_छान छान गोष्टी अधिक माहितीसाठी – येथे क्लिक करा

@_भारताचे संविधानविषयी अधिक माहितीसाठी – येथे क्लिक करा

@_जय जय महाराष्ट्र माझा mp3 अधिक माहितीसाठी – येथे क्लिक करा

Tags

#7 jully, 7 jully 2023, 7 jully 2021 panchang, 7 jully 2022 special day, 7 jully 2023 weather, 7 jully 2022 panchang in hindi, 7 jully is celebrated as, what is celebrated on 7 jully, 7 jully 2022,

शालेय परिपाठ,परिपाठ दाखवा,मराठी परिपाठ,परिपाठ शायरी,शालेय परिपाठ सूत्रसंचालन,परिपाठ सुविचार,हिंदी परिपाठ

DECLAIMER

वरील सर्व माहिती ही संग्रहित असून आपण पडताळून पहावी. काही चुका असू शकतात. फक्त शैक्षणिक माहिती असल्याने आम्ही कोणतेही कायदेशीर हक्क (copy right) सांगत नाही.

Exit mobile version